एकट्या बाईने प्रवास करण्याआधी करण्याची मनाची आणि सामानाची तयारी -

मला हे लिहिण्याची उबळ का आली हे निश्चितपणे सांगता येईल. सांगावं का नाही असा प्रश्न आहे. कदाचित प्रतिसादांमधून त्याची उत्तरं देण्याची उबळ उचकीसारखी येईल आणि मग थांबता येणार नाही.

लेखनाचं स्वरुप स्त्रियांसाठी टिप्स असं आहे. अर्थातच ऐसी अक्षरे हे संस्थळ फक्त स्त्रियांसाठी नसल्यामुळे (आणि एकट्या बाईबद्दल धागा असल्यामुळे) पुरुष सदस्य/न-सदस्य हा धागा वाचणारच; त्यांना त्या टिपांमागचा तर्क अर्थातच समजणार नाही आणि मग पकाऊ प्रश्नोत्तरं होणार. ते टाळण्यासाठी आणि वाचक स्त्रियांचं मनोरंजन करत त्यांना 'पुरुषांना विचार कसा करता येत नाही' याची उदाहरणं देण्यासाठी टिपांमागची स्पष्टीकरणं दिलेली आहेत.

०. घराची काळजी करू नये.
स्पष्टीकरण - आपल्या घरात पुरुष राहत नसेल तर घराची काळजी करायची गरजच नाही. आपण बाई असल्यामुळे घरून बाहेर पडण्यापूर्वी गॅस नीट बंद केला आहे ना, हे किमान चार काड्या जाळून खात्री करून घेतलेली असेल; कुलपाला लोंबकळून घर नीट बंद केलं असेल, आणि शेजारच्या मैत्रिणीकडे घराची किल्लीही देऊन ठेवलेली असेल.

आपल्या घरात पुरुष राहत असेल तर ... तो आपल्या अनुपस्थितीत तसाही घराचा उकीरडा करणारच. आपण काळजी करण्यात काय हशील? त्यापेक्षा जीवाचा प्रवास करून घ्यावा. घरी गेल्यावर योग्य प्रकारे आरडाओरडा केल्यावर साफसफाईच्या कामासाठी गडी तयारच असणार आहे.

१. एकट्या बाईने प्रवास करताना फार सामान जवळ बाळगू नये. एखादी जडशीळ दिसणारी बॅग प्रवासासाठी निवडावी.
स्पष्टीकरण - आपल्याला झेपेल एवढंच सामान बाळगणं सोयीचं असतं. कोणी हुशार आणि हँडसम पुरुष दिसण्याची शक्यता नगण्य असली तरी अगदीच शून्य नाही हे लक्षात ठेवणे. असा पुरुष दिसल्यास आपणच आपली बॅग सहज वागवू शकतो, याचे कूल पॉईंट्स मिळतील.

हँडसम पुरुष दिसण्याची शक्यता बरीच जास्त असते. जडशीळ दिसणारी बॅग असेल तर ही प्रकरणं लगेच मदतीला धावतात. त्यांच्यासमोर आपण 'अबला नारी' वगैरे असल्याची पुरेशी नाटकं करून आपला 'मतलब' साधता येतो.

पण बायांनो, जग निष्ठूर आणि निर्दय आहे. हँडसम नसलेले पुरुषच आपल्याला भेटण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यातून ते पुरुष नुकतेच डायपरचं व्यसन सुटलेले किंवा भुवया पांढरे झालेले असण्याची शक्यताही असते. (पुरुष हा अव्होकाडोसारखा असतो. ठराविक अव्होकाडो खाऊन समाधान होईल अशी टाईमरेंज खूप म्हणजे खूपच्च छोटी असते.) अशा वेळेस आपली बॅग कशी का दिसेना, आपल्याला वागवता येते याचा आनंद आपल्या अजस्त्र आकाराच्या पर्समध्येही मावणार नाही एवढा मोठा असू शकतो.

