सीरियातील 80 टक्के हत्या आसाद च्या राजवटींने केल्या आहेत!

सीरियातील यादवीमध्ये सुमारे 5 लाख ठार आणि 50 लाख निर्वासित झाले आहेत. पण धक्कादायक बातमी अशी की यातील सुमारे 80 टक्के हत्या बशर आसाद च्या राजवटींने केल्या आहेत, आणि 11 टक्के आयसिसने . लोकसंख्येमधे केवळ 11 टक्के असणाऱ्या आलावी या थोड्याफार शिया टाईप जमातीचे सरकारमध्ये वर्चस्व होते, ते आस्साद पिता-पुत्रांमुळे . त्यांनी अनेक मोठ्या सुन्नींना पद्धतशीर पणे सत्तेतून हाकलले . पण सुन्नी 70 टक्के आहेत, आणि बाजारावर त्यांचेच वर्चस्व आहे . याचा परिणाम अर्थातच अत्यंत दडपशाहीची राजवट आणण्यात झाला . राजवटीविरुद्ध 2011 मध्ये शांतता-पूर्ण निदर्शने चालू झाली, त्यावर अचानक गोळीबार करून सरकारने अनेक माणसे मारली, आणि मग विरुद्ध बाजूचे नेतृत्व हळूहळू अल नुस्रा आणि नंतर आयसिस कडे गेले . अलावी जमातीचे राज्य गेले तर त्यांची प्रचंड कत्तल होईल असा इतिहासाचा धडा असल्यामुळे अस्साद ही राज्य सोडण्यास तयार नाही - पण आज तो जेमतेम दमास्कसचा महापौर असल्यात जमा आहे -रशियाच्या मदतीने त्याची सध्या थोडीफार सरशी मात्र होत आहे . हे असेच पंधरा वीस वर्षे चालू राहील अशी भीती आहे .
http://www.cbc.ca/news/world/syria-regime-atrocities-far-outweigh-rebels...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet