वॅलेंटाईन्स डे

अलार्मच्या आवाजाने मी जागा होतो आणि डोळे किलकिले करून बाहेर बघतो.

मिनेसोटामधली एक निःशब्द, थंडगार, आळसलेली हिवाळी सकाळ बाहेर उगवते आहे.

‘स्नूझ’ चं बटण दाबता दाबता मी अलार्मक्लॉकमधली तारीख बघतो.

फेब्रुवारी १४ - वॅलेंटाईन्स डे…

आज मी काय करणार आहे ते मला आठवतं आणि माझ्या लक्षात त्यातली आयर्नी येऊन मी स्वतःशीच हसतो. प्रेमदिनाच्या मुहूर्तावर मी आज एक पाप करायला निघणार आहे. माझ्या आणि ललिताच्या मेलेल्या प्रेमाचं श्राद्ध घालायला…एका दुसरया स्त्रीच्या मिठीत…

येस, आय ऍम गोईंग टू हॅव ऍन अफेअर. ऍण्ड टुडे इज द डे आय ऍम गोईंग टू बिगीन इट.

का करतोय मी हे?

मी वळून ललिताकडे बघतो. ती चुळबुळून कुशी बदलते आणि पलिकडे तोंड करून झोपते. किंग-साईझ बेडवर आम्ही दोघं बेडच्या दोन बाजू पकडून झोपलो आहोत. माझ्या मनात विचार येतो, दोघांच्या मध्ये एक भलामोठा सुमो पैलवान आरामात झोपेल एवढी जागा आहे!
माझं मन फ्लॅशबॅक घेऊन मागे मागे जातं. ललिता मला पहिली कधी भेटली, ते आठवत नाही, एवढंच आठवतं की केव्हातरी आम्ही प्रेमात पडलो होतो. ‘प्रेमात पडलो’ असं तेव्हा वाटत होतं, पण आता लक्षात येतंय, त्यात शारिरीक आकर्षण आणि हॉर्मोन्सपलिकडे कधीच काही नव्हतं. एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत, या गैरसमजुतीत आम्ही लग्न केलं आणि दोनतीन वर्षांचा हनिमून पिरियड संपल्यावर हळूहळू लक्षात यायला लागलं, वी आर ऍज डिफरंट ऍज चॉक ऍण्ड चीज…

फास्ट फॉरवर्ड फिफ्टीन यिअर्स…

दोन रूम पार्टनर्स नाईलाजाने एका घरात रहावेत तसे आम्ही रहात आहोत. एकमेकांशी कमीतकमी बोलायला लागेल अशा रीतीने आमचे सगळे व्यवहार चालताहेत. घरातल्या कामांची एक अलिखित वाटणी झाली आहे. आणि एवढं असून आमचं घर म्हणजे दोन शत्रूराष्ट्रांच्या बॉर्डरसारखं झालं आहे. छोट्याश्या गोष्टीवरून कधी चकमक उडेल ते सांगता येत नाही. पूर्वी निदान देहाच्या ओढीने आमच्यातले वाद मिटत असत, आता तेही उरलं नाहीये.

पडल्यापडल्या मी तिचा देह निरखतो.

एकेकाळी कमनीय इ. इ. असलेले अवयव आता एकमेकांत मिसळून गेले आहेत. शरीर सुटलेलं, नव्हे सुटू दिलेलं आहे. एकेकाळी जे डोळे मला टप्पोरे भासत तेच आता बटबटीत वाटताहेत. ती मांसल पाठ, थुलथुलीत मांड्या…जाऊ द्या!

मी उठून खिडकीजवळ येऊन उभा राहतो. बाहेर नेहमीसारखीच एक फसवी मिडवेस्टर्न सकाळ उगवली आहे. निरभ्र आकाश. सूर्य जरासा वर आलेला. शिशिरात उघडीबोडकी झालेली झाडं त्याच्या किरणांना काहीही आडकाठी करत नाहीयेत. सगळं वातावरण झगझगीत पांढरया प्रकाशाने भरलेलं. बंद घरातून बाहेर पाहणारया एखाद्याला वाटेल, बाहेर जाऊन ते करकरीत उन अंगावर घेत, डोळे मिटून, दोन्ही हात पसरून उभं राहावं. पण रस्त्याच्या कडेला साचलेला बर्फ एक वेगळीच स्टोरी सांगतो आहे. वरवर छाSSन वाटणारया त्या वातावरणात एक असह्य जीवघेणा गारठा भरून राहिला आहे. घराबाहेर पाऊल टाकणारे चाकरमानी आणि शाळेला चाललेली पोरं क्षणात त्या बोचरया गारठ्याने त्रासून हात पोटाशी आवळून घेताहेत.
माझ्या मनात विचार येतो, ललिताचा आणि माझा संसारही अशाच फसव्या उन्हासारखा नाहीये का? बाहेरून पाहणारया एखाद्याला एक सुरेख, समृद्ध आणि यशस्वी पॉवर कपल दिसत असेल. दोन इन्कम्स्, पॉश कॉण्डो, गाड्या, सगळ्या सुखसोयी आणि गॅजेट्सनी भरलेलं घर. गोठलेलं नातं कुणालाच दिसत नाहिये, अगदी आमच्या घरच्यांना सुद्धा! तो गारठा बाहेरचा, आणि हा आतला. एवढाच फरक!
मी मागे वळतो. ललिता उठून तिच्या बाथरूम मध्ये अदृश्य झालेली आहे. डोळे चोळत मी आजच्या दिवसाच्या तयारीला लागतो. ऑफिसला उशीर होत असून सुद्धा मी आज बाथरूममध्ये बराच वेळ काढतो. आज जास्तीत जास्त हॅण्डसम दिसण्याचा मी प्रयत्न करतो आहे. घोटून घोटून गुळगुळीत दाढी करताना माझं लक्ष आरशातल्या माणसाकडे जातं आणि मी दचकतो. कानावर पांढरे होऊ लागलेले केस, कपाळावरच्या फ्राऊन लाईन्स, बसलेलं गालफड मला आज अचानक जाणवतात. ललिताच्या हरवत चाललेल्या तारूण्याकडे बघताना आपणसुद्धा आता ‘स्टड’ राहिलेलो नाही याची जाणीव मला कधीच झाली नव्हती, ती आज अचानक होते आहे. मी सापडेल त्या प्रसाधनाची मदत घेतो. शांपू, हेअर जेल, आफ्टरशेव्ह. पण जेवढा जेवढा तरूण व्हायचा मी प्रयत्न करतोय तेवढा तेवढा माझा कॉन्फिडन्स ढासळतो आहे.
दहा वर्षांनी म्हातारा होऊन मी बाथरूम मधून बाहेर पडतो.
डायनिंग टेबलजवळून मी जातो तेव्हा थंडगार टोस्ट आणि स्क्रॅम्बल्ड एग्स माझ्याकडे बघत असतात. ललिता केव्हाच ऑफिसला निघून गेली आहे. येतो/येते म्हणायची प्रथा आमच्या घरात नाही. नाश्ता तसाच ठेवून मी घोटभर कॉफी घशात ओततो आणि घराबाहेर पडतो.
फसवी सकाळ पुन्हा अंगावर येते. मी कुडकुडत कसाबसा गाडीत घुसतो आणि जोरात हीटर सोडून ऑफिसच्या वाटेला लागतो. इतक्या उशिरासुद्धा ट्रॅफिक आहेच. सगळे चाकरमानी कॉफी पीत, रेडिओ ऐकत आपापल्या दिशेला गाड्या हाकत चाललेत. या सर्वांसाठी आजचा दिवस म्हणजे नेहमीसारखाच एक रटाळ मंगळवार, पण माझ्यासाठी मात्र आजचा दिवस एक ऍड्व्हेंचर आहे. आज मी माझ्या पिंजरयातून थोडासा बाहेर उडून बघणार आहे. संस्कार, आणाभाका, मोरॅलिटी गेली काशीत.

****

मागे कधीतरी एक दिवस क्रेगलिस्ट पर्सनल्समध्ये उगीचच ऍड टाकून दिली. ‘इंडियन मेल लुकिंग फॉर कंपनी’ आठवड्याने बघतो तर मेलबॉक्समध्ये साताठ मेल्स. त्यातले तीनचार गोरया म्हातारयांचे... हम्म... पंचेचाळिस वय सांगणारया बाया म्हणजे कमीतकमी पंचावन्नच्या तरी असतील. दोन प्रोफेशनल रांडा. एक काळी, एक गोरी. दोघींच्याही मेल्समध्ये अवयवांचे क्लोझ-अप फोटो. कंटाळून मेलबॉक्स बंद करणार इतक्यात शेवटच्या मेलकडे माझं लक्ष गेलं. देसी होती तीसुद्धा.
माझ्यातलं कुतुहल मला स्वस्थ बसू देईना. मी तिला रिप्लाय केलं. माझं लग्न झालेलं आहे ही बाब मी लपवून ठेवली नाही. तिचीही परत रिप्लाय आली आणि आमचा पत्रापत्रीचा सिलसिला चालू झाला. हळूहळू मला कळून चुकलं की वी आर इन द सेम बोट. माझ्यासारखीच तीही मेलेला संसार जगत होती.
शेवटी एके दिवशी मी माझा इरादा क्लियर केला. मला तिच्याकडून नक्की काय हवंय ते स्पष्ट सांगितलं. तिची रिप्लाय आली.
'Let’s meet.'

****

मी ऑफिसात पाट्या टाकतो आहे, पण आज कामात लक्ष नाही. तिचं मेल कधी येतं त्याची वाट बघतो आहे. आम्ही अजूनही एकमेकांना आमची नावं, फोन नंबर यातलं काहीही दिलेलं नाही . सगळा व्यवहार एका निनावी इ-मेल आयडीतून. गावाबाहेरच्या एक मोटेलात ती रुम बूक करणार आहे. त्यानंतर मला एक मेल येणार आहे आणि मी तत्काळ निघणार. डॉक्टरची अपॉइंटमेंट असल्याची थाप आधीच ऑफिसमध्ये मारून ठेवली आहे.
एकच्या सुमाराला मला मेल येतं. मेलमध्ये फक्त एक नंबर आहे. ‘३०७’ .
मी पटकन आवराआवर करून सटकतो. गाडी मोटेलच्या दिशेने जात असताना मी माझ्या आशांच्या पतंगाला हवा तसा बदायला देतो. ती माझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असते. सावळी, सडपातळ, मोठ्ठ्या डोळ्यांची. आम्ही रोज एकमेकांना भेटू लागतो. एकमेकांत गुंतत जातो. अखेर तो दिवस येतो. मी ललिताला आणि ती तिच्या नवरयाला सोडचिट्ठी देऊन आम्ही एकत्र रहायला लागतो. आम्हा दोघांनाही आयुष्यात हरवलेला रोमान्स पुन्हा सापडतो. ऍण्ड दे लिव्ह्ड हॅप्पिली एव्हर आफ्टर…

एका स्वस्त, भिकार आणि सीडी मोटेलपाशी मी येतो. गाडी पार्क करून लॉबीत घुसतो. रिसेप्शन काउंटरवर गुज्जू बसलेला असतो. त्याने माझ्याशी काही बोलू नये म्हणून मी साळसूदासारखा खाली मान घालून पुढे निघतो. एवढ्यात तो ‘गुड आफ्टरनून’ म्हणतोच. मी त्याच्याकडे एक नजर टाकलीशी करून मान डोलावतो. तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघतो आहे असा मला उगीचच भास होतो. चोराच्या मनात…
‘व्हॉट द हेक्! चोरी कसली करतोय मी?’ मी स्वतःवरच डाफरतो. माझा कॉन्शन्स एकदम क्लिअर आहे! घरात मिळत नसेल ती गोष्ट दुसरीकडून मिळवायला बघतो आहे मी. यात काय पाप? उलट सगळं काही आलबेल आहे म्हणून स्वतःचीच प्रतारणा करणं हेच मोठं पाप नाही का? मी मनाला धमकावून गप्प करतो.
काउंटरवरचा माणूस आणखी काही विचारू नये म्हणून मी लिफ्ट सोडून पटकन जिना पकडतो. झपाझप ढांगा टाकत तिसरया मजल्यावर येतो.
पॅसेजमध्ये लोक दिसतायत. हे कशाला कडमडले इथे? कुणी मला पाहिलेलं मला नको होतं. ते लोक जायची वाट पहात मी टंगळमंगळ करतो. मेक्सिकन फॅमिली होती. दोनतीन पोरं बाहेर येऊन कल्ला करत होती. म्हणजे आत आणखी दोनतीन असणार. माझा अंदाज खरा ठरतो. बिळातून उंदिर यावेत तसे लोक आतबाहेर करत असतात. त्यांच्यातला एक बाप्या माझ्याकडे बघू लागतो. मी वर जातो आहे असं दाखवून परत जिना पकडतो. दोन मजले वर जाऊन सामसूम झाल्याची खात्री करून मी परत खाली येतो. या छोट्याश्या लपालपीमुळे आता मला स्वतःचीच किंचित शरम वाटायला लागली आहे.
३०७ नंबरच्या रूमसमोर जाऊन मी उभा राहतो. छाती धडधडायला लागली आहे. काय करावं याचा मी काही क्षण विचार करतो. काही घातपात तर नसेल ना? अलिकडेच वाचलेल्या बातम्या मला आठवतात. क्रेगलिस्टवर स्त्रियांना कॉन्टॅक्ट करून त्यांना घरी बोलवून त्यांचे खून करणारा मर्डरर आठवतो. काही क्षणांतच हजार शक्यता माझ्या मनात डोकावून जातात.
हॅ! त्यात काय एवढं! बाई इंडियन आहे एवढं तर नक्की. इंडियन बाई काय करणार आपल्याला? आणि काही लफडं दिसत असेल तर आपण सरळ मागे वळून खचकून जाऊ.
एक मोठ्ठा श्वास घेऊन मी दारावर टकटक करतो.
काही क्षण जातात.
मी दरवाजाच्या पीप-होलकडे टक लावून बघतो आहे.
पीप-होलमधून येणारा प्रकाशाचा ठिपका अचानक नाहीसा होतो. आतली व्यक्ति दरवाजात येऊन उभी राहिली आहे आणि माझ्याकडे निरखून बघते आहे.
मी एक पाऊल मागे सरकतो आणि खाली मान वळवतो.
दरवाजाखालच्या फटीतून येणारया प्रकाशाच्या रेषेत मला तिच्या पावलांच्या सावल्या दिसत आहेत.
सावल्या अदृश्य होतात. प्रकाशरेषा पुन्हा एकसंध होते.
मी वर मान करतो. पीप-होल पुन्हा उजळलं आहे. ती मागे गेली वाटतं.
दरवाजा उघडत नाही.
माझ्या मनात चलबिचल होते. ती परत येईल म्हणून मी टक लावून पीप-होलकडे बघतो आहे.
थोडावेळ मी वाट बघतो आणि पुन्हा दरवाजा ठोठावतो, थोडा जोरात.
एक मिनिट जातं.
दोन मिनिटं जातात.
एकेक मिनिट तासासारखं वाटतं आहे.
पण ती परत येत नाही.
हे काय प्रकरण आहे?? ती आयत्या वेळेला घाबरून गेली आहे का?
की तिने मला पाहून दरवाजा उघडायचा नाही असं ठरवलं?
मी पूर्वीइतका हॅण्डसम राहिलो नाही हे खरंय, पण मी इतकाही वाईट दिसत नाही.
की ही सगळी बनवाबनवी आहे आणि कुणीतरी उगीच माझी खेचतंय?
इकडेतिकडे बघत ताटकळत मी अजून काही वेळ जाऊ देतो.
दरवाजा उघडत नाही.
व्हॉट… द… फक!!!
असं काही होईल असा मी कधी विचारच केला नव्हता.
मी शरमेने आणि संतापाने बेभान झालो आहे.
दरवाजावरचे आकडे माझ्याकडे हेटाळणीच्या नजरेने बघत हसतायत असा मला भास होतो.
दरवाजावर लाथ मारून तो उघडावा असं मला जोरदार वाटून जातं.
चांगलाच पोपट झाला आपला…
बराच वेळ झालाय. दरवाजा उघडणार नाहिये हे कळून चुकतं.
आता इथून झपकन निघून जावं आणि हा प्रसंग लवकरात लवकर संपवून टाकावा.
मी ताडकन वळून झपाझप पावलं टाकत निघून जातो. जिना उतरून खाली येतो आणि बाहेर येऊन माझ्या गाडीत येऊन बसतो.
दोन मिनिटं जातात. झाल्या गोष्टीचा अर्थ लावत मी गाडीत बसून राहतो.
वायझर खाली करून आरशात स्वतःचा चेहरा न्याहाळतो. मी अचानक स्वतःलाच फार फार कुरूप दिसायला लागतो. पण तो चेहरा माझा नाही, तर अपमानित झालेल्या कुठल्यातरी पुरुषाचा आहे, हे माझ्या लक्षात येतं.
आता काय?
आता काय कारणार? निघ इथनं!
मी गाडी चालू करतो. या जागेपासून मला आत्ताच्या आत्ता लांब लांब कुठेतरी जायचं आहे.
गुंगीत असलेल्या माणसासारखा मी गाडी चालवत पार्किंग लॉटबाहेर काढत असतो, इतक्यात पलिकडे लावलेल्या एका गाडीकडे माझं लक्ष जातं, आणि गच्चकन ब्रेक लागतो.
ललिताची कार…

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

पहिल्या काही ओळीतच शेवट असा असेल म्हणून अंदाज आला होता. पण कथा छानच रंगवलीय! अशा आशयाचा एक हिंदी सिनेमा काही वर्षांपूर्वी आला होता. तसंच रेणुका शाहाणेने एकदा तिच्या पहिल्या लग्नाबद्दल "It died its natural death" असं म्हटलेलंही आठवलं. काही वर्षं बरोबर काढल्यानंतर अगदी आसपासची झाडं, प्राणी यांच्याबद्दलही आपल्या मनात काही एक भावना तयार होते. मग सगळ्यात जवळचं असायला हवं, असं जे नवरा बायकोचं नातं आहे, त्यात असं का होत असावं हे मला न उलगडणारं कोडं आहे.या कथेच्या निमित्ताने नातेसंबंधांवर एक चांगली चर्चा वाचायला मिळेल या अपेक्षेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवरा बायकोच्या नातेसंबंधांबद्द्ल नुकताच पाहिलेला बासू भट्टाचार्यांचा अनुभव हा चित्रपट आठवला. यातले एक पात्र म्हणते, "इतर सर्व नाती संभाळण्याचा आणि टिकवण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करतो. नवरा-बायकोचे एकच नाते आहे, जिथे गोष्टी अध्याहृत समजल्या जातात, नात्यातले नाविन्य जपण्याचा वा टिकवण्याचा प्रयत्न केला जात नाही!"
गीता दत्तने गायलेले, तिच्या शेवटच्या काळातले, या चित्रपटातले मेरी जान मुझे
हे गाणे आजच्या 'वॅलेंटाईन डे' निमित्ताने जरूर ऐका.

वेगळ्या शैलीत लिहीण्याचे धाडस केल्याबद्द्ल खवचट खान यांचे अभिनंदन! शेवटाचा अंदाज आल्यामुळे वाचताना नेहेमीइतकी मजा नाही आली, पण चांगला प्रयत्न!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही चाणाक्ष वाचक असल्याने गोष्टीचा शेवट कसा होणार आहे ते आम्हाला आधीच कळले होते. हिन्दी सिनेमाप्रमाणेच अशा गोष्टींच्या grammarचा आमचा चांगला अभ्यास आहे. शेवटाला यायला तुम्ही किती हुलकावण्या देणार एव्हढेच काय ते पाहायचे होते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खवचट खानाकडून अशा प्रकारच लेखन हा सुखद धक्का म्हणावा लागेल
आधीचे लेखन पाहून वेगळाच अंदाज बांधला होता
लेखाच शीर्षक पाहून रेवडी उडवणार लिहील असेल अस वाटल होत
जसजस वाचत गेल तस लिँक लागत गेली
अपेक्षित शेवट असूनही लेख छान फुलवलाय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

सुंदर कथा खखा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान.

हळूहळू मला कळून चुकलं की वी आर इन द सेम बोट.

या वाक्याच्या ठिकाणी कथानकातील दिशा समजली होती. पण शेवट गोडगोड होणार की नाही, हे शेवटपर्यंत कळले नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपेक्षित शेवट.. महिलांसाठी म्हणून पुरुषांनी काढलेल्या मासिकांत असतात तसल्या प्रकारची कथा.. फारशी नाहि आवडली म्हणण्यापेक्षा वेगळी नाहि वाटली.
तुम्ही अधिक रोचक लिहु शकालच! पुढील कथेच्या प्रतिक्षेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मासिकांबद्दल माहित नाही, पण बाकी सहमत. खवचटपणा कमी पडला या वेळेस!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अपेक्षित व ऐकलेली कथा. कधी कधी जोकच्या फॉर्मॅटमध्येही ऐकलेली आहे. मागील वर्षी "मिर्च" नावाचा एक झणझणीत व बराचसा offbeat बॉलीवूडपट आला होता. इतरही बर्‍याच चाम्गल्या चित्रपटांप्रमाणे फारच थोड्यांना माहित आहे. त्यातही शेवटची कथा अगदि हीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही कथा अजिबातच आवडली नाहीये. एक तर अपेक्षित शेवट. त्यामुळेच की काय किंचित लांब वाटली. "कांदोजीची बखर लिहिणारे ते हेच खानसाहेब का?" असा प्रश्न पडला मला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

प्रतिसादकांचे आभार!

मी ही कथा लिहायला घेतली ती 'If you like Pina coladas' या सुरेख गाण्याच्या प्रेरणेने. खरं तर मला कथेतही हे गाणं गुंफायचं होतं पण गाण्याचा अपबीट मूड आणि सुखांत शेवट, आणि या कथेचा gloomy मूड आणि अधांतरी शेवट यांचा काही मेळ बसला नाही.
इथल्या आणि माबोवरच्या प्रतिसादांतून कळलं की याआधी या धर्तीच्या कथा, चित्रपट इ. येऊन गेलेले आहेत. या थीमने बरयाच जणांना प्रेरित केलेलं दिसतं! Smile मात्र मी ही कथा सुखांत वळणावर न नेता शेवट अधांतरी ठेवला आहे आणि वाचकाला हवा तसा शेवट करून घेण्याचं थोडंसं स्वातंत्र्य ठेवलं आहे. 'थोडंसं' अशासाठी की कथेतले बहुतेक धागे ( दोघांच्या नात्यात कोणतेही redeeming feature राहिलेले नसणे, दोघे एकमेकांना भेटू पाहतात ते एकमेकांत काही साम्य आढळतं म्हणून नाही तर आदिम गरजेच्या पूर्तीसाठी, ललिताचे दरवाजा न उघडणे) नकारात्मक शेवटाकडे निर्देश करतात. असं असून बहुतेकांनी शेवट गोडगोड करून घेतला आहे असं वाटतं. असं का असावं? १. उमेदवार लेखकाचं भावना वाचकापर्यंत पोहोचवण्यात अपयश २. सुखांत शेवट करून घेण्याचं wishful thinking ३. याआधी वाचलेल्या कथा-चित्रपटांचा चष्मा लावून वाचकांनी कथा वाचणे.
मायबाप वाचकांनी शेवट कसा करून घेतला आणि त्यामागची कारणमीमांसा याबद्दल वाचायला आवडेल!
----------------
@अदिती- तुम्ही मला टाईपकास्ट करताय! वन्स अ खवचट, ऑलवेज अ खवचट, असं करू नका हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>तुम्ही मला टाईपकास्ट करताय! वन्स अ खवचट, ऑलवेज अ खवचट, असं करू नका हो!

अनेक आय.डी. घेऊन अनेक प्रकारचं लिखाण करण्याचं स्वातंत्र्य आणि ते स्वातंत्र्य उपभोगण्याची प्रदीर्घ परंपरा मराठी आंतरजालावर असतानादेखील एकाच आय.डी.तून दोन टोकांचे भाव व्यक्त करून मग त्याचे परिणाम झेलणार्‍या खवचट खानांविषयी अनुकंपा वाटली. या गोग्गोड गुलाबी दिवशी कुणीतरी त्यांना आपलं म्हणा बरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत आहे.

खवचट खानांबद्दलचा आदर संपूर्णपणे नाहीसा झालेला आहे. इतके दिवस आम्हाला खान हे डुप्लिकेट आयडी आहेत असेच वाटत होते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा खूप छान फुलवली आहे. "पिनॅकोलाडा" गाणे तर मस्तच आहे. पण गाण्याचा सुखान्त मनाला खूप आवडतो. या कथेत सुखान्त केला असतात तर बरे झाले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथले दोन बदाम पाहून उर भरून आले..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बदाम दोन आहेत म्हणून ऊर भरून आलेले दिसत आहेत. नाहीतर ऊर भरून येतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>>बदाम दोन आहेत म्हणून ऊर भरून आलेले दिसत आहेत. नाहीतर ऊर भरून येतो

ते उरासाठी आदरार्थी बहुवचन वापरत असतील तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत आहे. त्याशिवाय त्यांनी कशाने भरून आलेत हेही लिहलेलं नाही तरी लगेच मुसुशेठ डिशिजन काढून तयार!! Wink

(च्यायला, आज चिंतू गुर्जी लै फार्मात दिसत्यात!!... बाकी आदरार्थी नसेल तरी नुस्तंच बहुवचनही वापरत असतील.. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यायला, आज चिंतू गुर्जी लै फार्मात दिसत्यात!!

