कातरवेळ
फिकट झालेत पश्चिमेला, क्षितिजावरचे रंग
क्षितीज झालंय आभाळाच्या, निळाईमध्ये दंग
उरली आहे क्षितिजावरती, अंधुक एक पिवळी रेघ
क्षितिजाच्या पल्याड दूर, बरसणारा कृष्णमेघ
अंधाराच्या शून्यात क्षितीज, कुणाला एवढं शोधतंय ?
आर्त गहिऱ्या निळाईत, वेडं स्वतःच हरवतंय !
क्षितिजाच्या मनात उठलंय, चांदण्यांचं काहूर
अंतरात मंतरलेली… अनाहत हुरहूर
वाऱ्यासारखं सैरावैरा, मनासारखं अधीर झालंय
क्षितीज त्याच्या क्षितीजासाठी, केवढं सैरभैर झालंय
शांतपणे रात्र दुरून, पाहतीये सारा खेळ
पांघरतीये क्षितिजावरती, गर्द निळी कातरवेळ…
प्रतिक्रिया
छान! आवडली कविता.
छान! आवडली कविता.
छान आहे कविता
थोडी "चिंगारी कोई भडके"च्या शब्दांची आठवण करून देणारी. विशेषतः या ओळी;
अवांतरः गवि, अशी एखादी कविता त्या "शून्य प्रतिसाद मिळालेल्या लेखनात ५०% कविता असतात" गटात नाहि मोडत
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
मस्त आहे कविता...
मस्त आहे कविता...
छान कविता
आवडली. उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ हे "गारवा"चे शब्द अचानक आठवले.
गारवा
गारवा हा काखांना सुखावणारा असतो, असं नुकतंच कळालं अन तेही ऐसीवरच.
शांतपणे रात्र दुरून, पाहतीये
शांतपणे रात्र दुरून, पाहतीये सारा खेळ
पांघरतीये क्षितिजावरती, गर्द निळी कातरवेळ… ही ओळ विशेष आवडली.
आवडली.
आवडली.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
धन्यवाद !
धन्यवाद !
आवडली कविता
छान !!
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
छान!
खुप छान आहे कविता.