"नक्षत्रांचे देणे/ सदाचेच उणे "

(What does it matter how many lovers you have if none of them gives you the universe?
: Jacques Lacan)
एक बिछान्यात / एक खाटे खाली
प्रियकर दोन / गालावर लाली
रात्र तिची अशी/ जरी मस्त झाली
उदासी चढे ती / पहाटे-सकाळी
नक्षत्रांचे देणे / कोणी दिले नाही
दूर त्या आभाळी / रिक्त डोळा पाही
कल्पनांचे डोळे/ जरी अमानवी
प्रियकर तिचे / मानव मानवी !
नक्षत्रांचे देणे/ सदाचेच उणे
मानवाचे बल/ जाणोनिया घेणे!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जिसका जितना आंचल है,
उतनी सौगात उसको मिली|

भले प्रेमिक युनिव्हर्स देत असेल तुमची झोळीच थिटी असेल तर त्यात चांदण्या मावणार कशा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0