२. हॉटेलात सामान टाकून बाहेर फिरायला जाताना पर्समध्ये कायम एक नॅपकिन बाळगावा.
स्पष्टीकरण - तुम्ही स्त्री आहात, अर्थातच तुम्हाला कधी प्रवास करायचा याचा जीवशास्त्रीय विचार करता येतो, हे निराळं सांगायला नकोच. पण असा विचार करा, तुम्ही एखाद्या छानशा हॉटेलात बसून, सुंदरशी वाईन पीत एकीकडे चीज आणि/किंवा स्टरफ्राईड मश्रूम्स खात आहात. तेव्हा एखादा बॉर्डरलाईन हँडसम इसम तुमच्याशी गप्पा छाटायला येतो. ना तो धड गीक आहे, ना त्याला धड विनोदबुद्धी आहे. थोडक्यात सगळंच बॉर्डरलाईन आहे. तुम्हाला त्याला सध्यापुरतं वेटिंग लिस्टवर टाकून कटवायचं आहे. अशा वेळेस पर्समधला नॅपकिन किंवा लायनर त्याला दिसलेला पुरेल. बॉर्डरलाईन लोकांनाही एवढा हिंट पुरतो. (तुम्ही पुरुष असल्यास हा हिंट आता तुम्हाला समजेलच.)

३. एखाद्या शहरात फिरायला जात आहात, तिथल्या एक-दोन माफक ओळखीच्या स्त्रिया आहेत. त्यांचे फोन नंबर्स जवळ ठेवा.
स्पष्टीकरण - काही कुत्रे, काही स्त्रियांना क्यूट वाटतात. कुत्रे आणि लांडगे यांचे पूर्वज एकच होते म्हणतात. लांडगे कळपाने शिकार करतात. आपण बायका गॉसिपही वाटून घेतो तर ... हॅ हॅ हॅ.

४. अगदी म्हातारी सहप्रवासी असेल तरीही तिला आपली खाजगी माहिती फार देऊ नये.
स्पष्टीकरण - आपल्या खाजगी माहितीवरून आपल्याबद्दल कोण, काय मतं बनवेल याचा भरवसा नाही. मतं बनवली तरी चालतील, पण समजा या म्हातारीचा कोणी हुशार आणि हँडसम भाचा (ही प्रजाती किती दुर्मीळ असते माहित्ये ना!) असेल तर! भलती रिस्क कशाला घ्यायचीच कशाला?

५. तुम्ही घरी कितीही नेटनेटक्या असाल तरीही सोबत काँडोम बाळगू नका.
स्पष्टीकरण - कितीही उत्क्रांती, प्रगती आणि स्त्रीवाद या सगळ्या गोष्टी आल्या, शिकल्या, समजल्या तरीही फायद्याच्या मुद्द्यांत निसर्गाशी भांडू नये. नैसर्गिकरित्या आपण beggers नाही choosers आहोत. कोण losers ते लगेच समजेल, त्यानुसार निवड करा. आपण बायांनी माज करणे हाच खरा स्त्रीवाद.

६. बॅटऱ्या कधी संपतील, चार्जर्स कधी दगा देतील याचा भरवसा नाही. मॅन्युअल गोष्टी जवळ ठेवा.
स्पष्टीकरण - 'वेळेला केळं' असं म्हणतात, पण त्यात काही दम नाही. केळी चटकन पिकतात. त्यापेक्षा गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर न मोडता खाल्ली.

७. घरच्यांना आपल्या प्रवासाचे तपशील देऊन ठेवावेत.
स्पष्टीकरण - आयुर्विमा काढताना विचार करत नसाल तरच हा मुद्दा लागू आहे. घरातला पुरुष नामक जिन्नस हे तपशील हरवणार याची १०१% खात्री असताना तपशील द्यायचे कशाला, हा प्रश्न साहजिक आहे. पण आपण हे तपशील पुरवले होते हा मुद्दा भविष्यात कधी वापरता येईल याची आत्तापासून कल्पना असायची गरज नाही. आपण भविष्याची तरतूद करून ठेवावी. भांडण का असेना, आपण बायकांनीच नैतिकता सोडली तर जगाकडून काय अपेक्षा ठेवणार!

बाकी पुरुषांसाठीही सूचना लिहिण्याचा विचार केला होता. पण फायदा काय? त्यांना सूचना दिल्या तरी त्या फुकटच जाणार याची खात्री आहे. रँडम पुरुषांच्या बाबतीत आयुर्विमा तर्कही चालत नाही.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

हा लेख पाहून भंजाळायला लागलेलं डोकं थोड्या शहाणपणाच्या सल्ल्यांवरून नजर टाकल्याने शांत झालं.

रँडम पुरुषांच्या बाबतीत आयुर्विमा तर्कही चालत नाही.

एकंदर लेख झेपणं कठीणच होता; पण त्यातल्या त्यात हे वरचे वाक्य म्हणजे "भलतेसलते आटोमेटीक" वाटले. त्याबद्दल प्रकाश टाकावा ही धागालेखिकेस विनंती.

कळावे आपला,
एक कुजका काळाकभिन्न अव्होक्याडो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आपण आयुर्विमा काढतो तो आपल्यासाठी नाही, आपल्या मागे राहणाऱ्या लोकांसाठी. आपल्या मागे कोणी असण्याची शक्यता असेल तर विम्याचा हफ्ता भरण्यात अर्थ आहे; अन्यथा एकट्या बाईने हफ्ते भरावेत कशासाठी?

तसं 'तपशील दिले होते' हा मुद्दा भांडणात वापरता येणार असेल तरच तपशील देण्याला महत्त्व आहे. आपल्या घरी न राहणाऱ्या आणि गेले चार-सहा महिने ज्यांच्याशी "आज तूप-गूळ-पोळी खाल्ली, कालची भाजी आज खराब झाली होती," यापलिकडे बोलणं झालेलं नाही अशा लोकांना थोडीच तपशील देण्याचा फायदा आहे!
दुसरं, आयुर्विमा कधी वापरावा लागेल हे आपल्याला माहीत असतं का? तसंच, तपशील देण्याचा फायदा कधी होणार हे समजत नाही.

ऱ्यांडम पुरुषांसाठी आयुर्विमा तर्क असा की त्यांच्याशी आपलं भांडणही होणार नसतं. मग त्यांना कुठल्याच प्रकारचे तपशील देण्यात काय हशील? त्यांच्यासाठी बुद्धी आणि कष्ट खर्च करण्याचा हफ्ता भरावाच का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कितीही उत्क्रांती, प्रगती आणि स्त्रीवाद या सगळ्या गोष्टी आल्या, शिकल्या, समजल्या तरीही फायद्याच्या मुद्द्यांत निसर्गाशी भांडू नये. नैसर्गिकरित्या आपण beggers नाही choosers आहोत. कोण losers ते लगेच समजेल, त्यानुसार निवड करा. आपण बायांनी माज करणे हाच खरा स्त्रीवाद.

Of all enjoyments, Bentham reasoned, sex was the most universal, the most easily accessible, the most intense, and the most copious – nothing was more conducive to happiness. An "all-comprehensive liberty for all modes of sexual gratification" would therefore be a huge, permanent benefit to humankind: if consenting adults were freed to do whatever they liked with their own bodies, "what calculation shall compute the aggregate mass of pleasure that may be brought into existence?"

आणखी इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाइटेक लेख आणि स्त्री आइडी काय लिहितात बघू.ऐसीकरांच्या तब्येतीला झेपेल असा विनोद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत सेक्सिस्ट धागा! निषेध!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हेच बोल्तो. निषेध! पुरुषांचाही काढा कोणीतरी असा धागा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऋ व अनुपढेरे या दोघांचा जोरदार निषेध.

कधी नव्हे तो एखादा सेक्सिस्ट धागा बायकांनी काढला की आले लगेच तलवार उपसून. सेक्सिस्ट असले तरी ही ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अखत्यारीतच येते.

(सिरियसली सांगतोय.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि सेक्सिस्ट असे काही वाटले तर त्याचा निषेध करणे हेही अभिव्यक्तिस्वातंत्र्यातच येते बरंका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छ्या... खूप सूचना राहिल्यात अजून.
शस्त्रास्त्रं वापराचं काय?!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हंटरवाल्या आदितीतैं ना कसली कोणाची भीती?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रश्न भीतीचा नाही अनुतै, पूर्णत्वाचा आहे. मुद्दा बरोबर आहे. शस्त्रास्त्रांबद्दल लिहिलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्दा बरोबर आहे. शस्त्रास्त्रांबद्दल लिहिलं पाहिजे.

अगदी.

तात्याराव सुद्धा म्हणाले होते (असं मी ऐकलं) की हिंदु देवीदेवता एवढी शस्त्रं बाळगून असतात आणि हिंदु अजिबात शस्त्रं बाळगत नाहीत - हे कसंकाय ? अदिती सुद्धा एक देवी होती/आहे. तिच्याकडे शस्त्रं असतीलच की. तेव्हा ऐसीच्या अदितीने शस्त्रांबद्दल अवश्य लिहावे.

( १ - यावरून कुणीही हिंदु मुस्लिम विवाद सुरु करू नये. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

५. तुम्ही घरी कितीही नेटनेटक्या असाल तरीही सोबत काँडोम बाळगू नका.
स्पष्टीकरण - कितीही उत्क्रांती, प्रगती आणि स्त्रीवाद या सगळ्या गोष्टी आल्या, शिकल्या, समजल्या तरीही फायद्याच्या मुद्द्यांत निसर्गाशी भांडू नये. नैसर्गिकरित्या आपण beggers नाही choosers आहोत. कोण losers ते लगेच समजेल, त्यानुसार निवड करा. आपण बायांनी माज करणे हाच खरा स्त्रीवाद.

हे बिलकुल म्हणजे बिलकुलच पटलं नाही. बायका बेगर्स नाही, चूझर्स असतात हे फार्फारच पुराणमतवादी झालं. बायका सेलर्स नाही, तर बायर्स असतात अशी काहीतरी एमान्सिपेटेड विचारसरणी हवी. किंवा युझ्ड ऑब्जेक्ट्स नसून यूझर्स असतात असा दृष्टिकोन हवा. जर कोणी अचानक हवाहवासा टग्या पुरुष दिसला, तर त्याला तिथल्या तिथे घेता येण्यासाठी तुमच्याकडे नको का काही प्रीकॉशन? स्काउट्सचा मोट्टो असतो 'ऑलवेज बी प्रीपेअर्ड'. ज्या कोणाला इच्छा असते त्यांनी तयारी ठेवावी यात गैर काहीच नाही. अशी तयारी ठेवण्याची तयारी न दाखवणं हा स्त्रीवादाचा अपमान आहे. तयारी पुरुषांनी करायची, त्यांनी प्रपोज करायचं, त्यांनीच पुढाकार घ्यायचा इज सो एटीन्थ सेंच्युरी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो अठराव्या शतकातही बायकांना भूक लागत असे. मग आज बाईला भूक लागली हे समजल्यावर "धिस इज सो एटीन्थ सेंच्युरी!" म्हणणार आहात का ... असं काहीबाही लिहिणार होते. मग तुमचा आयडी बघितला. पुरुष असणार तुम्ही! स्वतःला मेले काही कष्ट घ्यायला नको, ऑर्गनाईज्ड असायची गरजही वाटणार नाही आणि आम्ही तशी मागणी केली की पुराणमतवादी म्हणून हिणवायला सुरुवात! बायांनो, ह्या असल्या नावठेवणीकडे दुर्लक्ष करा. आपला फायदा असेल तिथे थर्टीन्थ सेंच्युरीसुद्धा आपलीच.

बायका बायर्स असतात; मुक्त बाजारपेठेत ग्राहकच सर्वोच्च असतात, तेव्हा बघा ... कसं जमतंय तसा पहा तुम्ही पुरुष!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बायका बायर्स असतात; मुक्त बाजारपेठेत ग्राहकच सर्वोच्च असतात,

अहो, तेच तर मी सांगतोय. बायर व्यक्तीने आपली पिशवी जवळ ठेवली तर काय बिघडतं?

एखादं पुरुषसावज सापडलं तर ते केवळ कंडोम नाही म्हणून हातचं जाऊ देण्याचा विचार कंडम आहे. दिसला चांगला माल, तर लगेच केलं एन्व्हलप त्याला असा आक्रमक बाणा अंगी बाळगावा अशी आजच्या स्त्रीकडून अपेक्षा आहे. 'या गावचा, त्या गावचा, केमिस्ट नै आला, कंडोम नाही मला, कशी मी येऊ?' अशी रडतराऊ गाणी गात राहाणार का तुम्ही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Context

५. तुम्ही घरी कितीही नेटनेटक्या असाल तरीही सोबत काँडोम बाळगू नका.
स्पष्टीकरण - कितीही उत्क्रांती, प्रगती आणि स्त्रीवाद या सगळ्या गोष्टी आल्या, शिकल्या, समजल्या तरीही फायद्याच्या मुद्द्यांत निसर्गाशी भांडू नये. नैसर्गिकरित्या आपण beggers नाही choosers आहोत. कोण losers ते लगेच समजेल, त्यानुसार निवड करा. आपण बायांनी माज करणे हाच खरा स्त्रीवाद.

तुमचा नेमका मुद्दा -

बायका बायर्स असतात; मुक्त बाजारपेठेत ग्राहकच सर्वोच्च असतात

या पर्टिक्युलर केस मधे बायका बायर्स असतात ? कशाकाय ? तुम्ही ज्या ट्रांझॅक्शन ची बात करताय ते चलनविरहित आहे. ती बार्टर एक्सचेंज आहे. बार्टर एक्सचेंज मधे कोण बायर व कोण सेलर असतो ? दोघेही बायर व दोघेही सेलर असतात. नैका ? की हा मौजमजेचा धागा असल्यामुळे गल्लत ही सुद्धा स्वीकारणीय आहे व गल्लतीकडे सुद्धा मौजमजा म्हणून पहावी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय गब्बरशेट, दोघेही बायर्स आणि सेलर्स कसले? पारंपारिक दृष्टीतून पुरुष बायर असतो, म्हणून तो 'फ्रेंडशिप देतीस का?' 'लौशिप देतीस का?' किंवा नुसतंच 'देतीस का?' असं विचारतो. तुम्ही हिंदी सिनेमा नाही का पाहात? हैय्या हैय्या करत एकबार तरी प्यार तिने द्यावं म्हणून जान आणि इमान द्यायला तयार असलेले पुरुष दिसतात त्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पटतंय पटतंय.

आता तुम्ही शिवगामीदेवींना घेऊन आलाय. आम्ही काहीही बोल्लं तर त्या लगेच म्हणतील "मेरा वचन ही है शासन". सबब आम्ही तुमचा मुद्दा मान्य करत आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेक्सिझम आहे हो हा गब्बरशेटचा. पुरुषाने आधी हे विधान केलं, त्याला प्रश्न नाही विचारला. बाईने मूळ विधानातली चूक दाखवून द्यायचा प्रयत्न केला तर तेव्हा मात्र लगेच आले धावत धावत. तुमचं दोघांचं हे 'मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं कर' सुरू आहे हे सगळं मी समजून आहे. (बघा, गब्बरशेटने लगेच चूक कबूल केली.)

---

तुमच्या आधीच्या प्रतिसादालाही इथेच उत्तर देते.

तुम्हाला एक गोष्ट सांगते - मी एकदा चप्पल शोधत होते. साधीशी, खरबरीत पोताचा, रबरी तळ असलेली, रोज वापरण्यासाठी. दुकानात गेले तर तिथला माणूस (पुरुषच तो) म्हणे, "त्यापेक्षा तुम्ही ही उंच टाचांची, नाजूक नक्षीकाम असलेली, सपाट सोल असलेली चप्पल का घेत नाही? हल्ली अशाच चपला खपतात." पुरुषांना वाटतं, बायकांना काय सेक्सी वाटतं ते बायकांपेक्षा आपल्यालाच जास्त समजतं, त्यातलीच तुमचीही गत.

केमिस्टच्या येण्याजाण्याचा बायकांच्या येण्याजाण्याशी संबंध काय? केमिस्ट नाही आला तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे; पुरुषच असणार तो ही! स्वतः एवढ्या औषधांच्या साठ्यावर बसायचं आणि वर त्यालाच यायला प्रॉब्लेम! पण हे ही अवांतर झालं. तुम्ही मूळ लेख वाचलात का? तो वाचा आधी नीट.

