शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, जुलै १ १९१६, पहिल्या महायुद्धातील सोमच्या (Somme) लढाईला सुरवात झाली. ही लढाई म्हणजे मानवी इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस आहे.
ही लढाई आपल्याला वाटते त्यापेक्षा फार जवळची आहे कारण त्यात कित्येक मराठी बोलणाऱ्या माणसांनी जीव गमावला आहे. १२ लाख भारतीय जवानांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला आणि त्यातील ७४,००० जणांनी प्राणांची आहुती दिली. (दुसर्या महायुद्धात ८७,०००; १९७१च्या युद्धात ३,९००; १९६२च्या ३,०००; १९६५च्या ५,३०० जवान शहीद झाले होते. सर्व आकडे विकिपेडिया वर आधारित.)
आणि मराठी मध्ये ह्या सगळ्याची नोंद करणार- 'ऑल क्वायेट ऑन धी वेस्टर्न फ्रंट' सारखी कादंबरी तर सोडाच- एकही नावाजलेले पुस्तक त्याकाळात लिहल गेल नाही! ना लिहली गेली एखादी ओवेन वा ससून सारखी अजरामर कविता.
माझ्या मते ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी या युद्धातील ऍक्शन मधे जवळ जवळ भाग घेतला नाही आणि महाराष्ट्रातील बहुजन समाज त्यावेळी ललित साहित्यात मोठ्या प्रमाणात उतरला नव्हता.
आता प्रश्न असा पडतो की कुणा ब्राह्मणाने बहुजनांची ही कुर्बानी बघून त्यावर का एखादी कादंबरी लिहली नाही? का महान बालकवींना हे पलीकडल्या गल्लीतले, परक्याची लढाई लढताना आलेले वैधव्याचे दुःख दिसल नाही? का एखादा गोडसे भटजी सोमच्या जवळपास फिरत नव्हता? का एखादा बखरकार किमान ऐकलेल्या गोष्टींवर कहाण्या रचत नव्हता? का एखादी तरल नाट्यछटा अशा उपऱ्या प्रदेशात आलेल्या मृत्यूवर लिहली गेली नाही? १८व्या शतकातील 'दुर्दैवी रंगू' अजून दिसत होती पण वर्तमानातील अभागी गंगू कुठे लपली होती? (पनिपत,१७६१ बद्दल आपण अजुन किती भावविवश होतो.)
नकळत पणे मर्ढेकर यात ओढले गेले ते असे. त्यांच्या कवितेची एक ओळ : "पावसाळे आले गेले; दोन युद्धे जमा झाली;"
कै दि के बेडेकरांनी चांगली चपराक मारली!
"...'दोन युद्धे जमा झाली' या चार शब्दांत कोट्यावधी भारतीयांच्या, नव्हे सर्व मानवजातीच्याच वेदनांचे व मृत्यूचे ब्रह्मांड सामावलेले आहे. पण मर्ढेकर परमहंसगतीला पोहोचलेले असल्यासारखे आहेत ! त्यांच्या कालप्रवाहाला मनुष्यांच्या सुखदुःखांचे मोजमाप लागत नाही. नुसते पावसाळे येतात नि जातात हीच कालगणना !..." ('साहित्य : निर्मिती व समीक्षा', १९५४)
या युद्धातील एक हृद्य घटना अशी.
'कटचा वेढा' (Siege of Kut) १९१५-१६ मध्ये कितीतरी मराठी भाषिक सैनिक अडकले होते. प्रचंड उपासमार सुरू झाली होती. घोड्याचे मास खाणे हा एकमेव उपाय उरला होता. मराठी सैनिकांनी धर्मभ्रष्ट होऊ म्हणून खायला नकार दिला. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी शाहू महाराजांना विचारल की ते मास खाल्ल तर चालेल का. महाराजांनी त्यांना परवांनगी तर दिलीच पण अतिशय हेलावून टाकणारे पत्र लिहल. ते वाचूनच, मला खात्री आहे, मराठी सैनिकांच्या अंगावर मूठभर मास चढल असेल!
Indian bicycle troops at a crossroads on the Fricourt-Mametz Road, Somme, France
सौजन्यः विकिपेडिया
याचं काही डॉक्युमेंटेशन आहे
याचं काही डॉक्युमेंटेशन आहे का? रेजिमेंटल हिस्ट्री, dispatches किंवा कोणत्याही स्वरूपात?
साधारणपणे
सहमत, परंतु दुसर्या महायुद्धाच्या वेळी जनरल/मेजर/लेफ्टनंट/कर्नल थोरात यांनी ते स्वतः व त्यांच्या सहकार्यांनी यांनी व्हिला सान सेबास्तिआनो नामक एका इटालियन खेड्यात नाझी फौजांपासून लपत छपत कसे दिवस काढले यावर "स्वाधीन की दैवाधीन" नामक पुस्तक ऑलरेडी आहे. (चुकूनमाकून) वाचायचे राहिले असेल तर ते अवश्य वाचावे अशी विनंती. अप्रतिम पुस्तक आहे.
बाकी अलीकडे गेल्या दोनतीन वर्षांत जयंत कुलकर्णी यांचे मराठा लाईट इन्फंट्रीच्या पहिल्या व दुसर्या महायुद्धातील कामगिरीवर पुस्तक आलेले आहे. त्यामुळे याची उणीव अंशतः तरी भरून निघावी.
एकूणच या इतिहासाची पोझिशन विचित्र आहे. आपलेच लोक लढले म्हणावे तरी ते लढले परक्यांकरिता, त्यामुळे त्यांचा सन्मान करावा किंवा नाही, ऑफिशियल परेडमध्ये इ. त्या घटनेचा उल्लेख करावा की नाही, इ. बद्दल सरकारी स्तरावर बराच खल झालेला आहे. इतकी वर्षे हा इतिहास न सांगणे हीच ऑफिशियल पोझिशन होती कारण इन अ वे ते ब्रिटिशांचे ग्लोरिफिकेशन झाले असते. पण अलीकडे हा दृष्टिकोन बदलू लागलेला असून अनेक पुस्तके हळू हळू येत आहेत. या विषयावर चर्चाही होत आहे. हे सगळे खचितच स्वागतार्ह आहे.
धन्यवाद पण मी पहिल्या
धन्यवाद पण मी पहिल्या महायुद्धा बद्दलच बोलतो आहे इथे....दुसर्या कडे नंतर वळणार आहे...शिवाय मी तत्कालीन ललित सहित्या मधे पडलेले युद्धाचे प्रतिबिम्ब या बद्दल जास्त बोलतो आहे. कवीला/ लेखकाला/ कलावंताला 'पोझिशन' वगैरे मधे यायला नाही पहिजे...
'स्वाधीन की दैवाधीन' चा उल्लेख तुम्ही पूर्वी केला होता, अजुन वाचायला मिळाले नाही.
बरोबरे...
बरोबरे...
"स्वाधीन की दैवाधीन" खूप
"स्वाधीन की दैवाधीन" खूप लहानपणी वाचलं होतं. आता कुठे मिळू शकेल?
मेजर जनरल एसपीपी थोरात यांच्या आठवणी (मेमुआर) From reveille to retreat या नावाने प्रकाशित झाल्या आहेत. हे पुस्तक मला त्वरित वाचायचं आहे. कोणी देऊ शकल्यास लई उपकार होतील.
नाबार्डचे भूतपूर्व चेअरमन यशवंत थोरात म्हणजे मे० ज० थोरात यांचे चिरंजीव. त्यांना लिंक्डईनवर संदेश पाठवला होता, पण त्यांच्याकडून उत्तर आलं नाही. :(
थोरातांच्या आठवणी:
http://veekay-militaryhistory.blogspot.co.uk/2012/10/biography-lt-gen-s…
नो ऐड्या सर. पाहिले पाहिजे.
नो ऐड्या सर. पाहिले पाहिजे. जुनी वाचनालये पाहिली पाहिजेत.
मला माहीत नाही पण गेल्या
मला माहीत नाही पण गेल्या दोन-तीन वर्षात दोन्ही महायुद्धांवर भारतीयांच्या सहभागाबद्दल चांगली पुस्तके आली आहेत उदाहरणार्थ : 'For King and Another Country: Indian Soldiers on the Western Front, 1914-18', 2015 by Shrabani Basu
For King and Another Country:
आजच हे पुस्तक हाती आलं. लेखिका श्राबनी बसू यांचं नूर इनायत खान या गुप्तहेर कन्येबद्दलचं पुस्तक मागे वाचलं होतं.
शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार अफ्रिकेत केंव्हाच...
आणखी तीन पुस्तके :
१> India At War: The Subcontinent and the Second World War by Yasmin Khan
२> Farthest Field: An Indian Story of the Second World War by Raghu Karnad (सर्वात चांगले माझ्या मते...मला अतिशय आवडले...मराठीत अनुवाद व्हायला पहिजे...मराठी सैनि़कांचे अनेक उल्लेख आहेत...शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार अफ्रिकेत केंव्हाच पोचला होता...लिहिन एक दिवस त्याबद्दल...)
३> India's War: World War II and the Making of Modern South by Srinath Raghavan
महाराजांनी त्यांना परवांनगी
शक्य असल्यास हे शाहूमहराजांचं पत्र किंवा त्याचा सारांश वाचायला मिळेल का? अंजावर किंवा कुठल्या पुस्तकात? की "स्वाधीन की दैवाधीन" ह्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे?
"राजश्री श्रीशाहूमहाराजांची भाषणे"
"राजश्री श्रीशाहूमहाराजांची भाषणे", पृष्ठ १७७-१८०, लोकवाङ्मय गृह, २००९
त्यातला कांही अंश मी इथे जोडत आहे...कृपया मूळ पुस्तकातून उर्वरित भाग वाचावा
धन्यवाद अनिरुद्ध हे शेअर
धन्यवाद अनिरुद्ध हे शेअर केल्याबद्दल. मुळ पुस्तक मिळाल्यास निक्कीच अजून वाचेन.
'कटचा वेढा' (Siege of Kut)
महायुद्धाहून परत आल्यावर या कारणास्तव कैकांना वाळीत टाकण्यात आले होते. तरी तसे वाळीत टाकू नये, वाळीत टाकणार्यांवर सरकारी कारवाई होईल असे सांगणारे एक अप्रकाशित पत्र वाचायला मिळाले होते...
महायुद्धाहून परत आल्यावर या
काय अत्युच्य दर्जाचा मूर्खपणा आहे
इंडीड. बाकी महायुद्ध करणे
इंडीड.
बाकी महायुद्ध करणे हाही तितक्याच मोठ्या दर्जाचा मूर्खपणा होता.
मिसळपावरील कूटच्या वेढ्याबद्दलची मालिका
http://www.misalpav.com/node/17998
http://www.misalpav.com/node/18009
http://www.misalpav.com/node/18017
आहा, धन्यावाद मनोबा _/\_
आहा, धन्यावाद मनोबा _/\_
छान आहे...<या युद्धात आमचे
छान आहे माहिती...
या युद्धात आमचे एक पूर्वज सुभेदार मेजर लोखंडे (शिवरामपंत कुलकर्णी), त्यांचे मित्र श्री. हसन, व सुभेदार जाधव यांचा सहभाग होता. त्यात श्री. शिवरामपंत आपले नाव चोरून कसे फौजेत भरती झाले (कारण त्याकाळी ब्राह्मणांना फौजेत भरती करून घेत नसत)>
त्याकाळी ब्राह्मणांना फौजेत
ही माहिती चूक आहे. ब्राह्मण म्हणजे कुठले नक्की ब्राह्मण? यूपीबिहारकडचे अनेक ब्राह्मण कंपनीच्या लष्करात होते. मंगल पांडे हे त्यांपैकी सर्वांत फेमस उदा. आहे.
मराठी ब्राह्मणांना भरती करून घेत नसत कारण पेशवाईच्या अनुभवामुळे 'पुण्याचे ब्राह्मण' हे 'राजद्रोही' (अँटीब्रिटिश) आहेत असे इंग्रजांचे मत होते. याच कारणास्तव चाफेकर बंधूंनाही त्यांची इच्छा व फिटनेस असूनही लष्करात भरती होता आले नाही. त्यांचे तेव्हाचे संभाषण रोचक आहे- भरती अधिकारी म्हणतो की सैन्यात काय सोवळे नेसून लाडू खायचे नाहीत. चाफेकर म्हणतात की पेशवे अटकेपार गेलेले ते काय सोवळे नेसून लाडू खातखात गेलेले की काय?
+१ मराठी ब्राह्मणांना भरती
+१
मराठी ब्राह्मणांना भरती करून घेत नसत हा प्रकार अगदी दुसर्या महायुद्धापर्यंत चालू होता. "साद सागराची" या कमोडोर पु गो गोखले यांच्या पुस्तकातले "सैन्य भरती आणि मी" हे पूर्ण प्रकरणच कमाल आहे.
पुस्तक इथे सापडेलः
https://msblc.maharashtra.gov.in/pdf/newpdf/next50b/%E0%A4%B8%E0%A4%BE%…
डाउनलोड केले
डाउनलोड केले...
क्या बात है आबा. अनेक धन्यवाद
क्या बात है आबा. अनेक धन्यवाद या पुस्तकाबद्दल. डौनलोडवतो.
प्रकरण छोटेसेच आहे. ब्रिटिश बायस अगदी स्पष्टपणे दर्शवते.
जुजबी सर्च घेता ब्रिटिश
जुजबी सर्च घेता ब्रिटिश आर्मीत "फर्स्ट ब्राह्मन्स" या नावाची एक अख्खी रेजिमेंट होती हे कळाले.
https://en.wikipedia.org/wiki/1st_Brahmans
मॉर्डॉर
लेख आणि प्रतिसाद आवडले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज्'च्या निर्मितीवरही या लढाईचा प्रभाव पडला, त्याबद्दलचा हा लेख: http://www.nytimes.com/2016/07/03/opinion/sunday/how-jrr-tolkien-found-…
लेखातूनः
अजिबात माहित नव्हते.
अजिबात माहित नव्हते...तेवढा भाग तरी वाचला पहिजे. थन्क्स.