यम-यमी संवाद

old literature.

यम-यमी संवाद

मानववंश बुडून लयास जाऊ नये म्हणून, 'यमी' आपल्या भावाला समागमास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करते. प्रेमरसाने थबथबलेल्या आपल्या मोहक वाणीने यमीने यात भावाला वळविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यम तिचा धिक्कार करतो, त्या वेळीं त्याची वाणीही सौम्य असून निश्चयाची आहे. परमेश्वराने घालून दिलेल्या सनातन धर्माचे उल्लंघन होऊ नये, यासाठीं एकाच रक्तामांसाच्या स्त्रीपुरुषांनी विवाहपाशांत बद्ध होणे अनुचित आहे असे यमाने यमीस सांगितले आहे. या भाषणामध्ये नाट्यमय आवेश आहे, परंतु दुर्दैवाने यांतला बराचसा भाग दुर्बोध होऊन बसला आहे.

यमी : गुप्त व प्रशस्त अशा अर्णव प्रदेशात जाऊन माझ्या पूज्य सख्याला मी संभोगसुखांसाठी अभिमुख करू इच्छिते. पृथ्वीवर उत्कृष्टगुण असा कोणी तरी व्हावा अशी इच्छा करणारा विधाता तुझा गर्भ माझे ठिकाणी ठेवो.

परंतु यमीने आपलाच ह्ट्ट चालवून पुन्हा म्हटले की, मानववंश कायम राहावयासाठी तुझा माझा संगम व्हावा अशी देवांचीच इच्छा आहे. यम जसजसा नाहीं नाही म्हणे तसतशी यमी अधिक अधिकच उत्कंठित होत जाई.

यम : तुझा सखा असल्या प्रकारचे सख्य इच्छीत नाही. कारण, जी समानरूप नात्याची आहे ती विषमरूप नात्याची होईल. महाप्रज्ञावान्‌ असुराचे पुत्र वीर आहेत. द्यावादी लोक धारण करणारे आहेत. ते सर्वत: पाहतात.

यमी : एकाच ठिकाणी सहशयन करण्याचा यमविषयक काम यमीचे ठिकाणी आला आहे. मी माझी तनू पतीपुढे जाया करते त्याप्रमाणे तद्वधीन करते. रथचक्र आणि अक्ष यांप्रमाणे एकमेकांस आलिंगन देऊ.

यम: देवांचे हेर जे येथे संचार करितात ते कोठेही थांबत नाहीत व डोळेझाक करीत नाहीत. हे प्रहार करणारे, तू त्वरित अन्य पुरुषाकडे जा व त्याला रथचक्र आणि अक्ष यांप्रमाणे आलिंगन दे.

तथापि यमी अधिकाधिकच बेफाम होऊन तिची यमाला आलिंगन देण्याची इच्छा सारखी बळावत जाते. तरीही यम वारंवार तिला झिडकारतो. अखेरीस संतापून जाऊन यमी म्हणते -

यमी : हे यमा, तू अती दुर्बल झाला आहेस. तुझी मला कीव येते. तुझे मन व हृदय तुझ्या ताब्यात मुळीच नाही हे मला कळते. कक्षारज्जू ज्याप्रमाणे अश्वाला परिवेष्टन करते किंवा लता ज्याप्रमाणे वृक्षाला परिवेष्टून असते त्याप्रमाणे दुसरी कोणी तरी तुला खात्रीने परिवेष्टून आहे.

यम: तर मग तू दुसर्‍यालाच लता वृक्षाला आलिंगन देते त्याप्रमाणे दृढ आलिंगन दे व तोही तुला तसेच आलिंगन देवो. तू त्याचे मन जोडून घे. तो तुझे घेवो व नंतर त्याच्यासह गोड अनुभव घे.

यमयमीसंवादाचा शेवट काय झाला हे समजत नाही. पुढच्या वाङ्मयातही याबद्दल माहिती मिळत नाही. हे ऋग्वेदांतील सूक्त म्हणजे एक शिरोविहीन धडाप्रमाणे आहे. मात्र वरील उताऱ्यावरून याचे मूळ एक उत्तम काव्य असावे एवढे स्पष्ट होते.

यम = जुळा, यमे हे त्याचे स्त्रीलिंगी रूप.

ऋग्वेद, मं. १० सू. १०, यम-यमी संवाद

महाराष्ट्रीय ज्ञानकोश, प्रस्तावनाखंड, विभाग दुसरा – वेदविद्या, प्रकरण दुसरे - वेदप्रवेश-ऋग्वेद - दुवा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

या नंतरच्या काळातील धर्मसुत्रांमध्ये काही विशिष्ट पापांना "महापातक" वा "अतिपातक" ठरवण्यात आले. यात प्रामुख्याने ब्राह्मणहत्ये इ. च्या जोडीने स्व-मातेशी गमन, स्व-कन्येशी गमन, स्वतःच्या सुनेशी गमन यांचा समावेश करण्यात आला. या महापातक केलेल्या व्यक्तीला उंच कड्यावरुन झोकुन देणे , अग्निप्रवेश ही प्रायश्चित ठरवण्यात आले.
त्यानंतर अजुन पुढील काळात ब्राह्मणाने जरी वरील अतिपातके केली तरी त्याने वरील प्रायश्चित करु नये असे बदल ही या धर्मसुत्रांच्या नियमात केले गेले. अर्थात यात ब्राह्मणाने वरील पातके करावीत असे प्रोत्साहन नसुन त्याचा जीव वाचला पाहीजे ही भुमिका असण्याची शक्यता जास्त आहे.
गौतमबुद्ध सिद्धार्थ चा स्वतःच्या कुलात होत असलेल्या सख्या बहीण भावांच्या विवाहाचा व त्यायोगे कुलपावित्र्य शुद्ध बीजाचा अभिमान मिरवणारी वचने, ब्रह्माच्या प्रतिकाचा निषेध इ. वरील प्रमाणे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या एका केमिकल प्रोसेस मधे, एरंडेल तेलापासून सिबॅसिक अ‍ॅसिड व २-ऑक्टॅनॉल बनवत असू. त्यांत पहिले अ‍ॅसिड आहे आणि दुसरे अल्कोहोल. त्या दोन्हीची पुन्हा रिअ‍ॅक्शन करुन आम्ही डाय-२-ऑकटील सिबॅकेट नावाचे प्लास्टिसायझर करायचो. माझा एक मित्र, या दुसर्‍या रिअ‍ॅक्शनला यम-यमी असे म्हणत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगरावांच्या मनात रसायनं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या संवादाची पार्श्वभूमी नक्की काय आहे? मला जे अंधूकपणे आठवतं आहे त्यात यम व यमी हे दोघेच उरलेले होते, त्यामुळे त्यांनी नाईलाजाने संभोग करून मनुष्यजातीचा विस्तार केला अशी काहीशी गोष्ट आहे. पण या संवादात तर इतर स्त्रिया व पुरुषांचा उल्लेख आहे. त्यामुळे थोडा गोंधळून गेलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यम-यमीविषयी अशी कथा (किंबहुना विश्लेषण) माझ्या ऐकिवात आहे, की सूक्तरचनापूर्व कालात भाऊ-बहीण यांच्यात लैंगिक संबंध असणे निषिद्ध मानलेले नव्हते. पण हे सूक्तरचनाकालाच्या आसपास हे निषिद्ध मानले जाऊ लागले. यमीची विनंती पूर्वीच्या प्रथेचा निर्देश करते, तर यमाचा नकार नवीन प्रथेचा निर्देशक आहे.
भाऊबिजेला यमद्वितीया असेही म्हणतात. या सणाचा या सूक्तातील कथानकाशी काहीतरी संबंध असावा असेही वाचले होते. बंगालात भाऊबिजेला ओवाळताना बहीण जे गाणे म्हणते, त्यातही 'यमी लावते यमाला टिळा (तिलक), मी लावते माझ्या भावाला टिळा' अशा अर्थाच्या ओळी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला जे अंधूकपणे आठवतं आहे त्यात यम व यमी हे दोघेच उरलेले होते, त्यामुळे त्यांनी नाईलाजाने संभोग करून मनुष्यजातीचा विस्तार केला अशी काहीशी गोष्ट आहे.

मला खात्री आहे की ही नक्की त्या वै.५ दु. "ह्या:-आमच्या-पवित्र-संस्कृतीत-असे-असेलच-कसे-काहीतरीच"-वादी संस्कृतिसंरक्षकांनी नंतर कधीतरी केलेली पांढरधुलाई आहे म्हणून. तुम्हाला आठवतेय ती ष्टोरी नक्कीच खोटी असणार! आणि हेच पुरोगामी ऐतिहासिक सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्होल्गासे गंगा तक या राहुल सांकृत्यायन यांच्या ग्रंथातील पहीले प्रकरण या संदर्भातील खुलासा नेमकेपणाने करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सुक्तात १4 ऋचा आहेत. लेखात सर्व ऋचांचा उल्लेख केला नाही आहे. त्यातली १२ वी ऋचा स्पष्ट सांगते बहिण आणि भावाचे संबंध त्या समाजाला मान्य नव्हते

न वै ओं इति ते तन्वा तन्वं सं पपृच्यां पापं आहुः यः स्वसारं नि-गच्चात्
अन्येन मत् प्र-मुदः कल्पयस्व न ते भ्राता सु-भगे वष्टि एतत् ॥ १२ ॥
चल जा. तुझ्या शरीराशी मी आपले शरीर कदापि भिडवणार नाही. आपल्या भगिनीकडे जो जातो त्याला अधम म्हणतात बरे! तर हे भाग्यशालिनी, माझ्याशिवाय दुसर्‍या पुरुषापासून आनंद प्राप्त करून घे. मी तुझा भाऊ ह्या गोष्टीची मुळीच इच्छा करीत नाही १२. (सत्संगधारा)

ऋग्वेद काळात भटकणारा समाज स्थिरावळा. शेती इत्यादी करू लागला. त्या काळच्या ऋषींना विकृत संतति आणि परीवारांतर्गत शारीरिक संबंध यात साम्यता आढळली. अशा संबंधांवर त्यांनी प्रतिबंध लावला. आपल्या ज्ञान भांडारात अर्थात वेदात यम -यमी या आख्यानाच्या माध्यमातून याची नोंद केली आणि श्रुती स्मृतीच्या माध्यमातून परीवारांतर्गत संबंध उचित नाही हे लोकांपर्यंत पोहचविले.

८ व्या ऋचात सर्वत्र नजर ठेवणार्या देवांच्या दूतांचे वर्णन आहे. स्पष्ट आहे, त्या काळात असे संबंध ठेवणार्यांना दंड दिल्या जास्त असेल.

हा संवाद त्या काळी विवाह संस्थेच्या स्थापनेच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल होते. पुढे श्वेतकेतू आख्यान आहे. त्यात कुठल्या हि स्त्रीला एकाच पुरुषा बरोबर संबंध ठेवण्याचा आदेश दिला आहे. अर्थात श्वेतकेतू ने भारतात विवाह संस्थेची स्थापना केली असे हि म्हणू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैतिकतेबद्दल एक लेख वाचत होते. काय वाचताय मध्येही त्या लेखाचा उल्लेख मी केलेला आहे. त्यात एक अवघड प्रश्न लोकांना विचारलेला हा होता -
.
ट्रेन प्रवासात बाऊ बहीण परस्पर संमतीने देहसुख घेतात. मूल होऊ नये म्हणून काँडम वापरतात. यामध्ये तुम्हाला काही वावगे वाटते का.
बरेच जण, बहुसंख्य जण उत्तर हेच देतात की हो हे वावगे आहे. पण का ते त्यांना नीट स्पष्ट करता येत नाही.
- मूल तर होणार नाही त्यामुळे विकृत संततीची भीती नाही
- बळजबरीही नाही कारण परस्पर संमतीतून हे सौख्य दिले-घेतले गेलेले आहे.
.
मग नक्की आक्षेप कशाला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग नक्की आक्षेप कशाला आहे?

जो स्वतःच्या बहिणीला सोडत नाही तो कुणाला सोडेल, अशी मनांत भीति असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा अ‍ॅडल्ट कन्सेसुअल सेक्सचा आहे. पण ते एक असो.
इतिहासाचार्य राजवाड्यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' मध्ये या यम-यमी प्रकरणाचे विवेचन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पुराणातले दाखले न घेता काही नवीन घ्या ना.संस्कृत आहे ,काय छान काव्य आहे ,किती छान उपमा आहेत हे पटवा.दुसरं काय नाही.ऋग्वेद येईल मनु येईल पुन्हा तीच हाणमारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो कशाला यम यमी संवादापर्यंत जाताय,गुगलला भाऊ बहिण असा सर्च देऊन बघा काय स्टोरीज येतात ते,माझ्या माहीतीत सख्ख्या नात्यात संबंध नसतात ,पण मामे ,मावस, आत्ये भाऊ बहिणींचे आपाआपसात बरेच पुढे गेलेले प्रकार ऐकलेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

प्रश्न - आपल्याकडे मामाच्या आणि आत्याच्या मुलांशी लग्न करणे प्रचलित आहे, मग काकांच्या आणि मावशीच्या मुलांशी लग्न का नाही होऊ शकत? काय कारण असावे यापाठीमागे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे काही ठोस कारण नाही,प्रचलीत प्रथा आहे.महाराष्ट्रात काही भागात मामा भाची यांचेही लग्न होते,मुस्लिम समाजात चुलत भाऊ बहिण यांचा निकाह होऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

राजीव नाईक यांच्या 'आताची नाटकं-सततची नाटकं-मधली नाटकं' या मालिकेत यम-यमी, इंद्र-इंद्राणी, अगस्ति-लोपामुद्रा ही मंडळी भेटली होती. त्यामुळे या तुकड्यानं धक्का दिला नाही.

नीतिकल्पनांच्या स्थित्यंतरामधला एक सांधा दाखवणारी ही जोडगोळी खरी मदतीला आली, ती फॅनफिक्शनमधल्या इन्सेस्टच्या गोष्टी वाचताना. मला त्या गोष्टी - खर्‍यातर कधीही - पचवता आल्या नाहीत. व्यक्तिस्वातंत्र्याचा तांत्रिक मुद्दा मान्य केल्यानंतरही मला 'कसंसंच' होत राही. पण त्यांत व्यक्तिचित्रणाचे आणि जैविक आकर्षणांचे अगदी निराळे, नवीन पैलू असत आणि मला ते जाणून घ्यायचे असत. त्या वेळी यम-यमी आठवून मी अनेक गोष्टी वाचल्या. आपल्या सांस्कृतिक संचितात असलेल्या गोष्टी आज गैरलागू असल्या, तरीही परक्या वा नव्या संकल्पना समजून घेताना त्यांचं निव्वळ असणंही किती मदतीचं, दिलासादायी असतं ते मी तेव्हा अनुभवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन