दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२३ मार्च
जन्मदिवस : गणितज्ञ पिएर-सिमॉं लाप्लास (१७४९), लॉग टेबल्स प्रकाशित करणारा गणितज्ञ युर्यी वेगा (१७५४), पॉलिमर्सवर मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता हर्मन स्टॉडिंजर (१८८१), अमूर्त गणितज्ञ, सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ एमी नथर (१८८२), भारतात पहिली विद्युत मोटर बनवणारा अभियंता जी. डी. नायडू (१८९३), मानसतज्ञ, तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम (१९००), अॅलर्जीवर औषध शोधणारा नोबेलविजेता दानियेल बोवेत (१९०७), निर्माता, दिग्दर्शक अकीरा कुरोसावा (१९१०), स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया (१९१०), लेखक रविंद्र पिंगे (१९२६), औषध व्यावसायिक किरण मजुमदार-शॉ (१९५३), अभिनेत्री कंगना राणावत (१९८७)
मृत्युदिवस : हुतात्मा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू (१९३१), लेखक श्री. ना. पेंडसे (२००७), फील्ड्स मेडलविजेता गणितज्ञ पॉल कोहेन (२००७), अभिनेता गणपत पाटील (२००८), अभिनेत्री एलिझाबेथ टेलर (२०११)
---
प्रजासत्ताक दिन : पाकिस्तान (१९५६)
आंतरराष्ट्रीय हवामान दिन
१७५७ : कोलकात्याजवळचा चंदननगरचा किल्ला ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून जिंकला.
१८३९ : बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील वापर.
१८५७ : तार तुटली तरीही न कोसळणारी पहिली लिफ्ट न्यू यॉर्क शहरात ओटिस कंपनीने बसवली.
१८८९ : कादीयान (पंजाब) मध्ये अहमदिया पंथाची स्थापना.
१९१८ : भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाच्या सहाय्याने मुंबईत अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषद भरली.
१९१९ : मुसोलिनीने मिलानमध्ये फाशिस्ट चळवळीची स्थापना केली.
१९३३ : हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला.
१९४० : मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य मागणारा लाहोर ठराव ऑल इंडिया मुस्लिम लीगने मांडला.
१९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने अंदमान बेटांवर कब्जा मिळवला.
२००१ : रश्यन अंतराळयान 'मीर' अंतराळात नष्ट केले गेले.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील
प्रतिक्रिया
बोनस म्हणजे काय...
बोनस म्हणजे काय याचे गूगल ने "a sum of money added to a person's wages as a reward for good performance. " हे उत्तर दिलेले आहे:
मूळ: https://www.google.co.in/search?client=ubuntu&channel=fs&q=what+is+bonus...
बोनस या शब्दातच "अनपेक्षित"
बोनस या शब्दातच "अनपेक्षित" हा अर्थ दडलेला आहे. सामान्यपणे अपेक्षित असलेल्यापेक्षा अधिक काहीतरी मिळणे. आणि म्हणूनच तो डिस्क्रिशनरी असायला हवा.
आज (भारतात) बोनस म्हणजे पगाराचा काही भाग वर्षाच्या अखेरीस (किंवा कोणत्यातरी उत्सवाच्या वेळी) लम्पसम देणे असा घेतला जातो. नोकरीचा पगार ठरवतानाच इतका बोनस मिळतो असे सांगितले/मोजले जाते. [आयटी/कन्सल्टिंग क्षेत्रात तो व्हेरिएबल पे म्हणून देतात].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
रोचक
रोचक
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शंका
पूर्वी म्हणजे नक्की कधी?
वर्षासने (अर्थात अॅनुअल प्याकेजेस) नेमून देत असत असे वाचले होते. आता ही वर्षासने ५२ भागात विभागून देत असत किंवा कसे, याबद्दल ठाऊक नाही!
वर्षासने
वर्षासने हा शब्द पहिल्यांदाच वाचला.
हम्म. पेमेंट ऑफ बोनस
हम्म. पेमेंट ऑफ बोनस ऍक्टमध्ये किमान बोनस ८.३३% असावा असा नियम दिला आहे. १/१२ = ८.३३%
पण हा कायदा १९६५चा आहे. बोनसची प्रथा पूर्वीपासून होती ना? नारायण मेघाजी लोखंड्यांच्या काळापासून?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
बोनस चा बोन्साय शी संबंध असावा असे वाटते. नै ??
बोनस चा बोन्साय बरोबर नक्की काहीतरी संबंध असावा असे वाटते. नै ??
