समदानी एखादाच

जरी हे व्यक्तीचित्र असले तरी एक प्रकारची जंत्री आहे, यात कोणतीही चमकदार घटना नाही. हे लेखिकेचे स्मरणरंजन आहे. काही अत्यंत रोचक प्रसंग शोधायचा असेल तर तो यात सापडणार नाही. अजुन एक केलेले नीरीक्षण हे लेखिकेचे वैयक्तिक नीरीक्षण आहे. त्यावरती मतभेद संभवत नाहीत. मग L1 वाले असुरक्षित नसतातच/असतातच्/यापैकीकाही ठोस नाही वगैरे काहीही मतभेद असोत. लेखिकेची मर्यादीत हवे तर पीत दृष्टी नीरीक्षणे म्हणुन फक्त वाचणे.
________
समदानी - माझा सहकारी. याची ओळख मी कशी करून देईन तर सर्वप्रथम माणुसकी असलेला एक माणुस - माझा ऑफिसातील सहकारी - मुसलमान ज्याचे वडील शिंपी होते. म्हणजे बेतास बात घरातून आलेला. अन्य काही गुणावगुण ओघात येतीलच. तूर्तास इतकेच. सावळा- उंच-देखणा या सहकार्‍याशी माझी पहिली ओळख कधी झाली कधी आम्ही हँड शेक केला ते काही मला आठवत नाही. पण लक्षात आहे तो त्याचा माणुसकी असलेला स्वभाव. समोरच्याला भरपूर कर्टसी दाखविणारा, समोरच्याचे बोलणे एकाग्रतेने ऐकणारा. A good Listener. भारतातून अमेरिकेत L1 व्हिसावर आलेला समदानी माझ्या टीममध्ये होता. सदैव आनंदी-हसतमुख दिसायचा, हसला की सावळ्या चेहर्‍यावरती पांढरे शुभ्र दात लखकन चमकायचे. मला तो का आवडला तर बर्‍याच कारणांसाठी काही वर आलेली आहेतच अजून एक म्हणजे पॉलिटिक्सपासून थोडा दूरच होता. L1 वरचे भारतीय एकमेकांची प्रचंड खेचत (मारत), स्वत:च्या असुरक्षिततेचे ओंगळ वाटावी अशी वर्तणूक करत. समदानी अपवाद होता. carefree , आनंदी आणि integrity असलेला.
.
त्याच्याकडे खूप छान छान टीप्सही असत जशा body language बद्दल. तो सांगे - कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीचे विस्फारलेले डोळे आपल्या बोलण्यात त्या व्यक्तीसा रुची आहे हे दर्शवितात तर चेहरा आपल्याकडे पण पाय अन्य दिशेस म्हणजे त्या व्यक्तीला तेथून कटायचे आहे. मी हसत या काही Obvious टिप्स ऐके कारण तोदेखील माझे obvious वाटणारे बोलणे एकाग्रतेने ऐके. आमची mutual admiration society होती albeit silent .तो अन्य कलीग्जसाराखा रुक्ष नव्हता. त्याच्यामध्ये नेतृत्व गुण होते. पुढे L1 वरून तो H1 वरती तेही Delloitte मध्ये manager झालेला मला Linked In वरून समजले.
.
एकदा कोणतातरी database manage करण्याचा task त्याच्यावर सोपविला होता. मी त्याला म्हटले "मी तुला मदत करेन. मला database च्या बर्‍याच संकल्पना निट माहीत आहेत." खरं तर मला मदत करायची होती पण त्याने मला खूप समजावून सांगितले शेवटी तो म्हणाला "This is my ownership. मला अन्य कोणाची मदत नको." खरं तर एखाद्या कामाची ownership आणि मग त्या basis वरती होणारे संभाव्य appraisal यांची सांगड मला कळली ती तेव्हा प्रथमच.
ऑफिस मधील Laura नावाच्या सेक्रेटरी ची मैत्री मिळवण्याचा तो प्रयत्न करतो हे मला माहीत होते आणि त्या गोरवर्णी शिष्ठ मुलीला तो रुचणार नाही हे सुद्धा. पण मी कोण सांगणारी म्हणुन मी फक्त मूकपणे त्याचे प्रयत्न पहात असे.
.
टीम लंचमध्ये एकदा फ़ोटो काढण्याचे काम त्याच्यावरती सोपविलेले होते. मी मात्र माझा फ़ोटो काढू नये म्हणून संकोचाने चेहर्‍यावरती हात ठेवला आणि नेमका त्याने फ़ोटो काढला. नंतर बरेच दिवस तो चिडवे "जोव्ह आप तो पापाराझी के डरसे जैसे सेलिब्रिटॆज मुंह छुपाते है वैसे बिहेव्ह कर रहे थे ;)" एकदा, आमचा वर्मा नावाचा प्रचंड खत्रू manager सोडून चालला होता. त्याच्याबरोबर coffee करता सारेजण जाणार होते . मी ठरविले होते कामाचा बहाणा करून जायचे नाही. तेव्हा एकटा समदानी मला समजवायला थांबला, "जोव्ह चलो. आप आये नाही तो बुरा दिखेगा. वर्मा का कुछ नाही जायेगा, आप अकडू हो ऐसा इंप्रेशन क्यों create करना चाहते हो? Bear his last day with a pinch of salt" फक्त त्याच्या विनंतीला मान देऊन मी गेले खरी पण नंतर वाटले जे केले ते अगदी योग्यच केले. Why burn bridges & moreover why give importance to people like वर्मा?
.
आमचे project बे एरियातील एका गावात होते. समदानीने सांगितलेला एक विनोदी प्रसंग आठवतो. एकदा त्याने पाहिले एका काळ्याचे २५ सेंटस खाली पडले जे समदानीने उचलून त्या काळ्याला दिले. परत पडले परत उचलून दिले. तिसर्‍यांदा पडले तेव्हा समदानीला कळले "दालमे कुछ काला है " तो काळा नक्की गे होता. आम्ही सारेजण इतके हसलो. खरं तर office मध्ये तो प्रसंग बरेच दिवस जोक झालेला होता.
.
पुढे आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वरती गेलो. मी दुसरीकडे तर समदानी अन्यत्र. फेसबुकवरती "मेहरू" नावाच्या इंडोनेशिअन-अमेरिकन मुलीशी त्याने लग्न केल्याचे कळले. पण नंतर नंतर फेसबुकवर फक्त रोज चमचमीत खाण्याचे फ़ोटो त्याच्याकडून येउ लागले. इतके की हा माणूस खाण्याकरताच जगतो काय असे वाटावे. तिडीक येईल इतके रोज ३ वेळचे खाण्याचे फोटोज. Something was wrong . त्याने कधी लिहीले नाही पण त्यचे लग्न मोडले असावे ही शंका घेण्यास खूप वाव आहे. नंतर एका काही मुस्लिम तसेच काही हिप्पी मुली-मुलांबरोबरच्या भटकंतीचे त्याचे वाळवंटातील दाढी वाढवून अरबाअंसारखा फेटा घातलेले फ़ोटो येत राहिले. पण या फ़ोटोत तो अतिशय आनंदी दिसे.
.
पुढे linked In वरती अचानक त्याचे अपडेट आले "योगा टीचर". बापरे Deloitte Manager To Yoga Teacher ....मोठीच उडी की ही. up the ladder की down हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबुन असेल. पण एक नक्की एक वेगळं मस्त कलंदर आयुष्य तो जगला-जगतो आहे. आणखी एक नक्की जिथे जाइल तिथे तो आसपासच्या लोकांना समृद्ध करणार हेही तितकेच अटळ.
.
थोड्या थोडक्या नाही २० वर्षाच्या माझ्या नोकरीच्या कारकिर्दीत एकाच समदानी निघाला बाकी rat race वाले उंदीर. हे फक्त त्याचे गौरवीकरण करायला इतरांची खोडलेली लाइन नाही हा माझा मनुष्य स्वभावाचा घेतलेला अनुभव आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वाह! छान लिहिलंय.

पण त्याचं कलंदर आयुष्य हे तो तुमच्या संपर्कातून गेल्यावर सुरू झालं ना? तोपर्यंत तो तुमच्यासाठी rat race वाले उंदरांपैकी एक होता. गोजिरवाणा उंदीर पण उंदीरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उंदरांना इन्टिग्रीटी नसते. त्यांना फक्त पाय ओढता येतात, मारता येते. समदानी ऊंदीर नव्हता. Let me know if you have any more questions Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगलय शुचि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.
लेखाच्या शीर्षकावरून खालील सुप्रसिद्ध काव्यपंक्ती आठवल्या.

नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी !
पण शेतकरि-
सनदी तेथे कोण वदा
हजारांतुनी एखादा !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुक्तसुनीत आणि अनु धन्यवाद. आबा तुम्हालाही धन्यवाद.
_____

परत कलीग्ज नी कॉम्पिटिटिव्ह असणे आणि त्या अनुषंगाने समोरच्या कलीगची रेषा खोडणे ( ज्याला मी खेचणे/मारणे आदि म्हटले आहे) हे योग्य की अयोग्य यावरही मतभेद असू शकतात. किंबहुना ज्यांना २ घेतल्यावरती २ देता येत नाहीत अशा आमच्यासारख्या लोकांना तर तसा आक्रमकपणा म्हणजे "ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स" अयोग्य वाटतोच. पण सुप्तपणे मनात हे आपल्याला जमलं असतं तर असेही वाटते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किपिटप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

छान लिहिलंय. ऐकून घेणारे आणि शर्यतीत नसणारे लोक खूपच कमी पहायला मिळतात..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान व्यक्तिचित्रण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

व्यक्तिचित्रण आवडलं. अजून येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

छान लिहीलंय. अशी माणसं क्वचितच दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद देवदत्त. त्याच्या ब्लॉगची लिंक दिली होती वरती पण मग म्हटलं जाउ दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!