मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५८
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
एखाद्या सोलरवॉटर हीटरच्या खालच्या बाजूस सोलर सेल लावले तर त्यातून वीजनिर्मिती होईल का? झाली तर तितक्याच प्रमाणात होईल का?
सूर्याकडे तोंड करून काच.
सूर्याकडे तोंड करून काच. त्याखाली पाणी. त्याखाली दुसरी काच. त्याखाली सोलर पॅनेल. अशी रचना.
सूर्याचे ऊन पहिल्या काचेतून पाण्यातून खालच्या काचेतून सोलर पॅनेलवर पडणार. दोन काचांच्या मधले पाणी गरम होणार. आणि सोलर पॅनेलमधून वीज निर्मिती होणार. उर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार बरीचशी ऊर्जा पाण्याने शोषल्यास सोलर पॅनेलमध्ये अगदीच कमी वीज निर्मिती व्हायला हवी.
ऐकीव माहिती
वेगवेगळ्या पॅनल्समध्ये वेगवेगळ्या तापमानाला जास्त वीज निर्माण होते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला तापमानानुसार वीजेचं प्रमाण बदलेल, हे एक.
दुसरं पाणी आणि काच या दोन्ही माध्यमांमध्ये प्रकाश पूर्णपणे शोषला जात नाही. पारदर्शक असल्यामुळे काही प्रमाणात प्रकाश पलिकडे जातोच. त्यातून पॅनल्समधून वीज तयार होऊ शकेल. सैद्धांतिक पातळीवर. व्यावहारिक पातळीवर खर्च आणि वीज उत्पादन यांचा ताळमेळ, गणित फायद्याचं होईल असं वाटतं (गणित केलेलं नाही).
या चित्रात
या चित्रात पाण्याच्या वर काच आहे. खाली पण काच लावली आणि त्याच्या खाली सोलर पॅनेल लावला. दोन काचा आणि पाणी यांतून जो प्रकाश आरपार जाईल त्या प्रकाशाने वीज निर्मिती होईल. ही वीज निर्मिती सूर्याचा प्रकाश डायरेक्ट प्रकाश पडल्यावर निर्माण होणार्या विजेपेक्षा कमी असेल की सेम असेल?
सूर्यप्रकाश / / / / / / / / / / / / /
वरची काच ---------------------------
पाणी ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
खालची काच ---------------------------
सोलर पॅनेल ================
सोलर पॅनलची रचना नीट तपासली
सोलर पॅनलची रचना नीट तपासली पाहिजे. तुमच्या म्हणण्यानुसार ग्लास टॉप टँक भरुन पाणी थेट उन्हात एक्सपोज केलेलं असतं असं वाटतंय. पण मी पूर्वी बघितलेल्या (जुन्या जनरेशनचे असतील) सोलर हीटरमधे पाणी बारीक काळ्या नागमोडी किंवा अन्य आकाराच्या पाईप्समधून फिरवलेलं असायचं. आता नवीन पद्धत काय आहे बघायला हवं.
अर्थातच त्या काळ्या रंगाच्या पृष्ठभागा खाली सोलर पॅनल लावून उपयोग नाही, कारण प्रकाश त्या काळ्या अपारदर्शक पॅनेलमधून खाली पोचणारच नाही. हे फारच बेसिक तुम्हीही गृहीत धरलं आहेच. तुम्ही इच्छिलेला इफेक्ट मिळण्यासाठी काळ्या रंगाच्या ऐवजी सोलर पॅनेल लावायला हवं. त्याच्याखाली पुन्हा काळा रंग लावला तरी फरक पडणार नसल्याने पॅनेल हेच काळ्या रंगाचं काम करण्याइतकं योग्य हवं. नाहीतर पाणी गरम होण्यातली एफिशियन्सी कमी होईल. माझ्यामते पाण्यावर थेट किरण पडल्याने पाणी जितकं गरम होतं त्याहून बरंच जास्त ते त्या काळ्या धातूच्या मटेरियलमुळे /नळ्यांमधून खेळल्याने गरम होतं. तेव्हा काळ्या रंगाच्या मेटलप्लेटपर्यंत किरण पोचलेच पाहिजेत. काही सोलर हीटर्समधे फक्त उष्णता गोळा करुन तिच नजीक अन्यत्र वहन करुन पाणी गरम करणंही शक्य असतं असं वाचल्याचं आठवतं.
शिवाय समजा सोलर पॅनेल्स अशा मटेरियलची केली की ती खुद्द काळ्या पत्र्याप्रमाणे गरम होऊन पाण्याला तापवतील, तरी ऊर्जा अक्षयतेच्या गृहीतकाचा तुम्ही योग्य उल्लेख केला आहे. पाण्याला गरम करुन सौरकिरणे सोलर पॅनेलमधेही ऊर्जा उत्पन्न करणार असतील तर ऊर्जाक्षय होणारच. एकदा चरकातून बाहेर पडलेल्या उसाच्या उर्वरित चिपाडाला परत चरकात घातल्यावर पहिल्या खेपेइतकाच रस निघेल अशी अपेक्षा ठेवणं तर्कदुष्ट वाटतं.
शिवाय सौरऊर्जा अत्यंत मुबलक
शिवाय सौरऊर्जा अत्यंत मुबलक आणि फुकट उपलब्ध असल्याने, बरीचशी वाया जात असल्याने आणि मुख्य म्हणजे इतर ऊर्जास्रोतांच्या तुलनेत मुळातच अत्यंत कमी ताकदीची असल्याने सौरऊर्जेबाबत एकात एक करुन अधिकाधिक ऊर्जा जमा करण्याची (टर्बोचार्जर लॉजिक) आजरोजी तरी गरज वाटत नाही. हा अर्थातच अनरिलेटेड वेगळाच मुद्दा आहे.
जागेचा प्रश्न आहे. मर्यादित ठराविक स्क्वेअरफूट इतक्या गच्चीच्या एरियात एक सोलर पॅनेल वेगळं आणि एक हीटर वेगळा बसवण्यापेक्षा ते कंबाईन करता आले तर? अशा अर्थाने प्रश्न योग्यच आहे, पण एकूण या ऊर्जाप्रकाराचं यिल्ड तसंही फार कमी असल्याने त्यात आणखी एकात एक बसवून तितकासा फायदा होईल असं वाटत नाही.
माझा असा कयास आहे की
माझा असा कयास आहे की सूर्यकिरणातील उष्णता देणार्या प्रकाशाची वेव्हलेंग्थ (इन्फ्रारेडच्या दिशेने) आणि फोटोसेल मध्ये विजेमध्ये रूपांतर करणार्या प्रकाशाची वेव्हलेंग्थ (व्हायोलेटच्या दिशेची) वेगळी असते. त्यामुळे उष्णता शोषली गेल्यावरही विजेत रूपांतर करणारा प्रकाश तसाच असेल असे वाटते. तो वापरता आला तर पहावा असा विचार आहे.
ओके
बहुतेक प्रश्न कळला.
खाली सोलर पॅनेल्स लावून ज्या मोकळ्या जागेतून सुर्यप्रकाश खाली जाईल तिथे सोलर सेल्स द्वारे वीज निर्मीती हा उद्देश, बरोबर?
तात्विकदृष्ट्या, बरोबर. पण काही मुद्दे.
१. 'एनर्जी' ऑफ द इनकमींग लाईट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट जनरेटेड. (एक्साईटेशन ऑफ अॅटम्स).
२. पाणी हे पाईपमध्ये असतं. पाईप काळे रंगवलेले असतात. त्यामुळे बराचसा प्रकाश अडवला जाणार. (एरिया रेशो चा विचार केल्यास, हा सोलर हीटर डिसाईन करताना ( प्रोजेक्टेड पाईप एरिया/टोटल सरफेस एरिया) हे गुणोत्तर जेव्हढे जास्त तेव्हढी इफिशियंसी जास्त. त्यामुळे खाली सोलर पॅनेल्स बसवले तर हे दोन 'वर्किंग अगेन्स्ट इच अदर' असं होईल.
३. सोलर सेल्स महाग. त्यामुळे रिकाम्या जागेत बसवण्यासाठीचे 'कस्टम डिझाईन्ड' पॅनेल प्रॅक्टिकल होणार नाही. आणि संपूर्ण पॅनेल जर बसवले तर पैसा निराकारण व्यर्थ, कारण बहुतेक सेल्सपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचणारच नाही.
४. मुळात या हीटरची इफिशियंसी कमी असते. त्यात खालचा काळा भाग काढून तिथे सोलर पॅनेल बसवले तर ती 'लॉस्ट इफिशीयंसी' कमावलेल्या सोलर इफिशियंशी ताडल्यास गणित वजाबाकीचेच होण्याची शक्यता जास्त.
सोलर हिटरमध्ये समजा १००
सोलर हिटरमध्ये समजा १०० कॅलरिज आल्या तर त्या सर्व पकडून पाण्याला तापवण्यासाठी उपलब्ध करून देणे हा उद्देश खालच्या काळ्या भागाचा असतो.पाणी उन्हाने सूर्यकिरणांनी सरळ सहज तापत नाही पण तापलेल्या कोणत्याही वस्तुच्या सान्निध्याने तापते.आता त्या पकडलेल्या १०० कॅलरिजचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं कितीची वीज आणि कितीचं पाणी गरम करणे ते.
बाकी एकाची घडी नीट बसवावी तर दुसय्राची तेवढीच मोडली जाते निसर्गात. ( mass,momentum,Pauli's exclusion principle?)
मला असं समजलं.
उंटाच्या बुडख्याचा मुका?
ह्या परकीयांना गरज काय हो असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायची?
ते कॅरोलायनावाले डी व्हिटॅमिन मिळवण्यासाठी उघड्या अंगाने लॉनमोईंग करतील नाहीतर अंगभर बुरखा घेतील. ह्यांना काय पडलीये?
हे इथे आलेयत ते निमूट रहा, काय चार दिडक्या मिळवायच्या त्या मिळवा आणि सुखाने अळूचं फदफदं आणि भात खाऊन सुखनैव झोपा काढा!
बाकी इतर अमेरिका काय करत्ये आणि काय नाही ह्याच्याशी काय करायचंय ह्या लोकांना?
आणि जर इथलं वातावरण अजिबात आवडत नसेल तर ज्या काय चार बॅगा घेऊन इथे आले त्या पुन्हा भरा आणि जा की परत तुमच्या देशाला!
व्हॉटेव्हर कंट्री इट मे बी!!!!!
डार्लिंग, गॉड ब्लेस यू!!!!>
:)
देवा, याही देशात उजेड पाड!
US town rejects solar panels amid fears they 'suck up all the energy from the sun'
फॉक्स न्यूजवरच्या एका चर्चेत, आमंत्रित केलेल्या 'एक्स्पर्ट' बाईंनी जर्मनीत अधिक सूर्यप्रकाश पडत असल्याने तिथली सोलर इंडस्ट्री अधिक प्रगत असल्याचा दावा केला होता, ते आठवलं :) -
http://www.slate.com/blogs/future_tense/2013/02/07/fox_news_expert_on_s…
हाहाहा
या बाईंना टेक्सास, अरिझोना, न्यू मेक्सिको वगैरे भाग अमेरिकेत आहे असं वाटत नसावं बहुदा.
आमच्या आष्टीनातली एक वीजकंपनी सोलर पॅनल्स घरांवर बसवण्यासाठी सूट देते. साधारण गणित असं की एकदा पैसे खर्च केले की वसूल व्हायला साधारण पाचेक वर्षं लागतील. पॅनल्स वीसेक वर्षं चालतात; पॅनल्सची मालकी वीजकंपनीचीच असते, पण पाच वर्षांनंतर आपल्यालाही फायदा होतो. विशेषतः उन्हाळ्यात एसीसाठी वीज जास्त लागते, तेव्हाच वीजेचे दरही जास्त असतात, पण तेव्हाच वीज अधिक बनतेही. ती चढ्या दरानेच विकत घेतली जाते.
गूगल आदि कंपन्या पूर्ण
गूगल आदि कंपन्या पूर्ण स्वयंचलित, चालकविरहीत कार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि बर्यापैकी फंक्शनल कार त्यांनी बनवलीही आहे. काही काळापूर्वी टीव्हीवर त्याचा डेमोही पाहण्यात आला.
अशा कारचा आल्गोरिदम अधिकाधिक प्रगत झाल्यावर ती मानवी ड्रायव्हरपेक्षा जास्त सुरक्षित ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. खरंतर, आत्ताही ती मानवी ड्रायव्हरपेक्षा जास्त सुरक्षित आहे असं म्हटलं जातं.
नियमानुसार आणि सततच्या अचूक वेळ-वेग-अंतर कॉम्प्युटेशनच्या दृष्टीने ही यंत्रणा नक्कीच अचूक काम करत असेल आणि करेलही.
माझा प्रश्न असा आहे की सर्व अपघात खुद्द ड्रायव्हरच्या अग्रेशनमुळे होतात असं नव्हे. इतर वाहनचालक बेफामपणे वाहन चालवतातच आणि अशा वेळी अनेकदा आपण सर्वबाजूंनी कोंडीत सापडलेलेही असतो. अशावेळी अपघात निश्चित होणार हे लक्षात आल्यावर अनेक "बेकायदेशीर" गोष्टी करुनही हानी कमी करण्याचा प्रयत्न होतो. यामधे खुद्द ड्रायव्हर कसा संयतपणे आणि नियमांनुसार ड्राईव्ह करतोय यापेक्षा मुख्यतः तो "लेसर इव्हिल" लॉजिक कसं वापरतोय हे महत्वाचं ठरतं.
उदा. राँग साईडने बेफाम येणारा ट्रक आता थांबणार नाही हे लक्षात आल्यावर आपण खुद्द खालीलपैकी काही अॅक्शन करु शकतो:
१. आपली गाडी फुटपाथ / डिव्हायडरवर चढवणे
२. गाडी जितकी शक्य होईल तितपत तरी त्या ट्रकच्या रस्त्यातून बाजूला काढणे. मग त्या प्रयत्नांत बाजूच्या एकदोन कार्सना तुलनेत कमी धोकादायक धक्के लागले तरी.
३. ट्रकशी टक्कर टाळण्यासाठी इतर दोन वाहनांपैकी कमी धोका असलेल्या वाहनाला धडक देणे. (दुधाचा ट्रक पेट्रोलियम टॅकरपेक्षा बरा इ.इ.)
हे सर्व मानवी तर्क आल्गोरिदममधे माणसापेक्षा जास्त प्रभावीपणे बसवता येतील का?
शतजन्म शोधिताना
शतजन्म शोधिताना चा अर्थ माहीती आहे का कुणाला ??
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गांठी ॥
हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
काही ओळींचा अर्थ लागतोय पण काँटेक्स्ट काही लागत नाहीये.
शत जन्म शोधिताना - संदर्भ
सन्यस्तखड्ग नाटकामागची सावरकरांची भूमिका :
संगीत सन्यस्त खड्ग नाटक गौतम बुद्धाच्या काळाशी संबंधित आहे. गौतम बुद्धांच्या सांगण्यावरून 'शाक्य' सेनापती विक्रमसिंह शस्त्रत्याग करून संन्यासी होतो. बुद्धांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन 'शाक्य' जनता शस्त्रत्याग करते व त्यामुळे त्यांचे राज्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. जेव्हा शेजारील कोसल राजा 'शाक्य' राज्यावर आक्रमण करतो तेव्हा विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभाच्या सेनापतीत्वाखाली असलेले शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरते. विक्रमसिंहाची सून सुलोचना सैनिकी वेश धारण करून रणांगणात उतरते. पण दोघांचाही शेवट सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य भूतपूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. गौतम बुद्धाशी अहिंसा व नैतिकता ह्यावर वाद-विवाद केल्यानंतर विक्रमसिंह त्याग केलेली तलवार (सन्यस्त खड्ग) उपसून शाक्यांना विजयी करतो.
.
गाण्याच्या आधीचा प्रसंग/मजकूर पुढीलप्रमाणे:
सुलोचना : म्हणूनच सखे, ते तसे क्षणात आपणांला सोडून गेले ह्याचा राग न येता उलट अशा नि:स्पृह कर्तव्यवीरांचा लोभ तसा क्षणभर तरी आपणांवर बसतो, हाच आपल्या अंगनांचा परमविजय होय अशी कृतज्ञ धन्यता आपणांस वाटावयास हवी. लंपट प्रेमापेक्षा असे त्यागी प्रेमच आम्हा कामिनींना खरोखरच लंपट करते. म्हणूनच अशा वीरवराच्या ह्या त्यागी प्रेमास शोभेन अशी ही त्यांची अर्धांगीही ह्या संकटात वागणार. नलिनी, मी सेनापती वल्लभाची पत्नी; सेनापती राष्ट्रपितामह विक्रमांची स्नुषा, मी कोलियन क्षत्रिय कुलाची कन्या- नलिनी, मी त्या दुष्ट विद्युद्गर्भाच्या सैन्यास आणि शक्य तर त्यास नागिणीसारखी डसणार. मी सैनिक वेश घेऊन शाक्यांच्या सैन्यात शिरणार. वीर वल्लभ कर्तव्याचे रणशृंग वाजतांच जसे मजकडे वळून पहाण्यासाठीदेखील थांबले नाहीत तशी मीपण आता ह्या माझ्या मांडल्या संसाराकडे निरोप घेण्यापुरतीदेखील वळून पाहणार नाही. हा बघ, सोंगट्यांचा पट तसाच मांडलेला; ही बघ ती माळ! सखे, पुरे आठ दिवस झाले असतील नसतील आमच्या प्रीतिसंगमाच्या पहिल्या वाढदिवशी; भगवान कामदेवाची पूजा करण्यासाठी मी ही माळ ओवीत होते, मी येथेच वल्लभांना गळ घालीत होते, त्या वेळी त्यांच्याशी खेळण्यासाठी हा सोंगट्यांचा पट मांडला. हाय हाय! मी त्यांस प्रेमाची गळ घालीत होते. त्याच क्षणी मला काय माहीत की काळाचा प्राणघातक गळही माझ्या प्रियकराच्या मानेवर फेकला जात होता! नाही तर मी शेवटच्या भेटीचा तो क्षण पोरसवदा अबोल्यात आणि रुसण्यात घालवला नसता. हा संसाराच्या पटावरील सुखाचा शेवटचा डाव खेळून घेतला असता. चालले मी हा संसाराच्या सोंगट्यांचा पट असा उधळून -
(चाल - आँखोंसे तेरे ग़ममें)
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गांठी ॥
हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
आर्ति या शब्दाचे अनेक अर्थ आहेत - दु:ख, क्लेश, इच्छा, इ. इथे इच्छा-आकांक्षा असा अर्थ होतो असं दिसतंय.
संदर्भः संगीत सन्यस्तखड्ग
नाटकातल्या संदर्भापेक्षाही
नाटकातल्या संदर्भापेक्षाही (अमुकने दिलेल्या संदर्भानुसार - 'ज्या क्षणाची वाट पाहिली तो काहीतरी क्षुल्लक कारणामुळे हातून गेला. मग आता उपाय काय? शत जन्म जशी वाट पाहिली तशीच अजून पाहावी लागणार.' असा अर्थ वाटतो.) हे काव्य जास्त व्यापक वाटतं.
आपण आपल्या आयुष्यात कुठचंतरी ध्येय ठेवतो. त्यासाठी अहोरात्र कष्ट करतो, अनेक आनंददायी गोष्टींचा त्याग करतो. आपल्या आयुष्याची ज्योत करून त्या ध्येयदेवतेची आळवणी करतो. त्या ध्येयाच्या पूर्तीचा क्षण म्हणजे सर्वस्व असं आपल्याला वाटत राहातं. आणि काही नशीबवान व्यक्तींच्या आयुष्यात तो क्षण साकार होताना दिसतो. मला हवं ते मला मिळालं या पूर्ण समाधानाचा तो क्षण असतो. तो क्षण अनंत काळ टिकून राहावा, त्या यशाच्या धुंदीतच उरलेलं आयुष्य जावं असं वाटतं. पण तो प्रत्यक्ष येतो तेव्हा जो दैवी आनंद मिळतो तो फक्त त्या क्षणापुरता पुरतो. पुढे काय?
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेकांनी त्याग केला. आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. जल्लोष झाला. परिपूर्ती झाली. पण तो शेवट नव्हता. त्यापुढे काय हा प्रश्न शिल्लक राहिलाच. मग कधी नवीन ध्येयं कवटाळावी लागतात, किंवा त्या प्राप्तीतून हातात काहीच लागलं नाही म्हणून 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' म्हणावं लागतं.
हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.
दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.
१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.
२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.
३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.
४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.
आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?
वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.
आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.
१) मुस्लिमांनी घराबाहेर
१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.
२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.
३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.
४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.
१) साफ नामंजूर
२) अॅट बेष्ट समस्याजनक. त्यांनी कोणत्या भाषेत बोलायचं हे तुम्ही का ठरवणार? तुम्ही फक्त एवढेच सांगा की ते हिंदीत बोलले तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेणार की नाही ? व व्यवहार करणार की नाही ?
३) नामंजूर (जिथे ओळखपत्र दाखवावे लागते तिथे दाखवायला लावावे. पण बाकी बुरख्यावर बंदी नामंजूर)
४) नामंजूर
पुन्हा बाजीराव व भन्साळी
पुन्हा बाजीराव व भन्साळी
असे चित्रपट पुन्हापुन्हा निर्माण होत नाहीत म्हणून त्यांची अचुकता महत्त्वाची समजायला हवी.
शिवाय आघाडीच्या दोन नायिका चित्रपटात आहेत. त्यांना नाचवले नाही तर माझे पैसे कसे वसूल होतील असा पूर्णपणे धंदेवाईक प्रश्न भन्साळी साहेबांनी देवदास सारख्या अनैतिहासिक चित्रपटावेळी विचारला होता. तोच निकष ते या ऐतिहासिक विषयालाही लावत आहेत. हे सर्वथा चूकच आहे.
तेव्हा या पाच मिनिटांच्या खोडसाळपणामुळे बाजीरावाबद्दलच्या प्रतिमेचे काही बिघडेल काय हा उलटा प्रश्न विचारणे अयोग्य आहे.
भन्साळीची ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची थेरे कुठवर जातील याचा नेम नाही. त्याला या निमित्ताने कोणीतरी ठणकावून सांगून शुद्धीवर आणणारे कोणी नाही हे दुर्देव आहे. कारण इतिहासाची मोडतोड हा विषय सेंसर बोर्डाच्या अखत्यारीत येईलच असे नाही. तेव्हा प्रत्येक वेळी हा चित्रपट इतिहासावर आधारित नाही ही एक ओळ सुरुवातीला दाखवून या लोकांना पळवाट काढण्याची संधी मिळत आहे.
धुम्रपानाच्या दृष्याच्या वेळी 'धुम्रपान आरोग्याला अपायकारक आहे' अशी पट्टी फिरवणे बंधनकारक आहे तसे अशा इतिहासाला धरून नसलेल्या प्रसंगी ' हा प्रसंग इतिहासाला धरून नाही, निर्माता - दिग्दर्शकाची अधिक पैसे मिळवण्याची खाज पूर्ण करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटात घातला आहे' अशी पट्टी फिरवायला लावली, तर या धंदेवाईकांना ते चालेल काय?
तेव्हा त्यांचा पैसा, त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे म्हणत प्रेक्षक म्हणून आपली ही हतबलता पाहता कमीत कमी अशा लबाडांचे समर्थन तरी नको. शिवाय एवढे आहे, तर चित्रपट पाहण्याची सक्ती नाही हा उपदेश आहेच.
एकीकडे इंडियन एक्सप्रेसने या चित्रपटाला दीड स्टार दिला आहे तर दुसरीकडे काहीजणांनी हा सिनेमा दुस-यांदा पाहणार असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे.
आता चित्रपट प्रदर्शीतही झाला आहे. त्याच्या झगमगाटात आपण हे सारे विसरून जाऊ आणि आता भन्साळीची नजर आणखी कोणत्या महापुरूषावर किंवा साहित्यावर पडते याची वाट पाहू. 'वाट' हा शब्द मुद्दाम योजलेला आहे.
ए परा तुझी फेसबुक ष्टेटसं टाक
ए परा तुझी फेसबुक ष्टेटसं टाक या धाग्यावर. पराने पार डिप्रेशन दिलय भन्साळ्याला.
___
इथे ट्रेलर देते आहे -
बाजी तारणहार-रक्षक-परमशिष्य इ. इ. असल्याने तो रोज रात्री झोपायला जायच्या आधी आश्रमात एक चक्कर मारत असतो. कोणाचे पाय पांघरुणाबाहेर आलेत का, कोणाच्या उशाशी पाणी ठेवायचे राहिले आहे का, कोणाला निद्रानाश झालाय का असे सगळे तो जातीने लक्ष घालत असतो. तर एकदा असेच 'जागते रहो...' करत असताना त्याला नृत्यशाळेत प्रकाश दिसतो. तातडीने बाजी आपल्या कुटीतून एक तलवार घेऊन तिकडे धावतो. आत जाऊन बघतो तर तीच आधीची सफरचंदवाली मुलगी बेभान होऊन नटराजासमोर नाचत असते (इथे 'नाचूंगी मै चाहे आंगन हो आढा तेढा... माझा नाच करणार सगळ्यांना वेडा..' असे गाणे). इतरांच्या झोपेची काळजी आणि रात्रीची वेळ लक्षात घेता हे गाणे फक्त बाजीरावालाच ऐकू येते असे दाखवले आहे.
मंत्रमुग्ध होऊन बाजी तिला बघत राहतो. गाण्याची तिन्ही कडवी झाल्यानंतर अचानक तिला मागे कोणीतरी उभे आहे हे जाणवते. ती दचकते, म्हणून मग बाजी पण दचकतो. त्याच्या कोपराचा धक्का लागतो आणि शेजारच्या मशालीतले तेल त्याच्या हातावरती उडते. तोबताबड ती नर्तकी धावत येते आणि आपली चुनरी फाडून बाजीच्या हाताला बांधते. बाजी म्हणतो, ''वाड्यावर जाम नाच-गाणी पाहिली पण असले कधी नाय पाहिले." बाजीचा दिल एकदम खूश होतो; पण गुरुकुलात अंगाखांद्यावरती दागिने नसल्याने बक्षिसी कशी देणार? मग तो आपल्या भिकबाळीतला माणिक काढतो आणि तिच्या हातावरती ठेवतो. ती हसते-लाजते आणि मुजरा करते. मग ती बुंदेलखंडाच्या राजकन्ये बरोबर आलेली दासी असून तिला विद्याभ्यासाची परवानगी समाज और धर्मने नही दी है असे आपल्याला कळते. पण बाजी तिला आश्वस्त करतो आणि समाजाला चार खडे बोल सुनावतो. रात्री समाज झोपलेला असल्याने मग त्याचे बोल ती एकटीच ऐकते.
धुम्रपानाच्या दृष्याच्या वेळी
धुम्रपानाच्या दृष्याच्या वेळी 'धुम्रपान आरोग्याला अपायकारक आहे' अशी पट्टी फिरवणे बंधनकारक आहे तसे अशा इतिहासाला धरून नसलेल्या प्रसंगी ' हा प्रसंग इतिहासाला धरून नाही, निर्माता - दिग्दर्शकाची अधिक पैसे मिळवण्याची खाज पूर्ण करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटात घातला आहे' अशी पट्टी फिरवायला लावली, तर या धंदेवाईकांना ते चालेल काय?
केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कोणत्याही ऐतिहासिक व/वा पौराणिक गोष्टीची कितीही मोडतोड केली तर ते अत्यंत समर्थनीय आहे. मी त्यास माझ्या तर्फे थेट, नि:संदिग्ध, व मजबूत पाठिंबा देतो. व ज्यांना या इतिहासाच्या मोडतोडीचा राग येतो त्यांच्या रागावरून बुलडोझर फिरवण्यासाठी तर अजून पाठिंबा देतो. उद्देश हाच आहे की भन्साळीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याविरुद्ध आरडाओरडा करणार्यांची नाकं जमीनीवर रगडली जावीत व त्यांच्या नाकातून रक्त यावे.
(सिरियसली) संजय लीला भन्साळी झिंदाबाद !!!
महाराष्ट्रात अन् दुष्काळ? चेष्टा करताय काय राव?
महाराष्ट्रात अन दुष्काळ? चेष्टा करताय काय राव?
.
पुण्याजवळ पार पडलेल्या वायकर व वाल्हेकर या कुटुंबांमधील एका विवाहसोहळ्याचे वृत्त खाली जोडलेले आहे.
लग्नातला दिमाख व खर्च कमी करण्याची सुरूवात कशी करत येईल यावरच्या पोस्टबद्दल मी दोन-तीन दिवसांपासून विचार करत आहे.
त्यासंदर्भात कालच वाचण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये सकाळी आठ वाजता झालेल्य लग्नामध्ये खाण्यापिण्यावर खर्च शून्य, उलट प्रत्येक आमंत्रिताच्या हातात एक पाकिट. पैशाचे नव्हे. तर त्यात एक निवेदन. लग्नातल्या जेवणावळीचा खर्च आम्ही उभयतांचा संसार उभा करण्यासाठी देत आहोत, दहा वाजता ‘लग्न’ संपलेदेखील. म्हणजे तसे जाहिर झाले. वेळही अशी की जेवणाचा प्रश्नच नाही.
अगदी अलीकडे पाहण्यात आलेले आणखी एक उदाहरण ग्रामीण भागातले. साखरपुड्याच्या निमित्ताने मुलीच्या गावी गेल्यावर नवर्या मुलाच्या वडलांनीच मुलीच्या वडलांना विचारले की साखरपुड्याबरोबरच लग्नही लावले तर त्यांची हरकत असेल काय? मुलींच्या वडलांना प्रथम धक्का बसला. मुलाचे वडील म्हणाले की लग्नाच्या निमित्ताने जेवणावळी झडणार, उगाचच त्यावर अफाट खर्च होणार. त्याची अजिबात गरज नाही. ग्रामीण भागातील लग्नांची ज्यांना माहिती आहे, त्यांना याचे महत्त्व कळावे. मुलीचे वडील या धक्क्यातून बाहेर पडतायत तोपर्यंत लग्नाची तयारी सुरूदेखील झाली आणि तासाभरात तेथे जमलेल्या मोजक्या मंडळींकडून अक्षता टाकून लग्न लागलेदेखील.
वरील दोन उदाहरणे आणि आजची बातमी. संपत्तीच्या विकृत दर्शनाने शिसारी आणणारी.
या समारंभाला काही आमदार व खासदारदेखील हजर राहिले असल्याची बातमी आहे. आता यापुढे हे लोक विधानसभेत किंवा संसदेत दुष्काळाचा द जरी उच्चारतील, तर त्यांच्या तोंडात शेण घाला. लग्न दुसर्याचे, खर्च करणारे तेच, आम्ही केवळ हजर राहिलो तर बिघडले कोठे असा बचाव ते नक्कीच करतील.
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे म्हणाल्या की हुंडा मागण्याप्रमाणे हुंडा देणे हादेखील दखलपात्र गुन्हा आहे. शिवाय संपत्तीच्या अशा ओंगळवाण्या प्रदर्शनामुळे इतरांच्या अपेक्षाही वाढतात व त्यातून हुंड्याशी संबंधित गुन्हेगारी वाढते, त्यामुळे कोणीही कितीही धनवान असले तरी त्यांनी असे ओंगळवाणे प्रदर्शन करू नये असे त्या म्हणाल्या.
या दळभद्री लोकांना आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव असण्याचे कारणही नाही.
हा निव्वळ खर्च नव्हे.
हा निव्वळ खर्च नव्हे. हुंड्याच्या प्रथेला उत्तेजन देणे, असे अनेक पैलू याला आहेत. या सर्व भेटी त्यांना खासगीतही देता अाल्या असत्या. त्याची जाहिरात करणे याचे काय कारण असावे? औक्षण करणा-या कोणाला तरी अक्टिव्हा स्कूटर, कित्येकांना सोन्याच्या अंगठ्या अशा अनेक बातम्या येताहेत.
मला ज्यांची ऐपत आहे त्यांनी
मला ज्यांची ऐपत आहे त्यांनी वाजत गाजत बराच खर्च करून लग्न करणे गैर वाटत नाही, फक्त अन्नाची नासाडी करू नये (किमान अश्य हॉल्सने कंपोस्ट प्रकल्प राबवावेत ;) )
कारण त्यानिमित्ताने त्या संपत्तीचे विभाजन होते, अनेकांना रोजगार मिळतो, अर्थव्यवस्था हलत रहाते. प्रत्येकाने आपला पैसा असा खर्च करायचा नाही म्हटले तर अनेक कामगार, व्यावसायिकांना पोटे भरणे कठीण होईल
===
अर्थात ज्यांची ऐपत नाही त्यांनी मात्र साधेपणाने- कर्ज वगैरे न काढता - जमेल तसे लग्न करावे.
बातमी आवडली नाही
ज्यांना खर्च करायचाय त्यांनी स्वतःच्या पैशातून जावयाला विमान दिले तरी आपण बोलणारे कोण?. मात्र लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात ज्या पद्धतीची जाहिरातवजा बातमी आली ती अजिबात आवडली नाही.
चिंचवड परिसरातील एक बडे घराणे आणि मावळातील एका दिलदार व हौशी इसमाचे तालेवार घराणे यांच्यात नातेसंबंध जोडणारा हा विवाह सोहळा महामार्गालगतच्या एका प्रशस्त मंगल कार्यालयात पार पडला. पै-पाहुण्यांची मोठी उपस्थिती असलेल्या या सोहळ्यासाठी दूरदूरवरून नातेवाईक आले होते. येथील प्रथेप्रमाणे तास-दीड तास उशिराने विवाह लागला. आमदार-खासदार व परिसरातील दिग्गज मंडळींची या वेळी आवर्जून उपस्थिती होती. जावई सन्मान म्हणून इतर सोपस्कार पार पडलेच, शिवाय जावयास एक ऑडी देण्यात आली. अन्य एका जावयास फॉर्च्युनर देण्यात आली. भावकीतील इतर जावयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १२ बुलेट देण्यात आल्या. इतर पाहुणे मंडळींचा असाच तोलामोलात मान-सन्मान करण्यात आला -
http://www.loksatta.com/pune-news/audi-honor-bullet-wedding-1175243/#st…
तोलामोलात सन्मान करण्याचे मोजमाप कोणते? तालेवार घराण्यातील इसमाची दिलदारी आणि हौस कशी मोजली याबाबतही लोकसत्ताच्या अग्रलेखात गिरीश कुबेरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
मला ज्यांची ऐपत आहे त्यांनी
मला ज्यांची ऐपत आहे त्यांनी वाजत गाजत बराच खर्च करून लग्न करणे गैर वाटत नाही
कारण त्यानिमित्ताने त्या संपत्तीचे विभाजन होते, अनेकांना रोजगार मिळतो, अर्थव्यवस्था हलत रहाते. प्रत्येकाने आपला पैसा असा खर्च करायचा नाही म्हटले तर अनेक कामगार, व्यावसायिकांना पोटे भरणे कठीण होईल
ज्यांची ऐपत नाही त्यांनी कर्ज मिळत असल्यास कर्ज काढूनही लग्न करण्यात गैर नाही. कर्ज फेडता आले नाही तर दिवाळखोरी जाहीर करावी लागते. जर सगळ्यांनी कर्ज न काढता लग्न केले तर दिवाळखोरी कोणीच जाहीर करू शकणार नाही. मग Bankruptcy advisers, loan recovery agents यांची पोटं कशी भरणार ??
हॉस्पिटल (वगैरे) रुग्णांच्या
हॉस्पिटल (वगैरे) रुग्णांच्या सेवेसाठी नसून डॉक्टर आणी नर्स यांचे पोट भरण्यासाठी असतात असा सोशालिस्टांचा समज असतो म्हणून.....
शाळा कॉलेज (वगैरे) विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नसून शिक्षक आणि शिपाई यांचे पोट भरण्यासाठी असतात असा सोशालिस्टांचा समज असतो म्हणून.....
वगैरे वगैरे
सिलेक्टीव्ह कायद्यांची सिलेक्टिव्ह अंमलबजावणी आणि आपण
सिलेक्टीव्ह कायद्यांची सिलेक्टिव्ह अंमलबजावणी आणि आपण
.
सगळेच कायदे हे अंमलबजावणीसाठी नसतात हे आपण रोजच्या जीवनात पाहतो.
हेल्मेटसक्तीचा कायदा आहे. त्याची दिल्लीत, मुंबईत अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसते. पण पुण्यात मात्र ‘डोके आमचे आहे, हेल्मेटची जबरदस्ती करणारे तुम्ही कोण’ असा बाणेदार प्रश्न केला जातो. शिवाय कोणा पोलिस आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त करायचा अवकाश, की पुणेकर चक्क आंदोलनाचा पवित्रा घेतात आणि वर आयुक्तांचीच बदली करण्याची मागणी करतात. शिवाय कोणतीही हेल्मेट कंपनी ही कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या – मंत्र्याच्या जवळची असतेच. तेव्हा त्यांची धन करण्यासाठीच ही सक्ती होत आहे असा आरोपही करतात. आणि मग थोडे दिवस मोर्चेबाजी झाली की कोणी आमदार महोदय वा मंत्री ‘यशस्वी’ मध्यस्थी करतात व हेल्मेट दुकानांमधल्या शेल्फमध्येच राहतात. तेव्हा कायद्याची अंमलबजावणी न करणारे हे लोक शिक्षेसाठी पात्र होत नाहीत का?
बरे हा झाला वैयक्तिक पातळीवरचा कायदा. तो पाळला नाही तर त्या व्यक्तीपुरतेच (त्याच्या कुटुंबावर होणा-या परिणामाकडे दुर्लक्ष केले तर) नुकसान.
दुसरी उदाहरणे म्हणजे धुम्रपानाविरूद्धचा कायदा. सर्रास भर रस्त्यावर फुंकणारे लोक दिसतात. पोलिस त्यांना हटकतही नाहीत. कारवाई तर दूरच राहिली. रात्री दहानंतर कर्णे न लावण्याचा कायदा/नियम. दिवाळीच्या दिवसांमध्ये रात्री एक-दोन वाजेपर्यंत प्रचंड आवाजांचे फटाके वाजवले जातात. हे कायदे असे आहेत की त्यांच्या उल्लंघनामुळे इतरांना त्रास होऊ शकतो, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
खून, दरोडे याबाबतीतल्या कायद्यामंध्येदेखील दुर्लक्ष केले जाते. पण ते भ्रष्टाचारामुळे, राजकीय दबावामुळे. ही उदाहरणे गुन्ह्याचे स्वरूप पाहता दुस-या टोकाची.
तर प्रश्न असा आहे की उद्या एखाद्या गुन्हेगाराने वर उल्लेख केलेल्यापैकी किंवा इतर काही गंभीर गुन्हा केला आणि त्याने न्यायालयात आव्हान दिले की सरकार अमुक कायद्यांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करते, तर त्याने गुन्हा केलेल्या कायद्याच्याबाबतीतच अंमलबजावणी का करू पाहते आहे? यावर न्यायालय काय भूमिका घेऊ शकते? त्या गुन्हेगाराला सोडून दिले जाईल असे माझे म्हणणे नाही. पण कोणत्या कायद्यांची अंमलबजावणी करायची आणि कोणत्या नाही, याबाबतीतले अधिकार सरकार किंवा पोलिसांसारख्या यंत्रणांकडे असतात का?
वर उल्लेख केलेल्याव्यतिरिक्त अंमलबजावणी केली न जाणा-या कायद्यांची यादी करायची झाली तर भली मोठी होईल. सार्वजनिक जाहिरातींमधली डिसेन्सी, विशेषत: स्त्रियांच्या देहप्रदर्शनाशी संबंधित; हा आणखी एक प्रकार.
तेव्हा अनेकवेळा अमुकअमुक कायदा फक्त कागदावरच राहिलेला आहे असे आपण नेहमी ऐकतो. मात्र त्याबद्दल असा विचार करत नाही. हतबलतेपोटी म्हणा, कदाचित त्याच्याशी आपला काही संबंध येत नाही म्हणून म्हणा किंवा आणखी काही कारणांनी.
तर याबाबतची नक्की स्थिती काय आहे याबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शन करतील काय? कदाचित त्यातून कागदावरच्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काहीतरी निष्पन्न होऊ शकेल.
दुसरी उदाहरणे म्हणजे
दुसरी उदाहरणे म्हणजे धुम्रपानाविरूद्धचा कायदा. सर्रास भर रस्त्यावर फुंकणारे लोक दिसतात.
Prohibition of Smoking in Public Places Rules, 2008 च्या माझ्या आकलनानुसार भर रस्त्यावर फुकायला कोणाच्या बापाची भीती नाही.
तुम्हाला काय वाटतं राकु?
रूल्स इथे वाचायला मिळतील. -->
http://karhfw.gov.in/PDF/GazofIndia%20-%20part%20II%20-%20Sec%203%20-%2…
आदूबाळ,अशा पोस्ट्सचे वेगळे
आदूबाळ,
अशा पोस्ट्सचे वेगळे अस्तित्व न ठेवता संपादकमंडळ त्या दुसरीकडे हलवत आहेत. माझ्या द्ृष्टीने मी हा मुद्दा मांडला म्हणून नव्हे तर तो खरोखरच महत्त्वाचा असल्यामुळे त्यावर सांगोपांग चर्चा होणे गरजेचे आहे. मी ही पोस्ट टाकताना भलतीकडे न टाकता चर्चाविषय याखालीच टाकली होती. तरीही ती अशी हलवली गेलेली आहे.
पोस्ट्स अशा पद्धतीने हलवू नये म्हणून मी संपादकमंडळाला अनेकदा विनंती केली होती. परंतु माझे लेखन हलक्या प्रतीचे फार विचार न करता केलेले (त्यांचा शब्द 'खरडलेले') दिसले की ते हलवले जाईल असे मला कळवलेले गेलेले आहे. ही एक प्रकारची सेंसरशिपच आहे. तुम्हाला हवे तर मासिकाच्या संपादकांसारखे तुम्ही नको ते लेख स्विकारू नका, पण एकदा स्विकारल्यानंतर ते असे हलवू नका अशी सूचनावजा विनंतीही मी केली होती. ते एकीकडे म्हणतात की पोस्टची प्रतवारी करण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत आणि दुसरीकडे हे असे चालू आहे.
काय करायचे हा त्यांचा हक्क आहे. मी लिहिणे बंद करण्याखेरीज त्याबाबतीत काही करू शकत नाही. मात्र अशा पद्धतीने हलवलेल्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया न पाहण्याचे मी माझ्यापुरते ठरवलेले आहे. तेव्हा तुम्ही अशा पोस्ट्सवर प्रतिक्रिया देण्याच्या फंदात पडू नका अशी तुम्हाला विनंती आहे. उगाच तुमचा वेळ वाया जायला नको.
अर्थात वाचक म्हणून तुम्हाला एखादी पोस्ट हलवलेली आहे की कसे हे कळते का हे मला माहित नाही. ही पंचाइत मात्र आहे.
क्षमस्व.
तुमच्या कमेंटवर आतापुरते सांगतो. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याबद्दल लोकांना हटकताना मी पोलिसांना पाहिले आहे.
ता.क. बाकी माझे लेखन म्हणजे काहीतरी खरडलेले असते या संपादकमंडळींच्या मताशी तुम्हीही सहमत असू सकता याची मला कल्पना आहे.
आदूबाळ, अशा ... पंचाइत मात्र
आदूबाळ, अशा ... पंचाइत मात्र आहे.
ते त्येनला सांगा - ते फोलिस आहेत.
सांगोपांग चर्चाच करायची असेल तर ती वेगळ्या धाग्यावर काय किंवा इथे काय - दोन्हीकडे होऊ शकते. बांगड्याच फोडायच्या असतील तर त्या धागा हलवला म्हणून काय किंवा चर्चा होत नाही म्हणून काय - दोन्ही कारणाने फोडता येतील.
माझ्या कमेंटबद्दल - तुमचा धागा कायद्यांची अंमलबजावणी का होत नाही हा प्रश्न विचारत होता. मला वाटलं त्यासाठी तुम्हाला कायदा काय आहे ते ठाऊक असावं, म्हणून त्यासंबंधी प्रश्न विचारला. "मी अबक करताना पोलिसांना पाहिलं आहे" हे माझ्या दृष्टीने पुरेसा अभ्यास असल्याचं द्योतक नव्हे.
बाकी तुमच्या लेखनाबद्दल काय बोलावं? मी अगोदर कधीतरी म्हटल्याप्रमाणे - तुम्ही एक नंबर आहात.
The infinite monkey theorem
The infinite monkey theorem states that a monkey hitting keys at random on a typewriter keyboard for an infinite amount of time will almost surely type a given text, such as the complete works of William Shakespeare.
आंतरजालाच्या विशेषतः सोशल मीडियाच्या उगमानंतर शेक्सपीअरचे साहित्य निर्माण झाले आहे का?
इतकंही रँडम टाईप करत नाहीत
इतकंही रँडम टाईप करत नाहीत सोमिवर.
रँडम म्हणजे maolldnsyn snsvbatwn wyhsgsuep;ans'djsgs sujsabausna auaanaisnsl sziks aiksbsusbnanaoa;snshauy
असं. पण त्यातही अक्षर ओळख असलेल्या, थोडंफार कीबोर्ड वापरलेल्या माणसाला १००% रँडम टाईप करणे शक्य नाही असे वाटते.
रँडम टाईप करूनही १०० वर्षे सुद्धा कमी काळ आहे शेक्सपियरचे साहित्य निर्माण व्हायला.
शेक्सपीअरचे साहित्यावर काय
शेक्सपीअरचे साहित्यावर काय कमी टीका झाली आहे का?
फेसबुक हाताला लागले म्हणून आमच्यासारखे कागदाला पेन टेकवणारे ( लेखक हा फार मोठा शब्द आहे ) काही लिहू लागले दोन चार ओळी.खरी आमची जागा " छान लेखन" वगैरे प्रतिसाद देणे अथवा खरडफळ्यावरच्या गिरगोट्या मारण्यासाठी.
भारतातल्या व्यापार उद्योगात
भारतातल्या व्यापार उद्योगात मालकाच्या मुलांना वारसाने वाटा मिळतो आणि पुढे त्यांची वारसदारांची भांडणे वगैरे होतात.परदेशात ते buy in प्रकरण काय आहे?वडिलधाय्रांनी विल/मृत्युपत्र/इच्छापत्रातून नाव घातलेतरच वाटा मिळतो का ? अथवा त्यांनी वेगळे पैसे कमावून तिह्राइतासारखा वाटा विकत घ्यायचा?
रिक्षा
मी अशी गोष्ट ऐकलीये की -
इन्फोसिसमधे लागलेल्या नव्या कोर्या पोरांचा रोज म्हैसूरूला जाण्यायेण्यात बराच वेळ जायचा. मग त्यांनी काँट्री काढून एक रिक्षाच घेतली आणि त्याने ये-जा करू लागले.
रिक्शा विकत घेता येते का? भाड्यावर चालवायला/किंवा प्रवासी वाहतूकीसाठी नव्हे, तर स्वतःसाठी एक वाहन म्हणून.
हो, येते ना. जुन्या पनवेलला
हो, येते ना. जुन्या पनवेलला भर मध्यवस्तीत राहणाऱ्या एका नातेवाईकाने घेतली होती. तिथे जो राडा असतो त्यातून वाट काढायला रिक्षाच बरी असा त्याचा हिशोब होता.
एकदा मुंबईला जाताना कल्याणजवळ काहीतरी झालं म्हणून सिंहगड एक्स्प्रेस कर्जतलाच थांबवली आणि रद्द केली. तेव्हा हे मामाजी खुद्द रिक्षा घेऊन आमच्या रेस्क्यूला आले होते.
हट यार
"जेव्हा आपल्याला एक आयदिया सुचते; तेव्हा ती आपल्यापूरर्वी पन्नास जणांना सुचलेली असते.
जेव्हा आपल्याला एखादी मुलगी आवडते; तेव्हा आपल्या आधी ती पन्नास लोकांना ती आवडलेली असते.
"
हा सुविचार आठवला.
माझ्या डोक्यात ही कल्पना फार फार पूर्वीपासून आहे.
दुचाकी झेपत नै (लांब अंतर अन् चालवाय्चा कंटाळा) आणि चारचाकी परवडत नै; अशी अवस्था असल्यानं आता लवकरच तीनचाकी तरी घ्यायचा माझा विचार आहे; असं मी नेहमी म्हणे. पब्लिक सगळं आधीच करुन बसतय. :(
असो. एका अर्थी चांगलच आहे. काही गायडन्स तरी मिळेल.
आदुबाबू +१
आदूबाबू +१
जळगावात असतांना ही वैयक्तिक वापराची गाडी आहे. कृपया थांबवू नये वगैरे लिहीलेली रिक्षा पाहील्याचे आठवते आहे.
लंकेत सत्यांशी टक्के रिक्शा पर्सनल व्हेइकल म्ह्णून वापरल्या जाते. (पाच मिनिटं तीस सेकंदाला व्हीडो फॉवड करा. खुद्द बजाज सांगताना दिसतील). पण राजीवबाबू आता पूर्ण रिक्शाच काढून टाकायच्या प्ल्यान मध्ये आहेत.
???
नि मग पूर्वी ते राजेलोक हत्तीवरून मिरवायचे, त्याचा काय पिकप असायचा म्हणे? नि अॅवरेज? ते काय फ्युएल-एफिशियण्ट वीहिकल१ होते, अशा समजुतीखाली वावरत होतात की काय? (एमिशन्स वगैरेची तर गोष्टच करत नाही.)
पण काय ऐट होती राव, काय डौल होता! मस्तपैकी उंचावर बसून, रस्त्यावरून जाणाऱ्या फडतूस पब्लिककडे खाली पाहात, ऐटीत हिंडायचे. आवाज होता कोणाचा त्यापुढे? (नि कोणी आवाज केलाच, तर त्याला तिथल्या तिथे चिरडण्याची सुविधा हे स्पेशल फीचरसुद्धा होते.)
शिवाय, त्या वरिजनल मॉडेल टी-प्रमाणेच हे मॉडेलदेखील एक्स्क्लूज़िवली एकाच रंगात उपलब्ध असे, हादेखील एक यूएसपी होता. (नाही म्हणायला, दुसऱ्या एका - पांढऱ्या - रंगात याची आवृत्ती काढून तिच्या मार्केटिंगचा प्रयत्न झाला, नाही असे नाही, परंतु तो सपशेल फसून ती आवृत्ती नुसती पडून राहू लागली, अत एव बंद पडली, नि एकाच रंगाची आवृत्ती मार्केटात उरली. तर ते एक असो.)
तर अशा या खानदानी, राजेशाही वाहनाची हवीहवीशी वाटणारी सर्व फीचरे एकत्रित करून यांत्रिक आवृत्तीत आणली आहेत, खास तुमच्यासाठी, या रोडरोलरमध्ये. एकदा अजमावून तर पाहा! बघा तुमचे 'न'वे वाहन आख्ख्या गावाच्या चर्चेचा विषय होते की नाही ते.२
असो. धन्यवाद.३
......................
तळटीपा:
१ 'आमच्या'त असाच उच्चार करतात.
२ 'हे मोठे ड्रम, हे मोठे, मोठाल्ले मोठाल्ले' इ.इ.
३ बोले तो, 'जो ले उस का भी भला, जो ना ले उस का भी भला'.
घोडा हा अपघात टाळण्याच्या
घोडा हा अपघात टाळण्याच्या दृष्टीने चांगला उपाय आहे. म्हणजे घोड्याच्या वर बसलेल्यास अक्कल कमी* असल्याने त्याने चुकीच्या पद्धतीने घोडा पुढे दामटण्याचा प्रयत्न केला तरी घोड्यास अक्कल असल्याने तो पुढे घुसत नाही. (दुचाकीस अक्कल नसल्याने तिला असा शहाणपणाचा निर्णय घेता येत नाही).
* कमी हा शब्द सौजन्य म्हणून वापरला आहे. दुचाकीवर किंवा घोड्यावर बसलेल्याला अक्कल असल्याचा कुठलाही संशय नाही.
उलटपक्षी...
...उंटावर फक्त शहाण्यांनीच बसावे, असा संकेत असल्याकारणाने, उंटाच्या अपघाताच्या बातम्या वर्तमानपत्रांतून अंंमळ अभावानेच छापून येतात.
(हत्ती झाला, घोडा झाला, आता उंटही झाला. कोणीतरी राजा१, वजीर आणि प्यादेही आणा रे!)
......................
तळटीप:
१ तसे म्हणायला वर राजा आम्हीच आणला खरा, पण तो वाहन म्हणून नव्हे. राजावर कोणीतरी चढल्याखेरीज तो उल्लेख फाऊल आहे.
सध्याच्या एम्प्लॉयरचा
सध्याच्या एम्प्लॉयरचा फिनान्शियल रिपोर्ट बारकाईने वाचतो. क्वार्ट्रली अर्निंग कॉल सभाही अटेन्ड करतो.
कारण मी नुसता एम्प्लोईच नव्हे तर शेअरहोल्डरदेखील आहे म्हणून.
प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयरचे असे रिपोर्ट वाचत नाही कारण सध्याचा एम्प्लॉयर हाच जगातला आमच्या लायनीतला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त देणारा एम्प्लॉयर असल्याने त्याने हाकलून काढेपर्यंत तरी आणिक दुसरा कोणी 'प्रॉस्पेक्टिव्ह' असा एम्प्लॉयर नाही!! :)
बाकी इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलियोमधल्या कंपन्यांचे फिनान्शियल रिपोर्ट्स/ अन्य अभ्यास करतोच करतो...
थोडसं अवांतर
ज्या कंपनीत आपण काम करतो त्या कंपनीत (वा त्या सेक्टरमध्ये) अतिरीक्त गुंतवणूक (कॉन्सन्ट्रेटेड सिंगल अॅसेट) करण्यात धोका हा असतो की कंपनी वा ते सेक्टर काही कारणात्सव डबघाईला आलं तर एकाच वेळी जॉब जाण्याची आणि गुंतवणूकही फसण्याची पाळी येते. (सामान्य एम्पलॉयी बद्धल नाही पण बर्याच टॉप मॅनेजमेंटच्या एम्पलॉयीमध्ये ही कॉन्सन्ट्रेटेड सिंगल अॅसेट दिसून येते) बर्याचवेळा आपण ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीत गुंतवणूक करण्यामागे जसे व्हॅलिड रिझन्स असतात (एम्पलॉयी स्टॉक ऑपशन्स, स्टॉक ऑफर, सॅलरी बेनेफीट्स) तसेच बिहेविअरल बायसेस पण असतात (खास करून गत कामगिरीवरून कंपनीच्या भविष्यातल्या कामगिरीचा अंदाज बांधण्यामुळे (नाईव्ह एक्स्ट्रापोलेशन्समुळे) आलेला ऑव्हरकॉन्फीडन्स बायस, अतिपरिचयामुळे आलेला अव्हेलेबिलीटी बायस). पण त्याचबरोबर बर्याचवेळा लिगल वा टॅक्स इम्लिकेशन्स मुळे अशी गुंतवणूक विकताही येत नाही. (बहुतेक युएस मध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सेबल आहे). त्यामुळे ही रिस्क कमी (हेज) करायला बरेच लोक इतर काही पर्याय (जसे डेरिव्हेटिव्ह्ज, स्वॉप्स इ.) वापरतात.
गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!
नऊ ग्रह आणि त्यांचे कुंडलीतील स्थान व त्यानुसार फलित याबद्दल सखोल ज्ञान ज्योतिष शास्त्रात उपलब्ध आहे. पण, त्या तुलनेत हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तीन गूढ आणि हटके गुणधर्म असलेल्या ग्रहांबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे असे वाटते. तसेच, त्यांच्या कारकत्वा बद्दल सुद्धा ज्योतिष्यां मध्ये संभ्रम आढळतो. कुणी जाणकार ज्याने या तीन ग्रहांच्या गुणधर्माचा, कारकत्वाचा आणि स्थान निहाय फळाचा बारकाईने अभ्यास केला आहे, त्याने येथे आपले ज्ञान येथे वाटावे. फल ज्योतिष अभ्यासक मंडळीना त्याचा नक्की ज्ञान वाढवण्यास उपयोग होईल. नेपच्यून हा अंतरस्फुर्ती आणि स्वप्नांद्वारे दृष्टांत देणारा ग्रह आहे का? तो प्रथम स्थानात असेल तर काय? वगैरे असे अनेक प्रश्न मनात आहेत.गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!
नेप्च्युन प्रथम घरात असलेली
नेप्च्युन प्रथम घरात असलेली एक व्यक्ती माहीत आहे. तद्दन खोटारडेपणा अंगात इतका म्हणून भिनला आहे. डि-से-प्श-न!!!
___
प्लुटो -
http://theastrologyplacemembership.com/2015/01/plutos-trauma-introducti…
इतर ग्रहांना वाटून उरलेली
इतर ग्रहांना वाटून उरलेली कार्यकत्वे या तीन ग्रहांवर टाकून पहा हे सुचवू शकतो.शिवाय फार हळू फिरणारे असल्याने राशिंना महत्त्व न देता स्थान, पोर्णिमेच्या पुढेमागे एक दिवस चंद्राजवळ असल्यास काही प्रभाव टाकतील असं वाटतं.
समलैंगिकता हा नवा विषय /मॅाडन आर्ट/पोरनोग्राफी हे विषय नेपच्युनला देता येतील असं वाटतं.
समाजातला दुर्लक्षित ( यांची काही कमतरता नाहीयै) अचानक लक्षवेधी होऊन पुन्हा दुर्लक्षित हे प्लुटोला देता येईल?
आत्मघातकी कारवाया हर्षलला?
फेसबुकवर कोण्या अतिहुशार
फेसबुकवर कोण्या अतिहुशार माणसाच्या भाषणाचं का कसलंतरी पोस्ट फिरतंय. म्हणे, एखाद्या ब्राह्मणाने आत्महत्या केली तर आपण म्हणतो का की ब्राह्मणाने आत्महत्या केली? कोणा क्षत्रियाने आत्महत्या केली तर आपण म्हणतो का की क्षत्रियाने आत्महत्या केली? मग अशावेळीच का सगळे "दलिताने आत्महत्या केली" म्हणून गळे काढतात?
