Skip to main content

इतर भाषांतील साहित्य वाचण्याची गोडी लागण्यासाठी काय करावे ?

नमस्कार मंडळी,
मी मराठी साहित्याचे वाचन बरेच केले आहे. अजूनही करत आहे. अर्थात येथील वाचनसम्राटांच्या तुलनेत आम्ही मांडलिक राजेच म्हणा. सुरुवातीला घरापासून वाचनालय लांब असल्यामुळे आणि जास्तीत जास्त पैसे वसुल व्हावेत असा साधासरळ हिशेब असल्यामुळे मी जास्त पाने असलेले पुस्तकच घेत असे. यातुनच कादंबर्‍या वाचण्याची आवड वाढत गेली. कादंबर्‍या, कथा, संकीर्ण, प्रवासवर्णने, आत्मचरीत्र (चरीत्र नव्हे) अशा प्रकारच्या वाचनाची आवड जास्त प्रमाणात आहे.

कुठेतरी असेही वाचले की कादंबर्‍या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे.

वाचतांना बर्‍याचदा अनुवाद वाचण्यात येतात आणि मग कधीकधी मुळ लेखन वाचण्याची इच्छा होते पण ते तितक्यापुरतेच. तोंडी लावण्यापुरती हिंदी, इंग्रजी आणि गुजराती पुस्तके वाचली आहेत पण ती अगदी नगण्यच म्हणता येतील.

इथे विविध भाषांमधील साहित्य अभ्यासणारे विविध वाचक आहेत. तुम्हाला तुमच्या मुळ भाषेव्यतीरीक्त इतर भाषेतील वाचनाची आवड कशी निर्माण झाली याची माहिती मिळाल्यास मराठी व्यतीरिक्त इतर भाषांकडे वळता येईल का ? व कसे ? यासाठी मदत मिळेल असा विश्वास वाटतो.

धन्यवाद !

पिवळा डांबिस Thu, 14/01/2016 - 23:13

इतर भाषांतील साहित्य वाचण्याची गोडी लागण्यासाठी काय करावे ?

आधी ती भाषा आपल्याला वाचता येतेय का ते तपासावे! :)
पण सिरियसली,
जर भाषा वाचता येत असेल तर दणकून वाचायला सुरवात करावी, दुसरं काय?

.शुचि. Fri, 15/01/2016 - 05:27

In reply to by पिवळा डांबिस

आधी ती भाषा आपल्याला वाचता येतेय का ते तपासावे! (स्माईल)

=)) =))
___
सन्जोपरावांच्या भाषेत - उंडगं जनावर चरत सुटतं तसे दिसेल ते वाचत सुटावे.

चिमणराव Fri, 15/01/2016 - 07:02

पिवळा डांबिस याच्या वैधानिक इशाय्राकडे दुर्लक्ष करून त्यांना श्रेणी देण्याचा सुज्ञपणा ऐसीकर दाखवतात याचे कौतुक वाटते.
जी भाषा येते त्यातील वाचनीय पुस्तकांची /लेखकांची यादी माहितगारांकडून घ्यावी म्हणजे वेळ वाचतो.इंग्रजीसाठी नव्या पुस्तकांची परिक्षणं रविवार आवृत्तींत येत असतात.जुन्यांची नावं गुगल देतेच.

अनु राव Fri, 15/01/2016 - 13:42

इतर भाषांतील साहित्य वाचण्याची गोडी लागण्यासाठी काय करावे

गोडी वाटणे आतुनच येते. आणि गोडी वाटली तर प्रत्येक जण मार्ग शोधतोच. असे काहीतरी कृत्रीम करुन गोडी लागेल असे वाटत नाही.

मारवा Fri, 15/01/2016 - 14:31

In reply to by अनु राव

प्यार किया नही जाता.... हो जाता है..............
अस लावुन घेतल्याने गोडी कशी लागणार हो ?
आतुन येण्याशी सहमत तरीही विचारताच आहात तर एक उपाय आहे
परभाषेचा अभ्यास वाढवायचा असेल तर सर्वोत्त्म उपाय म्हणजे परभाषिक मुली
शी स्नेहसंबंध जुळवावा. म्हणजे उदात्त आंतरभारती हेतुने म्हणतोय....

आपोआप मग माणुस भाषा संस्कृतीच्या खोलात डुबकी घेऊ लागतो
विनासायास

नंदन Fri, 15/01/2016 - 14:07

१. उजव्या पानावर मूळ स्पॅनिश/फ्रेंच मजकूर आणि डावीकडे त्याचे इंग्रजी भाषांतर, अशी जोड-पुस्तकं हौस म्हणून भाषा शिकणार्‍या व्यक्तीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत.

२. अशी सोय भारतीय भाषांत आहे की नाही, याची कल्पना नाही - पण परिचयाच्या भाषेतली (उदा. हिंदी) आवडत्या विषयावरची/रंजक पुस्तकं जर प्रथम वाचायला घेतली, तर सरावाने त्या भाषेतल्या वाचनाची गोडी लागू शकेल.