CTRL + C, CTRL + V

CTRL + C, CTRL + V

कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट
करत राहणाऱ्या आपल्या
बोटांना , मनाला , शरीराला
कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट
ची वाळवी लागून
बोटं आणि मन सडून -झाडून जाण्यापूर्वी
जवळच्या किंवा लांबच्या
समुद्र किनाऱ्यावर जावं

अथांग समुद्र किनाऱ्यावर आपला तुकडा
शोधून वाळू हातात घ्यावी
आणि बांधायला घ्यावा वाळूचा किल्ला

किल्ला छोटा की मोठा
सहज ठरवावं , किंवा ठरवू ही नये
होऊ द्यावा आपणहून
बनला तर छोटा , बनला तर मोठा
एकासारखा दुसरा बुरुज बनवता येतो का ते पाहावं
इथे कॉपी पेस्ट तंत्रज्ञान काम करीत नाही
आदिम व्हावं लागतं
रेतीचे सूक्ष्म ओले कोरडे चिखलाळलेले
कण बनून जावं लागतं

खालून वर जाण्यासाठी पायऱ्या बनवाव्यात
आता बनल्या पायऱ्या असं वाटून आनंदून जाऊ नये
कुठलीशी बारीक चूक होतेच
आणि निगुतीनं बनवत आलेल्या पायऱ्या
आपसूक कोसळतात
आवाज न करता

वाळूच्या किल्ल्याची कॉपी करता येत नाही
ते ऐतिहासिक , राजकीय दृष्टीने मह्त्वाचे नसतात
वाळूच्या किल्ल्याची आवर्जून दखल घेणारे शक्यतो
दोनच घटक , वारा आणि पाणी

खरा इतिहास लिहिणारे
खोटा इतिहास लिहिणारे
वाचणारे , अभ्यासणारे
कधी वाळूचे किल्ले बनवतात का ?
माहित नाही.

कणाकणा नं उभे राहून
कणाकणा नं विरघळून जातात पुन्हा वाळूचे किल्ले!!
विनातक्रार !!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

CTRL + X

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0