Skip to main content

तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?

Clearing the throat - हिंदी चित्रपटांनी एक गाण्यांची झकास परंपरा व ठेवा दिलेला आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा. सर्वात पहिले हिंदी पार्श्वगायक म्हणून कुंदनलाल सैगल यांचे नाव घेतले जाते. खरंखोटं विश्वेश्वरच जाणे. पण त्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी मस्त मस्त गाणी दिली. यात लता, आशा, रफी, किशोर, मन्ना डे, मुकेश, तलत, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, मिनु, शैलेंद्र सिंग, महेंद्रकपूर, सुमन कल्याणपूर वगैरे मंडळी होती. नंतर साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आलिशा चिनॉय, सुनिधी वगैरे मंडळी आली. समांतर पणे गझला कव्वाल्यांचा जमाना चालू होताच. संगीताच्या या यशा मागे संगीतकार पण होतेच. अनिल बिस्वास, सज्जाद, खेमचंद, वगैरेंपासून (किंवा त्याहीआधी पंकज मलिक असावेत) आज रहमान, शंकर महादेवन वगैरेंपर्यंत गाडी येऊन ठेपलेली आहे. अधे मधे शिवकुमार शर्मा वगैरेंनी सुद्धा संगीत दिग्दर्शनाचे प्रयोग केले होते.
.
पण मूळ विषय नावडत्या गाण्यांचा आहे. आजतागायत हिंदी व मराठी चित्रपटांनी व गायकांनी व संगीतकारांनी आपल्याला अक्षरशः लक्षावधी गाणी दिलेली आहेत. सगळ्यांना सगळीच ऐकायला मिळतातच असे नाही. वेळ नसतो, तेवढी आवड नसते, शोधायचा प्रयत्न करूनही सापडत नाहीत वगैरे कारणांमुळे. पण काही गाणी अशी असतात की जी अजिबात म्हंजे अजिबात आवडत नाहीत. म्हंजे गाणं लागलं रे लागलं की टेप, रेडिओ, ट्रांझिस्टर, युट्युब बंद करायची इच्छा अनावर होते. काही गाणी अगदीच डोक्यात जातात. गायकाला/गायिकेला शिव्या द्याव्याश्या वाटतात. अर्थातच अनेकदा यामागे संगीतकाराची चूक असू शकते पण तरीही गायक्/गायिकेस दोष दिला जाऊ शकतो. माझ्या मातोश्रींना हिंदी व मराठी गाण्यांची अतिशय आवड होती. तसेच सुगम संगीत, नाट्यगीते वगैरे. पण काही गाणी अजिबात आवडायची नाहीत. उदा. "जिवलगा राहिले रे दूर घर माझे". हे गाणं लागलं की मातोश्री तावातावाने उठायच्या आणि रेडिओ बंद करून टाकायच्या. आमचे एक मामाश्री सुद्धा संगीताचे शौकीन. पण ते "गाडीवान दादा" हे गाणं लागलं की - "अरे, कोण आहे रे तिकडे, ते आधी बंद कर" असं फर्मान सोडायचे. व हे मामाश्री ज्येष्ठतम असल्यामुळे त्या फर्मानावर ताबडतोब "अमल" केला जायचा. तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी देवासकर आठवा. त्यांचे ही असेच. "वाश्या, ती रेडिओ वरची ठुमरी बेसूर होऊन राहिलिये. रेडिओ बंद कर आधी" असं फर्मान सोडलं आणि वाश्याने त्याबरहुकूम.....
.
अनेकदा एखादं गाणं का आवडत नाही याचं खरंतर काही विशिष्ट कारण नसतं. तुम्हाला ते निव्वळ भिक्कार वाटतं. एखाद्याला एखादा गायक/गायिका आवडत असेल पण त्याची काही गाणी आवडत नाहीत. माझ्या एका रूम पार्टनर ला मदनमोहन आवडायचे पण त्यांची लैला मजनू चित्रपटातली गाणी अजिबात आवडली नव्हती. एखाद्याला एखादा संगीतकार/गायिका/गायक फार आवडत नसतो पण त्याचं एखादं गाणंच आवडतं. एखाद्याचं उलटं असतं. संगीतकाराचं/गायकाचं एक गाणं सोडून बाकी सगळी आवडतात. मला तलत चं "अश्कोंने जो पाया है" अजिबात आवडत नाही. पण बाकीचा तलत अतिप्रिय. माझ्या ओळखीच्या दोन मुलींना लता मंगेशकर फारशी आवडत नाही. पण त्यातल्या एकीला "ओ सजना बरखा बहार आयी" फार आवडतं. काहींना एखादा संगीतकार अजिबात आवडत नाही. माझ्या एका मित्राला आरडी बर्मन अजिबात आवडायचा नाही. पण त्याला जगजित, रफी, किशोर आवडायचे. त्याला आरडी चं पहिलं गाणं "घर आजा घिर आयी बदरा सावरिया" आधी ऐकवलं. म्हंटलं आवडलं का ? म्हणाला हो आवडलं. नंतर सांगितलं - संगीतकार आरडी. म्हंटला वा.
.
पूर्वी बिनाका, आपकी पसंद, हमेशा जवां गीत, चित्रहार, छायागीत, रंगोली, पुराने फिल्मोंका संगीत (सिलोन), जयमाला, आपली आवड, भूले बिसरे गीत, बेला के फूल असे डझनभर कार्यक्रम व्हायचे. आकाशवाणी, विविधभारती(हा आकाशवाणीचा च भाग होता), सिलोन, व दूरदर्शन हे मुख्य कंटेंट सर्व्हर्स होते. बाकीचे असतीलही. या सगळ्या कार्यक्रमांत काही गाणी अगदी "दत्तक" घेतल्यासारखी लावली जायची. "जो वादा किया वो निभाना पडेगा", "दूर रहकर न करो बात करीब आ जाओ", "दिल का खिलौना हाए टूट गया", "गाता रहे मेरा दिल", "रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना", "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही", "जरा सामने तो आओ छलिये", "मन डोले मेरा तन डोले", "होटो मे ऐसी बात मै दबा के चली आयी", "मिलो न तुम तो हम घबराए" ही व अशी अनेक गाणी अक्षरश: वीट येईपर्यंत ऐकलेली आहेत. गाणी गोड आहेत ओ ... पण कितीवेळा ऐकायची ती ? दर आठवड्यातून एकदा ? मग त्यातली मजा निघून जाणार नैका ?
.
.
तर माझी नावडती गाणी -

१) तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - गाणं गोड आहे. सुधा मल्होत्रांनी मस्त गायलंय. मुकेशने सुद्धा. पण माझा राग साहिर वर आहे. ती प्रेम व्यक्त करत्ये ... आणि हा तिला लेक्चर झाडतोय. काय डोक्याला त्रास आहे यार.

