गुप्त डायर्‍या आणि सापडलेले संकल्प

२०१६ मध्ये ऐसीकरांनी काय संकल्प केले ते या धाग्यावरती कृपया सविस्तर लिहावेत. तुमच्यापैकी काहीजणांच्या गुप्त डायर्‍या सापडल्याने मला त्यांच्यात्यांच्या संकल्पाची छुपी माहीती अगोदरच मिळाली आहे एवढेच नाही तर काहींच्या संकल्पाचा कसा बाजा वाजला आहे तेदेखील सप्रमाण सिद्ध झाले आहे.
.
(१) मनोबा - यावर्षी एक जरी प्रश्न विचारला तर नावाचा मनोबा नाही.
पण झाले उलटेच - मनोबा हा मुख्य प्रश्नकर्ताच रजेवर गेल्याने, "मनातील छोटे मोठे विचार्/प्रश्न" हे सदर पार ओस पडलं. चाणाक्ष ऐसीकरांच्या लक्षात आलं आणि दररोज मनोबाला खव/खफ/व्यनि मधून ऐसीकरच प्रश्न विचारुन, भंडावून सोडू लागले की "तू गप्प का? एकही प्रश्न विचारला नाहीस - तुझी तब्येत तर बरी आहे?" अशा रीतीने प्रश्नांची फैर मनोबावरच झाडली गेली व मनोबाला लोकाग्रहास्तव मनातील प्रश्नांना वाट करुन द्यावी लागली.
.
(२) अदिती - छे पुरुषांना बदडणं बास झालं आता थोडं स्त्रियांच्या दुटप्पीपणाबद्दल बोलू यात आणि यावर्षी पुरुषांच्या समस्यांना "रेड कार्पेट ट्रीटमेन्ट" देऊ यात.
पण झाले उलटेच - पुरुषांना इतक्या कौतुक, सन्मानाची सवय नसल्याने त्यांचा प्रथम विश्वास बसेना व शेवटी विश्वास बसल्यावरती ते सत्य पचेना. त्यामुळे स्वतःचे प्रश्न विसरुन कृतज्ञतेने तेच स्वतःचे प्रश्न विसरुन स्त्रियांच्या प्रश्नाकरता लढू लागले. अदिती एकटीच पुरुषांच्या बाजूने राहीली व कंटाळून ती परत स्त्रियांच्या गोटात आली.
.
(३) गब्बर - धनदांडग्यांचा कळवळा बास. यावर्षी "अंडरडॉग" अर्थात शेतकरी, मधयमवर्गीय यांच्याबद्दल चांगले, आशावादी, सपोर्टीव्ह बोलणार
झाले उलटेच - तेलाचे भाव कोसळल्याने, वॉलस्ट्रीट्/स्टॉक्स गडगडले. बँका, कंपन्या भीकेला लागल्या (व अंडरडॉग बनल्या)ज्यामुळे परत त्याच बँका/कंपन्यांबद्दल, गब्बरला चांगले बोलावे लागले.
.
(४) राकु - धागे प्रसविणे बास. यावर्षी अन्य लोकांचे धागे वाचणार.
झाले उलटेच - राकुंचे स्वतःचे धागे इतक्या प्रमाणात वर होते की बाकी सर्वच धागे पार खाली , पाताळात दडपले गेले होते. खोदकाम करुनही अन्य धागे परत वर येईनात, आले तर टिकेनात. राकुंना त्यांचा संकल्प मागे घ्यावा लागला.
.
(५) राघा - उत्क्रांती विषयावरती लिहीणारच नाही. यावेळेस अध्यात्माचा परिशोध (वा! वा! परि हा प्रिफिक्स लावल्याने शोध शब्द कसा भारदस्त झालाय) घेईन.
पण झाले उलटेच - राघांचे उत्क्रांतीचे धागे फक्त वाचूनच सर्वच्या सर्व ऐसीकरांनी अखिल मानवजातीच्या आधीच, स्वतः उत्क्रांतीचा पुढचा टप्पा गाठला होता. आणि या टप्प्यावर त्यांना विशेष करुन हे जाणवले की त्यांची बौद्धिक भूक कमालीची वाढली आहे आणि मग सर्वांनी राघांना विनंती केली की - विज्ञान-विज्ञान आणि फक्त विज्ञानावरच लिहा.
.
काही अजुन तरी बाजा न उडालेले संकल्प-
(६) अनुप ढेरे - यावर्षी खवचट/पिन-मारु कमेंटस टाकणार नाही
(७) शुचि - अध्यात्माची टेप लावून ऐसीकरांना पिळणार नाही
(८) आदूबाळ - यावर्षी २-३ लेखतरी टाकेन
(९) निमिष सोनार - जगात विजोड जोड्या कमी आहेत काय, की मी ज्योतिष+विज्ञान अशी विजोड जोडी घेऊन सुरस विज्ञानकथा लिहाव्यात? तेव्हा अशा कथा लिहीणार नाही
.
काही अनामिक डायर्‍यांची सुटी पानेही मिळाली ज्यात खालील संकल्प होते -
(१०) यावर्षी विषयाला धरुनच लिहीन, अवांतर करणार नाही .... शक्यतो!
(११) माझा संबंध नाही अशा विषयात थोबाड बंद ठेवेन
(१२) त्रागा करणार नाही
(१३) कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या सदस्यांना सळो की पळो करुन सोडणार नाही
(१४) I will choose someone own size
(१५) सरड्याच्या रंगासारखा क्षणाक्षणाला आय डी बदलणार नाही
(१६) टिंबटिंबांच्या रांगोळीने लेखाचे आकारमान आभासी फुगवणार नाही (डोळा मारत)
(१७) "थोडे तुमच्याविषयी" भागामध्ये स्वस्तुती करण्याचे टाळीन

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

(८) आदूबाळ - यावर्षी २-३ लेखतरी टाकेन

लोल. २-३ ख्याइशें "ऐसी"...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरं झालं १५ नंबरचा मुद्दा स्वतःच लिहिलात ते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हॅहॅहॅ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निमिष सोनार जिंदाबाद Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निमिष सोनार जिंदाबाद Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुश्श.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0