सागरी महामार्गाने कोकण सफर

गेली कित्येक वर्षे बाईकने कोकण सफर करायची असा विचार होता . पण भारतात असताना नेमकी पावसाळ्यात सुट्टी मिळत नसल्याने व गेली काही वर्षे आखातात असल्याने तो विचार प्रत्यक्षात मात्र येत नव्हता. सहा महिन्यापूर्वीच Hero Passion Pro खरेदी केली होती त्यामुळे यंदा तसा योग आला . मुख्य अडचण अशी होती की सलग 100 किमी पेक्षा सलग प्रवास एकट्याने मोटरसायकलने केलेला नव्हता . म्हणून सुरूवातीला 250 ते 300 किमी चाच टप्पा घ्यावा असे ठरवले .. मग थोडीफार तयारी करून रत्नागिरी –मालवण सागरी महामार्गाने जायचे निश्चित केले .

दिनांक 02 सप्टेंबर ला घरातून निघालो. रत्नागिरी आमच्या गावापासून 30 किमीवर आहे. रत्नागिरीत खरेदी व इतर काही कामे करून दुपारचे जेवण करून 2.00 वाजता निघालो. पावसला स्वामी स्वरुपानंद समाधीचे दर्शन घेवून पुढे पूर्णगड खाडी व बीचवर थोडे फोटोसेशन केले . कशेळी कनकादित्य मंदिर आणि आडीवरे महाकाली मंदिरात दर्शन घेऊन निघेपर्यंत चार वाजले होते . मग चहा घेवून पुढे नाटे - जैतापूर अणुप्रकल्प मार्गे कात्रादेवी येईपर्यंत पाच वाजले . घोडेपोई पूलावरून साडेपाच वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला . पडेल मार्गे जामसंडे (देवगड) येईपर्यंत सहा वाजले . या रस्त्याला ट्रॅफिक अतिशय तुरळक असल्याने 70-80 च्या वेगाने आरामात जाता आले.

जामसंडे वरून कुणकेश्वर ला पोहोचल्यानंतर तिथे hault घेतला . मंदिर व परिसर अतिशय सुंदर असून आधुनिक सुखसोयी उपलब्ध होत आहेत. MTDC चा सर्व सुखसोईनी युक्त अत्याधुनिक रिसॉर्ट नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांसाठी उपलब्ध होईल होईल असे कळले . मंदिरापासून जवळच अंतरावर समुद्रकिनारी असलेला हा रिसॉर्ट सुमारे 20 कोटी रुपये खर्चून बांधलेला आहे.

03 सप्टेंबर ला कुणकेश्वर – आचरा मार्गाने प्रवास केला .या मार्गावर मीठबाव येथे श्रीदेव रामेश्वराचे सुंदर मंदिर आहे. कुणकेश्वर -आचरा - मालवण हा मार्गादेखील बहुतांश सरळसोट असून अतिशय तुरळक ट्रॅफिक असते. त्यामुळे 80-90 च्या वेगाने बाइक दौडविता आली . मालवण येथे दुपारी भोजन करून काही स्थळे पाहिली व तिथे काही मित्रांना भेटून रात्री मुक्काम केला .

04 सप्टेंबर ला सकाळी 10.00 वाजता मुंबई-गोवा हायवे गाठला . कणकवली जवळ वागदे येथे श्री आर्यादुर्गा मंदिरात दर्शन घेवून जेवण घेतले आणि हायवेने नांदगाव-तळेरे -खारेपाटण -राजापूर -लांजा मार्गे सहा वाजता
घरी पोहोचलो. वाटेत राजापूर -हसोळ येथे कॉलेजमधील वर्गमित्र तुषार दिक्षित याचीही भेट झाली.

मंडळी... सगळा मिळून 450 किमीचा प्रवास झाला . एवढा मोठा प्रवास मोटरसायकलने व तोही एकट्याने करण्याची पहिलीच वेळ . प्रवासवर्णन लिहिण्याची देखील पहिलीच वेळ आहे. तरी सांभाळून घ्यावे व त्रुटी दाखवून सूचना जरूर कराव्यात . सर्व फोटो Flickr.com वर असून त्याची लिंक दिली आहे. धन्यवाद

https://www.flickr.com/gp/135269012@N08/29026d

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

४५० किमीच्या प्रवासाचं फक्त १२ ओळी प्रवासवर्णन वाचून तुम्हाला शाबासकी द्यावीशी वाटली. नायतर लोकं तालुक्याच्या गावाहून जिल्ह्याच्या गावी काय जातात आणि त्याची पाननपानं लिहितात...
बाकी,

पावसला स्वामी स्वरुपानंद समाधीचे
कशेळी कनकादित्य मंदिर
आडीवरे महाकाली मंदिरात दर्शन
कुणकेश्वर मंदिर व परिसर
मीठबाव येथे श्रीदेव रामेश्वराचे सुंदर मंदिर
वागदे येथे श्री आर्यादुर्गा मंदिरात दर्शन

काय हो ही 'सफर' आहे की 'यात्रा'?
पण बाकी कुठं काय खाल्लं याचं वर्णन न दिल्यामुळे तुम्हाला यात्रावर्णन माफ! Smile

असो. सिरियसली, तुमच्या प्रवासातल्य टप्प्यामध्ये थोडी माहिती, तुमची निरिक्षणं हे ही लिहीत जा. मग लिखाण अधिक वाचनीय होईल....
प्रवास सुखरूप पार पडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो टाका ना मंदीरांचे (गाभारा व मूर्ती)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0