ग्रेसफुल एजिंग

"ममा - ग्रेसफुल एजिंग चा अर्थ काय?" माझ्या १६ वर्षीय मुलीकडून हा प्रश्न अनपेक्षित होता. पण प्रश्न विचारल्यावर माझ्या डोळ्यासमोर माझ्या एजिंगची एकदम फिल्लमच चमकून गेली. म्हणजे केस काळे करायचा केलेला आटापिटा आणि पार्लरमध्ये भरमसाठ पैसे देऊन, पर्स रिकामी करुन आल्यावर घरी आरशात बघताना दिसणारे पांढरेशुभ्र केस पाहून होणारी तणतण. आतापर्यंत केलेले "फक्त कॉटेज चीझ डाएटींग" कुठे "नो बटाटा आणि भात डाएटींग", "पानात घेतलेल्याच्या अर्धच खायचा केलेला निश्चय आणि तो पूर्ण करण्याच्या भरात मूळातच तिप्पट भरुन घेतलेली प्लेट" ......... अन या सर्व सव्यापसव्यानंतरही "वाढता वाढता वाढे , भेदिले शून्यमंडळ" जाडी. गालाला लावलेला ब्लश, ब्लश न सापडल्यास लावलेले लिप्स्टिक आणि पावसात सगळा मेक-अप ओघळून झालेला अवतार, फेसबुकवर टाकलेले थालपीठसम थोबाडाचे फोटो आणि अगदी फक्त कट्टर लॉयल (आणि स्वतः गुटगुटीत असलेल्या) मैत्रिणींकडून आलेले "वा!" , "सुंदर", "किती गोड" प्रतिसाद पाहून स्वतःचीच थोपटलेली पाठ. घातल्यानंतर १० मिनिटात उसवलेल्या टाइटस, स्लीव्हलेसमधून दिसणारे बलदंड बाहू, क्रो फीट लपविण्याकरता विकत घेतलेली माहागडी क्रीम्स..... अन बरच काही आठवलं.
.
पण हे सगळे सांगते कोणाला. मग मी मुलीला म्हटले ग्रेसफुल एजिंग म्हणजे बघ - अगदी सहजतेने स्वीकारलेली वार्धक्याची चाहूल. म्हणजे बघ बेटा तुला मी कधी व्यायाम करताना दिसते का? तर नाही कारण वयोमानानुसार माझं शरीराचा लवचिकपणा जाणार, मला तितकीशी धावपळ, ट्रेड्मिलवरची पळापळ अन वेट-लिफ्टिंग, फ्लोअर एक्झर्साइझ, अमकं टमकं जमत नाही - हे स्वीकारलेलं सत्य - यालाच म्हणतात ग्रेसफुल एजिंग.
.
पण ममा मला तर शाळेत टॅमी म्हणत होती की तिची आई म्हणते की - मेक अप न करणं, केस काळे न करणं, पांढरेच राहू देणं म्हणजे "ग्रेसफुल एजिंग. पण तू तर डाय करतेस. डझ दॅट मीन यु आर नॉट एजिंग ग्रेसफुली?" नाही म्हणायला, यावर मला थोडा विचार करावा लागला. मग मी म्हटले - बरोबर आहे टॅमीचं. पण त्याचं काय आहे. केस सॉल्ट & पेपर पेक्षा, एकदम पेपर तरी नाहीतर एकदम सॉल्ट तरी असे बरे वाटतात. हे असे सॉल्ट-पेपर केस मला आवडत नाहीत म्हणून मी डाय करते. त्यात तरुण रहाण्याचा अट्टाहास नाही गं. फक्त माझा प्रेफरन्स आहे. अन मेक अप चं म्हणशील तर आपल्याकडे हवा किती थंड असते, मग त्वचा कोरडी पडून फुटू नये म्हणून त्यावर मी लेप (च्या लेप) लावते. मुलीला माझी सारवासारव पटल्यासारखी वाटली. मी हुश्श होणार तोच तिने विचारले पण गेल्या पार्टीत तुला जेव्हा माया आंटींनी वय विचारलं तेव्हा तू का ते १० वर्षांनी कमी करुन का सांगीतलस? यावर काय बोलायचे ते न सुचून आणि मुलीच्या प्रश्नांच्या सरबत्तीला कंटाळून मी म्हटले - अगं पण तुला का इतक्या चौकशा? त्यावर कन्यारत्न उवाच - आज भांडताना मला मैत्रिणी म्हणाल्या की त्यांच्या आया म्हणत होत्या की तू ग्रेसफुली एज होत नाहीयेस.
.
मी मनात म्हटलं बघतेच या अमेरिकन आयांना. आजच फोटोसेशन करुन, फेसबुकवरती छान छान फोटो टाकते. बघू देत अन जळू देत त्या लुकड्यांना. पाप्याची पितरं कुठची. आमच्या एशिअन जीन्स मधे आहे गुटगुटीतपणा. पण आम्ही त्याला अज्जिबात लाजत नाय. मी ताबडतोब परवाच आणलेला नवाकोरा टीशर्ट आणि मांडीवर उसवलेली टाइट (फोटोत दिसतेय कुणाला? वरती तर टी शर्टच येणारे) घालून, लिपस्टिक लाऊन एकदम तय्यार झाले. आज मुलीची थोरली बहीणच वाटले पाहीजे या निर्धारानेच. माझ्या २८ लॉयल मैत्रिणींकडून तरी नक्कीच मला लाईक येणार याची खात्री होतीच. खुश्शाल कोणी म्हणा ना का - तरण्या झाल्या बरण्या नि म्हातार्‍या झाल्या हरण्या. म्हणे ग्रेसफुल एजिंग ... माय फुट! इथे व्हायचय कोणाला ग्रेसफुली एज? एजच नाही होणार तर ग्रेसफुली राहीलं दूरच. काय बरोबर बोलले ना मंडळी? Wink

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पानात घेतलेल्याच्या अर्धच खायचा केलेला निश्चय

आणि उरलेलं काय टाकून द्यायचं? :O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय टाकुन द्यायचे मिहीर. टाकाटाकी अमेरीकेत नवी नाही. आपल्याकडेही अन्न वाया जाऊ नयेचे अति स्तोम केले जाते. मला हे मान्य आहे की सोमालियन कुपोषित मुले जगात आहेत, भारतात भुकेकंगाल लोक आहेत पण ते भुकेले आहेत म्हणून मी चरबी साठवत बसायचं का? आता म्हणाल आधीच कमी घ्यायचं होतं. नाही घेतलं - माझा विकल्प. पुढे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा विकल्प.

हाऊ ग्रेसफुल!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि, आपल्याकडे "अन्न हे पूर्णब्रह्म" आदि ठसवुन, अन्नाला, अन्य सामान्य गोष्टींपासून फार वरच्य्य (देवत्वाच्या) पातळीवरती ढकलले जात नाही का? ताटात वाढलेले वाया जाऊ नये, नासाडी होऊ नये - ही संकल्पना भारतासारख्या देशात स्वागतार्ह आहे प्रोव्हायडेड जर आधीच विचारपूर्वक अन्न घेतले नाही.
.
पण समजा माझं अन्न ताटात उरलं तर ते कोणी पार्सल करुन सोमालियात किंवा भारतातच भुकेल्या लोकांपर्यंत पोचवणार आहे का? तशी यंत्रणा अस्तित्वात आहे का? तसा कस्टमर बेस (त्या उष्ट्या अन्नाला स्वीकारणारा) आहे का? मग एवढं उदोउदो का?
.
समजा मला थाळी पूर्ण वाढून घेऊन, तिच्यातील अर्धच खाल्लं तर रोज एक समाधान तर मिळणार आहेच पण समजा माझ्या "स्वनियंत्रण" या गुणाचा कस लागुन माझी सेल्फ-इमेज अधिक उजळणार आहे, तर माझ्यावर टीका करणारे टिक्कोजीराव तुम्ही कोण? (ननि तुम्हाला टिक्कोजीराव म्हणत नाही. एक इन जनरल, जजमेन्टल लोकांना उद्देश्युन आहे हे.)
.
मला तुमची/मिहीर यांची या मुद्द्यावरील विचार-पद्धती जाणुन घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा माझं अन्न ताटात उरलं तर ते कोणी पार्सल करुन सोमालियात किंवा भारतातच भुकेल्या लोकांपर्यंत पोचवणार आहे का? तशी यंत्रणा अस्तित्वात आहे का?

याबद्दल मी विचार करताना थेट माझ्या ताटातलं उरलेलं भुकेल्यांच्या तोंडी असा विचार करत नाही.

मला समज वाडगाभर जेवण पुरत असेल पण मी दोन वाडगे भरून वाढून घेऊन, एक वाडगाभर फुकट* घालवत असेन आणि असे बरेच लोक असतील तर काय होईल असा विचार करते. यात गरज नसताना अन्नाची गरज आहे असं दिसेल. अन्न फुकट घालवणारे लोक श्रीमंत आणि बरेच असतील तर अन्नाचा ओघ तिथे वाढेल. अन्नाची किंमत वाढेल किंवा अन्नाला सबसिडी मिळेल, पण खर्च होईल आणि तो खर्च फुकट जाईल. अन्नाची किंमतही वाढेल. कदाचित अन्नाची मागणी जादा आहे म्हणून जंगलं कापून आणि/किंवा खतं-कीटकनाशकं मारून अन्नपुरवठा वाढवला जाईल. यात जंगलं कापणं, खतं/कीटकनाशकं वापरणं या एकाच गोष्टीला विरोध आहे असं नाही, एवढं सगळं करून होतंय काय तर उत्पादन फुकट जातंय.

मग मुळातच हवंय तेवढंच विकत, वाढून घेतलं तर नासाडी कमी होईल आणि जंगलतोड, अनावश्यक रसायनांचं उत्पादन, त्यातून होणारं पाण्याचं-हवेचं प्रदूषण या गोष्टी टळतील.

जे लोक असं करत नाहीत, अन्न फुकट घालवतात त्यांना इतर कोणी टिक्कोजीरावगिरी करत जोखावं का? जर जंगलतोड, रसायनांचा वापर, प्रदूषित हवा-पाणी यांबद्दल कळकळ असेल तसं होऊ शकतं. लोकांना जोखल्यामुळे अन्न फुकट घालवणं कमी होईल असं मात्र मला वाटत नाही. पण "अन्न टाकायचंच होतं तर घेऊ नका एवढं" असं म्हणणं म्हणजे जोखणं आहे असं मलातरी वाटत नाही.

*नको तेवढं खाऊन अंगावर अनावश्यक चरबी चढवणं/रोगांना आमंत्रण देणं आणि अन्न कचऱ्यात टाकणं, दोन्ही अन्न फुकट घालवण्याचेच प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile ह्म्म्म बिंदू आहे (ष्रेयाव्हेर - बॅट्या)
.
हे बाकी पटले.
___
अशी विचारपद्धती/ शैली ऐसीवर अनुभवायला मिळते. याचा हळूहळू, का होइना, अतिशय सुक्ष्म का होइना फायदा होतो आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! खुलासेवार बोला-लिहायचा मला कंटाळा येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अन्नाची गरज आहे असं दिसेल. अन्न फुकट घालवणारे लोक श्रीमंत आणि बरेच असतील तर अन्नाचा ओघ तिथे वाढेल. अन्नाची किंमत वाढेल

<मार्केट मोड> त्यामुळे अधिक अन्न निर्मिती करण्यासाठी अधिक शेती केली जाईल. त्यामुळे अधिक मजुरांची गरज निर्माण होईल मग मजुरांना वेतन वाढवून मिळेल. त्यांना अधिक अन्न विकत घेता येईल. शिवाय अधिक लोकांना अन्न वाया घालवणं शक्य होईल आणि चक्र चालू राहील. < / मार्केट मोड>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मार्केटला एकमेव, शेती आणि शेतीवर अवलंबून उत्पादनांचाच मोड येतो याची कल्पना नव्हती. मला वाटत होतं लोकांच्या गरजांमध्ये पर्यटन, शिकार, स्मार्टफोन, स्वच्छ हवा, लेखन-वाचन, फिटनेस अशाही गोष्टी येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गाळलेल्या जागी तुमच्या प्रतिसादातील स्मार्टफोन वगैरे शब्द घालून पहा.

<मार्केट मोड> त्यामुळे अधिक ____ निर्मिती करण्यासाठी अधिक _____ केली जाईल. त्यामुळे अधिक मजुरांची गरज निर्माण होईल मग मजुरांना वेतन वाढवून मिळेल. त्यांना अधिक _____ विकत घेता येईल. शिवाय अधिक लोकांना _____ शक्य होईल आणि चक्र चालू राहील. < / मार्केट मोड>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मस्त हो आंटी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याचा विचार करायला मला बरीच वर्षं आहेत. मी अजून सोळाचीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा मस्त. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२००० पूर्वीचं जीवन वाया गेलं म्हणायचय का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या सोळा म्हणजे एकशे सोळा म्हणतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेव्हा इंटरनेट नव्हतं ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पटलं पटलं.
ग्रेसफुल एजिंगची ऐशीतैशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

है शाब्बास!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेकीला 'छान पिकत जाणारे म्हातारपण' हा पुलंचा 'एक शून्य मी' पुस्तकातील लेख वाचून दाखवावा/वाचावयास सांगावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हातारपण आल्याने जोवर आपला आत्मविश्वास डळमळीत होत नाही तोवर आपण ग्रेसफुल दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेच म्हटलं, (या वयातही) चिच्चा इतके ग्रेसफुल कसे काय दिसतात? ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

केस पूर्ण पांढरे करण्याचा काही उपाय आहे का ? फायदे अनेक आहेत.

तुम्ही जास्त रिस्पेक्टेबल वाटता. कधीकधी विचारवंतही वाटू शकता.
ट्रॅफिकचे किरकोळ गुन्हे हवालदार माफ करतो.
बसमधे, सिनियर सिटिझनच्या जागेवर बसता येते, पुढच्या दरवाजाने चढता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस पूर्ण पांढरे करण्याचा काही उपाय आहे का ? फायदे अनेक आहेत.

मेरे बाल धूपसे सफेद नही हुए है. अशा आशयाचा डायलॉग ऐकलाय बॉ. उन्हात फिरुन पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा एक केस पांढरा दिसल्यावर मला फार आनंद झाला होता. मी अत्यानंदाने, उड्या मारत, लोकांना फोन करून हे सांगत सुटले होते. फेसबुकवर त्या पांढऱ्या केसाचा फोटो टाकून आनंद जगजाहीर करावा, हे ही त्या आनंदाच्या भरात मला सुचलं नाही.

या गोष्टीला निदान पाच वर्षं झाली. त्यांतली चार वर्षं टेक्सासात राहत्ये, उन्हात भरपूर फिरते, टोपी वापरत नाही. अजूनही एकच केस पांढरा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पांढरे केस असलेल्या पण त्वचा अतिशय तुकतुकीत्/टवटवीत असलेल्या काही लहान वयाच्या (चाळीशीत असाव्यात) अशा स्त्रिया पाहील्या आहेत. पण पांढर्‍या केसाचे आकर्षण तर नाहीच पण .... aversion च आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस पूर्ण पांढरे करण्याचा काही उपाय आहे का ?

तिमा, विनोद जाऊदे, पण असं एक नररत्न मी खरंच पाहिलं आहे. हा इसम चक्क ग्रे डाय करून घेत असे. कारण असं की क्लायंटसमोर, कॉन्फरन्समध्ये आणि आयकर अधिकार्‍यांसमोर व्यक्तिमत्त्व भारदस्त दिसावं.

हा डाय करून देणारा माणूस व्यावसायिक मेकपमन होता की काय कोण जाणे. तो इतक्या चतुराईने डाय करत असे की आम्ही त्याला रोज पाहूनसुद्धा ही भानगड लक्षात यायला दोनपाच महिने गेले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इथे दक्षिण भारतामधले रिक्षावाले/ भाजीवाले सुद्धा मी तिशीत असल्यापासून आंटी म्हणायला लागले. पांढऱ्य़ा केसांपेक्षा आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यापेक्षा "आंटी" ही हाक ऐकली की खरच वाईट वाटते.एकवेळ मला "डेविल वेअर्स प्राडा" मधल्या मेरील स्ट्रीप सारखे पांढरे केस आवडतील. लेकिन "मुझे आंटी मत कहो..."
लेख अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर लिहलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

मी मला वाटतं कोण्या लहान मुला की मुलीकडून हा शब्द ऐकला (एकदाच) सुदैवाने नंतर समहाऊ ऐकला नाही. (That doesn't mean I do not look like one. Just telling the fact. ब्रॅग करत नाहीये) .... एनीवे, त्या पोरीच्या कुल्ल्यावर सडकुन फटका द्यावासा वाटलेला. जाम राग आला होता, वाईट वाटलं होतं Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मित्र-मैत्रिणींची मुलं मला सुरुवातीला मावशी, आत्या अशी काही हाक मारतात. मला त्यामुळे काही फरक पडत नाही; लहानच आहे ती पोरं माझ्यापेक्षा! पण थोडा वेळ त्यांच्याबरोबर माकडचाळे केले की मावशी/आत्या गळून पडतं आणि सरळ अदिती म्हणून हाक मारायला सुरुवात होते.

साधारण १२-१३ वर्षांपूर्वी आय.आय.एस.सी मध्ये फिरताना बारक्या पोरांनी मला आंटी म्हणून हाक मारली होती. त्याबद्दल अधिक चौकशी करता असं समजलं की ती पोरं मुद्दाम मुलींना चिडवायला असे प्रकार करतात. हे समजल्यावर तर राग येण्याचा, वाईट वाटण्याचा काही प्रश्नच नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

This is for all you girls about forty-two
Tossing pennies into the Fountain of Youth
Every laugh, laugh line on your face
Made you who you are today
This one's for the girls
Who've ever had a broken heart
Who've wished upon a shooting star
You're beautiful the way you are

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेसफुल एजिंग असे करावे. दोघींना प्रत्येकी एक केस पांढरा
https://www.youtube.com/watch?v=8_gZo2fAcsU&t=2h1m47s

नाहीतर ए के हंगल सारखे. भावी ग्रेसफुल एजिंग चा विचार करून पहिल्यापासून तसाच दिसला तो. दूरदर्शी. रिस्पेक्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या वेळी अमुक अमुक होतं , आम्ही कधीही तमुक तमुक केलं /केलं नाही आणि आताची मुलं बघा साधं ढमुक ढमुक पण करत नाहीत किंवा करता येत नाही.

हा एटिट्यूड आपल्यात निर्माण होऊ न देणे हाही ग्रेसफुल एजिंग चाच भाग आहे असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि हा शुद्ध दुष्टपणा आहे. इतरांच्या वेळेची किंमत असेल तर कृपया लेखन पुनर्स्थापित करावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो हा बेअक्कल्/गाढवपणा आहे. पण ऋ माझ्या फुटकळ लेखनाचे मी कधीच बॅकाअप घेतले नाहीत. शिवाय आता दुर्दैवाने ते नष्ट झालेच आहे तरी कोणाला त्याची कमी भासणार नाही/ भासू नये ही आशा करते. तेव्हा प्लीज माफ तर कराच पण माझी स्वसंपादनाची सुविधाही काढून घ्या.
रिस्टोअर करा अथव नका करु. परत नाही प्रसविणार एकही लेख. Sad
__
दुष्टपणा या माइल्ड भाषेत बोळवणी केलीत पण मला माहीते प्रचंड dysfunctional वागणं आहे माझं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसं आहे शुचि, एक माणूस समज डिसफंक्शनल असेल किंवा एक सदस्य माजोरडेपणा करत असेल तर त्याचा त्रास सगळ्या लोकांना होतो.

उदाहरणार्थ - तुझी एकटीची स्वयंसंपादनाची सुविधा काढून घ्यायची म्हटलं तर सगळ्यांची काढून घ्यावी लागेल. मग प्रत्येकाला ती देत बसावं लागेल. जुन्या सदस्यांना ती तत्काळ मिळेल, पण नवीन लोकांनी खातं बनवलं की त्यांनी ती सुविधा देत बसावं लागेल. हे करणं खूप कष्टाचं आहे असं नाही; पण करत बसावं लागेल. ही असली कारकुनी करण्यासाठी ऐसीचं व्यवस्थापन मंडळ नाही.

त्यामुळेच कोणी एक सदस्य माजोरीपणा करत "दिसामाजि काहीतरी(च) ते प्रकाशित करावे" म्हणायला लागला तर इतरांना त्यांच्या डायरीयाचा त्रास सहन करावा लागतो किंवा सगळ्यांनाच तोशीस पडते आणि सुविधा कमी होतात. बहुतेकसे लोक चांगलेच असतात, या चांगल्या लोकांच्या सुविधा कमी करण्यापेक्षा 'डायरीया सहन करा' हा पर्याय थोडा कमी जिकीरीचा वाटतो, इतरांच्या चांगुलपणावर अधिक विश्वास टाकणारा वाटतो, म्हणून तो वापरायचा.

एका नासक्या फळाला अढी नासवू द्यायची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुला व्यनि केलेला आहे. माझी ही indecisive वर्तणूक अति होत चालली आहे. काहीतरी करायला पाहीजे. आणि ते केले जाइल नक्की. Sad
___
एखाद्या संस्थळाकडे किती ही का कोरडेपणे पहायचा प्रयत्न केला की हे निव्वळ संस्थळ आहे तरी, ही बाब रहातेच की तुमचं मेंटल प्रोजेक्शन तिथे लक्ख पडतं. तुमचा तिथला वावर हा तुमचं एक्स्टेन्शन असतो. मी तर म्हणेन एखादा behavioral dysfunction कन्फर्म करायला उत्तम व्यासपीठ असतं ते. अति वहावत जाणे, अति उद्धट असणे, अतिरेकी असणे, मर्यादा न कळणे, पर्सनल बाऊंड्रीज न कळणे एक ना दोन असंख्य dysfunctional नमुने इथे दिसतात. पण त्याचबरोबर विचारी, बुद्धीमान, बहुमितीय व्यक्तीमत्त्व असलेले, एखाद्या कार्यास वाहून घेतलेले, समोरच्यास समजुन घेणारे, डिप्लोमॅटीकली आपला मुद्दा मांडणारे, चार्मिंग अनेक प्रकारची उत्तम वागणुक चलनेही पहावयास मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि, माझी शब्दयोजना चुकली असेल तर कल्पना नाही .. पण मागेही बॅट्याने असे धागे रिकामे केले, अजूनही काहींनी केले. काही आवडीचे, खास वाचनखूणांमध्ये ठेवलेले धागेही (तुच असे नाही अनेकांनी) उडवले आहेत. एकदा का प्रकाशित केलं की ते लेखन त्या लेखका इतकं वाचकांचंही असतं. ते अचानक काढून घेणं त्रासदायक ठरतं. त्यामुळे अनेक काळ अ‍ॅक्युम्युलेट झालेला त्रागा इथे उमटला. गैरसमज नसावा.

कृपया कोणीही असे लेखन प्रतिसाद दिल्यानंतर उडवू नये अशी विनंती (अर्थात स्वयंसंपादनाची सोय दिलेली आहे त्याचा वापर करायचा कसा ते प्रत्येकाने ठरवायचे, पण विनंती नक्कीच करू शकतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संस्थळावरील चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाणार तर नाहीच उलट अंतर्मुख होऊन वाचन अधिक व बाष्कळपणा कमी केला जाइल. - हमी देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यावर सहज शक्य असल्यास आधीही कोणीतरी सुचवलेला पुढील उपाय करता येईल. धागा काढल्यानंतर काही ठराविक दिवसांनी (उदा. ३-४) स्वयंसंपादनाची सुविधा आपोआप बंद होईल असे करता येणे शक्य आहे का? माझा असा अंदाज आहे की २-४ दिवसांनंतर केले जाणारे बहुतेक सगळे स्वयंसंपादन '.' देण्यापुरतेच असेल. ह्यामुळे धागाकर्त्याला बारीकसारीक बदल करण्याचे स्वातंत्र्यही राहील आणि धागे गायब करणेही होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा टायमर शक्य आहे का? मला वाटतं मॅन्युअली करावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅन्युअली (किंवा विमॅन्युअली) किंवा आपसूक असं काही होईल असं करायची गरज नाही. तुरळक अशा काही घटना घडतात त्यासाठी खूप वेळ आणि शक्ती खर्च करून काही करण्याची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विमॅन्युअली Smile Smile मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅशची लिंक देऊ का हो शुचिकाकू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अरे नेकी और पूछ पूछ. द्या ना प्लीज.
____
जवळजवळ सर्व लेख http://cachedview.com/ या साईटवरुन रिस्टोअर झाले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!