'लोकप्रभा' वाचा आणि वाचू नका!

'लोकप्रभा' हे साप्ताहिक मी 'दैनिक सकाळ' सारखेच 'नेसेसरी एव्हिल' म्हणून वाचत असतो. गेल्या वर्षी वर्षभर कणेकरांचे 'मेतकूट' खपवून घेतले. या वर्षी जाहिरातींचं जग हे सदर चालवून घेण्याची पाळी अहे असे दिसते. पण ते असो. सुमारसद्दी आहेच आणि तिच्याविषयी फारसे काही लिहावे असे नाही. पण 'लोकप्तभा' च्या या वर्षीच्या अंकांमधील दोन सदरे मुद्दाम वाचावी अशी आहेत. एक तर रामदासांचे आठवणीतले ब्रॅन्ड हे सुरेख सदर. एकतर या सदरामागची कल्पनाच भन्नाट आहे. आणि दुसरे लिहिणारे रामदास. दुसरे मला आवडलेले सदर म्हणजे मिलिंद कुलकर्णींचे कोकणचो डॉक्टर आपल्या कोकणातल्या डॉक्टरकीविषयी कुलकर्णींनी लिहिलेले अनुभव मुळातून वाचावे असे आहेत. 'आमच्या कोकणातल्या बाईच्या डोक्यावर एक तरी फूल माळलेले असते, तोंडात पान असते आणि हातात तिचे फळ म्हणजे मूल असते. अशी पान, फूल, फळवाली माझी कोकणी आऊस, बहीण, वयनी माझ्याच कुटुंबाचा भाग झाली आहे. ही स्त्री खरोखरच कर्तृत्ववान आहे. परिस्थितीने तिला चाणाक्ष केले आहे. भाजावळीपासून ते झोडणी-मळणीपर्यंत ती भातशेतीत राबते, अंगण स्वच्छ सारवते. संध्याकाळी तुळशी वृंदावनावरचा दिवा चुकवत नाही. कुळथाची पिढी, भात, पेज, डाळ रांधते. मच्छीकढी बनवते. कधी तरी थोडय़ाशाच चिकनमध्ये मस्त सागुती बनवते. पोरांचा अभ्यास घेत नाही, पण त्यांना अभ्यासाला बसवते. या स्त्रीविषयी मला फार फार आदर आहे.' अशा साध्या साध्या वाक्यांनी सजलेले हे सदर मला खूप वाचनीय वाटते. कुलकर्णींनी असेच दर्जेदार लिहावे आणि अशा लेखनाचे एक पुस्तक निघावे असे मला वाटते.

लेखातील दुवे योग्य त्या पानावर निर्देश करतील असे हलविले आहेत.-संपादक

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

अरे वा! आठवणीतले ब्रँड म्हणजे कल्पना उत्तम आहेच, शिवया 'कोडॅक मोमेंटस' हा लेखही आवडला. रामदासांचे लेखन असे नियमीत वाचायला मिळणार याचा आनंद आहे! रामदासांचे अभिनंदन व शुभेच्छा!

कोकणचो डॉक्टर वाचतो आणि मग अभिप्राय देतो. जाहिरातींच्या जगाबद्दाल सावध केल्याबद्दल आभार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रामदासकाकांनी लोकप्रभेत लिहायल्या सुरूवात केल्यापासून दर शुक्रवारी पहिल्यादा लोकप्रभा उघडते
आतापर्यतचे त्यांचे लेख एकाहून एक सरस आहेत

मिलिँद कुलकर्णी यांचा आधीचा लेखही वाचनीय आहे
कोकणातील पेशंटाच वर्णन त्यातल्या बोलीभाषेसकट छान व्यक्त केलय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वा! लोकप्रभा आवर्जून उघडावा असे दिवस परत आलेत! आम्हीच भाग्यवान! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ते कोकणातलो डॉक्टर सदर आवडलं. रामदासकाकांचा लेख नेहमीप्रमाणेच मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा. लोकप्रभा वाचायला चांगली सबब आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर परत आठवण करून द्यायला म्हणून हा वर आणतोय हि टिप्पणी लिहून. लोकप्रभातली 'कोकणचो डॉक्टर' हि अप्रतिम लेखमालिका चुकवू नका.

BTW, रामदासांचं 'आठवणीतले ब्रँड' सदर गेल्या तीन अंकात नाहि दिसलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

योगायोगाची गोष्ट म्हणजे शशिकांत सावंत यांचा लोकप्रभेतला लेख नुकताच वाचला आणि हा धागा वर आलेला पाहिला.
सावंतांच्या लेखाचा दुवा : http://www.lokprabha.com/lokprabha/20120504/vachan_ved.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.