..तुझे टाळतो मी अताशा शहर..

++तुझे टाळतो मी अताशा शहर++
---------------------------------------------------
सुशोभीत केली जुनीशी कबर.!
स्वतः मीच केली स्वतःची कदर.

जसा बोललो आरश्याशी जुन्या
तशी घेतली मी स्वतःची खबर!

किती जीव घेतील शस्त्रे तुझी
कधी ओढणी वा कधी तो पदर

म्हणे फार होती पवित्र अधी
तिची मग बनवलीच नंतर गटर

ठरवताच पार्टी मनाने कधी
तिथे सर्व दु:खे सुखेही हजर

तसा तोच रस्ता जवळचा तरिहि
तुझे टाळतो मी अताशा शहर

दवा बनुनी येताच मृत्यु असा
उतरते तिथे जीवनाचे जहर

कळाली तुझी मज खुशाली जशी
किती छान आला मनाला बहर

तुझे रुप आहे तसे देखणे.
तुझे हास्य त्याहुनि तौबा कहर

+ कानडाऊ योगेशु

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>किती जीव घेतील शस्त्रे तुझी
कधी ओढणी वा कधी तो पदर<<

संपादकांनी कृपया ह्या कवितेला पॉर्न विषेशांकात समाविष्ट करावे!

>>सुशोभीत केली जुनीशी कबर.!
स्वतः मीच केली स्वतःची कदर.<<

कदर-पॉर्न?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

प्रत्येक द्विपन्क्ती उत्तम उतरली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me