झहीर खान निवृत्त!

क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्‍हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.

झहीर खान यातून गेला पण एकदम वेगळ्या क्रमाने. फास्ट बोलर करीयरच्या उत्तरार्धात जास्त वेगवान, जास्त आक्रमक व 'लीथल' होत गेला आहे असे क्वचितच पाहिले आहे. २००० साली पदार्पण केलेला झहीर २०११ मधे सर्वात जास्त भारी फॉर्म मधे होता. भारताच्या सुदैवाने वर्ल्ड कप मधे तर प्रचंड प्रभावी! त्यानंतर दुखापत वगैरे अपरिहार्य गोष्टी सुरू झाल्या व शेवटी आज त्याने निवृत्तीची घोषणा केली. भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात व कसोटी क्रिकेट मधे २०१० च्या उत्तरार्धात पहिल्या क्रमांकावर आणण्यात त्याचा प्रचंड वाटा होता.

त्याची सुरूवातीला ओळख झाली ती २००० च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत. कपिल चा अपवाद व झहीर च्या थोडा आधी आलेला आगरकर सोडला तर भारताला आपले बोलर्स यॉर्कर्स टाकून लोकांच्या दांड्या उडवत आहेत हे चित्र फारसे माहीत नव्हते. त्यात लेफ्ट आर्म फास्ट बोलर म्हणजे आपल्या दृष्टीने गल्ली क्रिकेट मधे बोलिंग करणार्‍या व टीव्हीवर अक्रम ला पाहणार्‍या आमच्यासारख्या पब्लिक च्या इमॅजिनेशन मधेच शक्य होता :). त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मॅच मधे अ‍ॅण्ड्र्यू हॉल ची दांडी त्याने उडवलेली पाहिली तेव्हा भारतीय क्रिकेट बदलत असल्याची खात्रीच पटली. २००० म्हणजे 'दादा' च्या काळाची सुरूवात. झहीर, हरभजन, सेहवाग, युवराज हे साधारण याच काळात आले/स्थिरावले.

नंतर झहीर आपला प्रमुख बोलर कधी बनला कळले पण नाही. त्याने पोत्याने विकेट्स काढल्या आहेत असे फारसे झाले नाही पण प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख बॅट्स्मन ना उडवणे, कॅप्टन ने मोक्याच्या वेळी आणल्यावर हमखास विकेट काढून देणे यात तो तरबेज होता. दुसरे म्हणजे भारताच्या बोलिंग ला जरा 'इंटिमेडेटिंग लुक' आला त्याच्या मुळे. फॉलो थ्रू मधे त्याचा आविर्भाव टीपीकल फास्ट बोलर सारखा असे. त्याआधी श्रीनाथ चा वेग जरी जबरी होता, प्रसाद चा स्विंग चांगला होता तरी त्यांची बॉडी लँग्वेज आक्रमक नसे. झहीर मुळे आपले बोलर्स पहिल्यांदा तसे वाटू लागले.

द. आफ्रिकेचा स्मिथ हा त्याचा सर्वात मोठा 'बनी'. अनेकदा त्याने त्याची विकेट काढलेली आहे. या क्लिप मधे त्या विकेट्स बघायला मिळतील.

त्याच्या जबरदस्त रिवर्स स्विंग बोलिंगची काही उदाहरणे: ही एक न्यू झीलंड विरूद्धची मॅच, भारतातली. इथे "भारतातली" ला वेगळा अर्थ आहे. भारतात कुंबळे विकेट्स काढतो यात आश्चर्य नव्हते, झहीर काढतो, ते ही स्विंग वर, यात होते. भारताच्या मोठ्या स्कोअर ला तोंड देताना किवीज ची अवस्था १७/३ करताना झहीर ने बॉल आत येणार आहे की बाहेर जाणार आहे या गोंधळात सतत ठेवले बॅट्स्मेनना. पहिले दोन ही झहीर नेच काढले होते, पण ही तिसरी स्टीफन फ्लेमिंग ची विकेट म्हणजे स्विंग मुळे होणार्‍या गोंधळाचे जबरी उदाहरण आहे. नॉर्मल स्विंग ओळखायची व त्याप्रमाणे खेळायची सवय असलेल्या खेळाडूंना बॉल अचानक "रिवर्स" होउ लागला तर खेळता येत नाही, व लाईन लक्षात न आल्याचे ढोबळ पणे दिसणारी उदाहरणे त्याचीच आहेत. बॅट्समन कधी लाईन च्या आत खेळतात तर कधी बाहेर. कल्पना करा - स्टीफन फ्लेमिंग सारखा अनुभवी खेळाडू १७/२ वर खेळायला येतो, आधीचे दोन झहीरनेच उडवले असले (हीच क्लिप पहिल्यापासून पाहा, त्या दोन्ही विकेट्सही जबरी आहेत) तरी त्याचा बॉल सरळ सोडून द्यायचा प्रयत्न करतो. टोटल पोपट. अक्रम यात मास्टर, पण झहीरही जबरी होता.

पिच च्या एका कडेने येउन बॅट्समनच्या 'ब्लॉकहोल' मधे येणारा बॉल कधी आत येउन, कधी बाहेर जाउन तर कधी लाईन होल्ड करून विकेट घेउन जात असे हे बॅट्स्मन ना अजिबात झेपत नसे. क्रीझच्या उत्तम वापराचे बांगला देश विरूद्धचे हे एक उदाहरण

मग मध्यंतरी दुखापत, फिटनेस चा बोलर्स ना होणारा त्रास त्यालाही झाला. साधारण २००५ च्या आसपास तो ही बराच आत-बाहेर होता असे मला आठवते. मग मात्र पुन्हा फिटनेस सुधारून करीयरच्या दुसर्‍या इनिंग ला आला आणि पहिल्यापेक्षा चांगला बोलिंग करू लागला.

आणि हा २००७ चा इंग्लंड मधला 'जेली बीन्स' चा एपिसोड. पीटरसन वगैरे लोकांनी झहीर ला तो बॅटिंग करत असताना सतावल्यावर मग जेव्हा तो बोलिंग ला आला, तेव्हा पेटलेला होता. ट्रेण्ट ब्रिज ची ही कसोटी त्याने खतरनाक बोलिंग करून जिंकून दिली व आपण इंग्लंड मधे बर्‍याच वर्षांनंतर मालिका जिंकलो.

यानंतर २००८ मधे त्याच्या जोडीला इशांत शर्मा आल्यावर ती २-३ वर्षे झहीर-इशांत ही जोडी जबरी जमली. मग २०११ च्या सुमाराला अनेक मोठ्या संघांविरूद्ध मॅचेस जिंकून टेस्ट मधे पहिले रँकिंग व नंतर २०११ चा वर्ल्ड कप हे त्याचे महत्त्वाचे योगदान. या कप मधे त्याने नवीन बॉल वर फार भेदक बोलिंग केली नसेल, पण काही ओव्हर्स नंतर जवळजवळ प्रत्येक वेळेला जेव्हा धोनीने त्याचा स्पेल आणला तेव्हा त्याने विकेट मिळवून दिली.

सुंदर बॅटिंग प्रमाणेच सुंदर अ‍ॅक्शन असलेल्यांची बोलिंगही बघण्यासारखी असते. त्या दृष्टीने झहीर हा ही इम्रान, होल्डिंग, कपिल, डोनाल्ड च्या रांगेतला. त्याची डिलीव्हरीच्या आधीची उडीसुद्धा आधीच्या अ‍ॅक्शनच्या र्‍हिदम मधेच आलेली असे. तसेच विकेटनंतरचे सेलिब्रेशन सुद्धा एकदम वेगळे होते. दोन्ही हात पसरून पळत बॅट्समनच्या दिशेने येणारा झहीर कायम लक्षात राहील. कारकीर्दीच्या उत्तरार्धात तो इतर बोलर्स ना मार्गदर्शनही खूप करत असे असे वाचलेले आहे. त्याच्यात जर तसे काही कौशल्य असेल तर संघाबरोबर किमान बोलिंग कोच म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे.

एकूण मागच्या दशकातील टीम्स नी एक पॅशन निर्माण केली होती, त्यात झहीरही होता. २०११ च्या कप मधल्या कायम लक्षात राहिलेल्या २-३ इमेजेस पैकी एक म्हणजे भारताची फिल्डिंग चालू होत आहे. रन अप च्या टोकाला केस रंगवलेला ओल्ड हॉर्स झहीर खाली मान घालून बॉल ग्रिप करून काही सेकंद फोकस करत शांत उभा आहे. सगळे कव्हरेज एक मिनीट पॉज होते, मग रन-अप सुरू, प्रेक्षकांचा आरडाओरडा सुरू, त्यानंतर ती क्लासिक फास्ट बोलर अ‍ॅक्शन. पुढच्या एक दोन ओव्हर मधे पार्टनरशिप तोडण्याची गॅरण्टी!

गुडबाय झहीर, आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

मी क्रिकेट या विषयात(ही) बिनडोक आहे. आणि तरीही लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंतोतंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
जाता-जाता: सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, शेन वॉर्न वगैरे मंडळी नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क, ह्यूस्टन आणि लॉस एंजेलिस इथे मॅच खेळणार आहेत, असे समजले. (आमच्या कंपनीचा बॉक्स मिनटमेड पार्कमध्ये आहे, तर तो मिळावा म्हणून जरा प्रयत्न कर असे एक मित्र म्हणाला तेव्हा कळले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान लिहिलय! त्याच्या कारकिर्दीचे सगळे हायालिट्स व्यवस्थित टिपले आहेत. यॉर्कर्ससाठी तो पहिल्यांदा महत्वाचा वाटला हे तंतोतंत खरं. २००७ पासून २०११ पर्यंतचा भारताच्या सगळ्यात यशस्वी काळात जहीरचं योगदान मोठं आहे.

( फ्लेमिंगची विकेट आणि रिवर्स स्विंगचा संबंध जोडलेला समजला नाही.पण ते राहुदे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो मी काल या लेखासाठी क्लिप्स बघत होतो. रिवर्स स्विंग वाल्या काही क्लिप्स बघितल्या. बॉल रिवर्स होउ लागल्यावर होणार्‍या दिशेच्या गोंधळाचे सर्वात चपखल उदाहरण शोधत होतो. यातले बॉल चे बिहेवियर अगदी रिवर्स सारखेच वाटले काल मला. आता तुम्ही विचारल्यावर लक्षात आले की तो नवीन बॉल असणार व त्यामुळे नॉर्मल स्विंग असणार. मात्र बॉल आत येणार की बाहेर जाणार याचा गोंधळ तितकाच आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिशी ओलांडल्यानंतर पेस कमी झाल्यावर त्यानी रिवर्स स्विंग त्याचं हत्यार बनवलं. हे असं अडॉप्ट व्हायला डोकं आणि स्किल्स खूप लागतं. जुन्या बॉलवर राउंड द विकेट येउन रिवर्सच्या करामती खूप दाखवल्या त्याने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अडॉप्ट व्हायला डोकं आणि स्किल्स खूप लागतं

अतिशय मार्मिक वाक्य अनुप! सही करु का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या अश्या निवृत्तीच्या घोषणा काहीतरीच वाटतात, थोड्या कीव आणणार्‍या. जो माणुस सध्या कुठल्याही भारताच्या संघात नाहीये, त्याने निवृत्ती घोषित करणे म्हणजे.....
त्यातुन त्याला जर निवड समितीला संदेश द्यायचा असेल की तो अ‍ॅव्हेलेबल नाही, तर आधी निवड समीतीनी तशी वेळ तर येऊ द्यायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूपच आवडला. झहीरच्या अनेक आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्या. तो आक्रमक होता पण त्याने कधीही विकेट मिळाल्यावर, स्वतःच्या तीनदा थोबाडीत मारुन नाही घेतल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला, जहीरची गोलंदाजी मलाही आवडते. पण काळासमोर प्रत्येकाला नतमस्तक व्हावेच लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लिप्स नी सजवलेला , नटवलेला हा जाहीर वरचा निवृत्ती लेख खूप आवडला. जाहीर हा एक श्रेष्ठ गोलंदाज होताच पण तो एक महान 'टीम प्लेअर ' होता. प्रसंगी त्याने चांगली फलंदाजी करून लाज राखली आहे , हा एक मुद्दा सोडला तर आपला लेख उत्तम.

द्रविड , सचिन , जाहीर निवृत्त झाले. आमच्या 'जवानी ' चा काळ ह्यांचा खेळ पाहण्यात गेला. जाहीर च्या जाण्याने एकदम मी मागच्या पिढीतला क्रिकेट प्रेमी आहे ह्याची जाणीव होवून राहिली ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाहीर च्या जाण्याने एकदम मी मागच्या पिढीतला क्रिकेट प्रेमी आहे ह्याची जाणीव होवून राहिली ...

तंतोतंत!
आता मीच "आता काय बेटा आमच्या वेळचे क्रिकेट होते महाराजा!" म्हणत सुस्कारे सोडू लागू नये म्हणजे मिळवली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्रिकेट खेळणे बंद झाल्यापासून पाहणेही सोडले आहे पण लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झहीर, सेहवाग या लोकांनी निवृत्त होवून तुमचं काम मात्र वाढवून ठेवलंय… पण काम पूर्ण करा नक्की… तुमचा "बॉम्बे डक" लेख खूप आवडला होता… झहीर च्या लेखापेक्षा… सेहवाग वर पण "तुमचंच" लेखन वाचायला आवडेल…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0