हाहाहा. यकदम पर्फेक्ट.
हम्म, मराठ्यांच्या लष्करात दर
हम्म, मराठ्यांच्या लष्करात दर पौर्णिमेस पगार दिला जायचा असे वाचलेय खरे. "चांदरात होणे" म्हणजे पैसे मिळणे अशा अर्थी वाक्प्रचार वापरला गेल्याबद्दलही वाचनात आले होते. पाहिले पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"चांदरात होणे" म्हणजे पैसे
हे ऐकल्यानंतर सुन्या सुन्या गाण्याच्या ओळी गमतीशीर वाटतात.
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे
थोड्क्यात काय तर प्रेम-बिम काय नसतं, शेवटी पैसा असतो नी दिसतो सगळी कडे

हे वचून मी वरलो.
हे वचून मी वरलो.
कुणाला?
कुणाला?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बर्याच काळापर्यंत भारतात वार
बर्याच काळापर्यंत भारतात वार/आठवडा ही कल्पना नव्हती.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हो, पण वारांची कल्पना
हो, पण वारांची कल्पना आल्यालाही दीडेक हजार वर्षे किमान झालेली आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण पैशात 'सर्विसचा' (सेवेचा)
पण पैशात 'सर्विसचा' (सेवेचा) ठराविक काळाने मोबदला देणे वार/आठवडे यायच्या आधी अस्तित्त्वात होते का?
तोवर वक्त वस्तुंचा(गुड्स) पैशात विक्रय होत असावा. सर्विसेससाठी बार्टरच होते ना? ते ही प्रत्येक सर्विस जातींमधे बंदिस्त असल्याने एकुणच "पगार" ही कंसेप्टही त्या आधी नसावी
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मॉनेटरी इकॉनॉमी हा प्रकार
मॉनेटरी इकॉनॉमी हा प्रकार भारतात मौर्यपूर्वकाळापासून असल्याचे पुरावे आहेत, अगदी महाजनपदांची नाणी वगैरे मिळालेली आहेत. (इसपू ४००-५००).
क्याश पगार ही कन्सेप्ट जुन्या काळी आजच्याइतकी बोकाळली नसली तरी अस्तित्वात होती असे म्हणायला नक्कीच वाव आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पैसे होतेच. मात्र ते फक्त
आभार. पैसे होतेच. मात्र ते फक्त वस्तुंच्या व्यापारासाठी वापरले जायचे असे वाचले होते एका लेखात (नक्की कोणता काळ वगैरे तपशील आठवत नाही म्हणून ही विचारणा)
सर्विसेससाठी पैसे देणं सुरू झालंवत का? कधी? असा प्रश्न आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुघल काळातली (१६००च्या अगोदर)
मुघल काळातली (१६००च्या अगोदर) तरी उदाहरणे आहेतच, त्याच्या आधीही नक्कीच आहेत. सैनिकांचा पगार अमुकतमुक मोहरा वगैरे गोष्टी तर खूप प्राचीन आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओह ओके, आभार. मग तो रोजगार
ओह ओके, आभार.
मग तो रोजगार असे का? का महिन्याला पगार याचे काही उल्लेख सापडतात काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मराठ्यांच्या लष्करात तर
मराठ्यांच्या लष्करात तर मन्थली पगाराचे उल्लेख वर दिलेच आहेत ना.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अहो मी वार/आठवडे येण्या
अहो मी वार/आठवडे येण्या आगोदरचं म्हंटोय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ते काय माहिती नाय. वार-आठवडे
ते काय माहिती नाय. वार-आठवडे आले तेच मुळात किमान दीडेक हजार वर्षांपूर्वी. त्याअगोदरच्या इतिहासाची रेकॉर्ड्स अत्यल्प आहेत. तरी पाहतो काही मिळतंय का ते- अशोकाच्या शिलालेखांमध्ये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्हा सर्वांना एक गोष्ट
तुम्हा सर्वांना एक गोष्ट लक्षात आली नाही इॆग्रज खुप बुध्दीवान होते. वर्षाचे (365/30) केले तर 12 महिने होतात. दर आठवड्याला पगार केला तर वर्षात (365/7) 52 आठव़़डे होतात म्हणजे (52/7) केले तर 13 महिने होतात. दर वर्षी इंग्रज कारकून, सैनिक, गिरणी कामगार, हमाल याॆना 12 महिन्याचा पगार देत असे. दर वर्षी 1 महिन्याचा पगार कमी देत असेल.असे किती वर्ष चालले असेल, त्यात इंग्रजांचा खुप फायदा झाला असेल.
