नग्नतेपासून रक्षण - कोणाचं आणि नक्की कसं केलं जातं?

मी साधारण पाचवीत असेन. संध्याकाळी आमची रवानगी हनुमान व्यायाम शाळेत होत असे. इमारतीमधली बरीच मुलं-मुली तिथे जात असत. आम्ही सगळे एकत्र जात-येत असू; अर्थात तेव्हाच्या नेहेमीप्रमाणे. म्हणजे भावासकट सगळे मुलगे ओळखीच्या सगळ्या मुलींपासून निदान काही मीटर अंतर ठेवत असत. जाताना एकत्र गेल्याचे मोजके काही प्रसंग आठवतात.

अशीच एका संध्याकाळी साडेसातला व्यायामशाळा संपल्यावर मी घरी परत येत होते. (ठाण्यात राहिलेल्या लोकांना राम मारुती रस्ता आणि वीर सावरकर रस्त्याचा चौक माहीत असेलच.) त्या दिवशी मी एकटीच मुलगी होते, बाकीच्या आल्या नव्हत्या. नाल्याच्या कडेने चालत येताना अर्धवट अंधारात समोर एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीची उजवी बाजू मला दिसत होती. शरीराच्या मध्यभागातून पाण्याची किंवा कसल्या द्रवाची धार शेजारच्या नाल्यात जात होती. अचानक पाणी थांबलं. मी तोवर काही पावलं पुढे आले होते. (आयुष्यात पहिल्यांदाच मी मांसल लिंग बघितलं.) त्या माणसाने स्वतःचं लिंग हातात धरलं, हलवलं. (कदाचित शेवटचे थेंब झटकून टाकत असेल.) गेल्या चार-सहा सेकंदात काय झालं ते समजायला आणखी काही वर्षं जावी लागली. जे काही होतं ते बघण्यासारखं अजिबात नाही, असं मला तेव्हा वाटलं. मी रस्ता ओलांडला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या गजानन महाराजांच्या दुकानात शिरले.

नेहेमीप्रमाणे तिथून काटेरी हलवा उचलला आणि घरी आले. नेहेमीप्रमाणे या गोष्टीची आजवर कुठेही वाच्यता केली नव्हती.

आज हे सगळं आठवण्याचं कारण, कालच ऐसी सदस्य मुक्तसुनीत यांनी माहिती दिली की अमेरिकन टीव्हीवर ठराविक वेळेच्या (साधारण पोरं झोपायची वेळ) आधी कोणताही कार्यक्रम लाईव्ह दाखवत नाहीत. गेल्या दशकात श्रीमती जॅनेट जॅक्सन यांची स्तनाग्रं टीव्हीवर दिसल्यामुळे सगळेच कार्यक्रम किमान दोन सेकंद उशीरा दाखवले जातात. "स्तनाग्रं टीव्हीवरून मुलांना दिसू नयेत यासाठी असा नियम (का कायदा) बनवला गेला," असंही ते म्हणाले. "पण मी तर टीव्हीवर भर दुपारी, संध्याकाळीही सर्फींग करणाऱ्या अर्धनग्न व्यक्ती बघते. सगळे चिक्कार स्तनाग्रं दाखवतात," मी लाळ गिळत म्हणाले. "नाही, स्त्रियांची स्तनाग्रं दिसू नयेत असा नियम आहे," असं सांगण्यात आलं.

मुलांना नग्नतेपासून वाचवा, ही भूमिका काही अंशी मला समजली. पण ती काही अंशीच अंमलात का आणली जाते? भारतात अशा प्रकारचे काय कायदे आहेत? मी लहान असताना मला नग्नतेपासून वाचवण्यात समाज कमी का पडला? आज भारतातल्या मुलांना अशा वांछित (जॅनेट जॅक्सनबद्दल अशीही एक थिअरी आहे की तिलाच तिची स्तनाग्रं दाखवायची होती) आणि अवांछित नग्नतेपासून वाचवण्यासाठी काय नियम आणि कायदे आहेत?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

मला या प्रकारचा अनुभव पुष्कळ उशिरा आला. बंगळुरी एका सकाळी मॉर्निंग वॉकच्या आरोग्यपूर्ण नशेत असताना एक गॄहस्थ अकस्मात सामोरा आला आणि माझ्या डोक्यात काही नोंद होण्याच्या आत मला ओलांडून पुढेही गेला. मी जागीच का थबकले हे कळायला मला सेकंद लागलं. त्यानं पॅन्टीच्या चेनमधून त्याचं लिंग हातात घेतलं होतं. या गोष्टीचा धक्का बसला असावा, असं वाटतं. कारण तो प्रसंग डोक्यातून गेला नाही.
आता या धाग्याच्या निमित्तानं विचार करताना असं वाटतं आहे, की अमुक प्रकारची नग्नता स्वीकारार्ह आणि अमुक प्रकारची नग्नता अब्रह्मण्यम् असं आपल्याला निरनिराळ्या प्रकारे शिकवलं जातं. मराठी बायकांचं साडीतून दिसणारं पोट कुणाला अशिष्ट वाटत नाही, तशा नऊवारी साडीतून दिसणार्‍या पोटर्‍याही. भारतीय पुरुषांना तर उघडेबंब फिरण्याचा परवानाच असतो. कितीही कमी लांबीची तुमान घालून, जानव्यासारख्या कळकट्ट वस्त्राचा किळस वाटेल असा उपयोग करत अनेक पुरुष सार्वजनिक ठिकाणी फिरतात. त्यातल्या काहींच्या उघडेपणाला तर इतरांपेक्षा अधिक सामाजिक प्रतिष्ठाही असते. लिंग या गोष्टीच्या प्रदर्शनाला ती प्रतिष्ठा नाही. (ते एक आश्चर्यच आहे. शंकराचं लिंग इतकं प्रतिष्ठित, पवित्र आणि दिलखेचक मानलेलं असताना, सर्वसामान्य पुरुषांना ते भाग्य न देऊन हिंदू समाजानं पुरुषांवर थोऽऽडा अन्याय केलेला दिसतो. ;-)) तद्वत स्त्रियांचा चेहरा (आणि साडीतून दिसणारं पोट आणि पोटर्‍या) सोडता त्यांच्या इतर कोणत्याच अवयवाच्या प्रदर्शनाला नाही. (मोकळे केस, टक्कल, लांडे केस, मांड्या, दंड, छाती... यू नेम इट. आणि त्याबद्दल काही सामाजिक संकेत, यमनियम, बंधनं आहेतच. काही ठिकाणी, काही परिस्थितीत तर चेहर्‍याच्या प्रदर्शनालाही ही प्रतिष्ठा नाही.) यात काही मूलभूत असमतोल आणि अन्याय आहे असं मलाही वाटायला काही वर्षं जावी लागली (नि मी स्वतःला स्त्रीवादी, पुरोगामी, आधुनिक, विवेकी व्यक्ती मानते), तर डोक्यात इतक्या गोष्टींचा इतका कीस काढायची सवय नसलेल्या कुणाला कुठून ही जाणीव होणार?
आता वाटतं, नग्नतेवर बंधनं असू नयेत ही आदर्श परिस्थिती झाली. जर ती घालायचीच असतील, तर त्यात काहीएक तर्क आणि समानता तरी असलीच पाहिजे. एरवी या निवडक बंधनांतून काहीही घंटा साध्य होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वर आलेल्या लेख-प्रतिसादांमधे सार्वजनिक ठिकाणी आपल्या लिंगाचं प्रदर्शन करणार्‍या पुरुषांनी obscenity संदर्भात मोडणार्‍या भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे असं मी समजतो. चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

होय, लिंगप्रदर्शनाला प्रतिष्ठा नाही, असंच मी नोंदलं आहे. (कायद्याचा उल्लेख मात्र मी केलेला नाही, कबूल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बालमानसशास्त्र याठिकाणी समजून घेतले पाहिजे.
अगदिच लहान वयात (५-६ वर्षांपर्यंत) बालकांनी अनवधाने नग्न व्यक्ति पाहिल्यास त्यांच्यावर होणारा परिणाम हा negligible असावा. कारण त्यांना त्याचा अर्थच लागणार नाही. शिवाय पालकही त्यांना एकटे सोडत नाहीत. तेव्हा सुरक्षततेचा उपाय म्हणजे कायम त्यांची सोबत करणे असे वाटते.

५ ते १२ - या वयात बालके कळती झालेली असतात. या वयात त्यांना विरुद्धलिंगी सवंगड्याच्या गुप्तांगाचे कुतुहल असते. मात्र कोणी प्रौढ व्यक्ति नग्न पाहिल्यास (अनवधानानेच) त्याचा होणारा मानसिक परिणाम (किळस , घृणा वगैरे) हा बराच जास्त असावा. या वयात बालकांवर लक्ष ठेवणे हे कठीण काम असावे. मात्र समवयस्क सवंगड्यांच्या समूहात ते आहेत ना याची खात्री करणे हा उपाय असू शकतो. बालसमूहाने अनवधाने पाहिलेला नग्न प्रौढ याचा परिणाम तितकासा जास्त नसावा.

१२ वर्षापुढील मुले- याविषयी 'बालक-पालक' या चित्रपटात योग्य प्रकारे विवेचन केलेले आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्या वृंदावनाच्या गल्ली बोळांतून चुकूनही जाऊ नका.गोकूळ मथुरा वृंदावन भयानक आहे.आताच्या गोष्टी आहेत.तिकडच्या सर्वांचेच या घाणेरड्या गोष्टीबाबत डोळे मेले आहेत.
मुद्यावर-लहान मुलांना सांगावे नीट बस 'च' दिसते तर ते उलट विचारतात टिव्हिकडे बोट दाखवून---?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलिकडेच ही रोचक बातमी वाचली होती.
http://timesofindia.indiatimes.com/world/europe/Italy-hides-nude-statues...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लहान असताना मला नग्नतेपासून वाचवण्यात समाज कमी का पडला?

अनेक बाबतीत समाज कमी पडतो. लहान मुलींना हा फ्लॅशिंग चा अनुभव सर्रास येतो. मला आला, माझ्या मैत्रिणींना आला, तुला आला - या लिमिटेड विदावरुन हा निष्कर्ष आहे अर्थात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

०.१% पुरुष आपल्या लिंगाचं महिलांसमोर मुद्दाम प्रदर्शन करत असू शकतील असं मान्य केल्यावर........

< दुष्ट खडूस मोड ऑन>
१. ९९.९% पुरुष "येणार्‍या जाणार्‍यांना आपले लिंग दिसत तर नाही ना?" अश्या चिंतेत असतील. मुतणार्‍या पुरुषाचे लिंग आजूबाजूने जाणार्‍यांना सहज दिसते हे पटत नाही. मध्ये पार्टिशन नसलेल्या सार्वजनिक मुतारीत शेजारी उभे राहून मुतणार्‍याचे लिंग (विशेष प्रयत्न केल्याशिवाय) दिसत नाही. तर सहजपणे बाजूने जाणार्‍या व्यक्तिला ते दिसण्याचा संभव कमी आहे.

२. इन्स्टाग्रामवरील काहीसं चित्र काढून टाकल्याप्रकरणी इथे झालेली वादळी चर्चा आठवली.

३. तुम्ही तुमचं आम्हाला दाखवलं तर आम्ही संतापणार. आम्ही आमचं तुम्हाला दाखवलं आणि ते तुम्ही पाहिलं तरी आम्हीच संतापणार.

<दुष्ट खडूस मोड ऑफ>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुद्दाम असं किळसवाणं प्रदर्शन करणारे असतात असं अनेक स्त्रियांकडून ऐकण्यात आलं आहे. याचा अर्थ हे धक्कादायक वास्तव अस्तित्वात आहे हे मान्यच.

धाग्यात दिलेल्या विशिष्ट केसबाबत. राममारुती रोड, घंटाळी रोड आणि गोखले रोड या पूर्ण परिसरात एकच पब्लिक मूत्रालय आहे. (गजानन वडापावच्या गल्लीत) त्यात कोणी जिवावर उदार होऊन गेलाच तर बाहेर पडल्यावर पुढचा अर्धा तास त्याच्या कपड्यांनाही तीव्र दरवळ येत राहतो. आत श्वास घेणं अशक्यच आहे. जितनी देर रोक सको उतनी देरमेंही शुक्रिया खतम करो, नही तो घुसमटो.

अशा स्थितीत अत्यंत अवस्था झाल्यावर कोणी यापैकी कोणत्याही रस्त्याच्या कडेला या देहधर्मासाठी उभा राहिला असेल तर त्याच्याविषयी सहानुभूति(सुद्धा) आहे.(जोपर्यंत त्याचा मूळ उद्देश "प्रदर्शन" हा नसेल)

हेच या रस्त्यांखेरीज अनेक शहरांतल्या अनेक रस्त्यांना लागू होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मुद्दाम असं किळसवाणं प्रदर्शन करणारे असतात असं अनेक स्त्रियांकडून ऐकण्यात आलं आहे. याचा अर्थ हे धक्कादायक वास्तव अस्तित्वात आहे हे मान्यच.

ते माझ्या प्रतिसादात सुरुवातीस लिहिलंच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते माझ्या प्रतिसादात सुरुवातीस लिहिलंच आहे.

ते वाचूनही मी परत लिहीलं. ज्या कारणाने तुम्ही आधी ते लिहीलंत त्याच कारणाने.

प्रत्येक साक्ष "मी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की" असं नव्याने म्हणून द्यावी लागते. अन्यथा तो "फ्लॅग" रोवायचा विसरला तर दिवस असे की आपणच थेट त्या प्रदर्शनकारी लोकांच्या रांगेत बसवले जायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपणच थेट त्या प्रदर्शनकारी लोकांच्या रांगेत बसवले जायचो.

शी! गंदे अंकल Wink ROFL
सं - पूर्वीचा गविंचा एक लेख.
मी पण सं देते नाही तर च्यायला ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा स्थितीत अत्यंत अवस्था झाल्यावर कोणी यापैकी कोणत्याही रस्त्याच्या कडेला या देहधर्मासाठी उभा राहिला असेल तर त्याच्याविषयी सहानुभूति(सुद्धा) आहे.(जोपर्यंत त्याचा मूळ उद्देश "प्रदर्शन" हा नसेल)

पुरुष तरी रस्त्याच्या कडेला उभे राहून मोकळे होउ शकतात; स्त्रिया काय करत असतील अशा प्रसंगी ?
( संकोचामुळे कुठल्या स्त्रीला थेट विचारु शकलो नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी वेळ आलेली नाही. मुख्य घरातून बाहेर पडताना एकदा शेवटची कृती म्हणजे जाऊन येणे - असे प्रिव्हेन्टिव्ह मेजर भारतात अंगवळणीच पडले होते. जी सवय आता राहीली नाही कारण इथे जिकडेतिकडे सुविधा आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नग्नतेपासून फक्त स्त्रीचे संरक्षण केले गेले पाहीजे ,कारण नैसर्गिकच त्यांना नग्नतेविषयी घृणा असते.पुरुश वयात येण्याआधीही नग्न स्त्री देहाबाबत आकर्षण बाळगून असतात वा त्यांना नग्न स्त्री पुरुषांविषयी घृणा वाटत नाही.अगदी कळालयला लागल्यापासून नग्न स्त्री विषयी ,तिच्या लैगिक अवयवांविषयी पुरुषांना आकर्षंण असते.मी सहावीत असताना आम्हा मित्रांमध्ये याविषयी चर्चा चालायच्या ,अनेकजण स्त्री वाकली की तिच्या स्तनांचे दर्शन कसे घडले, मुतताना कुणा पुरुषाचे लिंग कीती मोठे होते व आपलेही तेवढे होईल का याविषयी चर्चा करायचो.माझ्यामते वयात येण्याआधीही पुरुषाला नग्नतेचे वावडे नसते, समहाऊ नग्नतेचे आकर्षंण ज्नमताच पुरुषाच्या मेंदूत हार्डवायर्ड असते.वयात आल्यानंतर तर पुरुषाच्या तिव्र लैंगिकतेमुळे ते अधिकच घट्ट होते.त्यामुळे पुरुषांचे नग्नतेपासून संरक्षण करण्याची काहीच गरज नाही.
याऊलट स्त्रीची लैंगिक भावना वयात आल्यानंतरही पुरुषाच्या तुलनेत एकटक्काही नसते,त्यामुळे नॅचरली नग्नतेविषयी त्यांच्या मनात घृणा असते.एका सर्वे नुसार लग्नानंतर पहील्या संभोगावेळी नवर्याचे नग्न शरीर पाहून बहुतेक स्त्रीयांना घृणा उत्पन्न झाल्याचे आढळले आहे.
त्यामुळे लैंगीकता ,नग्गता, फ्लर्टींग,मेट सिलेक्षन हे पुरुषांचे प्रांत आहेत , अमेरीकन स्त्रीवादाने झापडून कुणा स्त्रीने या प्रांतात पाय ठेवल्यास तिला घृणा किळस याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

:yawn:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नग्नतेपासून फक्त स्त्रीचे संरक्षण केले गेले पाहीजे

मानवजातीचे काय होणार मग? फक्त टेस्ट्ट्युब बेबीज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ विषयाबद्दल मी नेहमीच गोंधळलेला असतो.
मुळात आपल्या लिंगाचे/स्तनाचे वगैरे प्रदर्शन करणे यात मला फार काही 'अब्रह्मण्यम' वाटत नाही. ज्यांना इंटरेस्ट असतो त्यांनी बघावे नाही त्यांनी सोडून द्यावे
--
मुळात कपडे घालणे नैसर्गिक आहे की न घालणे? तर न घालणे नैसर्गिक आहे!
मग एकीकडे विविध लैंगिकता असणार्‍यांच्या नैसर्गिक वेगळेपणाकडे आजार म्हणून न पाहता केवळ वेगळेपण म्हणून जर मी पाहू शकतो - तर एखाद्याला कपडे घालायचे नसतील किंवा आपल्या संपूर्ण शरीराचे वा त्यातील काही अवयवांचे प्रदर्शन करायचे असेल तर त्याच्यावर तसे बंधन घालणे मला अयोग्य वाटते. (आपल्याकडे कित्येक दिगंबर साधुंवर असे बंधन समाजाने घातलेले नाही. कारण त्या नग्नतेच्या मागे इतर एंडरकरंट्स नाहीत)

--
अर्थातच मुद्दाम समोरच्याची परवानगी नसताना इतर व्यक्तींना किळस वाटेल इतक्या मुद्दाम जवळ जाऊन अवयवांचे प्रदर्शन, सुचक हावभाव व व्यवहार आदी गोष्टी मात्र मी लैंगिक दुराचारात धरतो (कारण इथे समोरच्या ठराविक व्यक्तीची संमती गृहित धरलेली आहे किंवा समोरच्यावर ही बळजबरी आहे) आणि माझा त्याला विरोध आहे. मात्र एखाद्याच्या लिंग/स्तन दर्शनाने समोरच्याला त्रास होतो इतके कारण त्या व्यक्तीने तो-तो अवयव न दाखवण्यासाठी पुरेसे कारण मला वाटत नाही. (तो बघणार्‍यातला प्रॉब्लेम आहे. शिक्षणाची गरज बघणार्‍याला आहे.)

उदा. अदितीना एखाद्याचे लिंग मूत्र विसर्जन करताना दिसले यात त्या व्यक्तीचा मला काहीही दोष वाटत नाही. अदितीचाही नाही. मुळात मला यात काही फारसे 'नोटिसेबल'च वाटत नाही. याची डोळ्यांना सवय नसते त्यामुळे थबकणे समजू शकतो पण तिला लिंग दिसले यात समाजाने फार काही गुन्हा केलाय असे मला वाटत नाही. (स्त्री-पुरूषांना योग्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक मल-मुत्र विसर्जनाच्या जागा असाव्यात अशी मागणी मी करतो तेव्हा त्या मागे स्वच्छता व आरोग्य ही कारणे असतात. स्त्रीपुरूषांना आडोसा मिळावा म्हणून मी ती मागणी करत नाही)

---
याही पुढे जाऊन काहिंच्या मेंदूतील वायरिंगच्या वेगळेपणामुळे जर एखाद्याचा स्वतःच्या कृतीवर कंट्रोलच नसेल तर नुसते कठोर कायदे करून उपयोग होईल का कल्पना नाही. त्यापेक्षा त्याला (व समाजालाही) योग्य त्या समुपदेशनाची व उपचारांची गरज आहे. आमच्या परिचितांच्या चाळीत असे एक सत्तरीच्या पुढील गृहस्थ होते. ते कोणीही (बहुतेकदा बाई - पण नेम नाही) मजल्यावरून जाऊ लागली की स्वतःच्या नकळत लिंग बाहेर काढत - करत काहीच नसत , तेव्हढी ताकदही नव्हती. त्यांच्यावर काहीबाही उपचार चालू होते म्हणतात तपशील माहित नाहीत. पण बायकांनाही याची सवय झाल्याने त्यांना याचे काही वाटेनासे झाले होते. अशा व्यक्तींनाही समजून घेण्याची गरज आहे.
--
सगळ्यात क्लिष्ट प्रश्न आहे तो लहान मुलांसमोर शरीरप्रदर्शनाचा. माझ्या मते या गोष्टी आपण रोखु शकत नाही. मुलांसोबत आपला सतत संवाद हवा व आपल्यासोबत काहीही बोलण्याचे मोकळेपण हवे. मग असा प्रसंग घडलाच आणि मुले आपणहून आपल्याशी बोलली तर आपण योग्य ते समुपदेशन करू शकु. जर त्यांनी दुर्लक्ष केले वा फार किंमत न देता सोडून दिले वा आपल्याना न सांगता बाहेरच योग्य/चुकीच ज्ञान शिकले तर ते आपल्या कक्षेबाहेरचे आहे आपण त्यात काहीच करू शकत नाही. मुल स्वतंत्र व्यक्ती आहे व त्याचा प्रत्येक अनुभव व घडण आपण कंट्रोल करू शकत नाही हे वास्तव पालक जितक्या लवकर स्वीकारतील तितके बरे! (हे केवळ शरीर प्रदर्शनाबद्दलचे म्हणणे आहे. लिंग/स्तनांसोबत मुलांना जबरदस्ती व/वा कसेही हाताळायला/खेळायला लावणे किंवा अन्य लैंगिक दुराचारावर रोख हवी कारण तो दोन सज्ञान व्यक्तींमधील मामला नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे केवळ शरीर प्रदर्शनाबद्दलचे म्हणणे आहे. लिंग/स्तनांसोबत मुलांना जबरदस्ती व/वा कसेही हाताळायला/खेळायला लावणे किंवा अन्य लैंगिक दुराचारावर रोख हवी कारण तो दोन सज्ञान व्यक्तींमधील मामला नाही

माझा या बाऊंड्रीवर फार गोंधळ आहे. सज्ञान = १८ वर्षे की २० की १६ की आणखी काही? कशावरुन सगळेच्या सगळेजण १८ व्या वर्षी सज्ञान होतील?
.
मग मी म्हणते सज्ञान जाऊ देत. पण २ व्यक्तींच्या परस्पर्संमतीने होतो तो हेल्दी संभोग. पण मग ती व्याख्याही धूसर होते जेव्हा अगदी लहन मुलींना/मुलांना फसवुन, भुलवुन जर त्यांना फशी पाडले.
.
एकंदर To err on safer side म्हणून मग सज्ञान व्यक्तींमधील परस्पर्संमत संभोग हा हेल्दी मानावा लागतो. आनि सज्ञानतेची एक योग्यशी मर्यादा ठरवुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदर To err on safer side म्हणून मग सज्ञान व्यक्तींमधील परस्पर्संमत संभोग हा हेल्दी मानावा लागतो. आनि सज्ञानतेची एक योग्यशी मर्यादा ठरवुन.

+१
ती मर्यादा कुठली हे त्या त्या समाजाने बहुमताने ठरवावे. आपल्या समाजाने ते वय १८ वर्षे ठरवलेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मानव सोडून ईतर प्राणी हे कायम नैसर्गिक अवस्थेतच असतात. त्यांना त्यांच्या नग्नतेचा त्रास कधी होत नाही. किंवा मानवालाही होत नाही.

(मी बै एक नग्न गाढव बघितले, फार किळस वाटली वगैरे टाइपच्या कमेंटा मी तरी अजून कुठे वाचल्या नाहीत )

मग फक्त मानवालाच मानवाच्या नग्नतेचा त्रास का होतो?

कपडे घालणे हे नैसर्गिक नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाढव , कुत्री यांचे मेटींग पाहून जितकी किळस वाटली नव्हती तितकी ती घटना आवर्जुन पहाणारे बघे पाहून, त्यांची कमेंट "चढला चढला है शाब्बास" वगैरे नकळत ऐकून वाटली होती.
हे असे अंडरकरंटस विकृत वाटतात. लहानपणी हॉरिबल हॉरिबल वाटतात. की मी च अतिसंवेदनशील होते कोणास ठाऊक. तसेच असावे असे म्हणण्यास आता भरपूर जागा आहे अर्थात.
.
त्याचप्रमाणे नैसर्गिक विधी करताना पाहून किळस वाटली नाही पण फ्लॅशर्स पाहून वाटली होती असे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात नग्नते संदर्भात समाज फार दांभिक भुमिका घेतांना दिसतो. उदा. जर एखादा माणुस एक नॉर्मल माणुस समजा म्हणाला की मला निसर्गवाद योग्य आहे या निष्कर्षावर मी आलेलो आहे वा कुठल्या पर्यावरणीय थेअरी नुसार व आता मला कपड्यात अर्थ वाटत नाही नग्न विहार करायचा आहे. आणि त्याने तशी कृती केलीच तर त्याला त्याचे घरी शेजारीपाजारी पोलिस कायदा उचलुन जेल वा मनोरुग्णालयात टाकतील.
मात्र हेच कृत्य एखादा साधु जैन दिगंबर पंथाचा हवाला देऊन वा हिंदु नागा साधु आखाड्याच्या परंपरेचा दाखला देऊन करेल तर हाच समाज त्याला तसे करण्यास व नंतर ही प्रोत्साहन देइल नव्हे देतांना आपण बघतोच.
यांना आदराची वागणुक कारण त्यांनी दिलेली विचारसरणी तथाकथित त्यागाची समाजाला मान्य आहे.
नग्नतेला आक्षेप नसुन कुठल्या विचारसरणी पगड्याच्या खाली नग्न झाला याला महत्व अधिक आहे.
समजा काहीही कारण न देता उत्स्फुर्ततेने एखादा माणुस झाला तर
प्रोतिमा कबीर बेदी या प्रख्यात नृत्यांगना काही वर्षांपुर्वी मुंबई चौपाटीवर अशाच उत्स्फुर्ततेने नग्न होऊन धावल्या होत्या त्यांच्यावर अर्थातच टीकेचा भडीमार झाला होता.
समाज इतका प्रगल्भ कधी तरी होईल का इतके स्वातंत्र्य देण्याइतका नाही बहुधा
जे आदिवासी समाज अनेक ( अंदमान निकोबार मध्ये आजही ) ज्यात स्त्रीपुरुष अर्धनग्न असतात त्यात स्त्रीयांच्या पुरुषांच्या नग्नते कडे बघण्याचा दृष्टीकोण कमालीचा सहज असतो.
त्याउलट दिल्ली सारख्या शहरात अतीउच्च वर्गात हल्ली एक नविन ट्रेंड आहे. खासगी हाय प्रोफाइल फॅमिली पार्टीज मध्ये नग्न स्त्रीयांचे नृत्य आनंदाने मान्य होते. मात्र तेच कुटुंब तेच लोक बाहेर समाजात वावरतांना एकदम वेगळाच पवित्रा घेतात.
स्त्री संता मध्ये नग्न स्त्री संत आढळत नाही. एक लल्लेश्वरी या काश्मीर मधील संत स्त्री चा तेवढा अपवाद आहे.
जेवढ्या प्रमाणात शरीरे झाकली जातात तेवढे विकृत आकर्षण वाढत जाते. चायना मध्ये पाय मला वाटते व व्हिक्टोरीयन काळात तर स्त्रीचा कुठलाच भाग न दिसु देण्याची काळजी मुस्लिमांचा बुरखा
असे दडपलेले समाज अधिकच ऑबसेस झालेले दिसतात नग्नतेच्या बाबतीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नग्नता ही अनेक अंशांनी/प्रकारे लैंगिकतेशी निगडित आहे. मला वाटतं, 'नग्नतेपासून लहान मुलांचं रक्षण करणे' हे एक प्रकारे लैंगिकता (शारीरिक/ मानसिक/ सामाजिक) पूर्णतः विकसित न झालेल्या मुलांचं लैंगिकतेच्या प्रदर्शनापासून रक्षण करणे आहे. लहान बाळं नागडी असली तरी कोणाला (लहान्/मोठ्यांना) त्याचं काहीच वाटत नाही कारण त्यांच्या नग्नतेतून लैंगिकतेचं प्रदर्शन होतं असं बहुतेकांना वाटत नाही. लहान मुलांचं नग्न बाळांपासून 'रक्षण' करणार नाही कोणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका ठराविक वयापर्यंत, उपरोल्लेखित प्रकार घडायच्या काही वर्षं अगोदरपर्यंत, माझ्या वयाच्या आणि जवळच्या ओळखीच्या मुलामुलींसोबत आंघोळ, एकत्र ओढ्यात पोहायला जाणं असे प्रकार सर्वमान्य होते. तिथे नग्नता हा बाऊ नव्हता; सगळेच एका वयोगटातले.

हा प्रकार काय वयात बंद झाला ते आठवत नाही, पण त्यानंतरच कधीतरी विशेषतः आईकडून पाळीबद्दल माहिती आणि अनोळखी पुरुषांपासून लांब रहा, अनोळखी लोकांकडून काही घेऊ नकोस असे उघडउघड संदेश येऊ लागले. अनोळखी लोकांकडून काहीच घ्यायचं नाही आणि अनोळखी पुरुषांपासून लांब रहायचं या दोन गोष्टींचा भडीमार मी नववीत असेस्तोवर चालला. (पुढे आईच गेली.) माझ्या वयाच्या, आजूबाजूच्या सगळ्याच मुलींना घरून, विशेषतः आईकडून ही रास्त भीती किंवा बागुलबुवा दाखवला जात असे.

जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा संभोग, बलात्कार या गोष्टी माझ्या आकलनाच्या क्षितीजावरही नव्हत्या. पण जे दिसलं, ते मी आत्तापर्यंत कधीही बघितलेलं नव्हतं. अंधारात, रस्त्याच्या फार गर्दी नसणाऱ्या बाजूला, गर्दी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गजानन महाराजांच्या दुकानाच्या दिशेकडे तोंड केलेली आणि आपण जे बघणं अपेक्षित नाही (किंवा जे दाखवणं अपेक्षित नाही) - पूर्ण वाढलेल्या पुरुषाचं मांसल लिंग - ते दिसलं यामुळे मनात भीती, किळस, अपराधगंड अशा भावना आल्या. एकूणच संकेतांनुसार, नेहेमीप्रमाणे या गोष्टीची वाच्यता आईकडेही केली नाही. मी काहीतरी चुकीचं वागले, असं तिला वाटून मलाच ओरडा बसेल अशी भीतीही त्यात होती.

जर समाजात स्त्री-पुरुषांची नग्नता हा मोठा मुद्दा नसता ते तेव्हा त्या नग्नतेबद्दल काही विपरीत भावना मनात आल्याही नसत्या. आपल्या घरातले पुरुष, आपल्यावर प्रेम करतात ते वडील, काका, मामाही असे वागतात आणि घरातल्या स्त्रियांनाही त्यात काही वावगं वाटत नाही असं दिसत राहिलं असतं तर उपरोल्लेखित प्रसंगाबद्दल काही अडचण वाटली नसती ... ही अर्थातच थिअरी.

या घटनेला बरीच वर्षं उलटून गेल्यावर आता मला त्यातल्या आणखी गोष्टीही समजतात. आज कदाचित कोणी समोर मुद्दाम प्रदर्शन केलं तरीही मला कदाचित भीती वाटणार नाही. तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. त्या माणसाला आली असेल एक नंबरला, त्याने काय करायचं? समजा मला किंवा इतर कोणा बाईला अशी लागली तर मात्र स्त्रीच्या नग्नतेपासून समाजाला वाचवावं आणि त्यातून माझं स्वतःचंही भलं होईल, अशी समाजधारणा आहे. 'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हार म्हणते स्त्री मुतते तेव्हा तिचं बूडही उघडं पडतं, म्हणून ते चारचौघांत केलं जात नाही.

समजा, तेव्हा (किंवा आजही) कायदा असता की ठराविक एवढे लोक ज्या आस्थापनेत येतात किंवा ठराविक उत्पन्न असलेल्या सार्वजनिक आस्थापनांनी मूत्रालयं उपलब्ध करून दिली पाहिजेत तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या गजानन महाराजांच्या दुकानातही सार्वजनिक मूत्रालय असतं; भले तिथे चपला काढून जायला का लागेना. (त्या निमित्ताने ते कदाचित अधिक स्वच्छ राहिलं असतं.) ही गोष्ट फक्त देवळं, दुकानं आणि रेस्टॉरंटांपुरतीच मर्यादित का ठेवावी? स्टेशनं, पार्कींग लॉट्स, बस स्थानकं, गर्दीचे रस्ते सगळीकडेच ही सोय नको का? पण ही जाणीव ना लोकांना, ना प्रशासनाला. आजही पुरुष सर्रास रस्त्याला कडेला उभे राहून सार्वजनिक आरोग्याला बाधा आणतात आणि स्त्रिया धरून ठेवून स्वतःच्या आरोग्याला!

विकीपीडीयानुसार
Section 294 of the Indian Penal Code lays down the punishment for obscene acts or words in public. The other sections of Indian Penal code which deal with obscenity are 292 and 293. The law does not clearly define what would constitute an obscene act, but it would enter the domain of the state only when it takes place in a public place to the annoyance of others.

म्हणजे कदाचित रस्त्यावर मुतणं हा प्रकार भारतात ऑबसिनीटी संदर्भातला गुन्हा नसेलही. त्यातून लहान मुलामुलींना भीती, किळस वाटू नये म्हणून इतर काही यंत्रणा नसूनही. अर्थातच, हे सगळे मध्यमवर्गीय, किंवा श्रीमंती चोचले. ज्या घरांमध्ये संडास परवडत नाही तिथे हा प्रश्नच येत नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेकदा अशी वेळ येते.तेव्हा जर एखादं चांगलं रेस्टराॅ मिळाल तर मी माझ भाग्य समझते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0