अरे दिवस कोणता आहे ते तरी पहा!

चिंतातुर जंतू हा मला डु.आयडी वाटत होता. पण आता त्याही आयडीतून विविधरंगी, विविधढंगी प्रतिसाद यायला लागले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथले दोन बदाम पाहून उर भरून आले..

बाराबंदीचे बंद तटातटा तुटलेले पाहून आम्हालाही समाधान झालं...

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आडकित्ताजी, आजच्या जागतिक प्रेमदिनाच्या आणि जागतिक सौंदर्यदिनाच्या दुहेरी मंगल दिवशी तरी हे बदाम क्रॅक करू नका प्लीज... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शैली चांगली असली तरी वस्तू प्रेडिक्टेबल वाटली.
"सेव्हन यिअर इच" अशा काहीशा नावाची एक कथा (की चित्रपट?) वाचल्याचे (की पाहिल्याचे?) अंधुक स्मरते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या हातून अ-खवचट लेखनाचा प्रमाद घडल्यामुळे आमचा निस्सीम चाहता-वर्ग नाराज झाला आहे असे ऐकतो. त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी लवकरच घेऊन येत आहोत, सरलेल्या काळातल्या एका असाधारण, बहिष्कृत व्यक्तिमत्वाचा वेध घेणारं एक लोभस, राजस, आणि बरयापैकी नीटस व्यक्तिचित्र, 'सविताकाकी'.

हे खरं तर खूप वर्षांपूर्वीचं आहे. तीसेक वर्षं झालीत. ती बिल्डींग, ती शाळा, ते गाव सगळं सगळं काही आउट ऑफ फोकस चित्रासारखं आहे. जवळच्या नात्यातल्या बहुतेक व्यक्ती आहेत; परंतु त्या वर्तुळाबाहेरच्या लोकांना भेटायचा योग आता येत नाही.

सविताकाकी ही अशीच, जवळच्या वर्तुळापलिकडचीच. नातेवाईक असती तरी जवळच्या वर्तुळात राहिली असती का अशी शंकाच होती. नेहमी जायचा यायचा रस्ता तिच्या घरावरूनच जायचा. एका बाटलीत लावलेला मनिप्लँटचा वेल आणि त्या वेलाशेजारी बाल्कनीला उभी असलेली सविताकाकी ही माझी लहानपणीची तिची आठवण. सुबक ठेंगणी, केस मोकळे सोडलेले, डोळ्यात सुरमा, गालाला पावडर, ओठांवर लिपस्टिक, मोरपंखी रंगाची साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज, त्यावरून हवेशीरपणे घेतलेला पदर, आणि हो, कधीकधी डोक्यात चमेलीचा गजरा! हातामधे पानाचा डबा. एकेकाळी म्हणे ती गुटखा खायची, पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा सादा पानच. नेहमी दिलखुलास हसू. "काय रे, आजोबांनी सोडला का तुला खेळायला ?" अशा स्वरूपाचा मिष्किल प्रश्न.

केवळ खाजगी वितरणासाठी. सर्व प्रताधिकार सुरक्षित. पूर्ण लेख वाचण्यासाठी इच्छुकांनी व्यनि करावा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओ खवचट, तुम्हाला वर्णनं करायला फार चांगली जमतात हे वेगळं सांगत नाही. त्यात खवचटपणा कमी पडत नाहीच्चे. पण एकदम चित्रपटसृष्टीतल्या खानेसुमारीसाठी केल्यासारखं लिखाण करू नका हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ठ्ठो! सविताकाकी येऊच द्या!
सवितृ हा शब्द चालवताना संबोधनाला आले की हल्ली मंडळी भाभी प्रत्यय लावतातच म्हणे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी सुरुवातीला "सविताभाभी" वाचलं....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'काय हरकत आहे?' नावाची एक जुनी कथा आठवली.
'सविताकाकी' ची वाट पहातो आहे. 'वेलम्मा' हीही एक थीम सुचवून ठेवतो. (जिज्ञासूंनी गुगलून बघावे ;-)!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा