चांदण्यांच पांघरूण
चांदण्या भरलेलं आकाश सापडेल का हो कुठे?
किती दिवस झाले आता निवांत जगून.
एकदा हे जगण्याचं ओझ उतरवून ठेवायचंय
मला पुन्हा चांदण्यात झोपायचय
होस्टेलवर नाईट मारायची म्हणून गच्चीवर पडीक रहाव
जीएफ की मैत्रीण असले प्रश्न न पडता मी तुझ्याशेजारी पडून रहावं
हे ऐक कसलं भारीये म्हणून तू तुझ्या हेडफोनचं एक टोक माझ्या कानात घालावस
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचय
स्पर्शाची शब्दांची गरज भासू नये इतकं आपलं मौन बोलक असाव
वार्याने उडणार्या माझ्या केसांना तू हलकेचं मागं कराव
मग ते नाही उडाले तरी तू त्यांच्याशी खेळत रहावंस
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचय
बोचर्या थंडीत मी नकळत तुझ्या मिठीत शिराव
माझी झोप लागेपर्यंत तू स्तब्ध पडून रहावं
पहाटे जाग आली की तू पांघरुन गेलेल्या जॅकेटला मला कवटाळयाचय
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचंय
चांदण्या रात्रींची ती आस तुझ्याही मनात जिवंत असावी
बदललेले संदर्भ विसरून गच्चीत तू माझी वाट पहावी
समाजाच्या चौकटींना झुगारुन मला तुला मिठीत घ्यायचय
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचंय
गच्चीत तू माझी वाट पहावी
;) हां आता जमलय.
___
कविता आवडली.