मूळ लेखानुसार आम्हाला (म्हणजे दस्तुरखुद्द आम्हालाही) कोणी सांड वगैरे नकोय (आणि स्वतःला औषधं देऊ न शकणारा ढ केमिस्टही नकोय). हुशार आणि हँडसम पुरुष जगात कमीच; आम्हाला तसले लोक हव्येत. आम्ही 'खाईन तर तुपाशी' असा माज करणाऱ्या ग्राहक आहोत. एरवी सांड काय पैशाला पासरीभर मिळतील. सगळ्यांना हल्ली सिनेमात किंवा गेलाबाजार सिरीयलींत कामं करायची असतात. मग ते काखेत लिंबं/संत्री लावून फिरणारे चिक्कार सापडतात. असले बाहुबली काय कामाचे! आम्हाला ते माल वाटतच नाहीत. माल कोण ते आम्ही ठरवणार याचा अर्थ आम्ही ग्राहक आहोत. (या वाक्याला 'मार्क इधर है, तेजा मै हू।' अशी चाल लागल्यास आमची जबाबदारी नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मै जिस हाथ मे कल फूल देकर आया था
उसी हाथ का एक पत्थर आज मेरी तलाश मे है

या धाग्यावरच्या माझ्या पहिल्या व दुसर्‍या प्रतिसादात मी तुमची बाजू घेतली नव्हती का ??? आत्ताही घेत आहे. तुम्ही ज्या "विशिष्ठ ट्रँजॅक्शन" बद्दल बोलत आहात त्या बाबतीत स्त्रियांना खरोखर जास्त बार्गेनिंग पॉवर असते असं किमान फ्रिकॉनॉमिक्स तरी म्हणतंय. हा व्हिडिओ पहा.

--

राजेश आता म्हणेल -

फिर होगा जलील फिरसे उठाएगा जिल्लत
न जाने कब सुधरेगा ये गब्बर बेगैरत

फिर मौत का है सामना अल्लाह बचाए
फिर दिल लिए जाता है सितमगर के आगे

( थो ऽऽऽ डी चढलिये मला. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकट्या बाईला फक्त पुरुषच आवडतात असा पुराणमतवादी विचार सुचविल्याबद्दल निषेध!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषांचं वेगळं पडतं म्हणून लिहावं लागतं. तुम्ही प्लीज निषेध नका हो करू. तुम्हीच माझा निषेध केला तर तवसाळी बरोबर झालीत का नाही हे कुठून तपासून घेऊ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बायकांना सेक्स् ड्राईव्ह नसतो,निसर्गाने संभोग करणे ,त्यात पुढाकार घेणे ही कामं पुरुषांकडे दिली आहेत.बायका सेक्स या बाबतीत अत्यंत थंड असतात.पुरुषांना सेक्स ड्राईव्ह आहे तर आम्हालाही सेक्स ड्राईव्ह आहे या तद्दन अमेरिकन निओ फेमिनिस्टांच्या प्रचाराला बायका बळी पडतात,बाकी काही नाही.तस्मात बायकांनी काँडोम बाळगू नये हे उचीतच,
आणि दिसला तरणाबांड टवका पुरुष की घे अंगावर हे तर अतीच टोकाचं झालं,women's are child bearing race ,inferior to men when it comes to " spreading own genes". spreading of genes is pejorative of men,women are here only to serve men.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

धाग्याला चार पाय चाँद लावणाऱ्या ग्रेटथिंकर यांचे मनापासून आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयला...इथे असे लिहिलेले चाल्ते??? मी मिपावरून इथे आलोय...मिपावर असा लेख "आचरट्/उथळ" असे लेबल लावून लगेच उडाला अस्ता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

why not Wink

स्वतःला मनोरुग्ण बनवायला या सुचना फारच मनावर घेतल्या तर नक्कि कामी येतिल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

आई ग्ग! फेसबुकीय ७१ व्यक्तींनी हा लेख लाइक केलाय Smile
आई ग्ग! म्हणजे तो लाइक करण्याच्या "लाइकी"चा नाही असे नसून संख्या खूपच आहे असे सुचवायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा आकडा फसवा आहे.

