स्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं प्रमाण वाढणं इष्ट का आहे?
गब्बर यांनी नुकताच एके ठिकाणी प्रश्न विचारला - की 'ब्रिटनमध्ये (किंवा इतरत्र विश्वात) संशोधनात स्त्रियांचं प्रमाण वाढणे हे इष्ट का आहे ते सांगा. Specifically, what is not being achieved right now that will be achieved by increasing the percentage of women researchers ?'
त्यावर अर्थातच गब्बरला नीचा दाखवण्याची वीरुगिरी करण्यात आम्हाला कायमच आनंद होत असल्यामुळे आम्ही त्यांना आधी 'उत्तर देता येईल हो, पण प्रश्नच अस्थानी आहे' वगैरे सांगून डिस्क्रिप्टिव्ह आणि प्रिस्क्रिप्टिव्ह यांमधल्या फरकाचे डोस प्रिस्क्राइब केले. त्यातून आम्हांंस बहुत आनंद प्राप्त जाहला. पण तो पुरेसा वाटला नाही म्हणून की काय आम्ही ठरवलं की गब्बरच्या दोन मुंड्या चीत झाल्याच आहेत, तर त्याच दमात उरलेल्या दोनही चीत करू चारीमुंड्यांचा आनंद मिळवावा. अर्थात गब्बरसारख्या मातब्बर असामीला चीत करण्यासाठी साधेसुधे युक्तिवाद पुरत नाहीत त्यामुळे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून याची मी मांडणी करत आहे. ('न'वी बाजूंसाठी - हो, इथे मी/आम्ही मी व आम्ही या सर्वनामाची बेदरकार अदलाबदल जागोजागी केलेली आहे. त्याबद्दल आम्हांस काही खंत आहे असं मला वाटत नाही. तेव्हा ही चूक दाखवून देण्याची तसदी घेऊ नये हेच इष्ट. काय म्हणता कोणासाठी इष्ट? काय फरक पडतो? शेवटी आम्ही भटेच.)
सगळ्यात प्रथम 'इष्ट' म्हणजे काय? इष्ट म्हणजे कोणासाठी? याचा आधी विचार झाला पाहिजे. कारण आपण सर्वसामान्य (पक्षी : फडतूस) लोकं जे सर्वसामान्यपणे चर्चा करताना गृहित धरतो ती सर्व गृहितकं गब्बरशी चर्चा करताना बाजूला ठेवावी लागतात. भल्याभल्यांना ते करणं जमत नाही, म्हणूनच त्यांचे गब्बरशी वादविवाद होतात. ते टाळण्यासाठी 'इष्ट'पणाच्या वेगवेगळ्या व्याख्या स्पष्ट करून त्या सर्वांनुसार एखादी गोष्ट इष्ट कशी हे सिद्ध करण्याची इथे गरज आहे.
१. मार्केटसाठी इष्ट - मार्केट नावाच्या एका अदृश्य शक्तीची गब्बर कायमच उपासना करत आलेला आहे. तेव्हा त्या मार्केटदेवतेला एखादी गोष्ट इष्ट आहे हे सिद्ध करणं मी परमकर्तव्य समजतो.
आम्हांस मार्केटदेवतेबद्दल जे काही अल्प ज्ञान आहे त्यानुसार काही गोष्टी स्पष्ट आहेत.
अ. मर्त्य मानव लोकं मार्केटचा एक केवळ लहानसा हिस्सा असतात. म्हणजे शरीराची एखादी पेशी असावी त्याप्रमाणे. पेशी जगो/मरो पण शरीर सुरळितपणे चालायला हवं. हे एखाद्या पेशीसाठी, किंवा पन्नास-शंभरांसाठी ठीक आहे. पण जर निम्म्या पेशी पुरेशा परिणामकारकरीत्या काम करत नसतील तर शरीर नीट चालणार नाही. त्यामुळे स्त्रियांच्या जनरल उद्धार - मार्केटदेवतेसाठी इष्ट असतो.
ब. मार्केटदेवतेला सपाट जमीन आवडते. कारण आदर्श मार्केटसाठी No barriers to entry or exit, Equal access to factors of production ही दोन महत्त्वाची बंधनं आहेत. आता जर स्त्री व पुरुषांना अॅक्सेसचा प्रसाद कमी अधिक मिळाला तर मार्केटदेवतेला ते आवडत नाही. तसंच संशोधनवस्तूंचं उत्पादन करण्यासाठी जर स्त्रियांच्या एंट्रीसाठी ब्यारियऱ्या असतील तर मार्केटदेवतेचा कोप होईल.
क. फायद्याची गरज - आदर्श मार्केटदेवतेच्या मंदिरात फायदा होत राहिला पाहिजे आणि तोसुद्धा पुरेसा. ज्याची टॅलेंट अधिक त्याला अधिक फायदा, ज्याची टॅलेंट कमी त्याला कमी फायदा. पण समजा निम्म्या लोकांना या मार्केटात प्रवेशच नसेल तर मर्यादित लोकांमधून अधिक टॅलेंटचे लोक कसे काय मिळणार? मग मार्केटदेवी रुसणार नाही का?
२. समाजार्थिक(socioeconomic)दृष्ट्या इष्ट - हाही काहीसा मार्केटप्रमाणेच 'एकंदरीत समाज आणि उत्पादनासाठी इष्ट' असा युक्तिवाद आहे. म्हणजे फडतुसांसाठी इष्ट किंवा धनदांडग्यांसाठी इष्ट वगैरे गोंधळ त्यात नाहीत.
फार फार वर्षांपूर्वी जेव्हा मानवी समाज मुख्यत्वे शेती किंवा हंटिंग ग्यादरिंग करत होता तेव्हाची गोष्ट. त्याकाळी स्त्रियांना सर्वसाधारणपणे वय वर्षे पंधरा ते मरेपर्यंत सुमारे आठदहा बाळंतपणं काढावी लागत असत. त्यामुळे पुरुष रिकामटेकडे, बाहेर फिरायला मोकळे आणि बायका बराच काळ घरी बसलेल्या असत. साहजिकच बाहेरची कष्टाची कामं पुरुषांची आणि घरातली कामं आणि मुलं वाढवणं स्त्रियांकडे अशी एफिशियंट विभागणी झालेली होती. आता समाज बदलला आहे, त्याचबरोबर वास्तवही बदलेलं आहे. आता बहुतांश कामं यंत्रांनी होतात, त्यामुळे कोणाला किती शक्ती जास्त हा मुद्दा गौण झालेला आहे. त्याचप्रमाणे आता चाळीसेक वर्षांच्या करिअरमध्ये काही महिन्यांसाठीच स्त्रियांना मुलांच्या जन्मासाठी द्यावे लागतात. या बदलेल्या परिस्थितीत अर्थातच जुनी विषम विभागणी उपयोगाची नाही. उत्पादन वाढवण्यासाठी समानता देणं अधिक एफिशियंट आहे, कारण ज्या बंधनांपोटी विषमता निर्माण झाली होती ती बंधनं मोडून पडलेली आहे. तद्वतच ही समानता निर्माण करण्यासाठी योग्य प्रयत्न करणं जरूरीचं आहे.
३. धनदांडग्यांच्या भल्यासाठी - धनदांडग्यांना त्यांचं धन खर्च करून संशोधकांचं लेबर विकत घ्यायचं असतं. आता जर का फक्त पुरुषांपुरतंच लेबर मार्केट मर्यादित राहिलं तर त्यांना त्या लेबरसाठी अनावश्यकरीत्या जास्त पैसे मोजावे लागतील. त्यांचे विकल्प कमी होतील. आणि विकल्प जर कमी झाले तर काय राहिलं आयुष्यात, गब्बर, काय राहिलं, अं?
४. फडतुसांच्या भल्यासाठी - सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, पण फडतूसही आजकाल माजलेले आहेत. आणि तेही आपल्या इवल्याशा खिशाला चिमटा घेऊन संशोधकांचं लेबर विकत घेतात. उदाहरणार्थ - जगात जवळपास ऐशी टक्क्यांकडे सेलफोन झाले आहेत! आणि आजकाल काय, पट्टेवालाही स्मार्टफोन बाळगतो. आता जर का फक्त पुरुषांपुरतंच लेबर मार्केट मर्यादित राहिलं तर त्यांना त्या लेबरसाठी अनावश्यकरीत्या जास्त पैसे मोजावे लागतील. त्यांचे विकल्प कमी होतील. आणि विकल्प जर कमी झाले तर काय राहिलं आयुष्यात, गब्बर, काय राहिलं, अं?
५. संख्याशास्त्रीय युक्तिवादातून संशोधनासाठी इष्ट - आता काहीतरी कारणांसाठी चांगलं संशोधन होणं हे इष्ट आहे असं गृहित धरूया. आता समजा आइन्स्टाइन सापडण्याची शक्यता बिलियनात एक असेल, तर ज्या लोकसंख्येत आपण आइन्स्टाइन शोधतो आहोत अशांची संख्या एक बिलियनऐवजी दोन बिलियन केली, तर एकाऐवजी दोन आइन्स्टाइन नाही का निर्माण होणार? मग चांगल्या संशोधनासाठी तरी हो म्हणा गब्बर!
६. सामान्य ग्राहकासाठी आणि विक्रेत्यांसाठी इष्ट - आजकालची लोकं, थोडक्यात गिऱ्हाइकं जास्ती जास्ती सोफिस्टिकेटेड प्रॉडक्ट्स मागायला लागलेली आहेत. म्हणजे त्यांना नुसती कॉफी नको असते, तर कुठल्यातरी केनियामधल्या शेतकऱ्याची पिळवणूक न करता बनवलेली कॉफी हवी असते. हे प्रीमियम प्रॉडक्ट आहे, त्यासाठी जनता जास्त पैशे द्यायला तयार असते, किंवा अधिक वेळा ते घ्यायला तयार असते. तसं नसतं तर स्टारबक्ससारख्या दुकानांनी तशा जाहिरातींवर पैसे फुकट घालवले नसते. तसंच ज्या कंपन्यांमध्ये स्त्री-पुरुष समानता आहे अशा कंपन्यांनाही किंचित काही भांडवल द्यायला तयार असते. ही समानता सर्वच क्षेत्रात निर्माण झाली तर ग्राहकांना प्रीमियम प्रॉडक्ट विकत घेण्याचा आणि कंपन्यांना ते विकण्याचा विकल्प राहील. ती समानता आणली नाही तर त्यांचे विकल्प वाढणार नाहीत. आणि विकल्प जर वाढले नाहीत तर काय राहिलं आयुष्यात, गब्बर, काय राहिलं, अं?
७. स्त्री पुरुष समानतेसाठी इष्ट - हा गब्बरसाठी सर्वात कमकुवत युक्तिवाद आहे. पण तरी कंप्लिशनतेच्या सेकासाठी मी तो देतो आहे. समजा, म्हणजे फक्त समजाच... की समानता ही माणसाची एक मूलभूत गरज आहे. जर अशी गरज असेल तर केवळ समानतेसाठी समानता हेच अंतिम ध्येय होऊ शकतं. आणि मग त्यासाठी प्रयत्न करणं इष्टच ठरतं.
ऐसीकरांना नामी संधी आहे, इतरही पद्धतींनी इष्ट कसं आहे हे दाखवण्याची, आणि गब्बरच्या इतर वेळच्या लांबलचक हायेकी युक्तिवादांबद्दल त्याचा बदला घेण्याची. पण तोही काही कमीचा नाही. काहीतरी लिंका फेकून तो विषय बदलेल, मध्येच 'हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत' असं काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल... किंवा मार्केट आदर्श नसणंच कसं आदर्श आहे हेही सांगणाऱ्या लिंका देईल. तेव्हा सांभाळूनच जरा.
प्रश्न चुकीचा आहे
स्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं प्रमाण वाढणं इष्ट का आहे? याऐवजी स्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं प्रमाण वाढणं इष्ट आहे का? असा मुद्दा पाहिजे. Laissez-faire नुसार मार्केट ठरवेल की इष्ट काय आहे,
इतरांनीफडतुसांनी त्यात ढवळाढवळ करू नये.स्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं
स्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं प्रमाण वाढणं इष्ट आहे का?
याच्याऐवजी
वैज्ञानिकांचं स्त्रियांमधलं प्रमाण वाढणं इष्ट आहे का?
अशी एक बारीक द्रुस्ती सुचवतो.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
__/\__
__/\__
सहमत आहे. पण मला वाटतं उगाच
सहमत आहे. पण मला वाटतं उगाच समानतेसाठी समानते पेक्षा, ज्याला जे करायचं त्याची मुभा/संधी असली पाहीजे. मग नैसर्गिक समतोलानुसार (natural equilibrium) जे काही स्त्री-पुरुष प्रमाण व्हायचे ते रास्तच होईल.
छ्या छ्या... समानता म्हणजे
छ्या छ्या... समानता म्हणजे सगळ्यांनी सगळंच सारखंच करावं असं थोडंच आहे? प्रत्येकाने आपल्याला हवं तेच करावं. मात्र काय करावं आणि काय करू नये, याचे विकल्प सारखेच असले पाहिजेत. आता त्यालाही काही नैसर्गिक मर्यादा आहेतच, पण त्यासाठीही लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेण्याचा विकल्प आहेच. त्यामुळे तीही तक्रार राहात नाही. तेव्हा निदान मानवनिर्मित गोष्टींमध्ये तरी विकल्प समसमान आणि शक्य तितके जास्त हवेत. गब्बर या विधानाला खणखणीत पाठिंबा देईल याची खात्री आहे.
बाय द वे, सैन्यातील समानते
बाय द वे, सैन्यातील समानते बद्दल काय मत आहे? तिथेही ५०% स्त्रिया असणं फायदेशीर आहे का?
आयला, आता अजून एक नवीन
आयला, आता अजून एक नवीन प्रश्न! आता फायदेशीर कोणासाठी?
सोपं आहे!
शत्रूपक्षाच्या टेहळणी पथकासाठी!!!!!!
नोत नेचेस्सर्य
नोत नेचेस्सर्य
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेव्हा निदान मानवनिर्मित
मला काहीही समजले नाही.
सोपं आहे…
यात इतका विचार करण्यासारखं काय आहे ते कळलं नाही. वैज्ञानिकांमधलं स्त्रियांचं प्रमाण वाढल्यामुळे जर मार्केटमधल्या कुणाला क्ष इतका फायदा होणार असेल, तर तो क्ष उणे डेल्टा इतकी बिदागी एखाद्या कन्सल्टन्टला देऊन 'ऐअ' वर तसा तरफदारीवजा प्रतिसाद लिहून घेईल. जर असा काहीच प्रतिसाद आला नाही तर मार्केटला काही फायदा नाही हे आपोआपच सिद्ध होईल. मग आपण कशाला त्रास घ्यायचा?
हाच मुद्दा मांडणारा एक विनोद आहे:
How many Gabbars does it need to change a light bulb?
None. If the bulb needed changing, the market would have already done it.
बाय द वे, 'मार्केट' या शब्दातला रफार का दिसत नाहीय? असा रफार दाखवायचा विकल्प नसणं हे अँटिकॉम्पिटिटीव नाही का?
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
मला अजून एक सुचला. When will
मला अजून एक सुचला.
When will Gabbar be done changing the light bulb.
Certainly not before the market does, because you know, nobody can beat the market.
क्रिकेटवर बेटिंग करताना 'या ओव्हरमधला अमुक नंबरचा बॉल नोबॉल पडेल. अमुकव्या बॉलवर फोर जाईल.' वगैरे मायक्रोइव्हेंट करून त्यांवर बेट्स घेता येतात तसं काहीसं मॉडेल आम्ही ऐसीवर राबवायचं ठरवलेलं आहे. रफार दिसणं, अनुस्वार दिसणं, 'ज' हे अक्षर दिसणं, तुमच्याच आयडीवर पुष्पवर्षाव होताना दिसणं, एखाद्या विशिष्ट आयडीचं नाव अदृश्य करणं वगैरे अनेक ऑप्शन्स आम्ही अला कार्टे तत्त्वावर ऐसीच्या सदस्यांना विकणार आहोत. त्यातल्या काही टेस्टिंगचाच परिणाम होतो आहे बहुतेक.
आता गब्बर विनोद सुरूच झाले
आता गब्बर विनोद सुरूच झाले आहेत तर -
Q : How many Gabbars will it take to make a joke that a woman will understand?
Aditi : हॅ हॅ हॅ
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पूर्णतः अवांतर - टेस्टिंगमध्ये हेही आहे का ?
मराठीत 'विकल्प' हा शब्द 'किंतू', 'संशय', 'शंका' या अर्थी मी आत्तापर्यंत वाचला, वापरला आहे. उदा. "मनात काही विकल्प ठेवू नकोस रे, बाबा !"
हिंदीतला 'विकल्प' = मराठीतला 'पर्याय'.
(याआधी 'ऐसी'वर विकल्प = पर्याय या अर्थी आला असल्यास माहीत नाही त्यामुळे राघांचा हा लेख माझ्या शंकेसाठी एक निमित्त समजावे.)
--
दाते-कर्वे:
विकल्प—पु. १ भेद; फरक. २ विरोध; मतभेद. 'दोहींशीं घटिताच विकल्प । शून्यसंकल्प सोचरीके ।' -एरुस्व १.९३. ३ विरुद्ध, प्रतिकूल, भिन्न मत. ४ अंदेशा; कुतर्क; आशंका; वाईट किंवा चुकीचा तर्क, विचार. 'तैसें सांडिले अशेखीं । विकल्पीं जे ।' -ज्ञा १५.२८८. ६ संशयितपणा; संशय; अनिर्णय; मताचा किंवा हेतूचा दुटप्पीपणा. 'ऐसे दिवस लोटतां फार । अवलीस विकल्प पातला थोर ।' ७ (-अव.) विचार; कल्पना; तर्क. ८ भ्रम. 'उभेच संकल्प विकल्प दोघे ।' -सारुह १.२२. ९ (व्या.) एकापेक्षां अधिक रूपांचा किंवा नियमांचा स्वीकार. [सं.] ॰घालणें-संशय उत्पन्न करणें; वितुष्ट, बिघाड आणणें. 'आमुचें तेथें रत होतें चित्त । त्यांत विकल्प घातलां तुंवा ।'
--
नाही म्हणायला मोल्सवर्थमध्ये alternative असा एक अर्थ दिला आहे खरा, पण मराठीत तसा वापर मी याआधी पाहिलेला नाही.
मोल्सवर्थ :
विकल्प (p. 751) [ vikalpa ] m Opposition or difference of opinion respecting. 2 An opposite or a different opinion. 3 An alternative, a sphere or a subject of option. 4 Suspicion, surmise, evil apprehension concerning: also an evil, bad, or wrong surmise or thought. 5 Dubiety, doubt, indecision, doubleness of opinion or of intention regarding. Ex. ऐसे दिवस लोटतां फार ॥ अवलीस वि0 पातला थोर ॥. 6 A thought, fancy, notion about. Generally pl. 7 In grammar. Admission of more than one form or rule. वि0 घालणें To cast doubt upon; or to inject doubtfulness. Ex. आमुचें तेथें रत होतें चित्त ॥ त्यांत वि0 घातला तुंवा ॥.
स्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं प्रमाण वाढणं इष्ट का आहे?
नक्कीच. त्यामुळे फडतूसांच्या जिंदगीत बराचसा फरक पडेल. वानगीदाखल.
१) स्त्रीवर्ग बघत असलेल्या सासु सुनांच्या मालिका कमी होतील. त्यामुळे रिमोटवर पुन्हा एकदा पुरुषी वर्चस्व स्थापन करायची नामी संधी चालून येईल. तेही कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता.
२) स्त्रियांना आपण काहितरी उच्च प्रतिचे काम करत असल्याचा फील येईल आणि कामात अडकून पडल्यामुळे नसत्या खरेद्या बंद होतील. त्यामुळे एकंदरीतच वार्डरोबला लागणारी जागा कमी होईल आणि कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांची निकड भासू लागेल. त्यामुळे बिल्डर कमी क्षेत्रफळ असलेली घरे बांधण्यास प्रवृत्त होतील. आपसूकच कमी उत्पन्न असलेल्या वर्गाचे घर घेण्याचे मनसुबे पुर्ण होण्यास मदत होईल.
३) आत्ता बर्याचशा स्त्रिया गृहिणी असल्यामुळे त्या आठवड्यातून दोन-चार वेळेस का होईना स्वयंपाक बनवितात त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीजचा पाहिजे तेवढा विस्तार आणि विकास होऊ शकलेला नाहिये. शिवाय इन हाऊस कुकच्या (पक्षी नवर्याचे, प्रियकराचे, लिव्हीन पार्टनराच्या) पाकनिपूण होण्याच्या बाबतीत मर्यादा येतात. स्त्रियांच्या गैरहजेरीमुळे बर्याच पुरुषांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. ज्यांना रोजगार उपलब्ध होणार नाही त्यांना सेवेचा चानस मिळेल.
ही लिस्ट पाहिजे तितकी वाढवता येईल पण विस्तारभयास्तव थांबतो. नाहितर लेख चार आणे आणि प्रतिसाद बारा आणे व्हायचा.
पण माझ्यामते जास्तीत जास्त स्त्रियांनी वैज्ञानिक बनण्याऐवजी धर्ममार्तंडीण बनण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन आजपर्यंत धर्माने स्त्रियांवर जे अत्याचार केले आहेत त्याचा बदला घेण्याची संधी प्राप्त होईल.
आणी हा गब्बर कोण मोठा मार्केटतज्ञ लागून गेला आहे ? अरे जगातले ९०% मार्केट केवळ स्त्रियांमुळेच चालते हे ह्याला कुणीतरी समजवा रे. त्यामुळे मार्केटवर काय परिणाम होईल याची व्यर्थ चिंता तु बाळगू नको. सर्व चिंता सोडून 'तिला' शरण जा आणि 'करिष्ये वचनं तवं' या उक्तीप्रमाणे चालायचा प्रयत्न कर.
आणि हो, ९०% या आकड्यासाठी लगेच माझ्याकडे पुरावे मागायला येऊ नका. मी काही 'लिंक-गब्बर' नाही. जास्तच गरज असेल तर एकाच दमात अनेक कडवी रचणार्या महापुरुषाकडे जा. तो तुझे अज्ञानरुपी तिमिर दुर करुन 'सत्यस्त्री' चे दर्शन करुन देईन.
आणी हा गब्बर कोण मोठा
म्हणूनच म्हणतो - की जर जगातले ९०% मार्केट केवळ स्त्रियांमुळेच चालते - असे जर असेल तर ह्या धाग्याचे अस्तित्व एक्सप्लेन करा ना.
कृपया प्रतिसादातला
आपल्या उत्तरासाठी माझ्या प्रतिसादाचा शेवटचा पॅरा बघावा.
शिवाय धाग्याचा विषय जरी चर्चाविषय असला तरी त्याचे विनोदाचे अंग बघावे ही णम्र विनंती.
ह्या धाग्यावरील प्रतिसादात स्मायलींचा उपयोग करणे म्हणजे पॅडी कांबळेच्या नाटकाच्या प्रयोगात सभागृहाबाहेर 'हे नाटक विनोदी आहे' असा बोर्ड लावणे असा होईल.
वरील प्रतिसाद
वरील प्रतिसाद मी सखेद मागे घेत आहे पण या प्रतिसादावर स्वसंपादनाची सोय दिसत नसल्यामुळे मी हा उपप्रतिसाद देत आहे.
नाय नाय. काहीही मागे वगैरे
नाय नाय. काहीही मागे वगैरे घेऊ नका. तुमचा मुद्दा "राजिवड्याच्या विश्वेश्वराप्रमाणे" घट्ट आहे. मी फक्त प्रतिवाद केलाय. बचेंगे तो और भी लडेंगे.
--------
हे वाक्य बरोबरच आहे.
"The curious task of economics is to demonstrate to men how little they really know about what they imagine they can design." - Friedrich August von Hayek
एंट्री बॅरिअर हे मार्केटाच्या
एंट्री बॅरिअर हे मार्केटाच्या विरुद्ध आहे का? कारण एंट्री बॅरिअर/मोनॉपोली ही धंद्यांना इष्ट गोष्ट आहे. नफेखोरीसाठी.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मुळात एंट्री बॅरिअर ची
मुळात एंट्री बॅरिअर ची व्याख्या करा. थोडे कठिण आहे. बिल बेन चा पेपर आहे त्यावर. पण हाच एंट्री बॅरिअर हे जेव्हा सरकार निर्माण करते तेव्हा सरकार काही मुठभरांना नफेखोरीसाठी व इतरांना "तोटेखोरी" ची सोय करते.
बार्गेनिंग पॉवर ची परमावधी म्हंजे इतरांसाठी एंट्री बॅरिअर - अशी अतिसुलभ व्याख्या केली जाऊ शकते. व्यक्ती व कंपन्या दोघांनाही हा बार्गेनिंग पॉवर निर्मीती चा पर्याय्/विकल्प उपलब्ध आहेच की. व असा एंट्री बॅरिअर मार्केट चा मूलभूत हिस्सा आहे.
अनुप ढेरे आणि गब्बर यांना
अनुप ढेरे आणि गब्बर यांना एकत्रित प्रतिसाद-
अनुप ढेरे - धंद्यांसाठी जे चांगलं ते मार्केटसाठी चांगलं असेलच असं नाही. उदाहरणार्थ, सर्वांना सर्व ठिकाणच्या किमती माहीत असणं हे मार्केटसाठी चांगलं. दळणवळणाच्या सोयी असणं मार्केटसाठी चांगलं. पण त्यामुळे अनेक प्रस्थापित धंदे करणारांसाठी ते वाइट असतं. इनएफिशियंट मार्केटमुळे मालाचं उत्पादन, वितरण योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे मार्केटतर्फे ज्या जादू शक्य आहेत त्या होऊ शकत नाहीत.
वाटलंच होतं की सरकारवरती कुठूनतरी दुगाण्या झाडल्या जाणार. 'माझी चूक का दाखवता, आधी त्यांना बोला की' टाइपचा युक्तिवाद आहे हा.
गब्बर, इथे तुम्ही अर्ध्यावरच थांबलात. एंट्री बॅरिअरची व्याख्या कठीण आहे, तो मार्केटचा मूलभूत हिस्सा आहे वगैरे बोलून तुम्ही इशूला स्कर्टताहात. मार्केट बॅरिअर असावी की नाही याला हो की नाही असं स्वच्छ उत्तर का देत नाही?
मार्केट बॅरिअर असावी की नाही
सरकारनिर्मित एंट्री बॅरियर्स नसावीत. सरकारने ती निर्माण करू नयेत. ( अर्थात संरक्षण वगैरे सेन्सिटिव्ह क्षेत्रांबद्दल वेगळी चर्चा केली जाऊ शकते.)
मुळात कोणीही वैज्ञानिक
मुळात कोणीही वैज्ञानिक व्हायचीच काय गरज आहे हे सांगा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अगदी अगदी! एनीवे विज्ञान हे
अगदी अगदी! एनीवे विज्ञान हे थोतांड आहेच.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
१.ब कारण आदर्श मार्केटसाठी No
१.ब
स्त्रियांना वैज्ञानिक बनण्यास मदत करणारे म्हंजे सरकार असे गृहितक आहे. जेव्हा सरकार अशी मदत करते तेव्हा सरकार स्त्रियांसाठीचा एंट्री बॅरियर कमी करते. पण अॅट द कॉस्ट ऑफ मेन. नाही का ? सरकार जेव्हा ही मदत करते तेव्हा सरकार मार्केट मधून काही रिसोर्सेस प्रिएम्प्ट करते. त्यामुळे ते रीसोर्सेस पुरुषांना Equal access to factors of production च्या बेसिस वर मिळत नाहीत.
आता तुम्ही असे म्हणू शकता की इतर मुद्द्यांचे काय ? संशोधक म्हणून नोकरभरती करणार्यास स्त्री संशोधकांचा विकल्प (जो पूर्वी खूप कमी होता तो) मिळालाच् ना ?? लेबर सप्लाय मोठा व डायव्हर्सिफाय झालाच ना ?? यावर माझे उत्तर हे - पण त्याची कॉस्ट मात्र त्या पुरुषांनी भुगतान केली जे भेदभावास जबाबदार व दोषी होते की नव्हते हे सुद्धा तुम्हास माहीती नाही. तुम्ही "सो व्हॉट ?" म्हणू शकता.
स्त्रियांना वैज्ञानिक बनण्यास
ते गृहीतक चूकीचेही असेल. सरकार उत्तेजनार्थ स्त्रियांना अधिक सुविधा जसे मॅटर्निटी लीव्ह, जास्त मोठी स्कॉलरशिप, कमी फिल्ड्वर्क वगैरे अमिषही दाखवू शकतेच की.
जेव्हा सरकार अशी मदत करते
तुम्हाला स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा विरोध असं खरंच वाटतं का हो?
पुरुषांचा बळी देऊन नव्हे, स्त्रियांना होणारा जाच कमी करून.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एकदम इश्श्युच्या वर्मावर बोट
एकदम इश्श्युच्या वर्मावर बोट ठेवलयस.
____
च्यायला या संस्थळावर आपली कुवत कळली. आपण फक्त चीअर-लिडींग करत रहायचं - ८०% मनात अन २०% जनात
मला असे मुद्दे का सुचत नाहीत
पण अॅट द कॉस्ट ऑफ मेन. नाही
गब्बरकडून इतका कमकुवत युक्तिवाद येईल असं वाटलं नव्हतं. त्यावर अनेक प्रतिवाद शक्य आहेत.
- म्हणजे सध्याच्या परिस्थितीत स्त्रिया आत्ताच कॉस्ट देत आहेत, ती देत राहाणं मान्य आहे तर.
- समजा, पुरुषांना डिसअॅडव्हांटेज न होता स्त्रियांची संख्या वाढली तर गब्बरची हरकत आहे का? उदाहरणार्थ, समजा चार टक्के पुरुष संशोधनात आहेत, आणि फक्त एक टक्का स्त्रिया संशोधन करतात. आता जेव्हा संशोधकांची गरज वाढेल तेव्हा स्त्रिया जास्त भरती केल्या तर भविष्यात पुरुषांपैकी चारच टक्के संशोधनात असतील, पण स्त्रियांपैकी दोन किंवा तीन टक्के संशोधन क्षेत्रात जातील. यात पुरुषांना कॉस्ट कुठे आली? याच दिशेने प्रवास होत नाहीये, याबद्दल गब्बरकडे काही खात्रीलायक विदा आहे का? गब्बरने झीरो सम गेम गृहित धरला आहे, त्यामुळे हा गोंधळ होतो आहे.
- कदाचित पुरुषांना नसेल राहायचं संशोधन क्षेत्रात. नाइलाजाने ते करत असतील. पुन्हा गब्बरचं गृहितक - संशोधन क्षेत्रात शिरायला आणि राहायला लोक उत्सुक आहेत.
- कदाचित स्त्रिया या अधिक चांगल्या संशोधक असतील. मग मार्केटच्या मागणीनुसार जास्त टॅलेंटेड लोकांना जास्त संधी मिळायला नको का? गब्बरचं गृहितक - पुरुष हे स्त्रियांइतकेच उत्तम संशोधक आहेत.
मी काय म्हणतो गब्बर, तुम्ही तुमची गृहितकं स्पष्टपणे का मांडत नाही? कदाचित तशी यादी बघितल्यावर ऑकॅमचा रेझर वापरून त्यातले खुंट काढून टाकणं सोपं जाईल.
राघा मुद्द्यांना नंबर घाला
राघा मुद्द्यांना नंबर घाला हो.
सध्या सरकार पुरुषांना भरती करण्याचे धोरण राबवतच नाही तेव्हा कॉस्ट चा प्रश्न आला कुठून?
स्त्रियांचा भरणा मुद्दम केल्याने , पुरुषांवर अन्याय होइलच की.
पुरुषांकडे आहे की सोडण्याचा विकल्प.
या मुद्द्याला प्रतिवाद करताना गोंधळ उडतोय माझा कारण राघा तुम्हीच हे गृहीत धरताय की कदाचित स्त्रिया अधिक चांगल्या संशोधक असतील.
अॅट द कॉस्ट ऑफ द मेन - हा
अॅट द कॉस्ट ऑफ द मेन - हा खाली मी विशद केलेला आहे.
----
म्हणजे सध्याच्या परिस्थितीत स्त्रिया आत्ताच कॉस्ट देत आहेत, ती देत राहाणं मान्य आहे तर. - स्त्रिया सद्यस्थितीत कोणत्या कॉस्ट्स देताहेत ?
----
तुम्ही जो झिरो सम गेम चा मुद्दा मांडलात तो सरकारी आस्थापनांमधील संशोधक पदांमधे असू शकतो. असरकारी आस्थापनांमधे शक्यता कमी असते. ( याचा डेटा नाही पण लॉजिक देऊ शकतो.). अर्थव्यवस्था ही झीरो सम गेम नाही. पण सरकारचा कारभार चांगलाच झिरो सम गेम च्या जवळपास जाणारा असतो. कारण नियमाधारितच वागावे लागते त्यांना.
----
माझी गृहितके -
१) प्रजातांत्रिक सरकार हे सर्वसामान्यपणे रूल बेस्ड चालते.
२) स्पर्धात्मक परिस्थितीत नोकरभरती व कपात करताना सुद्धा सरकारला वस्तुनिष्ठ नियम ठेवून ते पाळावे लागतात. ( हा मुद्दा गहन आहे. कारण याचे स्वरूप व परिणाम स्पर्धा प्रक्रिया व्यवस्थित समजल्याशिवाय लक्षात येत नाहीत.)
३) भेदभाव झालाय की नाही ते ओळखणे व सिद्ध करणे व सर्वात महत्वाचे म्हणजे attributing it to specific person हे जनरली कठिण असते.
तुम्हाला स्त्रीवाद म्हणजे
स्त्रीवाद्यांचा आवडता प्रश्न. खडा टाकून बघायचा. लागला तर लागला. We are not trying to take a larger share of the pie. We are trying to increase the size of the pie itself. असं म्हंटलं की स्वतःचीच पाठ थोपटून घेता येते. ( आता लगेच - You are putting words in my mouth. असा डायलॉग येईलच. )
एंट्री बॅरियर - ही सुयोग्य संकल्पना आहे जिचे या धाग्यातील मूळ मुद्द्याच्या संदर्भात अॅप्लिकेशन कसे होते व व्हायला हवे त्याबद्दल विवाद होणे गरजेचे आहे. जोडीला एक्झिट बॅरियर ही संकल्पना सुद्धा विचार करण्या योग्य आहे. संशोधक म्हणून एंट्री मारणे हे प्रथम महत्वाचे आहे. नंतर संशोधक झाल्यावर जाच कमी करणे महत्वाचे. एंट्रीला च जाच होऊ शकतो व तो म्हंजे उमेदवार निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेमधे. व यामधे निवडीच्या प्रक्रियेमधून हेतूपुरस्सर वगळले जाणे (स्त्री आहे म्हणून) हा सुद्धा एक भाग असतो. किंवा कागदोपत्री दाखवायला निवडप्रक्रियेत स्त्री उमेदवार अंतर्भूत करणे पण मुलाखतीत जाच करून किंवा शांतपणे/धूर्तपणे तिला बाद करणे वगैरे प्रकार होतात ह्या excessively basic facts आहेत.
मी दुसरा प्रश्न विचारतो - समजा १-जुलै-२०२० ला एक संशोधकाची जागा भरायची आहे. इथे स्त्री उमेदवार निवडला जावा म्हणून येत्या पाच वर्षांत सरकार काहीतरी कृति करणार आहे. व या कृतिमुळे स्त्रियांचा जास्त विकास होईल व स्त्रिया त्या जागेस पात्र होण्याची शक्यता वाढेल. व या कृतिवर येत्या ५ वर्षांत सरकार रुपये १००० खर्च करणार आहे (गृहितक).
१) या १००० मधले काही पैसे स्त्रियांकडून आले व काही पुरुषांकडून आले. मान्य की अमान्य ?
२) या १००० मधले जे काही पैसे स्त्रियांकडून आले ते स्त्रियांनी स्त्रियांसाठी दिले. मान्य की अमान्य ?
३) या १००० मधले काही पैसे पुरुषांकडून आले ते पुरुषांनी स्त्रियांच्या विकासासाठी दिले की जेणेकरून women will be rendered more competitive in the labor market. मान्य की अमान्य ?
जर क्र. ३ मान्य असेल तर "अॅट द कॉस्ट ऑफ मेन" हे अमान्य का ?
[ हो पण स्त्रिया पण खर्च करीत आहेतच ना (२ प्रमाणे) - असे उत्तर द्यायचा मोह होईल तुम्हास. पण ..... ]
संशोधक म्हणून एंट्री मारणे हे
अहो, त्या एंट्री बॅरिअर असण्याला जाच म्हणत आहेत.
अमान्य. हे सगळे पैसे स्त्रियांकडूनच आलेले आहेत. मिलिट्रीचे पगार आणि त्यावरचा खर्च पुरुषांकडून आलेला आहे. कारण तिथे जास्त पुरुषांना फायदा होतो.
अहो, त्या एंट्री बॅरिअर
हे सरकार दरबारी होते की प्रायव्हेट मधे ? प्रायव्हेट मधे होत असेल तर केस वेगळी आहे.
-----
हे सगळे पैसे स्त्रियांकडूनच आलेले आहेत ?? कसे ?? सरकारची जी काही आवक असते ती सर्व स्त्रिया व सर्व पुरुष दोघेही मिळून देतात की नाही ??
सरकारची जी काही आवक असते ती
माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला नाही. तुमच्या मते ज्याप्रमाणे सरकारकडे आलेले पैसे हे स्त्रियांचे - हे पुरुषांचे असे वेगळे काढता येत नाहीत, तसेच सरकारचा खर्चही हा खर्च पुरुषांसाठी, हा खर्च स्त्रियांसाठी असा वेगळा हिशोब करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला सरकारचा एकंदरीत खर्च स्त्रियांवर अधिक होतो आणि त्यात या विशिष्ट खर्चाचा वाटा आहे हे सिद्ध करावं लागेल.
एक उदाहरण सांगतो. जॅक आणि जिल अशी दोन पोरं आपले खाऊचे/बक्षिसांचे पैसे आईबापांकडे साठवायला देतात. त्यातल्या काही पैशांतून जॅकसाठी प्रोटिन सप्लिमेंट्स आणली. आता तुम्ही जर तक्रार केली की हे पैसे दोघांचे आहेत, तरीही फायदा फक्त जॅकला झाला. त्याची शक्ती वाढली. त्याचा कॉंपिटिटिव्ह अॅडव्हांटेज वाढला. आता त्याला जास्त स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवता येतील. पण ती योग्य नाही. जॅकच्या प्रोटीन सप्लिमेंटबरोबरच जिलच्या नवीन ड्रेसवर आईबापांनी त्याच पैशात केलेला खर्चही पाहायला हवा. त्याने तिचं सौंदर्य वाढलं, तिचा कॉंपिटिटिव्ह अॅडव्हांटेज वाढला. त्यामुळे असा विशिष्ट खर्चांचा हिशोब न करता एकंदरीत खर्चांचं वितरण बरोबर आहे की नाही ते बघायला पाहिजे.
१) जॅक आणि जिल अशी दोन पोरं
१) जॅक आणि जिल अशी दोन पोरं आपले खाऊचे/बक्षिसांचे पैसे आईबापांकडे साठवायला देतात. जॅक किती देतो व जिल किती देते ?
२) जॅकसाठी प्रोटिन सप्लिमेंट्स आणली त्यावर जे पैसे खर्च झाले ते (१ मधे) जॅक ने जितके दिले होते त्यापेक्षा जास्त झाले का ?
३) प्रश्न (२) अर्थहीन्/चुकीचा/गैरलागू/अनुचित आहे असे तुम्हाला वाटते का ?
जॅक आणि जिलची अर्धी गुणसूत्रं
जॅक आणि जिलची अर्धी गुणसूत्रं समान असल्यामुळे जॅकवर त्याने आणलेल्या पैशांतले अर्धेच खर्च झाले आणि उरलेले जिलवर, तरीही जॅकचा तोटा होत नाही.
प्रत्यक्षात - स्त्रिया आणि पुरुष जी काही कामं करतात, त्याचे सगळ्याचे पैसे मोजले जातात का? उदा - राहुल सामान उचलून आणतो. प्रिया कचरा काढते, स्वयंपाक करते, मुलांना नऊ महिने पोटात वाढवते, त्यातले आठ महिने नोकरीसुद्धा करते, इत्यादी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अहो, हे प्रश्न तुम्ही मला काय
अहो, हे प्रश्न तुम्ही मला काय विचारताय? बर्डन ऑफ प्रूफ असं दुसऱ्यावर ढकलून कसं चालेल? जे काय चाललंय ते पुरुषांसाठी अन्याय्य आहे असा तुमचा दावा आहे. तेव्हा तुम्ही काढा आकडे शोधून आणि करा सिद्ध.
असो. वरच्या लेखात मी पाचसात वेगवेगळी कारणं दिली. त्यातल्या एका कारणाचा एक सबसेक्शन खोडून काढायला तुमची एवढी दमछाक होईल असं वाटलं नव्हतं. त्यापेक्षा तुम्ही मी दिलेल्या गृहितकांपैकी कुठचं तुम्हाला मान्य आहे ते स्पष्ट का सांगत नाही? मांडणी करा, नुसते आक्षेप नका घेऊ.
फायदा फक्त जॅकला झाला यात
फायदा फक्त जॅकला झाला यात जॅकचा काय दोष? दोघांना ते सप्लिमेन्ट घ्यायची समान संधी होती. अन समजा समान संधी नव्हती तर तेव्हा ज्या पुरुषांनी अन्याय केला त्याची शिक्षा आताच्या पुरुषांनी का भोगावी - फक्त ते पुरुष आहेत म्हणून? मला वाटतं हा गब्बर यांचा मुद्दा आहे.
मोअर दि मेरिअर॑, अनलेस
मोअर दि मेरिअर॑, अनलेस प्रुव्हन अदरवाइज. एका माणसाच्या म्हणण्याला काय महत्त्व देणार.
Q: How many गब्बर does it
Q: How many गब्बर does it take to screw in a light bulb?
A: None. If the government would just leave it alone, it would screw itself in.
...
Q: How many गब्बर does it take to screw in a light bulb?
A: A light bulb would be too small for Gabbar to fit in, let alone his partner.
असो.
हां कळलं मला. म्हणजे लाईट
हां कळलं मला. म्हणजे लाईट बल्ब मध्ये गब्बर सामावला जाणे शक्यच नाही अन त्याची सहचारी सुद्धा .
चांगला आहे हा जोक.
गब्बर विनोद
आता बहुतेक मुंग्या, नरभक्षक लोक, रजनीकांत, अजित आणि रॉबर्ट अशासारखे 'गब्बर विनोद' सुरू होणार असे दिसते! त्यात माझेहि योगदान -
Q. How many Gabbars are needed to change a light bulb?
A. Two. Gabbar himself to change the light bulb and one more person to shout 'can someone explain to me what he is doing?'
Q. How many men are needed to change a light bulb?
A. Two - Gabbar and Hayek. Gabbar will change the bulb and Hayek will explain what he is doing.
Q. जगातल्या सगळ्या फडतुसांचा
Q. जगातल्या सगळ्या फडतुसांचा खात्मा करायला किती गब्बर लागतील?
A. दोन. एक खात्मा करायला. आणि दुसरा खात्मा केलेले फडतूस होते (किंबहुना फडतूस होते म्हणूनच खात्मा झाला) हे सांगायला.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
Q. How many Gabbars are
Q. How many Gabbars are needed to change a light bulb?
A. None. Gabbar will provide a hyperlink to "do it yourself" ..
Q: How did Gabbar defend
Q: How did Gabbar defend objections on his research paper
A. By suggesting 7 more sensible & high level objections
प्रः गब्बरच्या प्रस्तावाला
प्रः गब्बरच्या प्रस्तावाला बसंतीने नकार का दिला?
उ: कारण गब्बरने "आय लौ यू" पाठोपाठ "संभाव्य आक्षेप" ही सांगून टाकले.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हा खतरा आहे
हा खतरा आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कायच्याकाय!
गब्बर आयलौयू म्हणणारच नाही, गब्बर मार्केट लव्हज् यू म्हणणार, मार्केट हॅज चोझन यू फॉर मी म्हणणार!
-Nile
गब्बर मार्केट लव्हज् यू
तीव्र आक्षेप. मार्केट मधे बलपूर्वक हस्तक्षेप करण्याची वे......
कमी स्त्रीया संशोधक असणं याचं
कमी स्त्रीया संशोधक असणं याचं एक्सप्लनेशन उत्क्रांतीत नाही का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आहे ना.... पुरुष सर्व गरजा
आहे ना....
पुरुष सर्व गरजा पुरवणार; त्यासाठी जे काय करायला लागेल ते करणार. त्यात संशोधन आलंच.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
१-अ) मुद्दा मान्य. १-ब)
१-अ) मुद्दा मान्य.
१-ब) मार्केटदेवतेस सपाट जमीन आवडते हे मार्केटदेवतेच्या भूमिकेचे मिस-रिप्रेझेंटेशन आहे. World is Flat चा युक्तिवाद पत्रकार थॉमस फ्रिडमन यांनी केलेला होता. त्याला अनेकांनी उत्तरे सुद्धा दिलेली आहेत. एंट्री बॅरियर्स मार्केट देवतेस आवडत नाहीत हे सुद्धा मिस-रिप्रेझेंटेशन आहे. मार्केट देवता पर्फेक्ट आहे वा असते असा तुम्ही दावा केलाय असे मी म्हणत नाही. पण मार्केट खरोखर फेल्युअर्स नी युक्त असते. पण बॅरियर्स उभी केली जातात. उदा. भारतात कोणत्याही फॅक्टरीत काम करण्यासाठी भारतीय नागरिकच भरती केला पायजे असा नियम आहे (अपवाद असू शकतील पण नियम जवळपास सार्वत्रिक आहे.). तो बॅरियर नाही तर काये ?
स्त्रियांच्या एंट्रीसाठी बॅरियर्स असतील तरी स्त्रियांकडे अनेक मार्ग उपलब्ध आहेत व असतात. खरंतर नोकरभरतीच्यावेळी स्त्री विरुद्ध भेदभाव होत असेल तर तिच्याकडे एक महत्वाचे शस्त्र असते. पण सरकार मधे पडून ते शस्त्र निष्प्रभ करून टाकते. ( व स्त्रीवाद्यांचे त्याकडे लक्ष जात नाही किंवा त्यांना लक्ष द्यायचे नसते.). Her main weapon is that she has the option to offer to work at a lower wage. - हे ऐकले रे ऐकले की बायका वस्स्कन अंगावर येतात - "मी का म्हणून कमी पगारात काम करू ?" असे म्हणत.). ते शस्त्र आहे ह्याकडे त्यांचे लक्ष नसतेच. ते शस्त्र कसे काय आहे असा प्रश्न सुद्धा विचारायची तसदी घेत नाहीत.
१-क) ५०% मान्य. मार्केट मधे तोटा व दिवाळखोरी काही महत्वाची जबाबदारी पार पाडतात. किमान ९०% अमेरिकन व किमान ९०% आफ्रीकन लोकांना भारतातील फॅक्टरीत नोकरी न मिळण्याची बॅरियर आहे. प्रवेश नाही. पण मार्केट देवी रुसलेली नाही. तिने मार्ग शोधून काढला. त्याची आऊट सोर्सिंग, FTA/PTA अशी वेगवेगळी रूपे आहेत.
२) कारण ज्या बंधनांपोटी विषमता निर्माण झाली होती ती बंधनं मोडून पडलेली आहे. - हे कळीचे वाक्य आहे. त्या बंधनांचे फायदे व तोटे होते. स्त्री व पुरुष दोघांनी ते लाभ घेतले व किंमत मोजली. ती बंधने मोडून पडलेली आहेत म्हंजेच एंट्री बॅरियर्स कमी झालेले आहेत किंवा कोसळून पडलेले आहेत. उलट आज एंट्री एनेब्लर्स उपलब्ध आहेत. बर्थ कंट्रोल, वॉशिंग मशिन वगैरे. त्यामुळे वेगळे यत्न करायची काय गरज आहे ?? आजही स्त्रियांचे जीवन सुलभ करणार्या बहुतांश सोयी मार्केट ने च उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सरकार पेक्षा.
३) धनदांडग्यांना विकल्प हवे असतात. हो. पण पुरुषाला स्त्री हा विकल्प त्यांच्यासाठी फारसे मायने नही रखता. तसे जर असते तर स्त्रियांविरुद्ध भेदभाव अस्तित्वातच नसता. A greedy industrialist (धनदांडगा उद्योगपति) will look for opportunity to hire lowest priced resource for the same level of productivity. (शस्त्र....)
४) सरकार जे प्रयत्न करणार आहे त्यास जो खर्च येणार आहे - त्यात माजलेल्या फडतूसांचे योगदान किती. आणि संशोधकांची डिमांड इतकी आहे ????
५) ओके. मान्य.
६) हा तर मार्केट चा डिफेन्स झाला. तुम्ही माझ्या पक्षात आलात का ?
७) कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक.
-----------------------
सरकार जर संशोधकांमधे स्त्रियांचे प्रमाण वाढवण्यास प्रोत्साहन देणार असेल तर ती एक सबसिडी असते. सबसिडी ची कॉस्ट ही जे लाभ घेऊ शकत नाहीत त्यांच्यावर डिस-प्रपोर्शनेटली पडते. They are forced to pay the costs but excluded from receiving direct benefits. They might get indirect benefits. व म्हणून अशा प्रकारचा सरकारी यत्न हा पुरुषविरोधी आहे.
मार्केट देवता पर्फेक्ट आहे वा
मार्केटदेवतेचं मंदिर अस्वच्छ आहे याबद्दल वाद नसावा. माझा मुद्दा असा आहे की तिच्या सर्वच भक्तगणांत ते स्वच्छ असणं इष्ट अशी इच्छा असते.
नाही, मार्केट लाइटबल्ब आपोआपच बसवेल. फक्त 'वॉशिंग मशीन हे स्त्रियांसाठी एनेबलर आहे' असं ऐसीवर नाक वर करून बोलण्याच्या तुमच्या धाडसाचं कौतुक वाटतं.
मी काही गब्बरचा पक्ष, गब्बरचा विरोधी पक्ष असा विचार करत नाही. गब्बरच्या शुवांमध्ये मैलभर चालून त्यालासुद्धा पटेल असं कारण मांडलं इतकंच.
आता कसं मुद्द्याचं बोललात. अहो, मार्केट वगैरे सगळं झूट आहे! आपल्या प्रेयसीच्या मनातल्या इच्छांसाठी जान कुरबान असते. तिला जर वाटत असेल की व्हावी स्त्रीपुरुष समानता, तर तिच्या डोळ्याला डोळे भिडवून आपण नाही म्हणू शकतो का? मग मार्केट गेलं खड्ड्यात! तसंही ते फरफेक्ट नाहीच्चे.
Time to celebrate
या वाकताडनापासून ते
अशा पार १८० डीग्री बदलापर्यंत..... नक्की क्कॉय क्कॉय झालं ते माझ्या स्क्रीनवरती खरच दिसत नाहीये म्हणून म्हटलं विचारावं इतकच!
हे सगळं खेळीमेळीत चाललेलं आहे
हे सगळं खेळीमेळीत चाललेलं आहे हे बहुधा तुमच्या लक्षात आलं नसावं...
खरंतर नोकरभरतीच्यावेळी स्त्री
भेदभाव नोकरभरतीच्या वेळेस सुरू होतो हे आणखी एक हस्तिदंती मनोऱ्यातलं गृहितक.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असे गृहीतक वरच्या
असे गृहीतक वरच्या प्रतिसादातून कुठे दिसले?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मांडणी करताना अन्यत्र
मांडणी करताना अन्यत्र होणाऱ्या भेदभावाचा काहीही उल्लेख नाही. रेषांमधली अक्षरं वाचायची सवय लागली की अशी गृहितकं लक्षात येतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चर्चा महाराष्ट्राबद्दल असली
चर्चा महाराष्ट्राबद्दल असली तर तमिळनाडूचा उल्लेख केलाच पाहिजे आणि तो केला नाही की तमिळनाडूला दुर्लक्षाने मारले असे ओरडणे ही स्ट्रॅटेजी बाकी रोचक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भेदभाव नोकरभरतीच्या वेळेस
ब्याट्याने बरोब्बर पकडला आहे मुद्दा.
बाकीचे लोक हे फक्त हस्तिदंती मनोऱ्यातून, थियरॉटिकल बोलतात. प्रॅक्टिकल बोलत नाहीत, ग्रासरूट लेव्हल वर येऊन बोलत नाहीत. नैका ?
आपल्या आलिशान गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा खाली करून बोलत नाहीत. नैका ??
आंबा, सफरचंद यांच्याबद्दल बोलल्यानंतर आम्ही द्राक्षांबद्दल काही बोललेले नाही असे दिसले की लगेच फळं म्हंजे फक्त आंबा व सफरचंद च की काय ??? असा प्रश्न विचारण्यातला प्रकार झाला हा.
"नोकरभरतीच्यावेळी" हा शब्द त्या वाक्यास नेमकेपणा आणण्यासाठी इंट्रोड्युस केलेला होता.
वस्तुस्थिती ही आहे की स्त्रियांविरुद्ध भेदभाव होतो हे मी वर मान्य केलेलेच आहे. पण त्याचे किमान * दोन भाग केलेले आहेत - १) नोकरभरतीच्या वेळी, २) भरती झाल्यानंतर. अर्थात हे दोन च भाग नाहीत. स्त्रियांविरुद्ध भेदभाव होतो तो जन्मापासून मृत्यू पर्यंत चालतो. नोकरभरतीच्या वेळी वा त्यानंतर हे दोन भाग झाले. That is not all. व हे अमान्य नाहीच्चे.
स्त्रिया पुरुषांविरूद्ध भेदभाव करीतच नाहीत - असे गृहित धरून चालले की हस्तिदंती मनोर्याच्या वरून जाणार्या हेलिकॉप्टर मधे बसता येते. व परिस्थितीची हेलिकॉप्टर मधून पाहणी केली असा दावा करता येतो.
किमान म्हंजे कमाल नव्हे.
आपल्या प्रेयसीच्या मनातल्या
आई ग्ग!!! या वाक्यावरती कलिजा खलास झाला.
.
स्त्रियांचं वैज्ञानिकांमधलं
अर्थातच! नायतर दुसर्या कोणत्या स्त्रिया त्या वैज्ञानिक पुरुषांना पटणार?
फॅशन रॅम्पवरच्या मॉडेल्स? कैच्या कै विचारताय!!!
सौ सोनार की आणी एकच लोहारकी!!
सौ सोनार की आणी एकच लोहारकी!!
थांकू
थांकू!!
-डांबिस लव्हार
(आमचेकडे सर्व चुकांवर घणाचे घाव घालून मिळतील! आधी आर्डर नोंदवल्यास तुमच्या द्येवाला ठिणग्याही वाहून मिळतील!!!)
कुंभाचे काम करणारा =
कुंभाचे काम करणारा = कुंभार
सोन्याचे काम करणारा = सोनार
"लव्हा"चे काम करणारा = लव्हार
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अतिअवांतर
रोडरोमिओचे भाषांतर सडकसख्याहरी असे वाचनात आलेय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सडकसख्याहरी हा शब्द वि आ बुवा
सडकसख्याहरी हा शब्द वि आ बुवा यांनी मराठी भाषेस प्रदान केलेला होता - असे ऐकलेय.
अच्छा, माहितीकरिता धन्यवाद.
अच्छा, माहितीकरिता धन्यवाद. आमच्याकडे दै. पुढारीत हा शब्द खूपवेळा वाचनात आलाय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"लव्हा"चे काम करणारा =
या व्याख्येच्या पार्श्वभूमीवर सौ सुनार की, एक लोहार की ही म्हण पुन्हा एकदा पाहता येईल.
आधी
आधी स्त्रियांचं राजकारणातलं प्रमाण १०० टक्के झालं पहिजे तरच, बाकी क्षेत्रांतले प्रमाण वाढू शकेल. तसे झाले म्हणजे, वैज्ञानिक क्षेत्रांत त्याचा इष्ट परिणाम दिसून येईल. शिवाय एक चांगला साईड इफेक्ट म्हणजे ५६ इंची छातीविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल.
५६ इंच काय ३६ इंच काय,
५६ इंच काय ३६ इंच काय, ज्यांना छातीविषयीच चर्चा करायची आहे, ते करणारच....
उलट भारतीय समाजाचा एकूणच आंबटषौकीनपणा पाहाता, या चर्चा अधिक प्रमाणात, अधिक रसाळ आणि अधिक उद्बोधक होतील असे वाटते.
शिवाय एक चांगला साईड इफेक्ट
आजिबात नाही, उलट इन अॅडिशन टु छाती, २४-३६-२४ (किंवा कसे असतील ते बघा, नक्की क्रम ठाऊक नाही.) वगैरे मोजमापेही जोकच्या कक्षेत येतील.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
३६-२४-३६फक्त मर्लिन मन्रो
३६-२४-३६फक्त मर्लिन मन्रो होती. ते माप एकदम अतिरंजितच आहे तसेही
अन हवय कोणाला (कोल्ह्याला द्राक्षं.... हेहेहे)
अन हवय कोणाला (कोल्ह्याला
हवंय सर्वांनाच, मिळेल की नाही हा भाग अलाहिदा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खी: खी: बरं अगदी अश्शी
खी: खी: बरं अगदी अश्शी ३६-२४-३६ पण स्वभावाने एकदम बंडल चालेल का?
सौंदर्य हा प्रेफ्रन्स उघड
सौंदर्य हा प्रेफ्रन्स उघड सांगितला की नेमकी अशीच बरी उदा. सुचतात लोकांना? हेही उत्क्रांतीला धरून नाही काय?
पण हा प्रश्न गहन आहे. "चालेल" म्हणजे नक्की काय, तसेच "स्वभाव" अन "बंडल" यांच्या अर्थाची नक्की व्याप्ती काय, इ.इ. अनेक गोष्टी यात अंतर्भूत आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सौंदर्य हा प्रेफ्रन्स उघड
हाहाहा. बंडल म्हणजे तुला न आवडणारे ट्रेट्स अगदी पूर्ण विकसित झालेली
असो, असो. शुद्ध मांसाहारी
असो, असो. शुद्ध मांसाहारी ग्रूपवरचे तत्त्वज्ञान इथे पाजळण्याअगोदर थांबतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शारीरीक ट्रेटस पूर्ण विकसित
शारीरीक ट्रेटस पूर्ण विकसित होणे - यावरच जोक मारायचाय ना तुला
हा हा हा
उत्क्रांतीतत्त्वानुसार स्त्री ही क्षणाची ३६-२४-३६ आणि अनंतकालची बंडल असते
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
टोला जबरदस्त लावलात थत्ते.
टोला जबरदस्त लावलात थत्ते. सॉलिड!!!
ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बरं अगदी अश्शी ३६-२४-३६ पण
ह्या प्रतिवादाला काहीच अर्थ नाही शुचीतै. शरीर चांगले म्हणजे स्वभाव वाईट असे काही आहे का? ( हे म्हणजे सगळे श्रीमंत वाईटच आणि सगळेच गरीब चांगले असे झाले ).
त्यापेक्षा असेही विचारा ना. ४५-४०-५० पण स्वभावानी अगदी छानछान. चालेल?
ह्या प्रतिवादाला काहीच अर्थ
फार सुंदर दिसणार्या लोकांशी इतरजण चांगले वागतात, म्हणून अशी लो़कं माजण्याची शक्यता असते, असा सुप्त विचार /bias यामागे असावा.
on the other hand, हे पहा findings suggest that expectations based on physical attractiveness can become self-fulfilling prophecies that may strongly influence the course of a person's life.
+१११११११११११११११११११११११११११११११११.
क्या बात है, तुम्ही एकदमच मार्मिक गुगली टाकलात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा एक अजुन वेगळाच
हा एक अजुन वेगळाच अभ्यास
"Beauty and brains DO go together! Study claims good-looking men and women have higher IQs"
http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1347651/Attractive-people...
म्हणजे तुम्ही हुशार असाल तर स्वताला सुंदर समजा किंवा सुंदर असाल तर हुशार समजा.
अवांतर
डेली मेल म्हणजे UK चा संध्यानंद!
ठ्ठो एकदम नेमके.
ठ्ठो
एकदम नेमके.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असू दे हो संध्यानंद. अशी
असू दे हो संध्यानंद. अशी बिनकामाची माहीती जमवून ठेवावी. कधी कुठे फेकायला उपयोगी पडेल ते सांगता येत नाही.
लोल
हा हा
Beauty and brains
तुमच्या या कॉमेंटवरून ही जाहिरात आठवली.
ह्या प्रतिवादाला काहीच अर्थ
शॉल्लेट
"साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी" चा बकवाससुद्धा या अशा Either Or च्या "तत्वज्ञानावर" आधारलेला होता.
अनु आणि गब्बर ती कोल्ह्याला
अनु आणि गब्बर ती कोल्ह्याला द्राक्षं होती बाबा. शेपमध्ये नसलं की फार सुस्वभावी आहोत असा डांगोरा पिटायचा (म्हणजे स्वतःच्याच मनात)
___
सहन होत नाही कोणी इतकं सुंदर अन इम्पेकेबली सुस्वभावी पण किंवा बुद्धीमान पण असलेलं.
___
आता काय काय उकल करायची तेच्या....
बकवास हा शब्द बिनशर्त मागे
बकवास हा शब्द बिनशर्त मागे घेतो. क्षमस्व.
नाही गब्बर. क्षमस्व
नाही गब्बर. क्षमस्व म्हणण्याची अजिबातच गरज नाही.
धन्यवाद.