घर

घर
वाटायचं
घर माझ्या मनातलं, घर स्वप्नातलं
कुठेतरी दूरवर, वृक्षराजीत लपलेलं
असावं एक घर, छोटंसं कौलारू
कौलातून आत यावे चांदण्यांचे कवडसे
ते झेलीत मी पहुडावं, सुखानं धुंद व्हावं
अलगद झोपेच्या कुशीत शिरावं
घर माझं असं असावं !

छोट्याश्या टेकडीनं घर माझं पेलावं
वर खाली करतांना, वर पिऊन धुंद व्हावं
टेकडीच्या पायथ्याशी, टुमदार तळं
सारखं सारखं मला, बोलावतं खुळं
पाऊस आला गरजत की,
घराच्या आसऱ्याला पळावं
घर माझं असं असावं !

घरासमोरची पायवाट वळणावळणाची नाचरी
कडेकडेनी तिच्या तृणफूलं बावरी
पाहतांना वेडावून, गाणं यावं मनात दाटून
वाटतं असंच मुक्तं जगता यावं
घर माझं असं असावं !

पाउलवाट नेई घराकडे, अंगणी फुलांचे सडे,
दारातली तुलासामंजिरी, खुणावते स्नेहभरी
उगा किती धावावं, घर माझं असं असावं
घर माझं असं असावं !

घरानी दिलं आपलेपण
माझ्या घराची न्यारीच शिकवण,
आल्या गेल्या सर्वांना घर आपलंच वाटावं
घर माझं असं असावं, घर माझं असं असावं !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

A chair is still a chair, even when there's no one sittin' there
But a chair is not a house and a house is not a home
When there's no one there to hold you tight
And no one there you can kiss goodnight
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घर् रिकाम नाहि. मि त्या घरात आहेच. माझ घर आहे ते. घरात इतर लोकहि आहेत. नि येनार्या मानसाना घर आपलस वाताव एवधिच कालजि घेतलि जावि अशि माझि इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0