(समज) मी हा लेख फेसबुकवर लाईक केला, त्याची पोस्ट फेसबुकवर दिसते. मग त्यावर कोणीतरी कॉमेंट करतं आणि मी त्याला उत्तर देते. फेसबुक या प्रकाराला तीन लाईक्स असं मोजतं. प्रत्यक्षात मी सोडून एकाच व्यक्तीने लेख वाचलेला असण्याची शक्यता असते; आणि लाईक केलेला असतोच असं नाही. (तस्मात्‌, पुरेसे खडूस असाल तर फेसबुकवर एखादी पोस्ट लाईक केल्यास तिथे कॉमेंट करू नका; कॉमेंट केल्यास लाईक करू नका.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरेच्च्या हे माहीत नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

६. बॅटऱ्या कधी संपतील, चार्जर्स कधी दगा देतील याचा भरवसा नाही. मॅन्युअल गोष्टी जवळ ठेवा.
स्पष्टीकरण - 'वेळेला केळं' असं म्हणतात, पण त्यात काही दम नाही. केळी चटकन पिकतात. त्यापेक्षा गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर न मोडता खाल्ली.

BiggrinROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुष घराचा उकीरडा करणारच. विशेषतः बीअर बॉटल रांगोळी घालूनच तुमचं स्वागत करणार

http://www.funnfun.in/wp-content/uploads/2014/03/beer-bottle-art-amazing.jpg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Earth Angel

सदरहु कंपन उपकरणाला बॅटरी वा चार्जरची गरज नाहीय. ते किल्लीच्या मोटारीसारखे चालते. चार वेळा किल्ली मारली की एकावेळचे काम भागते, दिड वेळेचेही भागत असावे पण कंपन उपकरणाचा वापराचा वेळ हा वैयक्तीक आवडीनिवडींवर अवलंबुन असतो असे ऐकुन आहे. म्हणजे कोकेन स्नॉर्ट करतांना काही लोक एका वेळी एकच लाईन ओढतात आणि अर्ध्या तासाने दुसरी तर काही लोक दोन, तीन वा चार लायनी एकदमच ओढतात. तर समजा एकाच रात्रीत (किंवा दिवसात, किंवा मग भरदुपारी) असे इन्स्टॉलमेंटमध्ये एकदाच चावी फिरवुन अर्धे अर्धे आवर्तन केल्यास तीन आवर्तने होउ शकतात. अर्थात प्रत्येक वापरा आधी पुर्ण चावी देउनही वापरता येउ शकते पण पुन्हा वैयक्तीक आवडीनिवडी आहेतच. कंपन उपकरण सीई अ‍ॅप्रुव्हड आहे की नाही ह्याबद्दल कल्पना नाही, अ‍ॅप्रुव्हड नसल्यास काही समस्या निर्माण होउ शकतात. मी लहान असतांना चावीच्या गाड्यांना गरजेपेक्षा जास्त चावी दिली गेल्याने त्या अस्ताव्यस्त वेड्यावाकड्या हवेत उडतांना पाहिल्या आहेत त्यामुळे तो धोका इथेही संभवतो.

पण हे छान आहेय. म्हणजे बॅटरी आणि चार्जींग नसल्याने पर्यावरणाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत चांगला शोध आहेय शिवाय हे रिसायकल केलेले प्लॅस्टीकपासुन बनविलेले आहे. पर्यावरणाला स्त्री पुरुष दोघेही समकक्ष असतात असे एकदा आम्हाला बौद्धिकांत सांगितले होते.

अशाच संकल्पनेवर एक सौरौर्जेवर चालणारे देखील कंपन उपकरण आहेय. त्याबद्दल नंतर सविस्तर लिहता येईल. दरम्यान 'वेळेला केळं' अथवा 'गाजरं' ह्या पर्यांयाशी अजिबात सहमत नाहीय. दोन्ही गोष्टींमुळे इस्ट इन्फेक्शन होउ शकते आणि ते आगोदरच असल्यास वाढु शकते हे मायो मेडीकल स्कुलने संशोधनाअंती सिद्ध केलेले आहेय. केळी वा इतर अर्वाचीन वनस्पतींचा उल्लेख हा पुनुरुज्जीवनवाद्यांच्या पथ्यावर पडणारा आहेय सबब मुळ लेख परिवर्तनवादी असेल तर त्यातुन हा पुनुरुज्जीवनवादी पर्याय वगळण्यात यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin

या प्रतिसादाबद्दल मतभेद संभवतात. पण आमची ट्यूब थोडी उशीरा पेटत असल्यामुळे सध्या फक्त दात दाखवत आहे. काही ट्यूब्ज अशा दिसतात.
ट्यूब

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.