कवीची कविता

कविवर्य मंगेश पाडगावकर हे माझे आवडते कवी. त्यांचे काव्यवाचन ऐकल्यावर प्रतिक्रिया म्हणून सुचलेली ही कविता मी ७-८ महिन्यांपूर्वी लिहिली होती. आज इथे देत आहे.

कविता ऐकावी कवीच्या मुखातुनी
वीणा वाजत असे त्याच्या मनी

शब्दांचे यमक जुळवुनी सहज
हरेक मोती गुंफिती अलगद

आईला जितके तिचे बाळ प्रिय
कवीला तितकीच कविता प्रिय

कवीच जाणे योग्य जागा शब्दांची
आणि महती विराम चिन्हांची

प्रत्येक कवीची एक शैली खास
ओळखू जावे तर होती आभास

मोजक्या शब्दांची ही सारी किमया
साधे कवीला सहजच लीलया

कवीचे ‘काव्यवाचन’ ऐकत रहावे
आणि वाह-वाह करत रहावे

– उल्का कडले

field_vote: 
0
No votes yet