Skip to main content

पिढ्या #शॉट

============================
काडीकिड्याच्या आईला-
'तिच्या' वजनाबद्दल चिंता वाटत नसेल?
घुबडाच्या घरचे लोक-
त्याने जाग्रण करावं म्हणून तळमळत नसतील?
चिचुंद्रीला तिची आई-
"१२च्या नंतर बाहेर" म्हणत नसेल? #सातच्याआतघरात

मग प्राणीसृष्टी इतकी
पुढारलेली असताना #रांडेचे
आम्हीच कसे रे असे कमनशिबी?
.
.
बाहेर जाताना-
कपडे इस्त्रटलेलेच घालत जा.
(जाऊ दे!)
फाटक्या 'जीन'च्या 'पँटी' घातल्यात- #लोल!
तर त्या भोकांना रफू तरी करत जा
(असून दे!)

अशावेळी जर टँकटॉप-योगापँटमधे
माझी मैत्रीण वाकूsssन नमस्कार करायला लागली #हॉट!
तर ह्या लोकांच्या आठ्या कपाळात का जाणार नाहीत?
.
.
मावशी आणि मावसोबा-
ऑलरेडी करून झालेलं होतं.
आत्या आणि आतोबांनी-
'आधी केले मग सांगितले' होते.
आई आणि बाबांनी-
बहुतेक तसं काहीच केलं नसावं. #निराशा

तरीच च्यायला एक दिवस
मी {तिच्यासोबत} एकटाच झोपणारे हे कळल्यावर
आई-बाबा लगेच तांडव करणार नाहीत तर काय?
.
.
काहींचे बाबा-
काहींना स्वतःहून कंपनी देतात
काहींची आई-
काहींना मेजर धुडगूस घालायला देते
आणखी काहीबाही तर-
मुलांना मित्र वगैरे मानतात #काहीहीहंश्री!

यार, मग समजा
एकदा कधी बेडरूम बंद करायला जावं #पॉर्न
तर दरवाजावर लगेच धडका मारायच्या का?
.
.
तुमचे परंपरा आणि संस्कार-
कधीतरी एकदा विसरा #archive
तुमच्या इतिहासाचं ओझं-
खांद्यावरून उतरवून बघा एकदा.
मी काय म्हणतो-
निदान अटेम्प्ट तरी मारून बघा? #केटी

तुमचा प्रॉब्लेम
काय झालाय माहितीये का?
तुम्ही राव जगणं फारच शिरेसली घेता. #लोडनकाघेऊ
============================

१ - पुल! सुटका नाही.

नंदन Tue, 08/12/2015 - 07:08

कविता आवडली.

अवांतर (कृ.ह.घे.):
नव्वदोत्तरी-साचा-स्कोअर-तक्ता -

'कपाळात आठ्या' हा सोवळेपणा = -१
'इस्त्रटलेले'सारखे वर्जेश-सोळंकायझेशन-ऑफ-भाषक-प्रयोग = +२
हॅशटॅग्ज्,कोडसदृश्यरचना = +२
पुलंच्या प्रभावाची प्रामाणिक कबुली =
s

नंदन Tue, 08/12/2015 - 13:16

In reply to by आदूबाळ

कवितेचे लोलत्व वादातीत आहे; हा आमचाच नव्वदोत्तरी कवितेच्या ठरावीक साच्याशी तुलना करण्याचा नतद्रष्टपणा!

नव्वदोत्तरी कवितांत, एक धक्कातंत्र-चूष म्हणून (विशेषतः मध्यमवर्गीय आड्यन्सला माफक बंडखोरीचं सेकंडहँड फीलिंग यावं, या हेतूने बहुधा?), बॉर्डरलाईन असभ्य शब्द वापरलेले दिसतात बर्‍याचदा. उदाहरणार्थ, इथे). ती संधी हुकवल्याबद्दल अभिनंदन अधिक फाऊल!

आदूबाळ Tue, 08/12/2015 - 15:15

In reply to by नंदन

रैट्ट. म्हणजे असं?

एच्चारने नाही म्हटल्यावर... (एक नव्वदोत्तरी 'भ'विता)

फोन घालावा
ताईच्या मांडीत
ओकलीच्यांनो
नाही म्हणताना
नीब झडली कशी नाही तुमची?

तो आतलाच घ्यायचा होता तर
इथे काय मी
हट्ट उपटायला बसलो आहे का
आणि माझा गेलेला वेळ
आता कोणाच्या ओच्यात शोधू?

- (हाना)हान्या जोषी

टीपः हा विनोद आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 08/12/2015 - 15:30

In reply to by आदूबाळ

हैदोस! हट्ट उपटण्यावर फुटले. मग टिपेवर काय करावं कळेना....
सहीबद्दलः आबा जितके जास्त कावतील तितकं बरं...

अस्वल Tue, 08/12/2015 - 23:08

In reply to by नंदन

:)
@आबा -भलत्याच जोशील्या कविता :ड
@नंदन - पु.ल. आता आमच्या firmwareचा भाग झाले आहेत. क्या करे! बाकी मला खरंच "आठ्या"च म्हणायचं होतं हो...

शिवाय ही कविता ट्विटरवर #खंडकाव्य म्हणून खपून जाईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/12/2015 - 09:26

अस्वलाला शत्रू म्हणण्यातही मतलब नाही, त्याने ऑस्कर वाईल्डचं म्हणणं ऐकून त्याचा शत्रू आधीच निवडला आहे. पण म्हणून त्याला असल्या भन्नाट कल्पना सुचतात, त्या नीट उतरवता येतात म्हणून होणारी जळजळ कमी होणार नाहीये.

तिरशिंगराव Tue, 08/12/2015 - 12:09

अस्वलाच्या आईला, ते माणसाला गुदगुल्या करुन मारते, म्हणून चिंता वाटत नसेल ?

चिंतातुर जंतू Tue, 08/12/2015 - 12:47

तुमचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का?
पाळीव प्राणी आणताना जसे नीट पारखून आणता #पॉटीट्रेन्ड
मग आईवडलांना का नाही ट्रेन करून आणत? #संस्कारीबॉन्ड

अॅरागॉर्न Tue, 08/12/2015 - 13:33

रोचक कविता. आता मराठी सायटींवर ह्याशट्याग रुढ होणार का?
#अवांतरप्रश्न #नांदीभविष्यकाळाची वगैरे.

.शुचि. Tue, 08/12/2015 - 19:27

अभिनव कल्पना #पेटंट.

राजेश घासकडवी Tue, 08/12/2015 - 19:54

या कवितेत बरेच प्रश्न दिसले म्हणून उत्तरांचे पर्याय आणि गुण किती झाले हे तपासून पाहाण्याचं बटण शोधलं. स्साला सापडलंच नाही.