आन्सर क्या चाहिये? :कँटीन

भाग १ : भाग २ : भाग ३ : भाग ४ : भाग ५ : भाग ६ :
भाग ७

इंजिनीरींग क्यांटीन/कँटीन [नाम]: काहीही करायची मुभा असलेलं कॉलेजमधलं एकमेव ठिकाण. बरेच जण इथे खाण्यापिण्यासाठीही येतात.
.
मी मगासपासून काय काय बोलतोय, पण कँटीनबदद्ल काहीच उल्लेख नाही हे लक्षात आलं आणि जरा वाईट वाटलं. आपण कसं, आपल्या फॅमिलीबद्दल वगैरे भरभरून बोलतो. आई, बाबा, बहीण भाऊ -सगळ्यांचं सगळंकाही. पण आजीचा पटकन उल्लेख होत नाही. आजी खरं तर आपला खंदा समर्थक, बेश्ट फ्रेंड असतो पण बोलताना ती राहून जाते. तसलंच काहीतरी झालं असावं बहुतेक. जाऊ दे. बकासूरा, मला माफ कर.
.
इंजिनेरींगात कँटीन हे एक वेगळं संस्थान आहे. इंजिनीरींग स्टूडंट असूनही निव्वळ जेवायला खायलाच जर तुम्ही कँटीन वापरलं असेल, तर तुम्हाला इंद्रधनुष्यातही बहुतेक २-३च रंग दिसत असावेत. कारण कँटीनमधे एक chaotic गलबलाट चाललेला असतो, जो प्रचंड महत्त्वाचा आहे. तेच कँटीनचं व्यक्तिमत्व आहे.
उ.दा. तुम्ही असे कँटीनमधे दरवाजात आलात तर एकाच वेळी-
"क्या बे #%@#@. आज लेक्चर बंक किया क्या?"
"बॉस एक मिंटॉस देना. और मँगोबाईट भी."
"ट्रिपल शेजवान राईस- कोण आहे रे? ट्रिपल शेजवान......"
....एफ.एमवरच्या आर.जेचे भिन्नाट शब्द. गाणी. किंवा कदाचित नुसताच स्टॅटिक. पण एफ.एम.चं अस्तित्व जाणवतं.
"मैने बोला __को. असाइन्मेंट छापने को. कल तर देता हू रे."
"हॅपी बर्थडे टू डीअर <न लिहिता येण्यासारखं भयानक टोपणनाव>.... हॅपी बर्थडे टू यू----- आणि मग बेताल होत जाणार्‍या टाळ्या".
.
असा सगळा गलबला कानावर पडेल. जरासे पुढे गेलात तर ह्या आवाजी कल्लोळांत काही खुशबू समाविष्ट होतील.
मिसळीचा तिखट गंध, चायनीजचा तेलकट वास, पुलावचा वाफेदार वास, काचेच्या पेटीमागून हसणारे समोसे आणि वडे, चकचकीत स्टीलच्या ताटल्यांत मांडलेली दाबेली, दहीपुरी किंवा शेवपुरी. डोसा, ईडली आणि मेदूवड्यांचे मंगलमय गंध. सांबाराचा खदखदणारा वास त्या कढईपासून चाळीस फर्लांग पसरलेला असेल. शिवाय पेशल काही दिवस असेल तर पावभाजीचा सर्वांगसुंदर गंध.
.
शिवाय कान आणि नाकातून तुम्हाला जेवढं कँटीन समजतं तेवढं बहुतेक डोळ्यांनी कळत नाही. डोळे ह्या सगळ्या Randomnessला पकडायला जातात आणि बाकीच्या अदृश्य गोष्टी हिटविकेट होतात त्यात. छोटा झोल आहे तो- त्यामुळे नुस्तं कँटीनमधे जाऊन डोळे मिटून बसतो मी कधीतरी. मंदीरात साधूंना वगैरे कसं वाटत असेल, त्या टाईप वाटतं. सिरीअसली.
.
निव्वळ खाण्यापुरतं म्हणाल तर इथे परमेश्वराचे दशावतार. भाविकांना दिसलेली रूपं.
|====================================|
भयानक गर्दीत बसून पोट भरण्यासाठी खाल्लेला सामोसा पाव. त्याला गंध म्हणून लावलेली लसूण चटणी आणि सोबत दिलेल्या मिरच्या. मग त्यामु़ळे लागलेल्या उचक्यांना अनुल्लेखाने मारत वचावचा घास घेत (तरीही पूर्णरूपाने जीव्हास्वाद घेत) स्वाहा केलेला सामोसा पाव. गरीबाची न्याहारी.
|====================================|
एखाद्या प्रॅक्टीकलनंतर पिटस्टॉप म्हणून घेतलेला मिसळपाव. तेलकट तर्रीवर तरंगणार्‍या फरसाणाबरोबर केलेलं हितगुज. तासाभरापूर्वीची कटकट आणि पाच मिनिटानंतर झेलावा लागणार्‍या शॉटच्या दरम्यानची ही शांतता मिसळीमुळेच. मिसळीची सोबत एकदम मैत्रिणीसारखी. थँक यू गॉड फॉर मिसळ.
|====================================|
दोन दाबेल्या एकामागे एक. असाइन्मेंट करताना एका हाताने अव्याहत छापकाम चालू. तेव्हा दुसर्‍या हाताने दाबेलीची चव घेत घेत प्रोफेश्वरांना वाहिलेल्या शिव्या.
दाबेलीतले शेवटी इतस्ततः उरलेले डाळिंबाचे दाणे टिपल्यावरच संपणारी असाइन्मेंट. दाबेली रॉक्स-
|====================================|
११ रूपये बजेट असताना जर का कडकडून भूक लागली असेल तर मग तुम को पता है के क्या करना है.
ऐसा जाने का, और पुलाव मंगाने का. साथ मे सांबार और वो अचार.
मग टेबलावर निवांत बसून बकाणे भरत ढेकर देने का. एकदम ऐश.
मी बरेचदा हा पुलाव खाऊन १५ मिनिटं झोप काढलीये. अन्नदाता सुखी भव.
|====================================|
रोला-कोलाsssss कोला का गोला.
२ रूपयांत २० गोळ्या. आमच्यासाठी वसूल ऑफर.
कृती-
मुंबईच्या चिकचिकीत उन्हातून घामेजलेल्या अंगाने प्रोजेक्ट करायला जायच्या आधी काऊंटरवर थांबून एक रोला कोलाचं पाकीट घ्यावं.
मग ते हळूहळू उघडावं.
वरची गोळी हातात घेऊन उगाच निरखावी.
मग ती जीभेवर ठेवावी आणि डोळे मिटून ध्यानस्थ व्हावं.
शि-म-ला. मनाली, स्वित्झर्लंड वगैरे अनुभव.
नंतर कामाला लागावं किंवा चकाट्या पिटाव्यात किंवा कसंही.
|====================================|
मे महिन्यात आंबे असतात, बाकी वेळ केळी वगैरे. तसंच खास-पेशल-सेलिब्रेट करायच्या वेळचा ट्रीपल शेजवान फ्राईड राईस. भोवती चमचे घेऊन बसलेली भुतावळ.
And the new record is -> 3.4 मिनिटं. टोळधाडीप्रमाणे पाडलेला फडशा, उरलासुरला फ्राईडराईस मग त्या ताटलीतून चिवडणारे एक्सपर्ट्स.
हा क्वचित भेटला, पण त्याच्या आठवणी एकदम कडक.
ह्याच बरोबरच्या त्या नूडल्स. एरवी त्यांना बघून कितीही जीभेला पाणी सुटत असेल तरी औकातीत राहायचं असतं. पण बर्थडे किंवा रिझल्टच्या आसपास नूडल्स अवाक्यात यायच्या. खास वेळ काढून मग नूडल्स मागवण्याचा जो आनंद आहे ना, तो म्हणजे Acking Fwesome.
|====================================|
दिवसभरच्या असाइन्मेंट, प्रॅक्टीकल्स, प्रोफेश्वरांचा ओरडा, मार्कांचं टेन्शन ह्या सगऴ्याला स्वतःत सामावून घेणारं कटींग हे मात्र परमोच्च सुख.
आईशप्पत सांगतो- संध्याकाळी ४ च्या सुमाराला कॉलेज संपता संपता मारलेला एक कप चहा जे काही खतरनाक फीलींग देतो, ते उच्च आहे.
डोकं हलकं व्हायचं आणि लोकलच्या गर्दीची काळजी क्षणभर कुठेतरी हरवून जायची.
रामगोपाल वर्मासारखा भोचक स्लो-मोशन कॅमेरा.
ग्लुकोज बिस्कीट त्या चहाच्या कपात जाताना, कपाच्या टोकावर चमकणारे सूर्यकिरण.
मग ते धनुर्वात झालेलं बिस्कीट माझ्या तोंडात, आणि बरोबरच चहाचा एक फुर्रर्र.
फिर (अंदाज अपना अपना मधल्या आमीरखानवत्) झकास! म्हणायला मी तयार.
|====================================|
बाकी इडली, डोसा, उत्तपा हे सौधिंडियन पब्लिक वेळीअवेळी असायचंच. त्यांना काही खास किंमत नव्हती. खास खावं असं नाही. चलता है टाईप माल.
मुंबईच्या परंपरेला अनुसरून वडापावाचं कौतुक करावं इतका चांगला वडापावही कॉलेजात मिळायचा नाही. तेव्हा ते सुखही कॉलेजाबाहेरच.
|====================================|
किंवा मग ग्रिल सँडविच, नुसतं सँडविच असले प्रकार. कधी जमलं तर जमून जातं. काहीच्या काही बेश्ट.
पण बरेचदा ठीकठाकच. बहुतेक आतल्या लोकांनी फुरसतमधे बनवलं तर त्याला चव असते. म्हणून मग आम्ही खूप उशीरा कधी थांबलो तर मागवायचो.
थोडा वेळ जाईल पण भेंडी वसूल एकदम!
|====================================|

