..विचारेन त्यालाच कॉफी चहा..
..विचारेन त्यालाच कॉफी चहा..
भरोसा करावा कुणाचा जरी..
भरोसाच नाही कशाचा जरी..!
विचारेन त्यालाच कॉफी चहा
घरी दूत आला यमाचा जरी
मिळो गार माझी तुला सावली
किती त्रास मजला उन्हाचा जरी
मनी मान्य केले शशीचोर मी!
खुळा आळ आहे नभाचा जरी.
म्हणे वाघ गेल्याच जन्मातला
अता जन्म आहे सशाचा जरी
किती त्यात जो तो पुरा गुंतला
खरा खेळ होता मनाचा जरी
अरे वाकला तो कशाने असा.?
तसा भार नव्हता जगाचा जरी!
खरा भक्त त्याला मिळो एकदा
तिथे प्रश्न असला युगाचा जरी!
- कानडाऊ योगेशु
हो ना!
यम (वा त्याचा दूत यानी कि पर्सनल रेप्रेझेंटेटिव) जर घरी आला, तर फक्त त्यालाच कॉफी-चहा विचारणे बरोबर आहे काय? त्याच्याबरोबर आलेल्या त्याच्या रेड्याचा काही विचार? तो तर बिचारा इतकी तंगडतोड करतो, वर मेलेल्यांची ओझी (= dead weight)... त्याची थोडीसुद्धा विचारपूस नको? अरे, काही माणूसकी आहे की नाही? निदान त्याला हवे-नको ते विचारून, फुटक्या/कान तुटलेल्या कपातून का होईना, पण अर्धा कप चहा तरी द्यायचा. (रेड्याला कॉफी म्हणजे टू मच होते हे एक वेळ मानून चालू. पण चहासुद्धा नाही? काय दार्जीलिंग द्यायला नाही सांगत आहे; पण गेला बाजार 'वाघ बकरी' तरी द्याल की नाही?) पण नाही!
- ('च'ची भाषा चांगलीच समजणारा) 'न'वी बाजू.
विचारेन त्यालाच कॉफी चहा..
मस्तच!
"विचारेन त्यालाच कॉफी चहा
घरी दूत आला यमाचा जरी!" : क्या बात है!