मटण - लघुकथा

सूर्य मावळतीकडं आला होता .
ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो .
पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले .
तेवढ्यात मागून पक्या आला.
पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला .
रात्री चांदीच.
निघालो दोघे .
खमंग वासान डोकं चवताळतय.
पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय.
दम निघना.
देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली .
मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता . किती खोकलो तरी निघता निघत नव्हता .
वाट बघू पण मटणचं खाऊ.
आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती.
नाहीतर सोन्यासारख्या संधीच मातेरं झालं असतं.
जीव मुठीत धरून तसंच कितीतरी वेळ बसून राहिलो.
झोपायच्या आधी पाटलीनबाईनं ऊकिरड्यावर खरकटं फेकलं.
मग आम्हि दोघांनी शेपट्या हलवत मटणाचा यथेच्छ स्वाद चाखला.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हा हा. आवडली गोष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जोहार मायबाप जोहार! तुमच्या उष्ट्यासाठी आलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्वान्तःसुखाय शेवट आवडला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता छान.

अतिअवांतर - ह्यावरून आठवलं, पुर्वी लोक कचरा-कुंडी वर जाऊन खरकटं टाकायचे अता अश्या पुर्वीसारख्या चौकात असलेल्या कचराकुंड्या नाहीत. घंटा गाडी येते आणि कचरा नेते किंवा सोसायटीचा कचरा एकत्र करून कचरा घेणार्‍यांच्या गाडीकडे दिला जातो. किंवा बर्‍याच सोसायटीज ओला कचरा (मुख्यतः खरकटं) सोसायटी मधेच साठवून खतासाठी वापरतात, त्यामुळे तो बाहेर जात ही नाही. असं होत असतांना अश्या भटक्या कुत्र्यांचे खाण्याचे हाल होत असतील ना? कुत्रेच नव्हे तर भटक्या गाई/म्हशी/बकर्‍या ह्याचंही तेच होत असावं.

(वरील शंका ही मनातले प्रश्न साठी योग्य वाटत असेल तर सं.मं. कृपया 'गो अहेड')

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यातली भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहून हाल होतायत असं वाटत नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कविता छान.?

लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न होता .:-(

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'वाट पाहू पण मटणच खाऊ" म्हणजे हे मुंबईचे नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'वाट पाहू पण मटणच खाऊ" म्हणजे हे मुंबईचे नाहीत.>>>>>>>>>>
बाउंसर गेला....:-[

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक अदितीला म्हणायचे आहे की मुंबईकर एवढी वाट पहात बसणारच नाहीत. नाही मटन तर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेरे...!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वाट बघेन पण एस्टीनेच जाईन" असं एस्टीचं एकेकाळी घोषवाक्य होतं. मुंबईत कोणाला एवढा वेळ असणार!

इतरही एक क्लू की ही महानगरीतली गोष्ट नाही. पाटलांच्या घरी काय शिजतं, देशमुखांच्या घरी काय शिजतं हे बघायला मुंबईत लोकांना वेळ नसतो (असं म्हणायचं. मराठी नाटकनिर्मात्याच्या घरावर झालेली अंडाफेक असे प्रकार वाढलेले आहेत). महानगरांमध्ये सगळेच बिनचेहेऱ्यांचे लोक असतात. घरांना आकडे असतात, किंवा तिसऱ्या मजल्यावरचं, जिन्याच्या समोरचं दार अशी वर्णनं.

हे कथेच्या चांगल्यावाईट असण्याबद्दल नाही; वाचताना जाणवलेली गोष्ट एवढंच. कथा गंमतीदार वळण घेते म्हणून आवडलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कथा ग्रामीण वातावरणातली आहे .आणि म्हणूनच ती मुंबई वगैरे शहरातली असणे शक्यच नाही .
बाकी आपणास मुंबईबद्दल प्रेम आहे की तिटकारा हा नविनच प्रश्न आम्हास सदर प्रतिसादातून पडला आहे ..:-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0