.
पण हे झालं प्राथमिक रूप - कँटीनचं अस्तित्व केवळ खाण्यापिण्यापुरतं नसतंच.
बरेचदा कॅंटीनची शीजनप्रमाणे वेगवेगळी रूपं असतात.
(मी जर द्वारकानाथ संझगिरी असतो तर इथे एक शॉट क्रिकेट/बॉलिवूडची उपमा टाकली असती. म्हणजे क्रिकेटवर लिहिताना बॉलीवूडची उपमा आणि बॉलिवूडवर लिहिताना क्रिकेटची. चूत्या आहे साला संझगिरी.)
तर कँटीन.
.

फेस्टीव्हलच्या वेळी जर कुणी कॉलेजच्या उर्जेचा आलेख काढला तर त्यात वाय अक्षावर सगळ्यात वरती कँटीनच असेल.
एका टेबलावर चहासोबत मग प्लॅनिंग, कुणाला बोलवायचं, ह्यावेळी जज कोण? स्पॉन्सरशिप कशा मिळवायच्या, स्वयंसेवक aka volunteers कुठले असतील वगैरे गंभीर खलबतांपासून सुरूवात.
नंतरच्या एका टप्प्यावर मग बॅनर्स, फ्लेक्स, इव्हेंट्सचे बोर्ड आणि चित्रविचित्र गोष्टी, स्वयंसेवकांचे बिल्ले, अधिकृतरित्या बंक करता यावं म्हणून छापलेली कूपन्स, ब़क्षिस म्हणून द्यायला आणलेल्या चिंधीचटोर गोष्टी, बरोबर असाइन्मेंट छापता याव्यात म्हणून ठेवलेले फोल्डर्स, पाचपन्नास फेवर्सची पाकीटं, एफीची खास गोळा केलेली पोरं आणि त्यांचे अनभिज्ञ प्रश्न, प्रोफेश्वरांकडे मस्का मारण्यासाठी दूत, एक ना दोन.
ह्या सगळ्या गदारोळात अक्षरशः वेडं झालेलं कँटीन.
शेवटच्या टप्प्यात तर कँटीनला फुलटू रंग चढतो. एकदा तरी खुद्द फेस्टीव्हलच्या वेळात कँटीनमधे जाऊन नुस्तं उभं रहून बघा, मग कळेल मी काय म्हणतोय ते.
.
त्याच्या उलट म्हणजे वायवाच्या आधीचं कँटीन. भयाण शांतता. जमलेल्या सगळ्या डोक्यांमधे एकच सामूहिक विचार - "मेरा क्या होगा?".
मग नर्वसपणे उगाच कुठलंही पान उघडून वाचणारे स्कॉलर्स, के.टी.बहाद्दर पब्लिकच्या डोळ्यातली भीती, सगळं काही येत असलं तरी निव्वळ वायवा ह्या प्रकारामुळेच फाटलेली चड्डी सावरणारे भिडू -असला सगळा गोतावळा जर बघितला तर नवज्योत सिद्धूलाही डिप्रेशन यावं. त्यात जर नुकताच वायवा होऊन गेलेला एखादा कँटीनमधे बसला असेल तर मामला अतिगंभीर.
फारतर एखाद्या चहा-पावाबरोबर पुढच्या अटळ के.टी.चा विचार बुडवत बसलेले चेहेरे लगेच ओळखू येतात च्यायला. मग आपणही उगाच ऑलरेडी शंभरवेळा वाचलेल्या प्रश्नांची उजळणी करणं आलं.
.
पण सगळ्यात वेगळं कँटीन असतं ते स्टडी लीव्ह मधलं. ह्यावेळी कॉलेजात फारशी गर्दी नसतेच. कॉलेजात अभ्यासाला येणारं पब्लिक आणि त्यावेळी तिथे असणारे तुरळक प्रोफेश्वर एवढेच लोक.
अभ्यासू लोक मग मिसळपावाबरोबर डायोड-ट्रायोड वगैरे समजावून घेतात. चमचे आणि काटे मांडून सर्किट्स बनवून दाखवतात. बर्‍याचशा इडल्या रिचवल्याशिवाय मग अँटिना वगैरे प्रकार कळणं अशक्य.
आणि त्या स्मशानशांतता असणार्‍या लायब्ररीत बसून उगाच रवंथ करण्यापे़क्षा इथे कँटीनमधे बसून वाचलेलं उत्तम!
इतकं असलं तरी रिकामटेकडं पब्लिक तिथेही उगाच टोटल सुखापट्टी करत पडलेलं असतं! फक्त मेंबर्स कमी असतात.
.
बाकी काही लोक नेहेमी कँटीनमधे असतातच- कधीही गेलात तरी.
उदा. आम्ही एकदा अशाच कुठल्यातरी भयानक वायवानंतर संध्याकाळी ५ वाजता कँटीनात गेलो. आजूबाजूला गर्दी नाही ह्याची खात्री केली, आणि बिंदास एक चायनिज डिश मागवली.
.
[आमच्या एका मित्राच्या मते आसपास गर्दी असताना कधीही अ) महागडी डिश ब) सगळ्यांपेक्षा वेगळी डिश क्)चायनीज मागवू नये. कारण लोक "एक बाईट" दे म्हणून त्या डिशची मदर-सिस्टर करून टाकतात.
तेव्हा आसपास ग्रूप असेल तर दुसर्‍या कुणीतरी मागवलेली डिशच घ्यावी, म्हणजे सेफ. निदान थोडं खाता तरी येतं.]
.
तिघांत मिळून एक- म्हणजे प्रत्येकाला निदान पाच घास तरी खाता येतील एवढा हिशोब होता.
नूडल्स टेबलावर आल्या आणि अचानक मागून "काय रे , कशी गेली?" म्हणत एक कँटीनपडीक उगवला. कुठून आला? कधी आला? कल्पना नाही. पण त्या चायनिजचा सुगंध दरवळताच अल्लाऊद्दीनच्या रा़क्षसाप्रमाणे तो प्रकट झाला खरा.
पुढल्या एकावेळीही हाच प्रकार! मग नंतर आम्ही त्याला गृहित धरूनच ऑर्डर करायला लागलो. तर असले हे कँटीनपडीक.
.
.
सबमिशनच्या शिजनची बात वेगळी. एरवी कँटिनची बाकं त्यांच्या मूळ रंगात दिसत असले तर ह्या दिवसां सगळीकडे पांढर्‍या रंगाचं वर्चस्व. कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही वेळी, कितीही गर्दी असली तरी पोरं असाइन्मेंट आणि जर्नल्स छापत असतात. काही लोक चहाबरोबर, काही समोसापावात पण बरेचशे लुख्खेच. पोटात कितीही भूक असली तरीपण "भेंडी इतना खतम कर के कुछ मंगाते है बे" म्हणणारेच जास्त.
ह्या शीजनमधे कुणालाही एरवीच्या फुकटफिरक्या घ्यायला वेळ नसतो. कँटीनचा उपयोग मग फक्त बिंधास्त छापण्याची जागा- एवढ्यापुरताच.
.
रोम्यांटिक लोकांना पण इकडे थोडा जास्त चान्स. म्हणजे सुरवात इकडे करायची आणि मग बाहेरच्या रेस्टॉरंटमधे. बरेचदा एखाद्या कोपर्‍यातल्या टेबलावर संध्याकाळी दोघं जणं बसलेली दिसली तर मग सूर्यालासुद्धा मावळताना काहीतरी केल्याचं समाधान मिळावं. एरवी कुठे बिचार्‍यांना कोण बोलायला देतो? वात्रटपणाचा कळस करणारे लोक पण अशावेळी थोडा अ‍ॅडजस्ट माडी करायचे.
.
पण मुख्य गोष्ट राहिली -दोस्त! एका बेंचवर बसून निरर्थक टवाळक्या करण्यापासून ते वायवाच्या आधी ज्ञानकण कोंबण्यापर्यंत सगळं काही कँटीनच्या कट्ट्यावर बसून.
एखाद्याची पार्टी असेल तर मग जन्मापासून खायला न मिळाल्यासारखा कल्ला, बर्थडेला दहा चमचे एकत्र घुसवून त्या फ्राईडराईसचा केलेला खून, दीडदोन तास बसून खपून बनवलेले बॅनर्स, चुकून एकदा मित्राच्या ग्ल्फ्रेंडला काहीतरी बोलल्याने झालेलं भयानक भांडण, बहुतेक वेळा दुपारी रोजची हजेरी. काहीच्या काही गोष्टी केल्यात आम्ही कँटीनमधे!
असो, नाहीतर मग च्यायला नॉस्टाल्जिया वगैरे होऊन जाईल. ते सगळ्यात शॉट.

.
ग्राज्वेशननंतर कधीतरी एकदा कॉलेजात गेलो होतो. च्यायला, आय-कार्ड पाहिजे म्हणे आत जायला. जेव्हा कॉलेजात होतो तेव्हा आणलं नाही आयकार्ड, तर आता कसलं असणार? आय-कार्ड्च्या आयचा घो.
तर दारावरच माज करून मग त्या कुठल्या बंदूकधारी काकांनी लायब्ररी, लेक्चरहॉल कुठेच जायला दिलं नाही म्हणून खाली उतरलो, तर कँटीन. दरवाजात एक मिनिट घुटमळलो. म्हटलं इकडे कोणी नाही म्हणणार नाही.
सब अपनाइच है बॉस.
आत गेलो तर एका ऑर्डरच्या बांगेने स्वागत केलं "एक मिस्स्स्ळ्पाव...".
गर्दी, गडबड, आरोळ्या, शिव्या, वेगवेगळे सुगंध, आजूबाजूने जाणार्‍या ऑर्डरी, पाच सेकंदात पन्नास गोष्टी -सबकुछ एकदम झकास.
.
म्हणून कँटीन रॉक्स.

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

अस्वलभाउ, सुरेख लिहिलं आहेस. मला वाटतं माझ्यासारखे बरेच जणं असतील ईथे - विंजीनेर नाहियेत पण अशा 'कँटिनमधले' (आणि आधीच्या भागातले) तुकडे अगदी ओळखीचे वाटतात. बर्‍याच वर्षानी पूर्वीचा जिवलग मित्र भेटावा तसं वाटतं! कॉलेजजीवनातल्या खास 'प्रवृत्ती' असतात. विंजीनेर बना नाहितर B. Pharm करा, तपशील वेगळे, कमीजास्त प्रमाण, पण अशा प्रवृत्ती सगळीकडे असतात. त्यांचं सुरेख चित्रण करतोयस....

त्यामुळे नुस्तं कँटीनमधे जाऊन डोळे मिटून बसतो मी कधीतरी. मंदीरात साधूंना वगैरे कसं वाटत असेल, त्या टाईप वाटतं. सिरीअसली.


क्या बात है, व्व्वा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

धन्यवाद!
एकदम खरंय- तपशीलांत थोडेफार बदल होत असतील पण "प्रवृत्ती" सगळीकडे सारख्याच असाव्यात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_ उर्वरित स्तुती नंतर सवडीनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बरेच दिवस ह्या मालिकेतला लेख आला नाही, म्हणून खवत येऊन आठवण करून देणार होतोच - तितक्यात हा लेख वाचायला मिळाला. क्यांटिनात हादडलेल्या मसाला-पाव + स्लाईस (शीतपेय)च्या आठवणी पुनश्च जाग्या झाल्या.

(मी जर द्वारकानाथ संझगिरी असतो तर इथे एक शॉट क्रिकेट/बॉलिवूडची उपमा टाकली असती. म्हणजे क्रिकेटवर लिहिताना बॉलीवूडची उपमा आणि बॉलिवूडवर लिहिताना क्रिकेटची. चूत्या आहे साला संझगिरी.)

खी: खी: खी:, आमच्या शाळेत ते एकदा येऊन भाषण ठोकून गेले होते. माझं घरगुती टोपणनाव 'पप्पू' असं आहे, असं उगाच सांगितल्यावर मागल्या बाकांवर रंगलेली टवाळी अजून आठवते. बाकी कणेकरांच्या लेखनाबद्दल एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चादरमोद डिक्शनरीत आणखी एक शब्द . बाकी सगळे खास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नूडल्स टेबलावर आल्या आणि अचानक मागून "काय रे , कशी गेली?" म्हणत एक कँटीनपडीक उगवला. कुठून आला? कधी आला? कल्पना नाही. पण त्या चायनिजचा सुगंध दरवळताच अल्लाऊद्दीनच्या रा़क्षसाप्रमाणे तो प्रकट झाला खरा.
पुढल्या एकावेळीही हाच प्रकार! मग नंतर आम्ही त्याला गृहित धरूनच ऑर्डर करायला लागलो. तर असले हे कँटीनपडीक.

व्वा! मज्जा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मजेदार! कॅन्टीन ही कॉलेजजीवनातील सर्वात जास्त वेळ जिथे घालवला जातो ती जागा. त्यामुळे लेख फारच भिडला.
साधा ब्रेड पकोडा किंवा वडापावही कोणी पूर्ण खाऊ देत नाही हे फारच युनिव्हर्सल. एकदा खूप भूक लागली असताना बाकीच्या भुतावळीने नीट खाऊ द्यावे म्हणून दहा वडा-पाव खायची पैज लावली होती. तीन-चार वडापाव खाऊन पैज हारलो. बाकी त्याकाळी कडकी असल्याने अनेक पदार्थ स्वर्गीय वाटायचे. एकच सिग्रेट पाच-सहांच्या ग्रुपमध्ये फिरायची आणि जो विझवेल तो नवी घेईल असा नियम असल्याने ओठाला चटका बसेपर्यंत ती ओढायची. टोट्टल सियापा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ये बात... आमच्याकडे क्यानाल रोडवरचा "अड्डा" होता. तुमचं कॅंटीन अजून अस्तित्त्वात तरी आहे, आमच्या अड्डयावर आता walking plaza झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बाकी सहमत, पण शीओईपीच्या क्यांटिनात पोरं सबमिशन करत नसत. तेवढी जागाच नसे. ती मेक्यानिकल ड्रॉइंग हॉल नामक एक "हॉटर दॅन हेल & सहारा कंबाईन्ड" जागा होती तिथे ग्राफिक्सच्या शिटा व बाकी काम चालत असे. आणि वेळप्रसंगी रेसिडेंट कबूतरे त्या शिटांवरती शिटत असत. सबमिशन झाले की आठवड्याचे जेवायला क्वचितप्रसंगी दुर्वांकुरात जात असू.

फुरियर (शुद्ध तुपातला उच्चार आहे याची जाणीव आहे.) या गणितज्ञाचे असे मत झाले होते की मानवास राहण्याकरिता वाळवंटी हवा हीच सर्वोत्तम असते. (नेपोलियनबरोबर इजिप्तास गेल्याचा परिणाम, दुसरे काय?) त्याच्या खोलीचे हे केलेले वर्णन आहे- ई टी बेल यांच्या मेन ऑफ मॅथेमॅटिक्स नामक अजरामर पुस्तकात.

(बहुधा हीट वगैरे भानगडींत त्याला त्याचमुळे रस पैदा जाहला असावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनेक रिकाम्या ड्रॉइंग हॉलांमधे बरेचदा छापाछापी चालू असायची. पण आमच्या काही हरामखोर प्रोफेश्वरांनी नजर ठेवून पोरांना पकडायला सुरूवात केल्याचं आठवतं.
तरीही बक्कळ रिकामी जागा उपलब्ध असलेले ड्रॉइंग हॉल्स ही असाइन्मेंट लिहिणार्‍यांची पॉप्युलर जागा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच लिहिलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैच्च भारीच्च!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झकास!! आमच्या क्यांटीनची आठवण आली. 'चंद्रलोक गार्डन' असं नाव धारण करणारं ते क्यांटीन बहुधा एकमेव असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यमायटी ना?

राजाराम पुलाजवळचं चंद्रलोक गार्डनही कराडांच्या जावयाचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

यस्सर. पण 'चंद्रलोक गार्डन'च का, हे मला अजूनही कळलं नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख. बाकी मिसळ, चायनीज, पुलाव, सामोसे वडे, दाबेली, दहीपुरी, शेवपुरी, डोसा, इडली, सांबार वगैरे देणारे हे क्यांटीन म्हणावे की उडुपी रेष्टारंट?

आम्हाला क्यांटिनमध्ये सामोसापाव आणि गुळचट-कोमट चहा वगळता इतर काही मिळाले नाही बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

पण आमच्या क्यांटिनला अ‍ॅटॅच्ड बोटक्लब होता त्यामुळे चहा व सामोसा (रु. ०.३५+ ०.३५) घेऊन बोटक्लबच्या लॉनवर बसणे हा सुखद अनुभव असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गेले ते दिवस.............

बाकी या क्यांटीनचे मालक श्री. मधू शेठ हेही सीओईपीचेच डिप्लोमा होल्डर बरे का. (१९५७-५९ च्या आसपासचे पासौट.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे वा! कँपस रिक्रूटमेंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अगदी!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या दृष्ट लागेलश्या मालिकेला दाद म्हणून मी संवेदची ही जुनी मालिका (, , , ) उकरून देते आहे. सोबत हे आणि हे पोस्ट बोनस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अशीच एक बहु इंट्रेषटिंग मालिका वैद्यकीय शिक्षणावर होती. बहुदा अडकित्ता यांची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण ती तशीच राहून गेलिये अर्धवट.
.
.
http://www.aisiakshare.com/node/2457
ह्या धाग्यावर " धन्यवाद, सुहृद! " ही कमेंट पहा, किंवा
.
.
http://www.aisiakshare.com/node/192 इथे "आडकित्त्याला लिहितं ठेवा " ही कमेंट.
.
.
त्यांना टैम मिळना झालाय असं दिसतं.
मी त्यांना म्हटलं की आपण फोनवर वगैरे बोलुयात फक्त; लिहून काढण्याचा उद्योग मी करतो हवं तर.
पण डागदर बिझ्झी हैत. (साहजिकच आहे. आपल्याकडे डॉक्टर बिझीच असतात.रिकामा असायला तो काय आयटीवाला आहे काय ? Wink )
.
.
बाकी फोनवर बोलून कितपत लिहिता येइल माहित नाही; पण लक्षात ठेवून बर्‍यापैकी लिहिता येइल(सान्यांच्या भाषणासारखं) असं वाटतं. Wink

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डाक्टर आडकित्ता इथं (आणि तिथंही) पर्सोना नॉन ग्राटा आहेत असं वाटतं (काहीसे अरूण जोशींसारखे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.