मला त्याचं लॉजिक पटलं. कमीतकमी दोन-अडीचहजार वर्षे या देशात या देशात जातिव्यवस्था आहे. शूद्र समजल्या गेलेल्या जातींतल्या लोकांचे अनन्वित हाल झाले हे सगळ्यांना माहित आहे. आरक्षण मिळाल्यापासून सवर्णांना यांचा अधिक विशेष राग आलेला आहे हेही सगळ्यांना माहित आहे. इतिहास माहित असूनही असा राग येतो म्हणजे परिस्थिती केवळ वरवर बदलली असून संधी मिळताच हे लोक पुन्हा त्रास द्यायला सुरु करतात हेही सगळ्यांना माहित आहे. अशा परिस्थितीत दलिताने आत्महत्या केली तर चर्चा कशी काय होते? चर्चा तर त्यांच्या आत्महत्यांची व्हायला पाहिजे ज्यांना असा काही त्रास नाही. ब्राह्मणाने आत्महत्या केली तर राष्ट्रीय पातळीवर बातमी व्हायला पाहिजे खरं म्हणजे. दलिताने आत्महत्या केली तर त्यात बातमी कसली?
मूळ पोस्ट वकुबानुसारच.
पण पुढचं स्पष्टीकरण अतिशय मार्मिक आहे.
काल हे वाचलं -
In Practice, How Does India’s Caste System Work In The 21st Century?
थोडा व्हाईट कॉलर परस्पेक्टिव
अगदी ड्रायवर, कामवाली वगैरे सोडून द्या. रुढ अर्थाने पांढरपेशे झालेले दलितही भेदभाव टाळण्यासाठी जात लपवण्याचा कसोशीने प्रयत्न करतातच.
http://www.ndtv.com/blog/why-today-is-the-day-i-am-coming-out-dalit-126…
ओळख.
काही धार्मिक पोथ्यापुस्तकांचे वाचन करताना एक गोष्ट लक्षात आली होती की बहुतेक ठिकाणी वैश्य आणि शूद्रांचे उल्लेख असले की ते एक मोळीविक्या, एक लाकूडतोड्या, एक रजक, एक शेतकरी असे मोघम आणि जात/धंदेवाचक असतात. उलट ब्राह्मणाचा उल्लेख मात्र अमुक मातापिता, अमुक गोत्र, अमुकशर्मा असा साग्रसंगीत असतो. राजाचे नाव कधीकधी नसले तर किमान अमुक देशाचा राजा इतके तरी असते. कदाचित मूळ पुराणांमध्ये नावे असतीलही, पण पुढे या कथांचा प्रसार होताना सामान्य लोकांना नावांची गरज वाटली नसावी.
कथांतले ब्राह्मण जरी गरीबबिचारे असले तरी त्यांना मातापितागोत्रप्रवरदेश वगैरेनिशी एक ओळख असते. बाकीचे तर गरीबबिचारेही आणि शिवाय स्वतःच्या ओळखीचीही गरज नसलेले.
राजेश कुलकर्णी आणि ऐसी
राजेश कुलकर्णी आणि ऐसी प्रशासनात जी रस्सीखेच चालू आहे त्यासंबंधाने मनात आलेले विचार.
राजेश कुलकर्णी यांचा आजचा धागा वाचनमात्र करण्यात आलेला आहे. त्या धाग्यात त्यांनी तीन-चार विषय मांडले आहेत. त्यापैकी काही मनातले विचार/प्रश्न या सदरात घालता आले असते. परंतु शनीच्या विषयी लिहिलेला विचार हा स्वतंत्र लेख म्हणून चालू शकतो. त्यामुळे धागा वाचनमात्र करण्याचे कारण नव्हते असे वाटते.
राजेश कुलकर्णी स्वतःच्या लेखनाला फुसके बार का म्हणतात कळत नाही. आजच्या धाग्यातले पॉईंट विखरून लिहिले असते तर ऐसी प्रशासनाला अडचण वाटली नसती. म्हणजे लिक्विड बायोप्सीचा पॉईंट छोटे प्रश्न किंवा ही बातमी समजली का या सदरांत घातले असते आणि शनीचा पॉइंट वेगळा धागा म्हणून काढला असता तर बरे झाले असते.
अर्थात लेखकाला जसे वाटेल तसे वर्गीकरण करणे हेही अयोग्य म्हणता येणार नाही.
ऐसी प्रशासनाचे मात्र वेगवेगळे विषय एकाच धाग्यात नसावेत (ते अगदी फुटकळ असतील तर) असे म्हणणे दिसते आहे.
या तिढ्यातून कसे सुटावे?
तिढ्याचा निकाल न लागल्याने राजेश कुलकर्णी ऐसी सोडून गेले तर त्यांच्या चौफेर मुद्द्यांना आम्ही ऐसीकर मुकू अशी भिती वाटते.
तिढ्याचा निकाल न लागल्याने
तिढ्याचा निकाल न लागल्याने राजेश कुलकर्णी ऐसी सोडून गेले तर त्यांच्या चौफेर मुद्द्यांना आम्ही ऐसीकर मुकू अशी भिती वाटते.
सहमत आहे. फक्त राकु धाग्यातून कमावतात ते प्रतिसादातून घालवतात. असल्या तिरसटाशी कोणताही संवाद साधायला मन घेत नाही.
-----
म्हणौनी थोरपण पहा सोडिजे |
येथ व्युत्पती अवघी विसरिजे ||
जै जगा राकुटे होईजे |
तै जवळीक माझी ||
याचा वेगळा धागा झालाच पाहिजे!
याचा वेगळा धागा झालाच पाहिजे! आम्हालाही रोज टायपायचं असतं. दिवसभरात इतके विचार येतात ते सगळे वाया जातात. इतके दिवस नियम पाळून मूर्ख ठरल्याची भावना आली आहे. नवे धागे काढल्याने काही फरक पडत नाही. उलट बोर्ड हलता राहतो. जुने धागे पटापट गडप व्हायला मदत होते.
आदूबाळ आणि नगरीनिरंजन यांच्या
आदूबाळ आणि नगरीनिरंजन यांच्या प्रतिसादानंतर फार जास्त लिहिण्याची गरज नाही.
लिक्विड बायोप्सी याबद्दल मला काहीही माहिती नव्हती; गरज पडली नव्हती आणि मला या विषयात फार रसही नाही. फक्त विषय निघाला म्हणून गूगल केलं तर बरीच माहिती समोर आली. त्यातली काही वाचून, भाषांतर, संकलन करून कोणी धागा काढला असता तर मी तो हौसेने वाचलाही असता. पण दोन कीवर्ड्स टाकून 'लिहा आता निबंध' छाप धाग्यांचा/लेखनाचा मला वीट आलाय. फेसबुकावर असलं लेखन दिसतं ते कमी आहे का, की इथेही चार-चारोळी धागे एकत्र काढून काही नवीन (किंवा 'हिला के रख दूंगा') लिहिल्याचा आव आणावा!
ऐसीवर फार पूर्वीपासूनच
ऐसीवर फार पूर्वीपासूनच लहानसहान धाग्यांनी मुख्य बोर्ड भरून जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. 'कालच मी हे गाणं ऐकलं, आणि अहाहा, काय छान वाटलं!' यासारख्या फेसबुकी अपडेटीचा एक लेख होऊ नये अशी त्यामागची इच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या लिखाणासाठी 'सध्या काय ऐकताय', 'ही बातमी समजली का' यासारखे सातत्याने चालू राहाणारे धागे उघडलेले आहेत. बहुतांश सदस्यांना हे सोयीचं वाटतं, आणि त्यामुळेच 'ही बातमी समजली का' किंवा 'मनात येणारे छोटेमोठे प्रश्न व विचार' या धाग्यांचे ५० हून अधिक भाग चालू आहेत. कधीकधी यांमध्ये काही उत्तम चर्चा होते, ती वेगळी काढून अर्थातच स्वतंत्र धागा बनवला जातो.
त्या धाग्यात त्यांनी तीन-चार विषय मांडले आहेत. त्यापैकी काही मनातले विचार/प्रश्न या सदरात घालता आले असते. परंतु शनीच्या विषयी लिहिलेला विचार हा स्वतंत्र लेख म्हणून चालू शकतो.
बरोबर. ऐसीची ही व्यवस्था आहे. ती पाळण्याबद्दल वारंवार राजेश कुलकर्णींना सूचना केलेली आहे. पण त्यांना आपल्या लिखाणावर प्रक्रिया करून तुम्ही वर म्हटलं आहे तसं वितरण करून लिहिण्याची तयारी नाही. असं वितरण करण्याची गरज हा त्यांना आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला वाटतो. त्यांनी व्यवस्थापनाच्या या मागणीला सेन्सॉरशिप असं म्हटलेलं आहे.
छान कल्पना
रोचक कल्पना.
माझ्याकडे सोलर वॉटर हीटर आहे. असे काही शक्य असल्यास करून बघता येईल.