गैरवर्तन

अखेर आपलेच पोलिस जेंव्हा भिंत फोडून आत येतील , येउन
ओरडतील , "कुणी जिवंत आहे का? असल्यास हात वर करा",
तेंव्हा रक्तामासाच्या चिखलातून
हात वर करण्याचे धाडस मी करीन .
धाडस अशासाठी म्हणायचे की तो चिखल एका
जिहादीने केला होता, इथले लोक
देवाज्ञा पाळत नाहीत म्हणून,
पोलिसांनीही उरल्यासुरलेयांना गोळ्या घालून
देवाची आज्ञा मानायची ठरविली तर ? हात वर करणे यासारखा
उद्दामपणा दुसरा नाही (ते देवाला फाट्यावर मारणे आहे!)
तुझ्या आज्ञेविरुद्ध मी वागलो इतकेच नाही तर
जिवंतही राहिलो आणि या पोलिसांबरोबर आता
स्वतःच्या पायांनी चालत बाहेर जाईन
आणि तुझ्या आज्ञा न मानता उद्या परत
गैरवर्तनही करीन. स्वतंत्रपणे वागेन .
धर्मसत्तेला पुन्हा ह्याच्यावर बसवीन.
चालणार आहे का तुला ते?
पण हे काय? मला हात वर करायला
सक्तीने, कोण सांगते आहे आतून?

---

field_vote: 
0
No votes yet