२) प्रीतीचं झुळझूळ पाणी - अगदी भिकार, तिडीक यावी असं गाणं

३) नही नही कोई तुमसा हसीन (स्वर्ग नरक) - हे निपोंचं एकदम आवडतं. पण मला अजिबात आवडत नाही. अर्थात तसं मी निपोंना कधीही सांगितलं नाही हा भाग वेगळा.

४) गाता रहे मेरा दिल - वीट आला त्याचा

५) जरा सामने तो आओ छलिये - का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही.

६) दिल का खिलौना हाए टूट गया - वीट आला

७) बिंदिया चमकेगी - भंकस गाणं आहे

८) ढल गया दिन ढल गई शाम ... जाने दो जाना है - अगदी भिकार गाणं.

९) मिलो न तुम तो हम घबराए

--

तुमची सर्वात नावडती गाणी कोणती ? - हिंदी वा मराठी

--
.
.
.
.

राजन बापट Fri, 15/04/2016 - 02:02

ही गाणी मी ऐकताना फॉरवर्ड करतो :
सिली हवा छू गई, सिला बदन छिल गया. - गुलजार, लता. कंटाळवाणे संथ लयीतले गाणे.
पानी पानी रे, खारे पानी रे - गुलजार, माचिस मधले गाणे. लता. कंटाळवाणे ||ध्रु||

या उलट काही गाणी "इट्स सो बॅड दॅट इट्स गुड" या सदरातली. ती इतकी भयावह आहेत की ऐकत राहून अशी गाणी कशी काय रेकॉर्ड होऊ शकली, असा प्रश्न पडतो.

शब्बीरकुमारची :
"तेरी मेहरबानियाँ तेरी कदरदानियाँ" - यात एकदाही तो सुरात नाही.
"पर्बतोंसे आज मैं टकरा गया" - डिट्टो.

नगरीनिरंजन Fri, 15/04/2016 - 10:34

In reply to by गब्बर सिंग

तू मुझे कुबूऽल मैं तुझे कुबूल
इस बाऽऽत काऽऽऽ
गवा खुदाऽऽ
खुदा गवाऽऽऽ
वै वै वै
खुदा गवाऽऽ

मोहम्मद अजीझला विसरू नका.
ह्यावरून आठवलं, विसरू नको श्रीरामा मला हे पण डोक्यात जातं. तशी बहुतेक गोऽग्गोड मराठी भावगीते डोक्यात जातात (म्हणजे "भावत नाहीत").

गब्बर सिंग Sun, 17/04/2016 - 23:22

In reply to by नगरीनिरंजन

विसरू नको श्रीरामा मला हे पण डोक्यात जातं.

आमच्या घरात हे गाणं लागलं की चारपाच कपबशा फुटतात.

फारएण्ड Sun, 17/04/2016 - 23:18

In reply to by गब्बर सिंग

सनी देओल च्या पदार्पणाच्या सिनेमात शब्बीर चा प्ल्रेबॅक घेण्याची कल्पना कोणाला व कशी सुचली याचा मेकिंग ऑफ बेताब असे काही असेल तर तो चॅप्टर वाचायला हवा. तीच कथा अमिताभची. किशोर जिवंत असताना शब्बीर चा आवाज वापरण्यापेक्षा तेव्हाच तो राजकारणात का नाही शिरला?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 15/04/2016 - 02:09

'शीशा हो या दिल हो ...' हे गाणं प्रचंड डोक्यात जातं. एकदा एक रेस्टाँरंटमध्ये ते बदलण्याची विनंती केली होती. प्रीतीचं झुळझूळ पाणी आणि बिंदिया चमकेगी या गाण्यांबद्दल अगदी, अगदी सहमत. 'शर्म आती है मगर' हे गाणं मला न समजणाऱ्या भाषेत असतं तर सहन करू शकले असते.

तसं 'बाग मे कली खिली' आणि 'दिन प्यार के आये है सजनियां' ही गाणी मला आवडतात किंवा नावडत नाहीत, यावर मला अजून विश्वास ठेवायचा नाहीये.

गब्बर सिंग Fri, 15/04/2016 - 02:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'शीशा हो या दिल हो ...' हे नखशिखांत भिकार गाणं आहे. रीना रॉय व जितेंद्र हे लालू-मुलायम आहेत.

"दिन प्यार के आये है" हे आज प्रथमच ऐकलं. पहिल्या ४५ सेकंदातच बंद करून टाकलं. हुश्श.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 15/04/2016 - 03:23

In reply to by गब्बर सिंग

'शीशा हो या दिल हो ...' हे नखशिखांत भिकार गाणं आहे. रीना रॉय व जितेंद्र हे लालू-मुलायम आहेत.

=)) निव्वळ थोर उपमा.

.शुचि. Fri, 15/04/2016 - 19:53

In reply to by गब्बर सिंग

'शीशा हो या दिल हो ...' हे नखशिखांत भिकार गाणं आहे.

+१
रीना रॉय अनबेअरेबल आहे.
जीतेद्रचे तोहफा तोहफा तोहफा तोहफा - लाया-लाया-लाया-लाया
हे देखील भिक्कार.

तिरशिंगराव Sat, 12/09/2020 - 08:38

In reply to by .शुचि.

एलपी हे बेसिकली बँडवालेच. दीदींनी हात दिला म्हणून वर आले. पारसमणी या चित्रपटाच्या गाण्यांनंतर त्यांनी खऱ्या अर्थाने मागे वळून बघितले नाही. मागे न बघितल्यामुळेच पुढे ते, चांगल्या दर्जाची गाणी म्हणजे काय, हे विसरुन गेले. एक बिंदिया चमकेगी वर पंचवीस गाणी बेतणं, हाथी मेरे साथी नंतर प्रत्येक गाण्याच्या मधल्या पीसमध्ये हत्ती ओरडणं हे प्रकार ते करतच राहिले.

'न'वी बाजू Fri, 11/09/2020 - 01:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'शर्म आती है मगर' हे गाणं मला न समजणाऱ्या भाषेत असतं तर सहन करू शकले असते.

उलट, मला समजणाऱ्या भाषेत असल्यामुळेच मी ते सहन करू शकतो.

त्यातल्या त्या 'अब हमें आप के कदमों में ही जीना होगा'चा अर्थ डोक्यात 'आता इत:पर मला तुझ्या तंगड्यांच्या मध्येच जगावे लागेल' असा आपोआप जुळून प्रचंड करमणूक होते. (चित्रही डोळ्यांसमोर उभे राहाते.)

(मग? शरम वाटायलाच पाहिजे तिला! इश्श!)

'न'वी बाजू Sat, 12/09/2020 - 17:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो, तो 'पडोसन' तर सपोज़ेडली तरुणाईचा पिच्चर आहे! (नाहीतर मठ्ठ माजलेला टिपिकल पंजाबी (की उत्तरप्रदेशी?) ब्लडीनॉर्थिण्डियनशाउविनिष्ट तरुण सुनीलदत्त आणि मूर्ख तरुणी सायराबानू (हे म्हणे हीरो-हिरॉइन!) ही काय (पारंपरिक असतीलही कदाचित (चूभूद्याघ्या.), परंतु) थेरडेशाहीची लक्षणे आहेत?)

(नि ती बिनडोक सायराबानू! त्या क्षणी ती त्या सुनीलदत्तच्या दोन तंगड्यांत उरलेले आयुष्यभर घालवण्याची 'सुखस्वप्ने' ('अय्या! कित्ती कित्ती मज्जा!') रंगवीत असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. हवेत बोटांनी 'बी-एच-ओ-एल-ए' अशी अक्षरेच काय गिरविते, न् काय न् काय! आयायायायाया! तिची लेव्हल तितपतच. हं, आता हिरॉइन ही असली बिनडोक, वारंवार नापास होणारी वगैरे आणि तितक्याच लेव्हलची दाखविणे हा जर तुम्ही पारंपरिक थेरडेशाहीचा भाग म्हणत असाल, तर गोष्ट वेगळी. मात्र, त्या दाव्यात कितपत तथ्य आहे, याबद्दल मी साशंक आहे. हिंदी चित्रपटांचा माझा विस्तृत आणि/किंवा सखोल अभ्यास नसल्याकारणाने, झटक्यात एकाहून एक अशी काउंटरउदाहरणे मी सादर करू शकणार नाही, परंतु (अशा हिरॉइनी दाखविणे) हा हिंदी चित्रपटांतील एक टिपिकल पारंपरिक (थेरडेशाही ऑर अदरवाइज़) पॅटर्न असल्याबद्दल मला शंका आहेत. इन एनी केस, (या चित्रपटातील) सायराबानू(च्या पात्रा)बद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारची सहानुभूती निर्माण होत नाही.)

किंबहुना, या चित्रपटातील कोठल्या पात्राबद्दल माझ्या मनात जर सहानुभूती (आणि ते वठविणाऱ्या कलाकाराबद्दल आदर) पैदा होत असेलच, तर ते पात्र म्हणजे मेहमूदचे!

तसे पाहायला गेले, तर हा पिच्चर काहीसा रेसिस्ट आहे. कथानक तितपतच आहे. कथानक तितपतच असण्यातही काही गैर आहे असे नाही, परंतु 'मद्राश्यांची टिंगल करणे' हा या चित्रपटाचा स्थायीभाव आहे. आणि, त्या 'एक चतुर नार' गाण्यात जे काही चालते, ते जर (उत्तरहिंदुस्थानसुलभ) ओव्हर्ट रेसिझम नसेल, तर मग ओव्हर्ट रेसिझम म्हणजे नक्की काय, असा प्रश्न मला पडतो. या असल्या भांडवलावर हे असले पिच्चर हे पंजाबात, उत्तरप्रदेशात नि महाराष्ट्रातच चालू शकतात. (हो महाराष्ट्रात! आपण मराठी माणसे काही कमी रेसिस्ट नसतो. आणि, सौथिण्डियन लोकांची टिंगल करण्याची वृत्ती परंपरेने आपल्यातही दांडगी असते. आता, आपल्याला ते पंजाब्यांउत्तरप्रदेश्यांइतके जमत नसेलही कदाचित - आफ्टर ऑल, दे आर द मास्टर्स ऑफ द आर्ट - परंतु, म्हणजे आपण ते करत नाही किंवा आपल्यात ती हौस नसते, असे मुळीच नाही. आणि, पंजाब्यांनी केले, तर त्यावर हसण्यात आपण सामील होऊ शकतो.)

तर या असल्या माहौलात, या मद्राशीडेनिग्रेशनमहोत्सवात स्वतःच्या अभिनयाने कोणत्याही प्रकारची भर न घालता, त्यात कोणत्याही प्रकारे सामील न होता, त्याच्या रिसीव्हिंग एंडला असलेल्या त्या मद्राश्याचे काम मेहमूदने सुरेख वठविले आहे. त्याबद्दल त्याला सलाम! (मी हॅट घालत नाही म्हणून, नाहीतर 'हॅट्स ऑफ!'सुद्धा म्हटले असते.) त्याच्या अभिनयातून (निदान मला तरी) त्या मद्राश्याच्या पात्राबद्दल सहानुभूती निर्माण होते. (लग्नाच्या वरातीच्या घोड्यावर बसल्यावर, 'त्या घोड्याला आज जरा जास्त खायला द्या, बरे का! बिचाऱ्याला आज डबल वजन उचलावे लागत आहे', असे म्हणू शकणाऱ्या माणसाची सेल्फ-डेप्रेकेटिंग विनोदबुद्धीच नुसती जागृत आहे असे नव्हे, तर तो सहृदयसुद्धा आहे - आतमध्ये कोठेतरी तो एक प्रचंड चांगला माणूस असला पाहिजे - हे लक्षात येते.) सिनेमाअखेरीस जेव्हा त्याचे सायराबानूच्या पात्राबरोबर लग्न होत नाही, तेव्हा 'सुटला!' असे वाटून 'हुश्श!' होते. (सुनीलदत्तच्या पात्राबाबत मात्र कोणतीही सहानुभूती वाटत नाही; उलट, 'ही डिज़र्व्ज़ एव्हरी बिट ऑफ व्हॉट ही इज़ गेटिंग इण्टू' असे होते.)

बरे, ते असो. 'एक चतुर नार'चे ओरिजनल वर्जन पाहिले/ऐकले आहेत काय?

तिरशिंगराव Sun, 13/09/2020 - 07:10

In reply to by 'न'वी बाजू

मद्राशांची टिंगल. अगदी हाच समज होऊन तामिळनाडुत कमल हसन त्याच्या मित्रांबरोबर अंडी आणि सर्व साहित्य घेऊन पिक्चर पाडायला थिएटर मध्ये गेले होते. पण त्याच्याच म्हणण्याप्रमाणे, ते थोड्याच वेळांत खो खो हंसत पिक्चर बघण्यांत रममाण झाले. त्यांत मद्राशांची टिंगल नसल्याचे सर्टिफिकेट खुद्द कमल हसननेच मागे दिले आहे.
फार्स बघताना कुठलीच गोष्ट सिरियसली घ्यायची नसते. नाहीतर किशोरचा हाफ टिकिट पण आवडणार नाही.
बाय द वे, त्या सिनेमातील सर्व गाण्यांपैकी, 'शर्म आती है मगर' हे एकच गाणं सर्वात चांगले आहे, असे आमचे मत आहे.

'न'वी बाजू Sun, 13/09/2020 - 07:53

In reply to by तिरशिंगराव

तामिळनाडुत कमल हसन त्याच्या मित्रांबरोबर अंडी आणि सर्व साहित्य घेऊन पिक्चर पाडायला थिएटर मध्ये गेले होते.

अंडी फेकून नाटक किंवा लाइव परफॉर्मन्स पाडणे शक्य आहे. अंडी फेकून सिनेमा कसा बंद पाडतात ब्वॉ?

म्हणजे, उद्या समजा दूरदर्शनवर (किंवा झीटीव्हीवर किंवा तत्सम कशावर तरी) काही दाखवत असतील, आणि ते पाडायचे असेल, तर मग स्वतःच्याच दिवाणखान्यातल्या टीव्हीसेटवर अंडी फेकणार काय?

लॉजिक कळले नाही.

('सिलसिला'मध्ये शशीकपूर मरतो, त्याची बातमी टीव्हीवर येते तेव्हा अमिताभ स्वतःचाच टीव्ही फोडतो, तशातलाच प्रकार झाला हा. टोटली इल्लॉजिकल. आमचा एक अमिताभपरमभक्त कझिन मात्र त्या स्टुपिडिटीला प्रचंड इंप्रेस झाल्याचे आठवते. 'काय सॉल्लिड दाखवलेय ना, अमिताभ टीव्ही फोडतो ते!' असो. (पण भक्तीत, आय गेस, सगळे माफ असते. त्या सीनमध्ये अमिताभ टीव्ही फोडण्याऐवजी - किंवा फोडताना - पादला जरी असता, तरीसुद्धा बहुधा हीच्च रिॲक्शन ऐकायला मिळाली असती, याची खात्री आहे. 'काय सॉल्लिड दाखवलेय ना', इ.इ. असो.))

त्यांत मद्राशांची टिंगल नसल्याचे सर्टिफिकेट खुद्द कमल हसननेच मागे दिले आहे.

कमल हासनचा मताधिकार अर्थातच मान्य आहे, परंतु, त्याचे सर्टिफिकेट हा (कोणत्याही बाबतीतला) अखेरचा शब्द कधीपासून होऊ लागला?

(सिनेमा थेट्रात अंडी फेकणाराचा कोणताही शब्द गांभीर्याने का घ्यावा, हाही आणखी एक प्रश्न.)

कमल हासनला आम्ही एका(च) गोष्टीकरिता मानतो. त्याची 'सदमा'मधली ॲक्टिंग अप्रतिम आहे. (त्याचे इतर पिच्चर मी पाहिलेले नाहीत, सबब, त्यांबद्दल आपला पास.) पण म्हणून उगाच काहीही?

असो.

बाय द वे, त्या सिनेमातील सर्व गाण्यांपैकी, 'शर्म आती है मगर' हे एकच गाणं सर्वात चांगले आहे, असे आमचे मत आहे.

ज्याचीत्याची आवड! (आम्हाला 'कोलावेरी डी' आवडते.) त्याला काय करणार?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 13/09/2020 - 07:58

In reply to by 'न'वी बाजू

कमल हासन ओव्हररेटेड वाटतो. 'हे राम' नावाच्या सिनेमात सुरुवातीला रानी मुखर्जीच्या पात्राचा खून होतो. तो प्रसंग अत्यंत बीभत्स आहे, निष्कारण. हिंसेचं निव्वळ पॉर्न. सिनेमाचं त्या घाणेंड्रेपणाशिवाय काही बिघडलं नसतं. असलं दिग्दर्शन करणाऱ्या इसमाला बटबटीतपणाखेरीज कसलंही श्रेय देण्याची माझी तयारी नाही.

'न'वी बाजू Sun, 13/09/2020 - 08:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'हे राम!' हा चित्रपट पाहिला होता खरा. त्याबद्दल विसरलोच होतो. आत्यंतिक बटबटीत आहे, हे मान्य.

ए ए वाघमारे Sat, 10/10/2020 - 09:58

In reply to by तिरशिंगराव

इसमे कुछ गडबड है.
पडोसन १९६८ चा. त्यावेळी कमल हसन १४-१५ वर्षांचा असेल.

'शर्म आती है मगर' हे एकच गाणं सर्वात चांगले आहे, असे आमचे मत आहे.

१००% सहमत. रिअ‍ॅलिटि शो वाले या गाण्याला हात लावत नाहीत.

तिरशिंगराव Sat, 10/10/2020 - 16:20

In reply to by ए ए वाघमारे

त्यानेच अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत हे सांगितले होते. ही ऐकीव माहिती नाही. १४ -१५ वर्षांची मुले या चित्रपटाला जाऊ शकत नव्हती ? तो काही ॲडल्ट मूव्ही नाही.
मीही साधारण त्याच वयाचा असताना पाहिला होता.
The first Hindi film I saw was Padosan, and that too because I was told that the Tamil community was lampooned in the film through Mehmood’s character. And I ended up becoming a fan of Hindi cinema.

https://www.asianage.com/bollywood/he-knows-i-am-fan-boy-945

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 13/09/2020 - 07:38

In reply to by 'न'वी बाजू

अत्यंत फालतू सिनेमे बनवणं हे थेरडेशाहीचं लक्षण अजिबात नाही. हल्लीच्या काळातही 'क्वीन'सारखे आत्यंतिक रेसिस्ट सिनेमे निघतात आणि ढतम बाई त्यात स्त्रीवादी वगैरे म्हणून दाखवली जाते. लोक असले भिकारचो^ सिनेमे थोर म्हणत डोक्यावर घेतात.

'पडोसन'मध्ये किशोर कुमारच्या पात्राबद्दलही किंचित सहानुभूती वाटते. "भोले नीचे से" म्हणून तो जी अजिजी दाखवतो, ती मला नेहमीच हवी असते. लताबाईंना जरा वरचा सूर लावला की मी न चुकता "भोले नीचे से" म्हणून ओरडते. (म्हणूनच का काय, बऱ्या अर्ध्यानी सरळ हिंदी-आंग्लेतर गाणी ऐकायला सुरुवात केली.)

'चतुर नार'चं मूळ व्हर्जन गोड आहे. आवडलं.

मेघना भुस्कुटे Fri, 15/04/2016 - 02:13

अहाहा! काय भारी धागा आहे...

नाना कारणांनी गाणी आवडत नाहीत. शब्द हे एक महत्त्वाचं कारण असतं अनेकदा. उदाहरणार्थ आनंद बक्षी या कवीची गीतकाराची गाणी ऐकून माझी अनेकदा चिडचिड होते. 'हसाता है कभी, कभी रुलाता है, दिल तो पागल है, दिल दिवाना है'? अरे काय? लोक ऐकतात म्हणून सोपेपणाच्या नावाखाली काहीही जुळवाल का?

असो. धागा अत्यंत आवडण्यात आल्या गेल्या आहे. टप्प्याटप्प्याने भर घालीन.

मेघना भुस्कुटे Fri, 15/04/2016 - 11:42

- 'चिक् मोत्याची माळ' हे एक गाणं पृथ्वीतलावरून नष्ट केलं गेलं पाहिजे. ते केवळ अनंत काळ, अनंत ठिकाणी, भयानक पट्टीतून माथी मारलं जातं हाच त्याचा दोष आहे.

- पण 'जाती हूं मैं, जल्दी है क्या' हे 'करण-अर्जुन'मधलं गाणं वास्तविक ऐकायला वाईट नाही. शब्दही तसे निरुपद्रवी आहेत. पण चित्रीकरण? गलिच्छ प्रकार आहेत. तेवढ्याकरता शाहरुख-काजोलला बडवून काढावं असं वाटतं आणि आपण हे काय बघतो आहोत असं वाटून लाज-लाज होते.

- राजेंद्रकुमार असलेली सगळी गाणी. त्या माणसाला 'आपला पुरुष' असं मानण्याचं नाटक तरी कसं करू शकलं कुणी? कसा आहे तो!

- 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' हे किंचाळगाणे. ते आर्त वगैरे अजिबात नाही, धन्यवाद. शिवाय त्यात गिरीश कर्नाड इतके भाडोत्री वावरतात की स्मिता पाटील टोटल डोक्यावर पडलेली बाई वाटू लागते. अगं, काय त्या पुरुषाला तुझ्यात रस तरी आहे का? सकाळी जॉगिंग आल्यावर एखादी बाई दिसल्यासारखा तुझ्याशी वागतो आहे तो... असं होतं.

- 'रोज रोज आँखों तले' हे गाणं मला अत्तिशय आवडतं. गुलजार आणि आशा आणि आरडी यांचं अफाट कॉम्बो आहे. पण पडद्यावर ते पाहिलं तेव्हा मी अवाक होऊन मिनिटभर मुकी झाले. संजय दत्त? आणि ती अळणी-व्यक्तिमत्त्वहीन-घोडतोंडी नटी? काय सत्यानाश आहे त्या गाण्याचा, संताप झाला.

प्लीज बूच मारू नये.

राजेश घासकडवी Fri, 15/04/2016 - 03:19

'जिथ्थे सागरा, धरणी मिळते, तिथ्थे, तुझी मी, वाट पाहाते, वाट पाहाते' हे गाणं मला त्यातल्या सर्व स्वल्पविरामांसकट डोक्यात जातं. त्यात अशी जागा या पृथ्वीतलावर हजारो मैल पसरलेली आहे, दर भरती ओहोटीनुसार बदलते वगैरे तक्रारी नाहीतच. नुसतं गाणंच पुरेसं आहे.

'गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा' हे गाणं मी मूळ आवाजात एखाददोन वेळाच ऐकलेलं असेल. पण एरवी ऐकलेलं आहे हे भिकाऱ्यांनी काढलेल्या आर्त स्वरात. त्यामुळे तेही अत्यंत नावडतं आहे.

रोचना Mon, 18/04/2016 - 13:22

In reply to by राजेश घासकडवी

आमचा एक भाऊ हे गाणं "जिथ्थे सागरा, धरणी मिळते, तिथ्थे, तुझी मी, वाट लावते, वाट लावते" असंच गातो.

फारएण्ड Fri, 15/04/2016 - 03:56

धमाल धागा. माझे टॉप ५ खाली देतोय. पण इथे दोन प्रकारची गाणी दिसत आहेत - एक म्हणजे मुळात आवडलेली पण अनेकदा ऐकून वीट/कंटाळा आलेली, व दुसरी मुळातच न आवडणारी. ही माझी दुसर्‍या प्रकारची:

१. थोडा रूक जायेगी तो तेरा क्या जायेगा. रफी आवडतो, पण ते विविध आवाजात म्हंटलेले "हो कामनी" डोक्यात जाते.
२. नजर ना लग जाये किसीकी राहोंमे - ओ माय लव्ह. तोच प्रकार
३. अ‍ॅन एव्हिनिंग इन पॅरिस टायटल वाले (किंबहुना त्यातली कोणतीही)
४. शब्बीर ची बेताब सोडून कोणतीही
५. तू मेरा रब, मौला, इबादत, सजदे, दुवाँए - छाप शब्द असलेली कोणतीही.

या धाग्याला उगाच कॉप्लेक्स करण्याचा धोका पत्करून (आणि गब्बर व घासूगुर्जी येथे असताना मी हे करू शकतो असे समजण्याची जुर्रत करण्याचाही धोका पत्करून) - अजून एक डायमेन्शन आहे. काही गाणी ऐकायला अतिशय सुंदर पण चित्रीकरण भिकार अशीही असतात.

"अर्धे" आवडणारे गाणे असा काही प्रकार असेल तर "तेरा होने लगा हूँ" हे त्यात. आलिशा चिनॉय च्या सुंदर आवाजानंतर हे गाण्यात पुलं म्हणत तसे कोणाबद्दलतरी काहीतरी आनंददायक सांगितले आहे अशी शंका येइपर्यंत तो अत्यंत रड्या आवाजात 'तेरा...." चालू करतो.

गब्बर सिंग Fri, 15/04/2016 - 05:54

In reply to by फारएण्ड

काही गाणी ऐकायला अतिशय सुंदर पण चित्रीकरण भिकार अशीही असतात.

झकास कल्पना. ही कल्पना मेघनाच्या या धाग्याच्या बर्‍यापैकी उलट आहे.

ए ए वाघमारे Fri, 15/04/2016 - 09:06

In reply to by गब्बर सिंग

काही गाणी ऐकायला अतिशय सुंदर पण चित्रीकरण भिकार अशीही असतात.

माझा आवडता टाइमपास..सावकाश धागा उघडायचा विचार आहे..उघडू का?

अमित.कुलकर्णी Fri, 15/04/2016 - 11:29

In reply to by फारएण्ड

ऐकायला सुंदर पण चित्रीकरण भिकार -- या वर्गीकरणात आँखोंसे जो उतरी है दिल में या गाण्याचा नंबर पहिल्या पाचात लागावा.
हे गाणे (गझल?) ऐकायला अतिशय सुंदर आहे, पण चित्रीकरण मात्र केवळ थर्डक्लास!
आशा पारेखचे हास्यास्पद हावभाव, गाण्याच्या शेवटी शेवटी एक्स्ट्रा पैकी एक बाईचे पाय घसरून पडणे हे "सो बॅड" प्रकारात मोडू शकते.
प्रतिभा असती तर या गाण्याच्या चित्रीकरणाचे "रसग्रहण" केले असते.
शेवटी १-२ सेकंद होणारे राजेंद्रनाथ चे दर्शन हेच फक्त (मजेशीर / अचरट) सुखद वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 15/04/2016 - 04:22

'मुझे हक है' हे विवाह नामक बडजात्यापटात असलेलं गाणं मला भीषण नावडतं. भिकारोत्तम गाणं असं बिरुद त्याला द्यायला हरकत नाही. 'इट्स सो बॅड...' हे सुद्धा म्हणता येणार नाही. शब्द फॉग, संगीत फॉग, चित्रीकरण फॉग, चित्रपटातली गाण्याची सिच्युएशन फॉग, उदित नारायण आणि श्रेया घोषालचे आवाजही फॉग. त्यातून हे गाणं एकीच्या फोनमधली अलार्म ट्यून आणि रिंगटोन होती; हे बघून त्या गाण्याला फाशी देण्याची इच्छा झाली होती. दुर्दैवाने गाण्यांना फाशी देता येत नाही, हे रागाचा भर ओसरल्यावर लक्षात आलं.

आणखी मला नावडणारं म्हणजे 'निंदीया से जागी बहार'.... त्यात कूऽऽऽके म्हणायला लागल्यावर तिथेच पीन अडकावी आणि कूऽऽऽच्या पुढे काही ऐकू येऊ नये अशा आसुरी इच्छा निर्माण होतात. संगीतामुळे मनोवस्था बदलू शकते याबद्दल आधी विश्वास नव्हता. पण हे गाणं माझ्या आयुष्यात नवं ज्ञान घेऊन आलं.

.शुचि. Fri, 15/04/2016 - 19:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तिथेच पीन अडकावी आणि कूऽऽऽच्या पुढे काही ऐकू येऊ नये अशा आसुरी इच्छा निर्माण होतात.

कूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ =)) आई ग्ग! __/\__

'न'वी बाजू Tue, 15/09/2020 - 06:51

In reply to by .शुचि.

तर तर! शिकाऊ व्हायोलिनवादन ॲट पॉइंट ब्लँक रेंज म्हणजे कसे, हे जर समजावून सांगायचे असेल, तर उदाहरणादाखल उत्तम नमुना आहे तो, 'हे असे!' म्हणून सांगायला. फक्त, तो आवाज एखाद्या व्हायोलिनमधून येत नसून, लताबाईच्या नरड्यातून येत आहे, इतकाच काय तो फरक.

नितिन थत्ते Fri, 15/04/2016 - 06:51

रंगीला रे हे गाणं मला का कोण जाणे अजिबात आवडत नाही.
दारू प्यायल्याची अ‍ॅक्टिंग वहिदा रेहमानला मुळीच जमलेली नाही. आणि गाणंही फारसं आवडलं नाही.

गाता रहे मेरा दिल हे अतिमारामुळे आवडत नाही की सिनेमात बाकी रफीची सुंदर गाणी असताना हे किशोरकुमारचे गाणे मिसफिट वाटते हे कळत नाही.

ए ए वाघमारे Fri, 15/04/2016 - 09:44

In reply to by नितिन थत्ते

किशोरकुमारचे गाणे मिसफिट वाटते

अगदी बरोबर अंदाज आहे.मलाही तीच शंका होती.विविध भारतीचा स्टार अनाउन्सर युनूस खानने काही दिवसांपूर्वीच शेअर केलेल्या नवीन माहिती नुसार विजय आनंदने कोलकात्यात बर्‍याच वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत हे कबूल केलंय. ते वाचा इथे...
http://learningandcreativity.com/silhouette/vijay-anand-interview/

घाटावरचे भट Fri, 15/04/2016 - 09:08

या धाग्यात नव्वदीच्या दशकातील सुनील शेट्टी-संजय दत्त-सैफ अलि खान-अक्षय कुमार आदि मंडळींच्या बहुतेक सर्व चित्रपटांतील बहुतांश गाणी बसतील. पण ती 'सो ब्याड...' प्रकारातील आहेत.

मी एक आशा भोसलें-कुमार सानू जोडीनी गायलेलं गाणं ऐकलं होतं. त्यात 'दिल ही तो है, दिल का क्या है, जिस पे आया, उस पे आया' असे वगैरे शब्द होते. मी ऐकलेलं बहुतेक ते सर्वात भिकार गाणं.

ए ए वाघमारे Fri, 15/04/2016 - 09:45

शेकडो गाणी आहेत...चला सुरूवात करूया..
१. ओ सायबा...ओ सायबा (सोनू निगम- चित्रपट माहीत नाही.फक्त विभावरच ऐकलंय)
२.आजकाल पांव जमींपर नही पडते मेरे (कर्कश लता स्पेशल)
३.दिल ने फिर याद किया बर्कसी लहरायी है..(टायटल ट्रॅक,संगीतकार सोनिक-ओमी)
४.मेर्रे नसीबमें तू है के नही..तेर्रे नसीबमें...(कर्कश लता स्पेशल)
५.आपकी कसम(टायटल ट्रॅक)
६.निसर्गराजा.....
७.जिंदगीकी ना टूटे लडीइइइइइ...(सिनेमा-तोच फारएण्ड स्पेशल.हेमा मालिनीने रंगोलीचं अ‍ॅंकरिंग करताना दर रविवारी हे गाणं लावून वीट आणला होता.)

तसंच चांगली गायलेली टुकार गाणी असा पण एक धागा काढायला हवा..उदा
०१. राजू..चल राजू..अपनी मस्तीमे तू..(किशोर..सिनेमा आझाद..बहुधा घोड्याला उद्देशून हे एकमेव गाणे असावे)
०२. साला मै तो साब बन गया..(याच्यातही घोडाच आहे..दोन पायांचा)

.शुचि. Fri, 15/04/2016 - 19:59

In reply to by ए ए वाघमारे

०१. राजू..चल राजू..अपनी मस्तीमे तू..(किशोर..सिनेमा आझाद..बहुधा घोड्याला उद्देशून हे एकमेव गाणे असावे)
०२. साला मै तो साब बन गया..(याच्यातही घोडाच आहे..दोन पायांचा)

=)) =)) __/\__

अनु राव Fri, 15/04/2016 - 10:01

राहुलदेव बर्मन ( १९७५ वगैरे च्या नंतर ) आणि राकेश रोशन ( ज्युली वगैरे अपवाद सोडुन ) ह्या लोकांची जाम डोक्यात जातात.
डोक्यात जातात ह्याचे कारण म्हणजे त्यांच्या चाली तुमच्या लक्षात रहातात, पण एकुण गाणे फॉर सम रीजन डोक्यात जाते.

घनु Fri, 15/04/2016 - 10:42

काही अती हीट झालेली गाणी अजिबात आवडत नाहीत.

धडकन आणि मन सिनेमाची गाणी अशक्य डोक्यात जातात.
धडकनची विशेषतः
दिल ने य कहा हे दिलसे
तुम दिल की धडकन मे
ना ना करते प्यार हाय मै कर गई (तुझ्या 'ना ना' ची टांग)

मन
मेरा मन क्यू तुम्हे चाहे
नशा ये प्यार का नशा है
काली नागिन के जैसे ब्लाब्लाब्ला...

रिक्षा वापरणं तर बंदच केलं होत मी त्या़ काळात कारण रीक्षावाल्यांनी उत आणला होता हे गाणे वाजवून. हे सिनेमे आले तेव्हा मी कॉलेजात होतो. कॉलेजची प्रेमी युगलं (चोट खाई हूयी) रडायची वगैरे ती धडकन ची गाणी ऐकून. मला मात्र ती गाणी ऐकली की मी रिक्षावाला झालोय अशीच स्वप्नं पडायची आणि मजबुरी म्हणून रिक्षा चालवतोय ह्यापेक्षा मजबुरी म्हणून मलाही रिक्षेत ही गाणी वाजवावी लागताहेत ह्याचं जास्त वाईट वाटायचं, नशिब स्वप्नच होतं ते.

आदूबाळ Fri, 15/04/2016 - 11:12

In reply to by घनु

अवांतर:

मेरा मन क्यू तुम्हे चाहे

एका मित्राच्या तीर्थरूपांचं नाव हिरामण होतं. मेरा मन च्या जागी हिरामण फिट्ट बसतं हा शोध लागल्यावर प्रलय झाला. त्या मित्राचं हे गाणं नक्की नावडतं असणार.

सिफ़र Fri, 15/04/2016 - 12:32

In reply to by घनु

बिपाशाचा Raaz नावचा भिकार सिनेमा होता त्यातली सगळी गाणी.
मस्ती सिनेमातलं "दिल दे दिया है".... मला आवडत नाही हे कळल्यावर कॉलेजात मित्र मला हे गाणं हॉस्टेलच्या खोलीत बंद करून ५-६ दा सलग ऐकवायची... *$%%^^**XXXXXXX असो!

घनु Fri, 15/04/2016 - 14:11

In reply to by सिफ़र

अगदी अगदी...रा'झ' ची गाणी अतिशय झ झ होती... तो ही एक रिक्षाछाप अल्बम होता.
आणि ते दिल दे दिया है गाणं... आई गं #$#@%@^#$^#%&$&%^*

अभ्या.. Fri, 15/04/2016 - 18:47

In reply to by घनु

मला धडकन, रझ आणि मनची सगळी रिक्षा जख्मी दिल छाप गाणि बेसुमार आवडतेत.
एक ओळ ऐकली की पुढची प्रेडिक्ट करता येते. मीटर मापात, बीटस आणि मुझिक सारे काही मापात असते.

.शुचि. Fri, 15/04/2016 - 20:01

In reply to by घनु

मला मात्र ती गाणी ऐकली की मी रिक्षावाला झालोय अशीच स्वप्नं पडायची आणि मजबुरी म्हणून रिक्षा चालवतोय ह्यापेक्षा मजबुरी म्हणून मलाही रिक्षेत ही गाणी वाजवावी लागताहेत ह्याचं जास्त वाईट वाटायचं, नशिब स्वप्नच होतं ते.

आई ग्ग!!! काही काही कमेन्टस कहर आहेत =)) ही त्यातलीच.

प्रथमेश नामजोशी Fri, 15/04/2016 - 11:03

काही वर्षांखाली एक पंजाबीटाईप गाणं आलं होतं. त्यात बराच वेळ 'पेंडी प्वॉ प्वॉ प्वॉ' असंच काहीतरी होतं. हॉरिबल.

राही Fri, 15/04/2016 - 11:12

चल संन्यासी मंदिर में आणि तत्सम उगाच किंचाळून म्हटलेली (लताची)गाणी. आ जा आयी बहार, दिल है बेक़्अरार वगैरे
सावन का महीना.
मैं तुलसी तेरे आंगन की. फक्त ही ओळ आवडते. पुढचे गाणे स्टॉप.
मुकेशची बहुतेक सर्व एकसुरी गाणी. कहीं दूर जब दिन ढल जाये सोडून.
सगळ्यात वाईट चित्रीकरण. जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात. भाभू त्याच्या दुर्दम्य ठोकळेगिरीमुळे अजूनही विसरला जात नाहीय. जिंदगीभर नहीं भूलेंगे.

राही Mon, 18/04/2016 - 14:18

In reply to by 'न'वी बाजू

मोहम्मद रफींच्या मधाळ आवाजामुळेच ते गाणं माझ्या लिस्टीतून बाद होता होता राहिलं. (आवडत्या गाण्यांच्या.) इथे तलत महमूद किशोर कुमार यांची कल्पनासुद्धा करवत नाही. तिलिस्माssत की रात.. आहाहा.

चार्वी Fri, 15/04/2016 - 11:25

*'त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली' ही ओळ आवडत नसल्यामुळे आमच्या पणजीबाई 'बगळ्यांची माळ फुले' रेडिओवर लागलं, की रेडिओ लगोलग बंद करायच्या. नारळीच्या झाडाचं काय कौतुक! नारळीच्या झाडाखाली कोणी बसतं का?

* 'चिक मोत्याची माळ'शी सहमत. इइइ

* नावडती गाणी: गुरू परमात्मा परेषु आणि सारेगमप मपधनीसा (मध्य मंद्र अन् तार म्हणे). या दोन गाण्यांवर शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाच बसवायचे लोक. आमचा एक वर्गमित्र ऑफ तासाला ही गाणी गायचासुद्धा :-(

* आदेश बांदेकर भावजी होण्यापूर्वी सह्याद्रीवर तक धिना धिनचं सूत्रसंचालन करायचा. त्यात भेंड्या खेळताना लोक तीच तीच गाणी बेसूरपणे गायचे. ती डोक्यात जायला लागली: ला जून हा सणे अन् हा सून ते पहा णे, लटपट लटपट (हे खरं किती गोड गाणं आहे! शब्दही.), रेशमाच्या रेघांनी वगैरे.

अनुप ढेरे Fri, 15/04/2016 - 11:28

In reply to by चार्वी

सारेगमप मपधनीसा

हे गाणं आवडतं. गणपती उत्सवाचा मूड हे आणि अजून एक दोन ठेवणीतली गाणी ऐकू आल्याशिवाय जमत नाही.

आदूबाळ Fri, 15/04/2016 - 11:58

- मी राधिका मी प्रेमिका ... आरती अंटि वेडेवाकडे चेहरे करून गातात ते पारच डोक्यात जातं. चालही पत्त्यातल्या चॅलेंज डावासारखी आहे. म्हणजे "और एक सत्ती" लावावी तसं "मी... (और एक) मी... (और एक) मी... (और एssक) मीsssss.... राधिका!" अरे काय!

- स्वप्नील बांदोडकरची राधा कृष्ण टैप गाणी. डायव्हर्सीफिकेशनची आयुष्यातली गरज पटवून देणारी गाणी.

- गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थ वगैरे. माझ्या एका नातेवाईकांकडे "घरातलं वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी" ही गाणी लूपमध्ये टाकलेलं खास यंत्र आहे. कानाच्या पडद्याखाली हे अव्याहत ऐकू येतं आणि थोड्या वेळाने मानसिक संतुलन ढासळेल की काय असं वाटतं.

- पब म्युजिक. फक्त बीट्सचा धाडधूड आवाज येतो, शब्दच काय, चालही कळत नाही. (याला ब्रिट पब अपवाद आहेत. त्यात गाणी नसतात, 'फिटबाs' असतो.)

–-------
उलटंही होतं - आपल्याला अमुक प्रकारचं संगीत आवडणार नाही असं आपल्याला वाटत असतं, पण प्रत्यक्ष ऐकल्यावर आवडायला लागतं. एका क्याबवाल्याने "नॉनस्टॉप ५१ भीमगीतं" ऐकवली होती, आणि त्यातली बरीचशी आवडली होती.

घाटावरचे भट Fri, 15/04/2016 - 12:36

In reply to by आदूबाळ

>>आरती अंटि वेडेवाकडे चेहरे करून गातात ते पारच डोक्यात जातं.

त्यांच्या सांगीतिक क्षमतेचा, विद्वत्तेचा आणि मोठेपणाचा आदर करूनही असं म्हणावसं वाटतं की हे गाणं गाताना त्यांचा चेहेरा सारखा कोणीतरी त्यांना इंजेक्शनची सुई टोचतय असा होत असतो.

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 12:39

In reply to by घाटावरचे भट

खी खी खी, अतिशय सहमत. बाकी वेडेवाकडे चेहरे तर भीमसेन जोशीही करायचेच म्हणा. नुस्ते चेहरेच नव्हे तर हातवारेही. पण त्यात मजा असायची काहीतरी. या केसमध्ये मजाही येत नव्हती.

अनु राव Fri, 15/04/2016 - 12:38

In reply to by आदूबाळ

आबा - ती स्वप्नील बांदोडकरांची गाण्या बद्दल सहमत.

तसेच च्या ओव्हर हाईप्ड "ऋतु हिरवा, ऋतु बरवा" तर लगेच डोक्यात चढते, अगदी उलटी होते.

गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थ

ह्याच्याशी पण सहमत. त्यात तो वाडकर गात असला तर अशक्य होते.

अनु राव Fri, 15/04/2016 - 12:41

In reply to by बॅटमॅन

वाडकरच. तो विशाल भारद्वाज का त्याला गाणी देतो ते कळत नाही.

चप्पा चप्पा चरखा चले मधे त्याला सुखवींदर बरोबर गायला दिले आहे. कसे तरीच वाटते त्याला त्या गाण्यात ऐकताना.

घाटावरचे भट Fri, 15/04/2016 - 13:42

In reply to by आदूबाळ

शास्त्रीय संगीतवाल्यांपैकी सर्वात विनोदी हावभाव करून गाणारे गायक/गायिका हा ही एक संशोधनाचा विषय होऊ शकेल (त्यांच्या विद्वत्तेविषयी पूर्ण आदर राखून). भीमसेन जोशी हे त्यातलं अग्रगण्य नाव.

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 13:44

In reply to by घाटावरचे भट

पण भटोबा, तुम्ही सांगा बघू, भीमसेन जोशींचे हातवारे वगैरे बघायला मजाही यायची. नुस्ती एरंडेली तोंडे करत नसत. ते एकूण सर्व पाहताना या माणसाला काहीतरी खूप मजा वाटतेय आणि ती तो शेअर करतोय असं जाणवतं.

घाटावरचे भट Fri, 15/04/2016 - 13:55

In reply to by बॅटमॅन

ते एकूण सर्व पाहताना या माणसाला काहीतरी खूप मजा वाटतेय आणि ती तो शेअर करतोय असं जाणवतं.

माफ करा, पण मला तर असं काही नाही जाणवलं बॉ. एक काम करा यूटूबवर एक मियां मल्हाराचा व्हिडो आहे भीमण्णांचा. तो बघा. त्यातले पेट्ट हावभाव म्हणजे -
१. हवेत बघत हाताने 'किती छान किती छान' असे हावभाव करणे
२. हवेतून काहीतरी खाली आणतोय असे हावभाव करणे
३. बसल्या बसल्या जमिनीला नाक घासणे
४. जात्यावर दळणे

म्हणूनच म्हणतो की भीमसेन जोशी गाताना ऐकायला भारी वाटतात, बघायला नाही. असो. त्यांचा दोष नाही. त्यांचे गुरुजी असले हावभाव संगीत नाटकात स्त्री भूमिकेत गाताना करायचे म्हणतात.

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 13:57

In reply to by घाटावरचे भट

हाहाहाहाहाहा.

असेल बॉ, आमचा अभ्यास नै इतका. काही व्हिडिओ बघून जे जाणवलं ते लिहिलं इतकंच.

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 14:02

In reply to by अनु राव

इंडीड! त्याचमुळे थंडीत नागवे सोडल्यावर येतील तसले आवाज काढणारे ते युरोपियन संगीतही आवडते. त्यासोबतचा वाद्यमेळ हेही एक कारण आहे म्हणा ते आवडण्याचे.

मेघना भुस्कुटे Fri, 15/04/2016 - 13:51

In reply to by अनु राव

हां, तो कायच्या काय चेहरे करतो. का आपण या माणसावर होणारे इतके अत्याचार पाहत वर करमणूक म्हणून एन्जॉय करतोय, असा प्रश्न पडून कळवळायला होतं.

बॅटमॅन Fri, 15/04/2016 - 13:36

In reply to by अनु राव

अगदी सहमत. तुलनेने जुनी गीते मात्र छान earthy वाटतात. भटी असली तरी. ही नवभटी गीते मात्र नै आवडत.

ऋषिकेश Sat, 16/04/2016 - 14:16

In reply to by बॅटमॅन

दे ट्टाळी! भावगीतांइतका पीळकाढू प्रकार नसावा! काय बोअर करतात राव!
थांब तुझ्यातून भाव कसे निघत नाहित, थांब त्यांना खेचूनच बाहेर काढतो असा नुसताच आततायी आवेश (गाणार्‍यांचा नी त्याहून अधिक चाहत्यांचा ;) ) नी प्रत्यक्षात अगदीच पुचकावणी शब्द!

मला म्हणून कोळीगीते, लावण्या वगैरे लय आवडतात!

बॅटमॅन Mon, 18/04/2016 - 14:22

In reply to by ऋषिकेश

थांब तुझ्यातून भाव कसे निघत नाहित, थांब त्यांना खेचूनच बाहेर काढतो असा नुसताच आततायी आवेश (गाणार्‍यांचा नी त्याहून अधिक चाहत्यांचा (डोळा मारत) ) नी प्रत्यक्षात अगदीच पुचकावणी शब्द!

अतिप्रचंड सहमत. पण यांच्या जरा अगोदरची अगदी भटी वळणाची गाणीही अधिक 'अर्दी', अस्सल आणि जोमदार वाटायची. लोकशाहीर रामजोशी या पिच्चरमध्ये गायलेल्या सर्व लावण्या एका भटानेच रचलेल्या असूनही काय जोम आहे, वाह! काय तो आवेश आणि अस्सलता! फार आवडली त्यातली सर्वच गाणी.

रेड बुल Fri, 15/04/2016 - 12:27

ए बच्चु तु सनले मेरे दिलका ये ऑर्डर हे गाणे डोक्यात जाते.

चर्लीज एंजल्स १ साठी वापरलेले "Independent Women" अजुन एक थर्डक्लास गाणे. हे मात्र कधीच डोक्यात जात नाही कारण याला मी पायाच्या वर कधी येउच देत नाही.