नाणी जुन्या काळीही भारतात अस्तित्वात होती. इतक्या पुराण काळात जायची गरज नाही. हा प्रश्म फक्त इंग्रजा पुरता आहे.
तुमचा हिशेब गंडलाय हे तुमच्या
तुमचा हिशेब गंडलाय हे तुमच्या लक्षात येतंय का ? स्वतःच्या थिअरीपुरती आकडेवारी किती फिरवली आहे ते पहा..
पहिली गोष्ट
वर्षाचे १२ महिने हे ३६५ दिवसांसाठीचे आहेत आणि त्यात ३० दिवस, ३१ दिवस आणि २८/२९ दिवसांचे महिने येतात.
अहो, ५२ आठवडे १२ महिन्यात पण येतातच की फक्त त्यात काही आठवडे विभागून येतात ना.
तेव्हा, "५२ आठवडे = १२ इंग्रजी महिने" असे म्हणा हवे तर.
तेव्हा एखाद्यास वार्षिक तनखा (पगार) हा ५२ रुपये असेल तर तो (५२/१२) आला काय अथवा आठवड्यास एक आला काय. वार्षिक ताळेबंद पहावा.
जर पगारच कमी केले असतील तर ती वेगळी गोष्ट आहे आणि ती तर आजही होत असते. ते इथे अवांतर.
त्याचा आणि
याचा काहीही संबंध नाही.
लोकांच्या लक्षात काय आलेले नाही ते तूर्तास बाजूस ठेवू. पण तुमच्या लक्षात आलेय का की तुम्ही फसवे आकडे वापरून भलताच चुकीचा सिद्धांत मांडता आहात..
सदैव शोधात..
खरेक्ट. तरी "इंग्रजांनी
खरेक्ट.
तरी "इंग्रजांनी तेराव्या महिन्याचा पगार बुडवला" वगैरे "गूढ गणित कालांगण" का असल्याच काहीशा नावाच्या पुस्तकातली थियरी आहे. लोकरंग पुरवणीमध्ये चौकटीत याची माहिती येत असे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
इंग्रजांनी आपल्या फसविले.
इंग्रज खूप बुध्दीवान होते हे सांगण्यासाठी इतका खटाटोप कशाला?
हा खटाटोप इंग्रज किती बुध्दीवान होते हे सांगण्यासाठी केला नाही तर इंग्रजानी आपल्याला 1 महिन्याचा पगार न देऊन कसे फसविले हे सांगण्यासाठी केला.
लाटकर, - दुसर्या कुणी
लाटकर,
- दुसर्या कुणी लिहिलेलं वाक्य तुमच्या प्रतिसादात उद्धृत करायचं असेल, तेव्हा ते सिलेक्ट करून मग प्रतिसादखिडकीच्या वर असलेलं दुहेरी अवतरणाचं चिन्ह (डोळ्याच्या डाव्या बाजूला आहे बघा) वापरा. म्हणजे ते उद्धृत (कोट हो, कोट) आहे हे कळेल.
- शिवाय ध + द = ध्द असं मराठीत नसतं. मराठीत द + ध = द्ध असतं.
- एखाद्याला उत्तर देताना (आधी नजारा थ्रेडेड करायला लागेल), सगळ्यांत खाली न लिहिता त्या प्रतिसादालाच उपप्रतिसाद द्या, म्हणजे तो लगेच त्या प्रतिसादाखालीच दिसेल आणि तुम्ही कुणाला उद्देशून बोलताय हे लगेच लक्षात येईल.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
उदा. महिन्याचा पगार ₹
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
इंग्रजी महिन्या प्रमाणे वर्षात 12 महिने येतात,
(365/30)-12.1666667 - 12 महिने
12 महिन्याचा पगार 12 x 100 - ₹ 1200
52 आठवड्या प्रमाणे पगार केला तर,
(365/7)-52.1428571 - 52 आठवडे
(52/4)-13 महिने (1 महिन्यात 4 आठवडे)े
वर्षाचा पगार 13 x 100 - ₹ 1300
माझ्या प्रतिसादा मध्ये नजरचुकीने (52/4) ऐवजी (52/7) झाले.
इंग्रज हुशार होते म्हणून तर महाराष्ट्रा एवढ्या देशाने जगावर राज्य केले.
मला इंग्रजाचे काैतुक किंवा त्यांना चांगले म्हणायचे नाही.
(1 महिन्यात 4
हेमंतरावजी लाटकर साहेब - तुम्हाला हे गणित कोणी शिकवले?
अनु राव. हे समजाऊन
अनु राव.
हे समजाऊन सांगण्यासाठी (1 महिन्यात 4 आठवडे धरले.
आता इंग्रजांनी आपल्याला 1 महिन्याचा पगार कमी दिला. हे मानने न मानने हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
हे समजाऊन सांगण्यासाठी (1
काहीही हं लाटकर साहेब. काहीहीच जर धरायचे असेल तर मग चार तरी कशाला? १ महिन्यात २ च आठवडे असे धरलेत तर मग इंग्रजांनी ६ महिन्याचा पगार कमी दिला असे प्रुव्ह करता आले असते की तुम्हाला.
अनु राव काहीही हं वापरता
अनु राव
काहीही हं वापरता येणार नाही (52/4) साठी महिन्यात 4 आठवडेच धरावे लागतील. कारण वर्षात 365 दिवसच व आठवड्या 7 दिवसच असतात.
आता तुम्ही सगऴेजण या विषयावर रवंथ करत बसा मी आता नवीम विषयावर काहीही हं लिहतो. बाय! बाय!
(52/7) केले तर 13 महिने होत
(52/7) केले तर 13 महिने होत नाहीत.
सुमार धाग्यात रोचक चर्चा कशी होऊ शकते याचं उदाहरण लगेच दिसण्याबद्दल गंमत वाटली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खटाटोप
इंग्रज खूप बुध्दीवान होते हे सांगण्यासाठी इतका खटाटोप कशाला?
(52/7) केले तर 13 महिने
????
लई १२चे होते इंग्रज!!
J)
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
आमची तर नॉन्प्रॉफिट ऑर्ग
आमची तर नॉन्प्रॉफिट ऑर्ग असल्याने सर्वांनाच एकच बोनस मिळतो. इतका मोठ्ठा देतात की छाती दडपून जाते, हर्षवायु होतो - $२५
कोणाला ती केस्/पझल आठवतय
कोणाला ती केस्/पझल आठवतय का?
an annual $1000 raise or (B) a twice-yearly $300 raise?
The question is which is better: A starting salary of $30,000 with
बोनस
प्रः बोनस म्हणजे काय?
उः ऑफर लेटरवर दिसणारा जो आकडा बँकेतील आकड्यात कधीच दिसत नाही त्याला बोनस असे म्हणतात!
माझ्या जुन्या कंपनीत त्रैमासिक रेवेन्यू टारगेटच्या अमुकतमुक टक्केवारीवर बोनसचा आकडा अवलंबून असे. उदा. कंपनीच्या रेवेन्यू टारगेटच्या ९१ टक्के अचिव झाले तर मान्य केलेल्या बोनसपैकी १० टक्के बोनस, ९२ टक्के अचिव झाले तर २० टक्के इ. मात्र रेवेन्यू कितीही जास्त झाला तरी बोनस मान्य केलेल्या आकड्यापेक्षा जास्त मिळत नसे. तर सांगायची गोष्ट अशी की रेवेन्यू टारगेट इतके जास्त ठेवत की सलग १५ महिने बोनस मिळाला नाही. हळूहळू लोक सोडून जाऊ लागले तेव्हा बोनसच्या किमान रकमेची हमी देणारी पॉलिसी अंमलात आली.
(52/7) केले तर 13 महिने होत
(52/7) केले तर 13 महिने होत नाहीत.
52/4 ऐवजी 52/7 झाले.
विक्षिप्त आदिती तु एखाद्या कंपनीत किंवा आॅफिस मध्ये बाॅस झालीस तर तुझ्या प्रत्येक गोष्टीत चुका काढण्याच्या सवयीला कंटाऴून एका वर्षात सर्व स्टाफ नौकरीचा राजीनामा देतील.
थ्यँक्यू
तरीही 'ऐसी अक्षरे' अजून सुरू आहे. आणि तुम्ही तिथे लिहिताय.
आणि हो, ते एकेरीवर कसे काय आलाय म्हणे? आई-बायकोला एकेरीत हाक मारणारे इतरांचा काय मान राखणार, वगैरे वगैरे. (उपा करणाऱ्यांना संदर्भ खरडफळ्यावर मिळतील.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो ना मी जस्ट म्हटलं की "हेला
हो ना मी जस्ट म्हटलं की "हेला कोण?" ..... हां हेमंत लाटकर तर त्या "हां" चा अर्थ यांनी एकेरी संबोधन म्हणून लावला अन नवरा काढला. च्यायला इतकी आदरयुक्त वागणूक हवीच असेल तर आधी एस्टॅब्लिश तर व्हा इथे अन मग सिद्ध करा की स्वतःला.
ही प्रतिक्रिया देऊ की नको....देऊ की नको .... हा विचार करुन दिलीच.
अदितीसारख्या वयोवृद्ध आणि
अदितीसारख्या वयोवृद्ध आणि तपोवृद्ध स्त्री आयडीला असे एकेरीत काय हाक मारता हेमंत लाटकरजी? त्यांना काकू, आजी वगैरे संबोधनं लावणं योग्य ठरेल. हो की नाही हो अदितीकाकू?
गुर्जींचा गनिमी कावा
गुर्जींचा गनिमी कावा लक्षात आला आमच्या
आदिती ताईंना आजी म्हणून लवकर निवृत्त करायचा विचार दिसतोय. पण आम्ही आमच्या प्रत्येक प्रतिसादात आदितीताई असा उल्लेख करुन त्यांच वय कमी करणार बरका !
ग्रुप मघ्ये कोणाचे वय किती
ग्रुप मघ्ये कोणाचे वय किती आहे हे कसे कळणार? मग कोणाला एकेरी नावाने हाका मारायचे, कोणाला ताई/दादा, काका/काकू, मामा/मामी, आजी/आजोबा, आत्त्या, मावशी, म्हणायचे कसे कळणार.
कोणाला काय म्हणायचे हे कळण्यासाठी प्रत्येकाने नावापुढे काका/काकू ...... यापैकी काही तरी लावावे.
मला नुसते लाटकर म्हणले तर चालेल.
लाटसाब कसं वाटतंय?
लाटसाब कसं वाटतंय?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ग्रुप मघ्ये कोणाचे वय किती
ग्रुप मघ्ये कोणाचे वय किती आहे हे कसे कळणार? मग कोणाला एकेरी नावाने हाका मारायचे,>>
म्हणून (चांगली) ओळख होईपर्यंत सर्वांना आदरार्थीच संबोधावे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हणून (चांगली) ओळख होईपर्यंत सर्वांना आदरार्थीच संबोधावे.
हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण लागू होते काय ? कृपया मार्गदर्शन करावे.
गोब्राप्रक्षकुछश्रीशिम
आम्ही तर काही ठिकाणी "गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलवतंस छत्रपती श्री शिवाजी महाराज" इतकं लिहितो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हणजे? महाराजांशी तुमची ओळख
म्हणजे? महाराजांशी तुमची ओळख नाही म्हणता? तेही मराठी वगैरे असून?
शिवबा म्हटले तर अपमान होतो का?
इतकी जळत असेल तर याचिकाच टाका ना कोर्टात. इतक्या याचिका आलरेडी आहेत, त्यांत अजून एकीची भर पडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्ही "मी शिवाजीराजे भोसले
तुम्ही "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" मधील सचिन खेडेकर सारखे शिवाजी महाराजांचे भक्त दिसताय.
वयोवृद्ध आणि तपोवृद्ध
जण्रली यात "ज्ञानवृद्ध" असंही असतं..ते तिघे नेहमी एकत्रच येतात..
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
अरेरे
कीव वाटली..
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
कुणाची
कुणाची
आता सोपे करून सांगतो.वर्षात
आता सोपे करून सांगतो.
वर्षात (365/7–52.1428571–52 आठवडे
महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील,
31/7 — 4.42857143 – 4
30/7 – 4.28571429 – 4
29/7 — 4.14285714 – 4
28/7
– 4
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300
३० दिवसांचा पगार १२० धरू
३० दिवसांचा पगार १२० धरू म्हणजे दिवसाचा पगार ४ रू.
आठवड्याचा २८ रुपये.
३६० दिवसांचेच म्हणजे १२ महिन्यांचे वर्ष धरू
१२*१२० = १४४० रुपये
५२ आठवडे (म्हणजे खरंतर ३६४ दिवसांचे) = १४५६ रुपये (वजा चार दिवसांचे सोळा रुपये) = १४४०
तेव्हा, दोन्ही मध्ये काही फरक नाही.
वरील तुमचे गणित फसवे आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
येथे मला फक्च महिण्याला पगार
येथे मला फक्च महिण्याला पगार घेतला तर वर्षात 12 पगार मिळतात.
आठवड्याला पगार घेतला तर वर्षात 13 पगार मिळतात हे समजाऊन सांगायचे होते.
तुम्ही वर्षाचे 360 दिवस असा शोध लावून निसर्गाच्या विरूद्घ चालला आहात.
आठवड्याला पगार केला तर सरकारी नाैकरदारांना फायदा होईल. कंपनीच्या नाैकरदारांना दिवाळीत बोनस मिळतो. आपण आपल्याकडे काम करणार्या भांडेवाली मावशी व पोळेवाली मावशीनां बोनस म्हणून 1 महिन्याचा पगार जास्त देतो.
आठवड्याला पगार घेतला तर १३ पगार मिळत नाहीत
आठवड्याला पगार घेतला तर १३ पगार मिळणार नाहीत. वर्षाच्या शेवटचा आठवडा (३१ डिसेंबरचा) हा रविवारऐवजी मध्ये कुठेतरी संपला तर तिथे वर्ष संपत असल्याने पूर्ण आठवड्याचा पगार मिळावा, आणि पुढील वर्षाच्या पहिल्या (अर्ध्या) आठवड्यातही पूर्ण पगार मिळावा हे तुमच्या गणितात अध्याहृत आहे. तसं होत नाही.
अहो काका.. मिपावर हा प्रतिसाद
अहो काका.. मिपावर हा प्रतिसाद दिलाय, तो इथे परत देतोय, आशा आहे की समजेल इथे नाय तर तिथे,
पहिली बाळबोध चूक म्हणजे,
वर्षात (365/7–52.1428571–52 आठवडे
महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील,
तूर्तास पगार, बोनस बाजूस ठेवू आणि दिनदर्शिकेचे गणित पाहू,
ठिक वर्षात ५२ आठवडे हे मान्य.
वर्षात १२ महिने हे मान्य.
मग एका महिन्यात ४ आठवडे धरलेत तर १२ महिन्यात किती आठवडे ? ४८. (गणित कच्चे असेल तर कॅल्क्युलेटर वर पहा)
मग आता जे ४ आठवडे तुम्ही तेराव्या महिन्याचे ते या कॅलेंडर वर्षात कुठे बसले ? आता असे पहा, इंग्रजी कॅलेंडर वर्षात तर अधिक महिना नसतो (जसा भारतीय पंचांगात असतो.) मग ते चार आठवडे गेले कुठे ?
तसेच हे बारा महिने आणि ५२ आठवडे यांचे एकक हे "दिवस" हे आहे ते मात्र "३६५" आहे ना.
इथे अपूर्णांक वगळून तुम्ही तुम्हाला गणिताच्या दृष्टीने फसवताय हे लक्षात घ्या.
कारण ३१ दिवसांचा महिना, म्हणजे ३१/७ = ४ आठवडे आणि ३ दिवस. एका वर्षात साधारण ७ महिने असतात म्हणजे तुम्ही २१ दिवस असेच वगळले (३ आठवडे वगळलेले).
३० दिवसांचा महिना, म्हणजे ३०/७ = ४ आठवडे आणि २ दिवस. एका वर्षात साधारण ४ महिने असतात म्हणजे तुम्ही ८ दिवस असेच वगळले (१ आठवडा वगळलेला).
२८ दिवसांचा महिना म्हणजे ४ आठवडे इतकेच बरोबर.
आता करा तुमचे पगाराचे गणित..
सदैव शोधात..
हा जो माझा खटाटोप चालू आहे
हा जो माझा खटाटोप चालू आहे ताे महिन्याला पगार पद्धती पेक्षा आठवड्याला पगार पद्घत झाली तर आपल्याला 1 महिना जास्तीचा पगार मिळेल व पगारासाठी महिनाभर वाट पहावी लागणार नाही.
---------------------------
31 / 7 — 4 . 42857143 – 4
30 / 7 – 4 . 28571429 – 4
29 / 7 — 4 . 14285714 – 4
28 / 7 – 4
-----------------------------
हे वर लिहले ते उदाहरणा दाखल आहे. महिन्यात 4 आठवडे धरण्याचा उद्द्श फक्त आठवड्याचा पगार काढणे हा आहे. तुम्ही महिन्यात 28,29,30,31 दिवस आहेत हा हिशोब करत आहात. 52 आठवड्यासाठी वर्षात 365 दिवसच धरले आहेत.
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
तुम्ही म्हणता 4 आठवडे वगळले, मग मी 52 आठवडे न घेता 48 आठवडे घेतले नसते का?
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300 (13 महिन्याचा पगार)
कंपन्या आपल्याला बोनस देऊन उपकार दाखवतात. तो बोनस म्हणजे आठवडा पद्धतीप्रमाणे मिळणारा 13 व्या महिन्याचा पगारच आहे. बोनस सरकारी आॅफीस, शाळा, काॅलेज, बँका मध्ये मिळत नाही.
आपणा (त्यात मी सुद्धा) भारतीयांना एक वाईट खोड आहे प्रत्येक गोष्टीत विरोध करणे. (पुरस्कार देण्यात सुद्धा)
लहानपणी ३ मित्र २७ रुपये बिल
लहानपणी ३ मित्र २५ रुपये बिल वगैरे कोडं असायचं त्याची आठवण झाली.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विनोद
पगार हा १२ वाटे (मासिक) करुन दिला तर कमी आणि ५२ वाटे (साप्ताहिक) करुन दिला तर जास्त हे गणित फारच आवडले.
यावरुन एक जुना विनोद आठवला.
एक सरदार पिझ्झा खायला हॉटेलात जातो.
वेटरः साहेब, पिझ्झ्याचे ४ तुकडे करुन आणू की ८?
सरदारः ४च आण बाबा. मी एकटाच आहे, ८ तुकडे कोण खाणार!
(No subject)
अरे बाबा, एक गोष्ट लक्षात
अरे बाबा, एक गोष्ट लक्षात घ्या महिन्यात किती दिवस आहेत हे नको बघू आपल्याला आठवड्याचा पगार काढायचा आहे. वर्षात 365 दिवस, 52 आठवडे, आपल्याला पगाराचा 4 था भाग घेण्यासाठी महिन्यात 4 आठवडेच घ्यावे लागतील.
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे पगार 100 x 12 ₹ 1200
आठवड्याप्रमाणे पगार 25
x 52 - ₹ 1300
आणि कंपनी मध्ये बोनस ((13 व्या महिन्याचा पगार) आॅलरेडी मिळतो. 1940 च्या कायद्यानुसार. इंग्रज जाण्यापुर्वी 7 वर्ष आघी.
मला वाटते तुम्हाला लक्षात आले असेल.
कंपंनी मघ्ये मिळतो पण मिळतो पण सरकारी आॅफीस मध्ये मिळत नाही.
आता या विषयावर पडदा टाकुयात. राम राम
अरे बाबा, एक गोष्ट लक्षात
अरे बाबा, एक गोष्ट लक्षात घ्या महिन्यात किती दिवस आहेत हे नको बघू आपल्याला आठवड्याचा पगार काढायचा आहे. वर्षात 365 दिवस, 52 आठवडे, आपल्याला पगाराचा 4 था भाग घेण्यासाठी महिन्यात 4 आठवडेच घ्यावे लागतील.
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे पगार 100 x 12 ₹ 1200
आठवड्याप्रमाणे पगार 25
x 52 - ₹ 1300
आणि कंपनी मध्ये बोनस ((13 व्या महिन्याचा पगार) आॅलरेडी मिळतो. 1940 च्या कायद्यानुसार. इंग्रज जाण्यापुर्वी 7 वर्ष आघी.
मला वाटते तुम्हाला लक्षात आले असेल.
कंपंनी मघ्ये मिळतो पण मिळतो पण सरकारी आॅफीस मध्ये मिळत नाही.
आता या विषयावर पडदा टाकुयात. राम राम
अरे बाबा, एक गोष्ट लक्षात
अरे बाबा, एक गोष्ट लक्षात घ्या महिन्यात किती दिवस आहेत हे नको बघू आपल्याला आठवड्याचा पगार काढायचा आहे. वर्षात 365 दिवस, 52 आठवडे, आपल्याला पगाराचा 4 था भाग घेण्यासाठी महिन्यात 4 आठवडेच घ्यावे लागतील.
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे पगार 100 x 12 ₹ 1200
आठवड्याप्रमाणे पगार 25
x 52 - ₹ 1300
आणि कंपनी मध्ये बोनस ((13 व्या महिन्याचा पगार) आॅलरेडी मिळतो. 1940 च्या कायद्यानुसार. इंग्रज जाण्यापुर्वी 7 वर्ष आघी.
मला वाटते तुम्हाला लक्षात आले असेल.
कंपंनी मघ्ये मिळतो पण मिळतो पण सरकारी आॅफीस मध्ये मिळत नाही.
आता या विषयावर पडदा टाकुयात. राम राम
मला २०१४ चं उदाहरण घेऊन
मला २०१४ चं उदाहरण घेऊन सांगता का?
- पगार ₹६००,००० प्रतिवर्ष
- १ जाने २०१४ आणि ३१ डिसेंबर २०१४ दोन्ही बुधवार
त्या १९४०च्या कायद्याची प्रत देता का जरा?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
तुम्हा चार्टर्ड लोकान्ला कळत
तुम्हा चार्टर्ड लोकान्ला कळत नाय !!
सहा लाख वर्षाला म्हणजे पन्नास हजार महिना म्हणजे साडेबाराहजार दर आठवड्याला म्हणजे साडेबारा हजार गुणिले ५२ वर्षाला....
= सहालाख पण्णास हजार रुपये. तुमचे पण्णास हजार खाल्ले कंपनीने....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
षट लक्ष मोजिताना...
शमत!
बाकी धाग्यातील युक्तिवादाला (किंवा त्याच्या अभावास) इलस्ट्रेटेड 'वीक'ली हा मथळा चालून जावा.
"बोगस म्हणजे काय" असा धागा
"बोगस म्हणजे काय" असा धागा कोण काढणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लाटकर साहेब
लाटकर साहेब, बाकी सगळं जाऊ द्या. माझं सोपं विश्लेषण असं आहे.
१. नोकरीवर ठेवताना वार्षिक पगाराचा करार केला असेल (उदा. बहुसंख्य व्हाईट कॉलर नोकऱ्या) तर वर्षाला तितका पगार असतो की नाही ते तपासा. तो १२ वाटे करुन मिळाला की ५२ यात पडू नका.
२. नोकरीवर ठेवताना मासिक पगाराचा करार केला असेल (उदा. ड्रायवर, घरातील कामवाली वगैरेंबाबत) तर महिन्याला तितका पगार असतो की नाही ते तपासा. तो २ वाटे करुन मिळाला की ४ यात पडू नका
३. नोकरीवर ठेवताना साप्ताहिक/पंधरवड्याचा पगाराचा करार केला असेल तर (उदा. शेतावर मजूर वगैरे) तर साप्ताहिक/पंधरवड्याचा तितका पगार असतो की नाही ते तपासा. तो ७ वाटे करुन मिळाला की १४ यात पडू नका
वार्षिक पगाराचा करार समोर ठेवून मासिक पगाराचं किंवा साप्ताहिक पगाराचं गणित लावणं पटत नाही ब्वॉ.
अवो हेला,
आता इंग्रजांनी आपल्याला 1 महिन्याचा पगार कमी दिला. हे मानने न मानने हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
<<
तुमास्नी इंग्रजांनी नोक्रीवर ठिव्लं आन वर्तून १ म्हैन्याचा पगार कमी देल्ला हे वाचून दु:ख पावलो.
बाकी, येका वर्सात ४ हप्तेवाले १२च म्हैने येतीले आस्लं गणीत करणार्यास्नी इंग्रजानी नोक्रीवं ठिव्लं ह्ये एक आक्रीत. आन वर्तून पगार बी देल्ला हे दुस्रं.
थे जौद्या. आम्च्या सार्क्या डेलीवेजेस वाल्या लोकानी काय करावा म्हंतो मी?
येक दिवस पावडर कुंकू करून धंद्यावं बस्लो न्हाई तं पगार द्याय्ला ना तुम्ही येत, ना इंग्रज.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
पगाराचा हिशेब
किराणाभुसार दुकानाच्या एका मालकाने एक पोर्या ऑर्डरी घरोघर पोहोचविण्यासाठी ठेवला. कामाची वेळ १० ते ६. रविवारी सुटी आणि पगार महिना रु ३००.
इतक्या कमी पगारावर इतके काम दोनतीन महिने केल्यावर पोर्या मालकाकडे गेला आणि म्हणाला 'मला पगार वाढवून द्या.' त्यावर पगार कसा भरपूर आहे हे मालकाने पोर्याला असे समजावून दिले.
'महिन्याचे ३० दिवस धर. त्यात सुट्ट्या चार म्हणजे कामाचे दिवस २६. त्यात तू रोज ८ तास काम करणार म्हणजे रोजचा १/३ दिवस. म्हणजे महिन्याचे काम झाले एकूण ८.६६ दिवस. ८.६६ दिवसांना ३०० रुपये पगार म्हणजे महिन्याचा किती? तर १०३९ रुपये. आता तूच सांग की तू करत असलेल्या कामाला इतका पगार कमी आहे का?'
पोर्याला पटले आणि तो बिनतक्रार काम करू लागला.
आठवड्याला पगार झाला तर... दर
आठवड्याला पगार झाला तर... दर महिन्यात चारदा कडकी येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आयला. ह्ये एकदम जब्राट
आयला. ह्ये एकदम जब्राट