दहशतवादाचे कूळ आणि मूळ

परवाच्या पॅरिस बॉम्बस्फोटानंतर बातम्या बघत असताना मनात विचार आला की ,आज सद्दाम हुसेन असता ,तर आयसीस किंवा तालिबानी आतंक्यांचा त्रास इतका वाढला असता का?

थोडा विचार केल्यावर असे उत्तर सापडले की नक्कीच नाही. सद्दाम हुसेन अमेरिकेच्या दृष्टीने कितीही वाईट/क्रूर इत्यादि असला तरी प्रत्यक्षात त्याने इराकला एक समर्थ अन बलशाली राष्ट्र बनवले होते . तो लोकप्रिय नेता होता आणि त्याने इराकमधील अंतर्गत बंडाळी आणि बाह्य हितशत्रूंचा बीमोड व्यवस्थित करून इराकी जनतेला सुखाचे दिवस दाखवलेले होते. त्याच्या काळात भारताशीही बगदाद चे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते...

असे असताना , त्याला कुवेत वर आक्रमण करण्याची दुर्बुद्धि सुचली आणि तेलाच्या राजकारणात स्वार्थ साधण्यासाठी टपलेली अमेरिका ताबडतोब इराकवर तुटून पडली ... बरे त्यातून इराकी सैन्याला माघारी ढकळल्यावर अमेरिकेचे काम संपलेले असताना सूडबुद्धीने "सद्दाम हा क्रूरकर्मा हुकूमशहा असून त्याच्याकडे बायोकेमिकल वेपन्स आहेत " असा कांगावा अमेरिकेने जगभर केला (जो की नंतर खोटा असल्याचे उघड झाले !कारण टी जैवरासायनिक शस्त्रे कधीच सापडली नाहीत , ब्रिटिश मंत्र्यांनी याची कबुली दिलेली आहे)

तर येनकेन प्रकारेण सद्दाम ला शत्रू ठरवून अमेरिकेने त्याला संपवले... त्यासाठी साम,दाम ,दंड ,भेद सगळे उपाय केले . बंडखोर अतिरेकी संघटनांना पैसा आणि शस्त्रे पुरवली. ( जे अमेरिकेने तालिबानसोबत आधी अफघणिस्तान मध्ये देखील केलेले होते , रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेनेच तालिबान ला पैसा आणि शस्त्रे पुरवली होती ) हाच प्रकार सीरिया /लिबिया आणि अन्य ठिकाणी देखील केला ... पण आपले ईप्सित साध्य झाल्यावर इराकची पुनर्बांधणी करून त्या देशात सुव्यवस्थित शासनव्यवस्था अन शांतता नांदेल याची जबाबदारी घेण्याचे मात्र अमेरिका टाळत आली आहे. म्हणजे आधी अतिरेक्यांच्या साथीने देश बेचिराख करायचा अन मग हात वर करायचे ! ही हरामखोरी अमेरिका नेहमीच करीत आलेली आहे . म्हणूनच मी मागे तृतीय विश्वायुद्धासंबंधीच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेचे दहशतवाद -विरोधी युद्ध बेगडी आहे आणि त्यांचे हेतु शुद्ध नाहीत .

आज इराक /सीरिय व अन्य भागात अमेरिकेच्या पैशानेच उभे राहिलेल्या अतिरेक्यांची सुधारित आवृत्ती म्हणून "आयसीस" उभे राहिले असून हा दहशतवादाचा भस्मासुर थांबवणे आता महाकर्मकठीण बनले आहे... पण या दहशतवादाचे मूळ आणि कूळ शोधू गेल्यास ते अमेरिकेच्या फसलेल्या अन चुकीच्या विदेश नीतीत अन युद्धखोरीत आहे हे स्पष्ट दिसून येणे... आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

:X ROFL :D> ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी