आपण मराठी विकिपीडियावर छायाचित्र संचिका चढवल्या आहेत ? संचिका परवाने अद्ययावत करण्याचे आवाहन !

आपण यापुर्वी मराठी विकिपीडियावर संचिका चढविली असल्यास, संचिका परवाने अद्ययावत करण्याची विनंती केली जात आहे.
.
.
मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे.
.
.
कारण, मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. सचिका चढवलेल्या सदस्यांच्या चर्चा पानावरही संबंधीत विनंती केली आहे. आपण मराठी विकिपीडियावर स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने यथाशीघ्र उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत ही नम्र विनंती आहे.
.
.
थोडक्यात आपण मराठी विकिपीडियावर स्वतः काढलेले छायाचित्र चढवले असल्यास विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे या दुव्या लेखावर दर्शवल्या प्रमाणे स्वतःचढवलेल्या संचिका पानांवर प्रताधिकार मुक्तीचे परवाने अद्ययावत करावेत, उदाहरणार्थ जे की खालील प्रमाणे दिसू शकतील.

udaharan 1

udaharan 2
.
.
सोबतच जमल्यास मराठी विकिपीडियावर कार्यरत आपल्या इतर मराठी मित्रांपर्यंतही ही विनंती पोहोचवण्यास होईल ते सहकार्य करावे.

पारिभाषिक शब्दार्थ टिपः
* संचिका = File
* परवाना = Licence Tag
* त्रुटी = Error
* निती = Policy
* प्रताधिकार = Copyright
{उपरोक्त माहिती सर्वसाधारण सजगता माहिती असून सर्व प्रकारच्या उत्तरदायकत्वास नकार.)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

संचिका म्हणजे मराठीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आल्बम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी विकिपीडियावर सहसा File शब्दासाठी संचिका शब्द वापरला गेला आहे.

आतापावेतो मराठी विकिपीडियावर ज्यांनी छायाचित्रे चढविली आहेत त्यांना संचिका शब्द File या नावाने परिचीत अथवा समजला असणार. कारण मराठी विकिपीडियावर 'संचिका चढवा' या शब्दांचा बोध होत नाही त्यांना छायाचित्रे चढवणे सहाजिक अवघड जाते. आणि तरीही बहुतांश लोकांनी संचिका शब्दाच्या वापरा बद्दल फारसे प्रश्न उपस्थीत न करता छायाचित्रे चढविली आहेत.

सोपेकरण टाळण्या मागचे कारणः
नवागतांना तशीही कॉपीराइट विषयांवर माहिती होण्यास वेळ लागतो तो लागू द्यावा म्हणूनही संचिका चढवा एवजी, छायाचित्र चढवा असे सोपेकरण करण्याचा मोह टाळलेला. आणि तरीही वीसएक हजार छायाचित्रांचे परवाने अद्ययावत करून घेण्याचे आणि प्रबंधकीय सुसूत्रीकरणाचे काम बाकी आहे. हे शब्द सोपे केले की कॉपीराईटेड काम सुरळीत करता येणार नाही एवढेविचार करता येणार नाही असे प्रबंधकांचे काम वाढले असते. त्यापेक्षा क्वचित एखादा शब्द समजण्यास अवघड राहीला तरीही परवडावे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

नवागतांना तशीही कॉपीराइट विषयांवर माहिती होण्यास वेळ लागतो तो लागू द्यावा म्हणूनही संचिका चढवा एवजी, छायाचित्र चढवा असे सोपेकरण करण्याचा मोह टाळलेला. आणि तरीही वीसएक हजार छायाचित्रांचे परवाने अद्ययावत करून घेण्याचे आणि प्रबंधकीय सुसूत्रीकरणाचे काम बाकी आहे. हे शब्द सोपे केले की कॉपीराईटेड काम सुरळीत करता येणार नाही एवढेविचार करता येणार नाही असे प्रबंधकांचे काम वाढले असते. त्यापेक्षा क्वचित एखादा शब्द समजण्यास अवघड राहीला तरीही परवडावे.

या परिच्छेदातलं तिसरं आणि चौथं वाक्य पाचदा वाचूनही समजलं नाही. पण त्याशिवाय काही अडलं नाही. संचिका या शब्दाशिवायही माझं फार अडलं नाही, काय म्हणायचं होतं तो आशय समजला आणि तेवढ्यापुरतं मी त्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं. प्रयत्न करूनही भोचक कुतूहल मेलं नाही म्हणून शब्दार्थ विचारला. त्यावरून एवढा लांबलचक प्रतिसाद येईल अशी खरंच अपेक्षा नव्हती.

इथे भाषांतर, परिभाषा, सोपेपणाचे फायदे-तोटे असा नवा विषय सुरू होईल, ज्याबद्दल माझी मतं असली तरी लोकांना सांगण्यासारखं माझ्याकडे फार नाही. त्यामुळे (प्रति)प्रतिसाद त्या विषयासंदर्भात दिला नाही असं समजावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथे भाषांतर, परिभाषा, सोपेपणाचे फायदे-तोटे असा नवा विषय सुरू होईल, ज्याबद्दल माझी मतं असली तरी लोकांना सांगण्यासारखं माझ्याकडे फार नाही. त्यामुळे (प्रति)प्रतिसाद त्या विषयासंदर्भात दिला नाही असं समजावं.

होय तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे. एकुण काय तर कॉपीराइटचे पैलु समजणारे आणि नाही समजणारे यातील सध्याचे प्रमाण व्यस्त आहे. अलरेडी ज्यांनी मराठी विकिपीडियाव्र छायाचित्रे चढविली आहेत त्यांचे या धागा लेखात व्यक्त अभिप्रेत सहकार्य मिळत गेल्यास या विषयातील सजगता वाढू शकते.

याचा मराठी विकिपीडियावर काम न करणार्‍यांना फरक पडतो का ?
मराठी विकिपीडियावरील छायाचित्रे (सध्याची उपलब्धता २० हजारच्या आसपास) इतर मराठी संस्थळांवरून अथवा इतरत्रचा वापर, पुर्न-वापर/ पुर्न-प्रकाशन हे निश्चिंतमनाने व्हावयाचे/करावयाचे असल्यास/झाल्यास; छायाचित्र चढवणार्‍याने केलेल्या (खरेतर राहून गेलेल्या- न केलेल्या) कॉपीराइट त्यागाच्या उद्घोषणांमध्ये विकिमिडीया चळवळीच्या उद्दीष्टांना अनुसरुन सुस्पष्टता असावयास हवी आणि सध्या नेमका त्याचा अभाव असल्यामुळे छायाचित्र चढवलेल्यांना आवाहन करून पहाण्याचा प्रयत्न आहे.

अर्थात जे छायाचित्र चढवणारे प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्या छायाचित्रांना काळाच्या ओघात वगळले जाऊन मराठी समाज काही(बर्‍यापैकी) प्रमाणात (छाया)चित्र स्वरूपात उपलब्ध माहितीस वगळले गेल्यामुळे मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ज्यांनी स्वत:ची चित्रे दिलेली नाहीत अथवा इतरांची चित्रे विना परवाना वापरली आहेत ती सरळ उडवून द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो अगदी बरोबर; ज्यांच्याकडून अनभिज्ञतेमुळे उद्घोषणेचे काम राहून गेले आहे, त्यांना प्रताधिकार त्यागाची खात्री करणारी उद्घोषणा करण्याची आणखी एक संधी देऊन मग ज्या छायाचित्रांवर या धागा लेखात उल्लेखील्या प्रमाणे प्रताधिकार त्यागाची खात्री करणार्‍या उद्घोषणा नाहीत ती सर्व छायाचित्रे उडवायची आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.