डॉ.कुमार विश्वास..

कोई दिवाना केहता है, कोई पागल समजता है,
पर इस धरति कि बैचैनी तो बस बादल समजता है
मैन तुमसे दुर कैसा हुँ तु मुझसे दुर कैसी है,
ये तेरा दिल समजता है या मेरा दिल समजता है.

हळुहळू मुक्तक पुढे सरकत जातं आणि आपल्याला कुमार विश्वास या नावाची, त्यांच्या शब्दांची नशा चढु लागते. संपूर्ण माहोल बदलून जातो, नजर पोह्चते तिथपर्यंत जमलेली गर्दी, त्यांच्या टाळ्या-शिट्ट्या, मधेच हास्याचा फवारा आणि या सगळ्यात मनाला भिडणारी डॉक्टरांची शायरी.....काही काळासाठी एक वेगळीच दुनिया निर्माण होते.
मग आपल्या समोर पुढचं मुक्तक डॉ. सादर करतात,

कोई पत्थर की मूरत है, किसी पत्थर में मूरत है
लो हमने देख ली दुनिया, जो इतनी खुबसूरत है

जिथे डॉ. पोचलेले नाहित तिथे या ओळी पोचलेल्या असल्याने पुढच्या ओळी आपोआपच जमाव डॉ. बरोबर त्यांच्याच चालीत म्हणु लागतो...

कोई पत्थर की मूरत है, किसी पत्थर में मूरत है
लो हमने देख ली दुनिया, जो इतनी खुबसूरत है
जमाना अपनी समझे पर, मुझे अपनी खबर यह है
तुझे मेरी जरुरत है, मुझे तेरी जरुरत है

सगळ्यांच्या तोंडून ओळी ऐकल्यानंतर डॉ. मिश्किलपणे म्हणतात,
इनको तो सब मालूम है फिर मुझे बुलाया क्यों?
आणि पुन्हा टाळ्या आपली जागा घेतात. एवढं असुनही कुठे तरी हात शांत असतात. मग पुढचं मुक्तक त्या 'शांतीप्रिय' लोकांना उद्देशुन येत,

हमारे शेर सुनकर भी जो खामोश इतना है
खुदा जाने गुरुर ए हुस्न में मदहोश कितना है
किसी प्याले से पूछा है सुराही ने सबब मय का
जो खुद बेहोश हो वो क्या बताये होश कितना है

हळुहळू डॉ. कार्यक्रमाच्या उत्तर्धाकडे येतात. प्रेमकवितांपासुन सुरुवात झालेला हा प्रवास देशभक्ती वर येउन एक थांबा पकड्तो. मग एक कविता उलगडते,

शोहरत ना अता करना मौला, दौलत ना अता करना मौला
बस इतना अता करना चाहे, जन्नत ना अता करना मौला
शम्मे वतन की लौ पर जब कुर्बान पतंगा हो
होंठो पर गंगा हो, हाथ में तिरंगा हो

त्या चाली बरोबर प्रेक्षकही एकेरी टाळ्या वाजवत ताल पकडतात आणि एका समांतर गतीत पुढची कडवी आपआपलं स्थान उलगडून दाखवू लागतात,

बस एक सदा ही सुने सदा, बर्फीली मस्त हवाओं में
बस एक दुआ उठे सदा जलते तपते सहराओं में
जीते जी इसका मान रखे, मरकर मर्यादा याद रहे
हम रहे कभी ना रहे मगर, इसक सज धज आबाद रहे
गोधरा ना हो, गुजरात ना हो, इंसान ना नंगा हो
होंठों पर गंगा हो, हाथों में तिरंगा हो

गीता का ज्ञान सुने न सुने, इस धरती का यशगान सुने
हम शब्द-कीर्तन सुन ना सके, भारत माता का जय-गान सुने
परवर-दिगार मैं तेरे द्वार पर ले पुकार ये कहता हूँ
चाहे अजान ना सुने कान पर जय जय हिंदुस्तान सुने
जन-मन में उच्छल देश प्रेम का,जलधि तरंगा हो
होंठों पर गंगा हो, हाथों में तिरंगा हो..

वेळेच्या मर्यादेतच डॉ. थांबतात. प्रेक्षकांची रजा घेतात. हळुहळू गर्दी कमी होते. बाहेर पडणारा मात्र मनात शब्द घेउन बाहेर पडतो,
कोई दिवाना केहता है, कोई पागल समजता है...............

field_vote: 
0
No votes yet