गिल्बर्ट टेकडी गावदेवी दुर्गादेवि मंदीर अंधेरी पश्चिम.

करड्या रन्गाच्या जटा आणि सफेद दाढी सोडुन गुगलेमहाराज शन्ख वाजवित्त बसले होते. त्यान्च्या त्या भयानक डोळ्यांकडे पाहुन मी म्हणालो महाराज किती बकाल झाली आहे ही मुम्बई? जिकडे तिकडे टोलेजन्ग इमारती, अतिक्रमणे , रहदारीतील अमाप वाढ आणि घाण. ह्या मुम्बईत समुद्र सोडुन काही प्राचीन आहे का?

माझ्या या बोलण्याकडे पाहात गुगले बाबा भेसुर हासले आणि म्हणाले अजाण बालका,.......या मुम्बईत अशि एक टेकडी आहे जी कित्येक दशलक्ष वर्षान्पासुन उभी आहे. किती अतिक्रमणे , आणि काय काय पाहिले असेल या टेकडीने! गिल्बर्ट टेकडी! हा हा हा हा हा हा हा हा ! एकदा जाउन पाहाच. पण ही टेकडी पाहायला जाताना तुला खुप संयम ठेवला पाहिजे. म्हणजे समजेल. एवढे बोलुन ते आपल्या कुटीत विश्रान्तीला गेले........(काल्पनिक )

बरेच दिवस जालावर (गुगले महाराज) वाचलेल्या गिल्बर्ट टेकडी या ठिकाणी जायचे ठरवून ठेवले होते. अखेर २४ डिसेम्बर ला हा योग आलाच.

अंधेरी पश्चिमेला वीर देसाई रस्त्याला जाताना भुवन्स महाविद्यालयाजवळ ही अतिप्राचीन टेकडी आहे. सुमारे ६६ दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीतून निर्माण झालेली
ही बेसाल्ट दगडापासून तयान झालेली ही टेकडी केवळ प्रेक्षणीय आहे. टेकडीवरून मुंबईचे विहंगम दृश्य दिसते. शिवाय घार , गरुड हे पक्षी जवळून पाहायचे असल्यास
यासारखे ठिकाण नाही. हे पक्षी मी पाहिले पण प्रकाशचित्रे घेवू शकलो नाहि. अतिक्रमणापासून ही टेकडी वाचली आहे हे मुंबईकरांचे भाग्य!

टेकडीवर गावदेवीचे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरामुळेच ही टेकडी अतिक्रमणापासून वाचली आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.

टेकडीला जाण्यासाठी अंधेरी पश्चिम वरून २५४ क्रमांकाची बेस्ट बस घावी आणि भुवन्स महाविद्यालयाजवळ उतरून चालत जावे. टेकडी ला जाताना अरुंद रस्ते ,नाला आणि घाणीचे साम्राज्य असल्यामुळे मनाची चिडचिड होते आणि कुणीतरी सूडबुद्धीने आपल्याला फसवण्यासाठी उगाचच हे ठिकाण सांगितले आहे असे वाटते. मी गेलो त्या दिवशी ईद ए मिलाद असल्यामुळे , या अरुंद रस्त्यांवर खूप गर्दी होतॆ. तरीही विचारत विचारत(गुगले बाबांच्या संयम ठेवण्याच्या सल्ल्याप्रमाणे) मी या ठिकाणी पोहोचलो आणि जेव्हा मी या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अशा रस्त्यावरून केवळ पाचशे मीटर चालून आलेली शिण आणि चिडचिड कुठल्या कुठे पळाली. सुमारे दोनशे पायऱ्या (दहा मजले) एवढ्या उंचीवर ही टेकडी आहे. वर गेल्यावर मुंबईचे विहंगम किंवा वास्तव(?) दृश्य दिसते. टोलेजंग इमारतीत लुप्त झालेले हे ठिकाण पाहण्यासारखेच. हे एक पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. मी दुपारी गेलो होतो. सकाळी येथील वातावरण आणखीनच प्रसन्न असेल .

काही फोटो देत आहे.

1

2

3

4

5

33

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जय-विजय आणि देवीचा फोटो आवडला. मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईतल्या या टेकडीचे वैशिष्ट्य ती प्राचीन आहे हे नव्हे. ही टेकडी हा मुंबईच्या मूळ सात बेटांपलीकडे साष्टी बेटाचा भूभाग आहे आणि ही टेकडी जितकी प्राचीन, जवळ जवळ तितकेच हे बेटही प्राचीन म्हणता येईल. तसे तर हे बेटच नव्हे, तर मुंबईची इतर बेटे किंबहुना कोंकण किनारपट्टी, सारा महाराष्ट्र, संपूर्ण पृथ्वीच कमी-अधिक प्राचीन आहे. ही टेकडी बसाल्ट पाषाणाची बनलेली आहे. खरे तर हेही याच एकमेव टेकडीचे वैशिष्ट्य नव्हे. बसाल्ट पाषाण महाराष्ट्रात, विशेषतः सह्याद्रीत सर्वत्र दिसतो. तर इथले वैशिष्ट्य म्हणजे या बसाल्टची कॉलम्नर रचना इथे स्पष्ट दिसते. (दिसत असे.) ही रचनासुद्धा दुर्मीळ नव्हे, सह्याद्रीच्या अनेक कड्यांमध्ये अशी प्रस्तररचना दिसते. मुंबईतल्या अनेक टेकड्या भुईसपाट झाल्या. ही अजून थोडीफार शिल्लक आहे. त्यामुळे अगदी थेट सह्याद्रीच्या मुख्य धारेशी न जाताही अशी रचना इथे दिसू शकते. बसाल्टचे स्तंभ दुरून पाहाताना अतिशय आकर्षक दिसतात. कुठेकुठे तर ही रचना मानवनिर्मितच असावी असे वाटावे इतके स्पष्ट हे स्तंभ दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवीचा फोटो सुंदर आहे.
मी मुंबैत अख्खा जन्म घालवुनही अजुन ही टेकडी बघितली नाही आहे. Sad
एक सांगू का? राग नसावा.
टायपो मिस्टेक की तुम्हाला माहित नाही म्हणुन ते मला माहित नाही...
पण ते भुवन्स नाही तर भवन्स कॉलेज आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

तसेच वीर देसाई मार्ग नव्हे, वीरा देसाई मार्ग.

आजवर असंख्य वेळा हे टेकाड पाहिलेय पण कधी वर चढून गेलो नाही!!

माहीती छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का
चुक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद!
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

छान. फोटो बघुन आधी दहिसरच्या भावदेवीच्या टेकडीचा फोटो आहे की काय असे वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुंबैच्या विहंगम दृष्याचा फटू नाहिये काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

1

2

3

4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आम्ही १९६५ पासून अंधेरीत रहात आहोत. माझ्या बहिणीच्या भूगोलाच्या पुस्तकात या टेकडीचा फोटो होता. आमच्या डोळ्यांदेखत, काही वर्षांत ही टेकडी अर्धी कापून काढली गेली (लँड माफिया) तेंव्हा सरकारला जाग आली. त्यानंतर ती आहे त्याच आकाराची राहिली आहे. त्याच्या जवळच्या नवरंग थिएटर मधे आम्ही अनेक चित्रपट पाहिले आहेत. पण कधी टेकडीवर गेलो नाही, कारण पूर्वी त्याला झोपडपट्टीचा वेढा होता. आता माहित नाही. अंधेरी स्टेशनपासून चालण्याच्या अंतरावरच ही टेकडी आहे.

अंधेरी पश्चिमेला वीर देसाई रस्त्याला जाताना भुवन्स महाविद्यालयाजवळ ही अतिप्राचीन टेकडी आहे

ही माहिती अपुरी आहे. अंधेरी स्टेशनकडून वर्सोवा रोडला पायी जायला लागले की दोन फाटे फुटतात. त्याआधीच ती टेकडी डावीकडे आहे. त्या दोन फाट्यांपैकी उजवीकडील फाटा, डोक्यावर मेट्रोला मिरवत वर्सोव्याला जातो. त्या रस्त्यावर पुन्हा उजवीकडे वळले तर वीरा देसाई रोड येतो.डावीकडचा फाटा जरा चढाचा रस्ता आहे. त्याने गेल्यास पुढे भवन्स कॉलेज येते. तोही फाटा भवन्सजवळ उजवीकडे वळून पुन्हा वर्सोवा रोडलाच मिळतो. मुद्दा हा की टेकडीकडे जाताना वीरा देसाई रोडचा संबंधच येत नाही.

- ५० वर्षे अंधेरीकर असलेला तिमा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५० वर्षे अंधेरीकर असलेला तिमा

हल्ली बरेच वर्षात त्या भागात गेलो नसलो तरी अंधेरीशी माझे नाते बरेच जुने. आत्या भूता हायस्कूल जवळ, अंधेरी (पूर्व) येथे तर मामा पश्चिमेकडे वीरा देसाई रोडवर.

अंधेरी स्टेशनकडून वर्सोवा रोडला पायी जायला लागले की दोन फाटे फुटतात

मला आठवते त्यानुसारे, अजून एक रस्ता सबवेखालून, आंबोली गावठाणातून वीरा देसाई रस्त्याकडे जायचा. रस्त्याच्या पलीकडे मोठे-मोकळे सावली मैदान! आणि त्यापलीकडे धाके कॉलनी.

बरोबर ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर.
मी वीरा देसाई रोड च्या बसने गेलो होतो म्हणून चूक झाली सांगण्यात.
तिरशिंग राव एकदा जाऊन या छान ठिकाण आहे.
आजुबाजुला झोपड्यांचा वेढा आहेच. तुम्हि म्हणता तसा. झोपड्या दिवसेदिवस वाढतच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

बरोबर.
मी वीरा देसाई रोड च्या बसने गेलो होतो म्हणून चूक झाली सांगण्यात.
तिरशिंग राव एकदा जाऊन या छान ठिकाण आहे.
आजुबाजुला झोपड्यांचा वेढा आहेच. तुम्हि म्हणता तसा. झोपड्या दिवसेदिवस वाढतच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम