शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत

शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.

त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.

असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.

सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.

सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.

असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.

आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.

या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.

तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.

field_vote: 
3.166665
Your rating: None Average: 3.2 (6 votes)

प्रतिक्रिया

चांगली माहिती दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नवीनच माहिती आहे. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बराच तापदायक प्रकार दिसतोय.
इतर स्वसंरक्षणात्मक शस्त्रांच्या बाबतीत (म्हणजे कट्यार, बिचवा, इत्यादि) काय नियम आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सन्नाटे को चिरती हूइ सनसनी...........
सन्न कर देती है दिमाग को....
ध्यान से देखो यही है वो आदमी
राजेश कुलकर्णी
आखिर क्या मकसद है इसका जो ये बंदुक की बात कर रहा है
चैन से सोना है तो जाग जाओ
पहचानो इस शख्स को
क्या है इसका एमेरीकी कनेक्शन
क्या ये सी आय ए एजंट तो नही ?
कही आपके आस पास भी कोइ शख्स है जो बंदुक मे दिलचस्पी दिखाता है?
जागो ग्राहक जागो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

एकदम टिव्ही चालु झाला की काय वाटलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंडिया टीव्ही किंवा आजतकला हेडलाइन कोण लिहून देतात ते आज कळलं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वा वा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळ्या विषयावरील माहिती आवडली. अमेरिकेतील बंदुकांबाबत नेहमीच (अगदी भारतीय वर्तमानपत्रांतही) वाचायला मिळते. मात्र भारतातील कायद्यांबाबत काही कल्पना नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीनच माहीती मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही माहिती खोटी आहे, असे बर्‍याच जणांनी म्हटले आहे, याबद्दल धागा काढणार्‍याचे काय मत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खतरनाक प्रतिक्रिया ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१ ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निव्वळ थोर प्रतिक्रिया आहेत. मिसाइल काय, अणूबाँब काय...! थोर विनोदबुद्धी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही दुसरीकडचे उकीरडे फुंकायचे उद्योग का करत आहात ते आधी सांगा. बेअक्कल, टवाळखोर, बेजबाबदार, विषयांतर करणा-या, दुस-याच्या हेतुबद्दल शंका घेणा-यांना तेथेही आपल्या पोस्टवर कमेंट करण्यापासून ब्लॉक करता येत नाही वा अशा कमेंट्स काढून टाकता येत नाहीत. तशीच स्थिती येथेही आहे. (तिथल्या संपादकांना अनेक वेळा विनंती करूनदेखील याबाबत काही केले जात नाही.) मात्र या वास्तवाचा गैरफायदा कोणी घेऊ नये असे वाटते.
मुर्खांच्या नादी मी लागत नाही हे सांगतो. असा मुर्खांवर वाया घालवण्याइतका वेळ माझ्याकडे नाही. ऐसी अक्षरेचाही उकिरडा करयाचा का ते तुम्ही ठरवा. मी तरी दुर्लक्षच करेन
एवढे कळेल अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला माझ्याबद्दल बरीच माहिती आहे, असं दिसतंय. आपण भेटलोय का कधी उकिरडयावर? पण मी तिथे कुस्ती खेळत नाही.
तुमच्या प्रेमाच्या सल्ल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या कळत-नकळत तुम्ही ते केलेलेच आहे. तेव्हा आपण उकिरड्यावर भेतलोय का हा प्रश्न नाही. उकिरड्यातली घाण कोणी फेकली हे पाहताना तेथे कोण अाहे हे बाहेरूनही दिसते हेही तुम्हाला माहित नसावे. आता कोणते कोटेशन शोधता पाहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा आवरणे. एक विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येथे असे अाहे, तेथे तसे आहे, म्हणून येथे त्याबद्दल जाब विचारण्याचे नको ते उद्योग करण्याला याला शब्दश: उकिरडे फुंकणे हाच शब्दप्रयोग आहे. तुम्हाला कोणाचे उद्योग करणे पसंत आहे का ते स्पष्ट करा. अशी माहिती खोटी अाहे म्हणणा-यांच्या एक लक्षात येत नाही की प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. तरीही दुसरीकडच्यांचा खोडसाळपणा येथे आणण्याला दुसरे काय म्हणावे? तुम्ही असे लिहिले आहे, पण माझा अनुभव असा-असा अाहे हे सांगणे वेगळे आणि दिलेली माहिती खोटीच आहे हे म्हणणे वेगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेअक्कल, टवाळखोर, बेजबाबदार, विषयांतर करणा-या, दुस-याच्या हेतुबद्दल शंका घेणा-यांना तेथेही आपल्या पोस्टवर कमेंट करण्यापासून ब्लॉक करता येत नाही वा अशा कमेंट्स काढून टाकता येत नाहीत. तशीच स्थिती येथेही आहे.

ऐसी अक्षरेच्या वाचकांना बेअक्कल, टवाळखोर, बेजबाबदार वगैरे म्हणण्याबद्दल 'भाषा आवरा' हे सांगण्याबद्दल संपादकांना संपूर्ण पाठिंबा. जर संस्थळांवर कॉमेंट काढून टाकता येत नसेल, आणि कॉमेंट्स करणारांना ब्लॉक करता येत नसेल, तर तुम्ही तिथे का लिहिता असाही प्रश्न उपस्थित होतोच.

(वाचक) राजेश घासकडवी

भाषा आवरा. आणि इतर वाचकांनी लिहिलेल्या प्रतिसादांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अन्यथा उकीरडा कोण करतो आहे हे इतर वाचकांसाठी उघड होईल.

(संपादक) राजेश घासकडवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेच्या वाचकांना बेअक्कल, टवाळखोर, बेजबाबदार म्हटलेले नाही. सरसकट सर्वांना एकसारखे लेखण्याची माझी सवय नाही. दुसरीकडे अश लोकांनी केलेल्या पोस्ट्स पोस्टकर्त्याला डिलिट करता येत नाहीत वा अशा कमेंट करणा-यांना ब्लॉकही करता येत नाही अशी स्थिती आहे. येथेही तशी स्थिती आहे, असा उल्लेख आहे. तुम्हाला सोयीस्कर अर्थ तुम्ही लावलात हा तुमचा प्रश्न.
सदर कमेंटबद्दल बोलायचे तर खोडसाळ व सकारात्मक कमेंटमधील फरक दाखवलेलाच आहे. मला तरी खोडसाळपणा चालवून घेण्याचे काही कारण वाटत नाही. तुम्ही तुमचे पहा.
आजवर तुम्हाला इतर सदस्यांची एकही कमेंट आक्षेपार्ह वाटलेली दिसत नाही. उलट तुम्ही अशा सदस्यांनाच संपादकीय संरक्षण देता हेदेखील मी मागे काही वेळा दाखवलेले आहे. एवढेच नव्हे तर संपादक व संपादक मंडळाचे सदस्य स्वत:च या खोडसालपणात उघडपणे भर घालतात हेी मी सप्रमाण दाखवलेले आहे. तेव्हा आणखी काही लिहित नाही.
बाकी वाचक आणि संपादकीय हॅट्स वापरून वेगळ्या कमेंट करण्याची कल्पना धन्य आणि तेवढीच अर्थहीनही.
"जर संस्थळांवर कॉमेंट काढून टाकता येत नसेल, आणि कॉमेंट्स करणारांना ब्लॉक करता येत नसेल, तर तुम्ही तिथे का लिहिता असाही प्रश्न उपस्थित होतोच." हा खुद्द संपादकांचा प्रश्न तर अतिधन्य. हात टेकलेले आहेत असे डोळ्यासमोर आणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉमेंट्स करणारांना ब्लॉक करता येत नसेल

मला हा प्रकार करता येतो. सुरुवात तुमच्यापासून करता येईल. करायचं का?
जरा प्रेमाने बोला, ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आक्षेपांना लेखकाने योग्य ते उत्तर न दिल्याने काय धमाल होऊ शकते याचं उदाहरण दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

बाकी सर्वच प्रतिसाद भयंकर खंग्री आहेत. हसून हसून मुरकुंड्या वळल्या. पण इतकं होऊनही मुरकुंडया नक्की कुठे असतात हे कळलं नाही. पण तो मुुद्दा तसा गौण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला काही प्रश्न आहेत.

एक म्हणजे आपल्याकडची पिस्तूल दाखवून मुलींना इंप्रेस करता येतं का? मी गॅंग्ज ऑफ वासेपूर नावाच्या सिनेमात एक गाणं ऐकलं होतं. त्यात तसे उल्लेख होते म्हणून विचारतो आहे.

दुसरा म्हणजे संभाजी महाराजांच्या तलवारीचं वजन चाळीस किलो की साठ किलो होतं म्हणतात, तसं विशेष वजनदार पिस्तुलं बाळगणारांचा इतिहासात काही उल्लेख आहे का?

तिसरा म्हणजे पिस्तुल बाळगण्याने ते बाळगणारावर काही हल्ले वगैरे होतात का? तसं होत असेल तर कारणीभूत असलेलं हे कारण नाकारण्याचा अट्टाहास होतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिसरा म्हणजे पिस्तुल बाळगण्याने ते बाळगणारावर काही हल्ले वगैरे होतात का?

बंदूकीचं माहिती नाही पण 'अ‍ॅक्स' वापरणार्‍यावर होतात हल्ले म्हणे.

बंदूक वापरण्याच्या गाइडलाइन्स येऊ द्या गुरुजी. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी काय म्हणतो राकु, तुम्हीच एक नवीन संस्थळ काढा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

करू, तेही करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या पोस्टवर कमेंट करण्यापासून ब्लॉक करता येत नाही वा अशा कमेंट्स काढून टाकता येत नाहीत.

मला कोडिंग येत नाही हे मी अनेकदा मान्य केलेलं आहे. तुम्हीच का मदत करत नाही अशा प्रकारचा कोड लिहायला? गरज ही शोधाची जननी आहे. आत्तापर्यंत अनेक सूचना सदस्यांनी केल्या, पण माझ्याकडे तेवढी क्षमता नसल्यामुळे या सूचनांची अंमलबजावणी करता आली नाही. आणि झालंच तर नवीन खरड आल्याचं नोटीफिकेशन देण्याचा कोडही लिहून द्याल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेगळ्या विषयावरील माहिती आवडली. धन्यवाद
अमेरिकेतील बंदुकांबाबत नेहमीच वाचतो. मात्र भारतातील प्रक्रिया सगळी अपेक्षीत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0