मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं एक अनावरण

जनसामान्यांना अनेक उच्चभ्रूंनी आत्तापर्यंत खालच्या दर्जाच्या अभिरुचीचे मानलेलं आहे. त्यामुळे गाजलेल्या चित्रपटांना 'बाजारू, गल्लाभरू' वगैरे विशेषणं लावणारे उच्चभ्रू त्यांकडे आपलं अपरं नाक उडवून कुठल्यातरी विधा वगैरे शोधून तिथे आपल्या उंचावलेल्या भ्रुवा (हे भ्रूचं अनेकवचन आहे. एक ऊ अनेक उवा, तसंच) वळवतात. मग त्यांचं वर्णन करण्यासाठी त्यांना अभिजात, दृक्कला, आरस्पानी, भांजाळलेल्या आधुनिकोत्तर अस्मिता वगैरे कोणालाच न कळणारे शब्द वापरतात. आपली बाजू भक्कम करण्यासाठी ते मुद्दामच स्पॅनिश, इराणी वगैरे कोणालाच न कळणाऱ्या भाषांकडेही वळतात. त्या भाषांमध्ये कसं भव्यदिव्य चित्रपटनिर्मितीचं कार्य चालू आहे आणि आपणच कसे मेले कूपमंडूक विहिरीच्या त्याच त्याच भिंती चाचपडत बसलो आहोत असलं काहीतरी लिहून टीआरपी खेचतात. (कधी कधी विहिरीच्या ऐवजी आपल्या भाषेला, संस्कृतीला डबकं म्हणण्याची प्रथा असते. पण डबकमंडुक हा शब्द प्रस्थापित नसल्यामुळे कूपमंडुक आणि डबकं हे शब्द वेगवेगळ्या चर्चांमध्ये वापरले जातात.) इझ्रायली, नॉर्वेजियन वगैरे सिनेमांना बिनधास्त वावा म्हणता येतं. 'वॉर ऍंड पीस' हे थोर पुस्तक आहे असं कोणीही ठामपणे म्हणू शकतो. कारण सहाशे पानांचा हा ठोकळा वाचण्याच्या भानगडीत कोण पडणार? तसंच टांझानियन भाषेतल्या 'टांझू टुक टुक भुश्श' या चित्रपटात आफ्रिकन मध्यमवर्गीय जीवनाच्या कंगोऱ्यांवर खास आधुनिकोत्तर शैलीत कशी गहन टिप्पणी केलेली आहे असं सांगायला काय जातं? कारण पुन्हा तेच. असला चित्रपट खऱोखर कोणी बघण्याची शक्यता जवळपास शून्य. जाणारे सगळे लोक उच्चभ्रूच. त्यामुळे एकमेकांच्यात 'सत्तेचाळीस मिनिटांचा नुसता काळोख, आणि पार्श्वभूमीला केवळ पाणी ठिबकण्याचा आवाज... या टांगाटिक्टूने कसलं दिग्दर्शन केलंय...' असं एकमेकांमध्ये बडबडायला मिळावं याचसाठी सगळे उंचभ्रुवाधारी जात असावेत अशी शंका येते.

हे सगळं आत्ताच सुचण्याचं कारण म्हणजे चेतन सुभाष गुगळे यांनी लिहिलेलं 'इनकार' या चित्रपटाचं रसग्रहण नुकतंच वाचलं http://www.aisiakshare.com/node/466. हरिदास चौधरीच्या चार नकारांभोवती या चित्रपटाची गोष्ट रुंजी घालते. दुर्दैवाने इतक्या सुंदर चित्रपटात लोकांना लक्षात काय रहातं, तर हरिदासचे कोकणस्थी डोळे, मराठमोळे हिंदी उच्चार आणि हेलनचा मुंगळा या गाण्यावरचा नाच. आता श्रीराम लागू आपलाच माणूस असल्याने पहिल्या दोन बाबतीत काही फार तक्रार करता येत नाही. पण इतकं प्रभावी कथानक असतानाही केवळ हेलनचा नाच लोकांना का लक्षात रहातो अशी खंत लेखकाने व्यक्त केलेली होती.

हेलनचा कमनीय बांधा, कामुक हावभाव, आणि ते कंबर लचकावणं यापायीच लोकं खुळे होतात. मग कथानक वगैरे विसरतात आणि आंबटशौकिनांप्रमाणे मनात तिचा झटकेदार नाच घोळवत बसतात, अशी काहीशी तक्रार त्यामागे असावी. या तक्रारीमागे हीच उच्चभ्रू वृत्ती दिसून येते. सामान्यांना आवडणाऱ्या गोष्टींना नावं ठेवल्याशिवाय आपला उच्चभ्रूपणा मुळी सिद्धच होत नाही, यापायी टीका करण्याचा अट्टाहास उघड उघड दिसतो. या लेखाचा उद्देश त्या अट्टाहासाला आव्हान देण्याचा आहे. हेलनच्या नाचातली कलात्मकता नक्की कशी आणि कुठे दिसून येते हे समजावून देण्याचा आहे. तुम्हाआम्हासारख्या सामान्यांच्याच कलात्मक जाणीवा आणि नेणिवा प्रगल्भ झालेल्या असतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. या जा/नेणिवांची अभिव्यक्ती कधीकधी फक्त शिट्या मारून दाद देऊन होते. (खरं तर दाद ही काही वेळा पेढ्यासारखी असते, ती मितस्वरी असावी - पण ही वेगळी चर्चा आहे) आपल्यासारख्या जनसामान्यांना उच्चभ्रू लोकांसारखी असल्या गोष्टींबाबत अगम्य शब्दांत मांडणी करता येत नाही, त्यातली रूपकं आत भिडली तरीही क्लिष्ट भाषेत व्यक्त करता येत नाही, हीच काय ती त्रुटी. ती भरून काढण्याचा इथे प्रयत्न आहे.

कुठच्याही विषयावर गंभीरपणे लिहायचं तर त्या विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे असं आमचं मत आहे. त्यामुळे आम्ही ते गाणं लागोपाठ सतरा वेळा बघितलं आणि मगच हा लेख लिहायला घेतला. (अनुभवातून आलेलं शहाणपण - पुरुषांनी हे नृत्य बघताना एखादं कापड लाळेरं म्हणून वापरावं) तर सांगायचा मुद्दा असा की अनेक वेळा ते गाणं व तो नाच बघितल्यावर त्यातले लपलेले पैलू रेखीव होऊन दृष्टीसमोर आले. दुर्बोधतेच्या वस्त्रपटलांखाली असलेलं अस्सल कमनीय शरीर हळूहळू दृग्गोचर व्हावं तसं. हेलनचं नृत्य पाहून अर्थातच या दुर्बोधतेच्या गाठी सोडवण्याची इच्छा बळावते. रूपकांची पटलं उलगडून आत दडलेला अर्थ जाणून घ्यावासा वाटतो. या कलाकृतीचं हे पहिलं बलस्थान.

गाणं घडतं ते एका दारूच्या गुत्त्यात. हेलन ही त्या गुत्त्याची मालकीण किंवा मॅनेजर. गुत्त्यात आलेल्या गिऱ्हाइकांना खुष करण्यासाठी ती नृत्य करते असं सकृत्दर्शनी चित्रण आहे. त्या छोट्याशा गाण्यात अनेक कथानकं घडतात, निरनिराळी पात्रं हजेरी लावतात. त्याचबरोबर भारंभार अर्थसंपृक्त रूपकांची रेलचेल आहे. एका एका कडव्याबरोबर या दृक्श्राव्याचा ('काव्याचा' या शब्दाप्रमाणे दृक्श्राव्याचा) पट एखाद्या कवितेप्रमाणे उलगडतो. असं असूनही या गाण्यातला गहन संदेश हा बटबटीत होत नाही. किंबहुना सामान्य प्रेक्षकाला, ज्याला या सगळ्या क्लिष्ट गुंत्याची उकल करण्यात रस नाही त्याच्यासाठी निखळ मनोरंजन म्हणून हे गाणं येतं. हे माझ्या मते या कलाकृतीचं दुसरं बलस्थान. मात्र या जनसामान्याभिमुख अंगामुळे अनेक उच्चभ्रूंनी, 'हॅ! हे तर निव्वळ मनोरंजन' म्हणून आपली अपरी नाकं मुरडली असावीत. या बलस्थानाचा असा उलटा परिणाम होतो ही या गाण्याचीच नव्हे तर भारतीय कलात्मक आविष्काराची शोकांतिका आहे.

या चार-साडेचार मिनिटांच्या कलाकृतीकडे स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून पहाता येतं हे खरं आहे. गाणं सुरू होतं गुत्त्यात अमजद खानच्या पात्राच्या एंट्रीने. तेव्हा गुत्ता गपगार असतो. पिऊन मरगळलेला असतो. या गाण्यातल्या नृत्याने त्या गुत्त्यात जान येते. आनंदाचा जल्लोष वाढतो. आणि त्या जल्लोषाच्या उच्चबिंदूलाच हे गाणं संपतं. त्यातल्या काही लघुकथा संपलेल्या असतात. काही नवीन ताणांची निर्मिती झालेली असते. हे ताण पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोचते. रसास्वादासाठी एखाद्या ऍपेटायझरप्रमाणे ही कलाकृती काम करते. केवळ चारेक मिनिटांची व्याप्ती असल्याने काही जण हिच्यात अपुरेपणाची तक्रार करतील. शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांनी नेहमीच लता मंगेशकरसारख्यांवर ही टीका केलेली आहे - एखाद्या रागाची अभिव्यक्ती इतक्या लहान कालावधीत करणं अशक्य आहे असं त्यांचं ठाम म्हणणं असतं. पण नक्की किती लहान कलाकृती ही कलाकृती मानावी? या चर्चेत शिरण्याची इच्छा नाही. फक्त एवढंच म्हणू की एखाद्या वडापावातून जे समाधान अपेक्षित असतं त्या समाधानाला पंचपक्वान्नाच्या मेजवानीतून मिळणाऱ्या आनंदाचे निकष लावणं योग्य नाही.

एका स्वतंत्र कलाकृतीबरोबरच हे गाणं 'इनकार' चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावतं. अमजद खान हा या कथेतला प्रतिनायक. त्याचं व्यक्तिमत्व धारदार, सामर्थ्यशाली करण्यासाठी या गाण्याचा पार्श्वभूमी म्हणून उपयोग होतो. या गाण्यात जे ताणतणाव निर्माण होतात त्यांची परिणती अमजदखान हा निडर, शक्तिवान व निर्घृण पुरुष आहे हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यात होते. एकाच वेळी स्वतंत्र कलाकृती म्हणून स्वतःच्या पायावर उभं रहाण्याची, आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या रचनेतला महत्त्वाचा खांब होण्याची, अशा दोन्ही क्षमता हे गाणं बाळगून आहे. 'इनकार' या चित्रपटरूपी गजलेतला हा एक शेरच जणू. हे तिसरं बलस्थान.

वरवर बाजारू वाटणाऱ्या कलाकृतीत किती पदर असतात! हेलनच्या वरवर उत्तान वाटणाऱ्या नृत्याला किती अंगं असतात! विचार करून थक्क व्हायला होतं. या कलाकृतीच्या बलस्थानांचा थोडक्यात आढावा आपण घेतला. पुढच्या भागात आपण या तीतील प्रतिमांचं, रूपकांचं वैविध्य पाहून त्यातून काय गवसतं हे तपासून पाहू.

(क्रमशः)

field_vote: 
2.88889
Your rating: None Average: 2.9 (9 votes)

प्रतिक्रिया

_/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपल्यासारखे दिग्गज पदरमोड करून असे ज्ञानकण आम्हां अज्ञ जीवांच्या पार आतपर्यंत पोचवतात म्हणून आम्ही 'ऐसी अक्षरे'चे शतशः ऋणी आहोत!
- पुढील भागांच्या प्रतीक्षेत हेलनप्रेमी जंतू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपल्यासारखे दिग्गज असले व्हिडीओ आमच्याकरता देता.. आपलं हे उलगडवून समजावून देता म्हणून आम्ही शतशः ऋणी आहोत. अजून व्हिडिओजच्या प्रतीक्षेत.

-व्हिडिओप्रेमी चिंटू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"वॉज धिस द लार्ज अँट दॅट लाँच्ड अ थाउजंड स्पूफ्स बाय द गुर्जीज्
अँड बर्न्ट द (ऑलमोस्ट) टॉपलेस अँग्लो इंड्यन दीवा "
- राजहॉपर घासलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सुरुवातीच्या पॅरेग्राफमधे चक्कर आली. पुढचं वाचून क्रमशः प्रतिक्रिया देण्यात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री राजेश घासकडवी यांचे या लेखाबद्द्ल आभार.

जनसामान्यांना अनेक उच्चभ्रूंनी आत्तापर्यंत खालच्या दर्जाच्या अभिरुचीचे मानलेलं आहे. त्यामुळे गाजलेल्या चित्रपटांना 'बाजारू, गल्लाभरू' वगैरे विशेषणं लावणारे उच्चभ्रू त्यांकडे आपलं अपरं नाक उडवून कुठल्यातरी विधा वगैरे शोधून तिथे आपल्या उंचावलेल्या भ्रुवा (हे भ्रूचं अनेकवचन आहे. एक ऊ अनेक उवा, तसंच) वळवतात. मग त्यांचं वर्णन करण्यासाठी त्यांना अभिजात, दृक्कला, आरस्पानी, भांजाळलेल्या आधुनिकोत्तर अस्मिता वगैरे कोणालाच न कळणारे शब्द वापरतात. आपली बाजू भक्कम करण्यासाठी ते मुद्दामच स्पॅनिश, इराणी वगैरे कोणालाच न कळणाऱ्या भाषांकडेही वळतात. त्या भाषांमध्ये कसं भव्यदिव्य चित्रपटनिर्मितीचं कार्य चालू आहे आणि आपणच कसे मेले कूपमंडूक विहिरीच्या त्याच त्याच भिंती चाचपडत बसलो आहोत असलं काहीतरी लिहून टीआरपी खेचतात. (कधी कधी विहिरीच्या ऐवजी आपल्या भाषेला, संस्कृतीला डबकं म्हणण्याची प्रथा असते. पण डबकमंडुक हा शब्द प्रस्थापित नसल्यामुळे कूपमंडुक आणि डबकं हे शब्द वेगवेगळ्या चर्चांमध्ये वापरले जातात.) इझ्रायली, नॉर्वेजियन वगैरे सिनेमांना बिनधास्त वावा म्हणता येतं. 'वॉर ऍंड पीस' हे थोर पुस्तक आहे असं कोणीही ठामपणे म्हणू शकतो. कारण सहाशे पानांचा हा ठोकळा वाचण्याच्या भानगडीत कोण पडणार? तसंच टांझानियन भाषेतल्या 'टांझू टुक टुक भुश्श' या चित्रपटात आफ्रिकन मध्यमवर्गीय जीवनाच्या कंगोऱ्यांवर खास आधुनिकोत्तर शैलीत कशी गहन टिप्पणी केलेली आहे असं सांगायला काय जातं? कारण पुन्हा तेच. असला चित्रपट खऱोखर कोणी बघण्याची शक्यता जवळपास शून्य. जाणारे सगळे लोक उच्चभ्रूच. त्यामुळे एकमेकांच्यात 'सत्तेचाळीस मिनिटांचा नुसता काळोख, आणि पार्श्वभूमीला केवळ पाणी ठिबकण्याचा आवाज... या टांगाटिक्टूने कसलं दिग्दर्शन केलंय...' असं एकमेकांमध्ये बडबडायला मिळावं याचसाठी सगळे उंचभ्रुवाधारी जात असावेत अशी शंका येते.

अगदी योग्य निरीक्षण. यातून घासकड्वीची अभ्यासू व्रुत्ती स्पष्टपणे दिसून येते.नुसतीच उच्चभ्रुवर टीका न करता पुराव्यानिशी वस्त्रहरन केलल आहे.

कुठच्याही विषयावर गंभीरपणे लिहायचं तर त्या विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे असं आमचं मत आहे. त्यामुळे आम्ही ते गाणं लागोपाठ सतरा वेळा बघितलं आणि मगच हा लेख लिहायला घेतला.

क्या बात है. आवडल आपल्याला.या गहन विषयावर लिहायच तर तयारी हवीच. (कोण रे तो अशा पवित्र हेतूविशयी शंका घेतोय.काड्यघालू कुठचे)

दुर्बोधतेच्या वस्त्रपटलांखाली असलेलं अस्सल कमनीय शरीर हळूहळू दृग्गोचर व्हावं तसं. हेलनचं नृत्य पाहून अर्थातच या दुर्बोधतेच्या गाठी सोडवण्याची इच्छा बळावते. रूपकांची पटलं उलगडून आत दडलेला अर्थ जाणून घ्यावासा वाटतो. या कलाकृतीचं हे पहिलं बलस्थान.

गाणं घडतं ते एका दारूच्या गुत्त्यात. हेलन ही त्या गुत्त्याची मालकीण किंवा मॅनेजर. गुत्त्यात आलेल्या गिऱ्हाइकांना खुष करण्यासाठी ती नृत्य करते असं सकृत्दर्शनी चित्रण आहे. त्या छोट्याशा गाण्यात अनेक कथानकं घडतात, निरनिराळी पात्रं हजेरी लावतात. त्याचबरोबर भारंभार अर्थसंपृक्त रूपकांची रेलचेल आहे. एका एका कडव्याबरोबर या दृक्श्राव्याचा ('काव्याचा' या शब्दाप्रमाणे दृक्श्राव्याचा) पट एखाद्या कवितेप्रमाणे उलगडतो. असं असूनही या गाण्यातला गहन संदेश हा बटबटीत होत नाही. किंबहुना सामान्य प्रेक्षकाला, ज्याला या सगळ्या क्लिष्ट गुंत्याची उकल करण्यात रस नाही त्याच्यासाठी निखळ मनोरंजन म्हणून हे गाणं येतं. हे माझ्या मते या कलाकृतीचं दुसरं बलस्थान.

अभ्यासू वृत्ती.सुरेख रसग्रहण. एकेक पदर अग्दी हळुवार पणे उलगडलाय.तो ही सोप्या भाषेत.सामान्य जनांच्या नेणिवेत यामुळे मोलाची भर पडली आहे.

या चार-साडेचार मिनिटांच्या कलाकृतीकडे स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून पहाता येतं हे खरं आहे. गाणं सुरू होतं गुत्त्यात अमजद खानच्या पात्राच्या एंट्रीने. तेव्हा गुत्ता गपगार असतो. पिऊन मरगळलेला असतो. या गाण्यातल्या नृत्याने त्या गुत्त्यात जान येते. आनंदाचा जल्लोष वाढतो. आणि त्या जल्लोषाच्या उच्चबिंदूलाच हे गाणं संपतं. त्यातल्या काही लघुकथा संपलेल्या असतात. काही नवीन ताणांची निर्मिती झालेली असते. हे ताण पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोचते. रसास्वादासाठी एखाद्या ऍपेटायझरप्रमाणे ही कलाकृती काम करते. केवळ चारेक मिनिटांची व्याप्ती असल्याने काही जण हिच्यात अपुरेपणाची तक्रार करतील. शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांनी नेहमीच लता मंगेशकरसारख्यांवर ही टीका केलेली आहे - एखाद्या रागाची अभिव्यक्ती इतक्या लहान कालावधीत करणं अशक्य आहे असं त्यांचं ठाम म्हणणं असतं. पण नक्की किती लहान कलाकृती ही कलाकृती मानावी? या चर्चेत शिरण्याची इच्छा नाही. फक्त एवढंच म्हणू की एखाद्या वडापावातून जे समाधान अपेक्षित असतं त्या समाधानाला पंचपक्वान्नाच्या मेजवानीतून मिळणाऱ्या आनंदाचे निकष लावणं योग्य नाही.

परीक्षणात केवळ काय चांगल आहे नी काय वाईट आहे ह्यावरच न थांबता ते परीक्षण रंगतदार कस होईल या ग्रासस्टांझाच्या शैलीचे आम्ही अगोदर्पासून फॅन आहोत. समाज्यातील विसंगतीवर अचूकपणे बोट ठेवण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे.

एका स्वतंत्र कलाकृतीबरोबरच हे गाणं 'इनकार' चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावतं. अमजद खान हा या कथेतला प्रतिनायक. त्याचं व्यक्तिमत्व धारदार, सामर्थ्यशाली करण्यासाठी या गाण्याचा पार्श्वभूमी म्हणून उपयोग होतो. या गाण्यात जे ताणतणाव निर्माण होतात त्यांची परिणती अमजदखान हा निडर, शक्तिवान व निर्घृण पुरुष आहे हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यात होते. एकाच वेळी स्वतंत्र कलाकृती म्हणून स्वतःच्या पायावर उभं रहाण्याची, आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या रचनेतला महत्त्वाचा खांब होण्याची, अशा दोन्ही क्षमता हे गाणं बाळगून आहे. 'इनकार' या चित्रपटरूपी गजलेतला हा एक शेरच जणू. हे तिसरं बलस्थान.

पूर्णपणे सहमत.

वरवर बाजारू वाटणाऱ्या कलाकृतीत किती पदर असतात! हेलनच्या वरवर उत्तान वाटणाऱ्या नृत्याला किती अंगं असतात! विचार करून थक्क व्हायला होतं. या कलाकृतीच्या बलस्थानांचा थोडक्यात आढावा आपण घेतला. पुढच्या भागात आपण या तीतील प्रतिमांचं, रूपकांचं वैविध्य पाहून त्यातून काय गवसतं हे तपासून पाहू.

अतिशय योग्य विचार.पुढचे भाग लवकर येउ द्यात.

बाकी आता हेलनने सुरुवात केली आहेच तर या मालिकेतील पुढची पुष्प जलेबीबाई, मुन्नी वैग्रे असावीत ही विनम्र सुचवणी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

>>बाकी आता हेलनने सुरुवात केली आहेच तर या मालिकेतील पुढची पुष्प जलेबीबाई, मुन्नी वैग्रे असावीत ही विनम्र सुचवणी

अंहं आधी जयश्री टी., सरला येवलेकर, संजीवनी बीडकर वगैरे यायला हव्यात.
- देशीवादी जंतू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अंहं आधी जयश्री टी., सरला येवलेकर, संजीवनी बीडकर वगैरे यायला हव्यात.

चालेल की
त्या निमित्ताने ग्रासस्टांझाच लिखाण तरी वाचायला मिळेल. आणि नेणिवा आणखी समृद्ध होतील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

'ऐअ' वर 'ग्रासस्टांझा' हे वाचून धन्य झालो. आता कुणीतरी 'बेटी बी' हेही वापरुन टाकावे.
बाकी घासकडवींच्या लिखाणाबद्दल काय बोलावे? सिर्फ नाम ही काफी है..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

बरा कालापव्यय आहे!
अनावरणात मनस्वी रस दिसतो तुम्हाला. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरोगामी महाराष्ट्रात जन्माला येऊन पुढे प्रतिगामी अमेरिकेत प्रयाण करणार्‍या, उच्चविद्याविभूषित आणि काव्य-शास्त्र-विनोदनिपुण राजेश घासकडवी यांनी अशा प्रकारच्या 'चीप' विषयांवर चवीने लिहावे याचा खेद झाला. स्त्री-देहाचं असं जाहीर प्रदर्शन मुळात संस्कृती आणि रूढीप्रिय भारतात व्हावं याचाच मुळात मला खेद झाला. ते तिथेच सोडून न देता राजेश घासकडवी यांनी अशा प्रकारांचं समर्थन करावं याचा अतिशय त्रास झाला. त्यातूनही मेघना भुस्कुटे आणि जाई असे स्त्री आयडी धारण करणार्‍यांनीही श्री. घासकडवी यांना साथ द्यावी हे सर्व उद्वेगजनक आहे.

त्यातून श्री. घासकडवी यांचा सर्व प्रकारचा तुच्छतावाद माफ केला तरीही स्वतःला प्रगत समजणार्‍या देशात रहाणार्‍यांकडून अल्पसंख्यांकांची पुरुषांनी हे नृत्य बघताना एखादं कापड लाळेरं म्हणून वापरावं अशा प्रकारे उपेक्षा करणे हे अजिबातच अपेक्षित नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हं हे आले लगेच उच्चभृ काड्या सारायला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

एका बाजूला स्त्रीमुक्तीवादी विचारसरणी कवटाळायची आणि दुसऱ्या बाजूला असल्या विषयांना 'चीप' म्हणायचं हा प्रतिगामीत्वाचा आणि उच्चभ्रूपणाचा एकाच वेळी कळस आहे. उच्चभ्रूंच्या प्रतिगामीत्वाला अत्यंत चपखल शब्द आहे - बूर्झ्वा मनोवृत्ती - तो इथे लागू पडतो. या लेखाचा उद्देशच मुळी हे दृक्श्राव्य 'चीप' नाही असं सांगण्याचा आहे.

या बूर्झ्वा मनोवृत्तीला हेच नग्नतेचं वर्णन संस्कृतप्रचूर शब्द लेऊन आलं की पचतं. नग्नतेला आजही किती विरोध होतो हे मी वेगळं सांगायची गरज नाही. राजा बढेंना याचा काही त्रास झाला होता का:

गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी?
पाहू दे मेघाविन सौंदर्य तुझे मोकळे

नग्नतेमधेही सौंदर्य असू शकतं असा विचार त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच मांडलेला नाही का? यावरून कधी गदारोळ झाला होता का? गाण्यातलं वर्णन 'चंचले'चं (वीज म्हणा, स्त्री म्हणा!) असेल तरीही ही चंचला कोणी पॉर्न स्टार किंवा नगरवधू असण्याचा उल्लेख आहे असं मलातरी वाटत नाही. तिला कोणी चीप म्हटलेलं नाही.

लाविली थंड उटी वाळ्याची
सखिच्या कुचकलशांसी

हे गाणं वसंतराव देशपांडेंनी आळवून आळवून म्हटल्याचं आठवतं.

अल्पसंख्यांकांची 'पुरुषांनी हे नृत्य बघताना एखादं कापड लाळेरं म्हणून वापरावं' अशा प्रकारे उपेक्षा करणे हे अजिबातच अपेक्षित नव्हतं.

उपेक्षा? चमचमीत बटाटेवडा खाताना हातात नॅपकिन बाळगावा असा सल्ला दिला तर ती उपेक्षा कशी होईल? तुमचा आक्षेप लैंगिक भेदभाव करण्याला असेल तर मी स्त्रियांना हा सल्ला दिला नाही हे बरोबरच. पण हेलनचं नृत्य बघताना स्त्रिया कलास्वाद घेण्याऐवजी आपल्या कंबरेच्या घेराबद्दल कॉन्शस होतात. त्यावर काय सल्ला देणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेलनचं नृत्य बघताना स्त्रिया कलास्वाद घेण्याऐवजी आपल्या कंबरेच्या घेराबद्दल कॉन्शस होतात.

न मिळालेली द्राक्षं सगळ्या कोल्ह्यांना (किंवा कोल्हिणींना) आंबट हे सरसकटीकरण होतंय बरं. आजकाल झीरो फिगरचा जमाना आहे त्यामुळे असं म्हणता येईल का की काही व्यक्ती कंबरेच्या घेराविषयी आधीच कॉन्शस असल्यामुळे त्यांना हेलन अनाकर्षक आणि कलाहीन वाटते आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

न मिळालेली द्राक्षं सगळ्या कोल्ह्यांना (किंवा कोल्हिणींना) आंबट हे सरसकटीकरण होतंय बरं.

असेलही (तशी बिनसरसकट विधानं कंटाळवाणीच होतात). पण पुरषाच्या पोटाचा घेर कितीही असला तरी तो हेलनकडे बघताना आपल्या पोटाचा विचार करत नाही. याउलट बायका मात्र लग्गेच तसले विचार करतात. तसले म्हणजे 'भला उसकी कंबर मेरी कंबर से बारीक कैसे'

आणि हो, या कोल्हा-द्राक्षं दृष्टान्ताची आठवण करून दिलीत ते बरं झालं. हेलनसारख्यांकडे अपरं नाक मुरडून भ्रुवा दुसरीकडे वळवण्याच्या मागची एक शक्यता लक्षात करून दिलीत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका बाजूला स्त्रीमुक्तीवादी विचारसरणी कवटाळायची आणि दुसऱ्या बाजूला असल्या विषयांना 'चीप' म्हणायचं हा प्रतिगामीत्वाचा आणि उच्चभ्रूपणाचा एकाच वेळी कळस आहे. उच्चभ्रूंच्या प्रतिगामीत्वाला अत्यंत चपखल शब्द आहे - बूर्झ्वा मनोवृत्ती - तो इथे लागू पडतो. या लेखाचा उद्देशच मुळी हे दृक्श्राव्य 'चीप' नाही असं सांगण्याचा आहे.

या बूर्झ्वा मनोवृत्तीला हेच नग्नतेचं वर्णन संस्कृतप्रचूर शब्द लेऊन आलं की पचतं. नग्नतेला आजही किती विरोध होतो हे मी वेगळं सांगायची गरज नाही. राजा बढेंना याचा काही त्रास झाला होता का:

'असले' विषय या शब्दप्रयोगातून तुम्हाला नक्की काय सुचवायचे आहे? स्त्री ही फक्त (बहुसंख्य) पुरूषांच्या शारीरिक आकर्षणाएवढीच नाही ही साधी सरळ गोष्ट तुम्हाला समजू नये याचा खेद वाटतो.
नग्नता म्हणजे लैंगिकता, कामुकता नव्हे! आणि तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र जोडत आहात. उद्या तुम्ही सौंदर्यस्पर्धांचाही पुरस्कार कराल!

उपेक्षा? चमचमीत बटाटेवडा खाताना हातात नॅपकिन बाळगावा असा सल्ला दिला तर ती उपेक्षा कशी होईल? तुमचा आक्षेप लैंगिक भेदभाव करण्याला असेल तर मी स्त्रियांना हा सल्ला दिला नाही हे बरोबरच. पण हेलनचं नृत्य बघताना स्त्रिया कलास्वाद घेण्याऐवजी आपल्या कंबरेच्या घेराबद्दल कॉन्शस होतात. त्यावर काय सल्ला देणार?

चमचमीत बटाटावडा खाताना स्त्री-पुरूष सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि असलं चमचमीत सदोदित खाऊन सर्वांचेच आकार वाढतात; त्यात काही लिंगभाग येत नाही. हेलनच्या कमरा-आकाराच्या कमरेबद्दल एक आक्षेप जंतूंनी आधीच मांडला आहे. पण माझा आक्षेप होता तो LGBT या अल्पसंख्य गटाकडे दुर्लक्ष करण्याबद्दल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'असले' विषय या शब्दप्रयोगातून तुम्हाला नक्की काय सुचवायचे आहे?

ज्या विषयांना तुमच्यासारखे बूर्झ्वा लोक 'चीप' म्हणतात तसले.

स्त्री ही फक्त (बहुसंख्य) पुरूषांच्या शारीरिक आकर्षणाएवढीच नाही ही साधी सरळ गोष्ट तुम्हाला समजू नये याचा खेद वाटतो.

खरीखुरी स्त्री व स्त्रीची कलाकृतीतली प्रतिमा यातला फरक तुम्हाला कळत नाही, हे दुर्दैव. हेलनचं चित्र काढून त्याखाली
ce n'est pas une femme
असं लिहिलं की तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल.

नग्नता म्हणजे लैंगिकता, कामुकता नव्हे!

या वाक्यातला स्वल्पविराम हा स्वल्पविराम आहे की अर्धविराम ते कळलं नाही. अर्थात त्याने काही फारसा फरक पडत नाही म्हणा, कारण दोन्ही पद्धतीने वाचूनदेखील वाक्यातून फारसा अर्थ निघत नाही. आणि सौंदर्यस्पर्धांना काय हरकत आहे? कोणाला बुद्धीबळं खेळायला आवडतं, कोणाला सौंदर्यस्पर्धांत भाग घ्यायला आवडतं. तुम्हाला बहुतेक उगाचच्या उगाच खुसपटं काढायला आवडतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेलनचा नाच मला आवडतो, मला हेलनच आवडते. .. त्यामुळे मी आवाज बंद करून तिला डोळे भरून पाहिले. (हेलनवरून हजार राखी सावंत ओवाळून टाकता येतील.. तरि कमीच)) अहा ..
आता झिनत अमानबद्दल ही लिहा काही. त्यासाठी काचेचे ग्लास आणि त्याचा आवाज इत्यादी विश्लेषणाचा विषय म्हणून हरकत नाही., अर्थात तो अधिकार आपलाच.
(हेलन आवडण कदाचित उच्चभ्रू नसेल.. माझ्या लेखनावरून कोण कायकाय अंदाज करत तो त्या व्यक्तीचा प्रश्न)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

एखाद्या वडापावातून जे समाधान अपेक्षित असतं त्या समाधानाला पंचपक्वान्नाच्या मेजवानीतून मिळणाऱ्या आनंदाचे निकष लावणं योग्य नाही.

सहमत.

बाकी श्रीगणेशा 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया या' ने व्हायला हवा होता. पण ते एक असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सानिया, वडापाव एखाद्याला पक्वान्न वाटू शकतो:) काय करणार?
निकषाच काय घेऊन बसलात एवढ.. अस सगळ चालयचच. हेलनने तक्रार केली असे कुठे वाचले का?:)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

वडापाव एखाद्याला पक्वान्न वाटू शकतो

कुपोषित लोकांसाठी वडापाव पक्वान्नच! पण म्हणून कुपोषणाचा पुरस्कार अशा ही&ही पद्धतीने करण्यावर आक्षेप आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वडापाव हे पक्वान्न नाही. पक्वान्न ही संकल्पनाच मुळात तुमच्यासारख्या उच्चभ्रुंनी आपल्या जीभेचे चोचले पुरवण्याकरता निर्माण केलेली आहे. असल्या संकल्पनांची आम्हा सामान्यांना काही गरज नाही. तेव्हा आमच्या वडापावाला उगाच पक्वान्न वगैरे म्हणू नका.

-वडापावप्रेमी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या काळातल्या चित्रपटांच्या आठवणीने अंमळ हळवा झालो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास! लेख आवडला.

वरवर बाजारू वाटणाऱ्या कलाकृतीत किती पदर असतात!

कुठे ब्वॉ? गाण्यात तर एकही दिसला नाही. आता आंतरजालावर लेखक दडपून पदरची माहिती देतात, ह्याची प्रचीती आली Wink

पुढच्या भागात आपण या तीतील प्रतिमांचं, रूपकांचं वैविध्य पाहून त्यातून काय गवसतं हे तपासून पाहू.

बेश्ट! 'शोले'त सचिनच्या पात्राचा जीव घेताना दाखवलेला मुंगळा आणि ह्या गाण्याच्या सुरुवातीला दाखवलेला मुंगळा पाहून मर्ढेकरांची 'मी एक मुंगी' कविता आठवली. 'शोले, हेलन आणि मर्ढेकर' ह्या आधुनिक लघुकथेला शोभेलशा शीर्षकाचे कॉपीराईट्स 'सोटा' आक्टान्वये राखून ठेवण्याची सोय आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान हो राजेशराव. मराठी चित्रपटांना हे जमायचे नाही हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शीर्षकातील मुंगळा, वस्त्र, अनावरण हे तीन शब्द वाचून या धाग्याकडे ओढला गेलो. पण हे भलतंच काही आहे (रादर, भलतंच काही नाहीये Wink ) शिवाय निवांत वाचायचा धागा आहे हे लक्षात येताच वाचने बंद केले. Wink निवांत वाचून उत्तराई होईन. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मला पैल्यांदा 'ग्रासस्टांझा' हे प्रकरण झेपलंच नाही एकदम. नंतर ट्यूब पेटली.
पुढच्या भागातल्या प्रतिमा आणि रुपकांचा वापर याबद्दल enlightened होण्याबद्दल उत्सुक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

चार आठवडे उलटून गेलेत. क्रमशः त आता पुढच्या क्रमांकावर काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

ऐसी अक्षरे उघडल्याचे सार्थक झाले आज.

चार-साडेचार मिनिटांच्या कलाकृतीचे येवढे कमनीय रसग्रहण करणारे घासुगुर्जी ग्रेटच आहेत बॉ ! __/\__

बाकी ऐसीअक्षरे वरती इतर भाषातील पद्यांचा मराठी भावानुवाद वैग्रे कोणी करत नाही का हो ? मला 'हिप्स डोंट लाय' आणि 'अ‍ॅलीस.. हू द ## इज अ‍ॅलीस' चा भावानुवाद हवा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

बाकी सर्व राहू द्या. आजपर्यंत मला या गाण्याचे शब्दच संपूर्णपणे कळले नाहीत. ते कुठे मिळतील ? ते आधी कळले तर बाकी रसग्रहणाचं काय ते पहाता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

Tu mungda, oh mungda, main gud ki dali
Mangta hai to aaja rasiya na hi to main le chali - 2
Tu mungda, oh mungda, main gud ki dali
Mangta hai to aaja rasiya na hi to main le chali
Oh le baiyyaan thaam gori gulaabi
Le baiyyaan thaam gori gulaabi
Daaru ki botal chhodo re anari sharaabi - 2
Oh sharaabi
Mungda, mungda, mungda, main gud ki dali
Zara mera nasha bhi chak le aaya jo meri gali
Aafat ki jaan dekhe so lut jaaye - 2
Tu jis mein naina taan haathon se pyaala satak jaaye - 2
Aa chitak jaa
Mungda, mungda, mungda, main gud ki dali
Kaisa mulga hai besharmila tujhse to mulgi bhali - 2
Tu mungda, oh mungda, main gud ki dali
Mangta hai to
Mangta hai to aaja rasiya na hi to main le chali - 2

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

धन्यवाद,चेतन गुगळे. चख ले, चिटक जा, याचा अर्थ आता समजला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मला ऐकू आलेले शब्द या शब्दांपेक्षा थोडे वेगळे आहेत. उदा:
तू मुंगळा मै गुड की कली ...

का फक्त माझेच कान वाजतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>

फक्त तुमचेच नाही तर सर्वांचेच वाजतात. आपले कान ओळखीचे शब्द शोधायचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हालाच नाही तर अनेकांना ते आधी गुड की कली असंच वाटतं. डली (ढेप http://hindi.indiandictionaries.com/meaning.php?id=6648&lang=Hindi) हा शब्द आपल्यापैकी (इथे चित्रपटापुरताच हिंदीशी संबंध येणारे मराठी जन असा अर्थ अभिप्रेत आहे) अनेकांनी ऐकलेलाच नसतो.

मला आधी रसिक बलमा हे गाणं बस इक बलमा असं वाटायचं कारण रसिक हा शब्द मराठी असून तो हिंदी गाण्यात ऐकायला मिळेल अशी अपेक्षाच नसायची. असं अजुन अनेक गीतांच्या बोलांविषयी म्हणता येईल, पण तो एक स्वतंत्र धाग्याचा विषय होऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तसंही असेल. पण गुड की कली म्हणणं ठीक आहे हो, गुळाची ढेप असं कोण हेलन* स्वतःला म्हणवून घेईल? नेटवर वेगवेगळ्या सायटींवर गाण्यांच्या ओळी सापडतात पण त्या निर्दोष असण्याची खात्री नसते. या गाण्यात चित्रपटीय मराठी कोळी स्त्रियांसारखे कपडे घातलेली हेलन उषा मंगेशकरांच्या आवाजात निश्चितच मुंगळा म्हणते.

*म्हणायचं तर म्हणू देत. तशीची तिची फिगर थोडीच झिरो आहे? तसंही तिने स्वतःला गुड की ढेप म्हणू देत नाहीतर स्वतःच्या कमरेला कमरा!
अवांतरः यूट्यूबच्या मूळ आकारात हेलनचा चेहेरा मला शर्मिला टागोरसारखा वाटतो. (आणि मोठ्या टीव्हीवरही रेशेल वाईजचा चेहेरा आशा पारेखसारखा.)

"कजरा रे, मेरे कारे कारे नैना" म्हणत ऐश्वर्या राय, डोळ्यात काळ्या लेन्सेस न घालताही नाचणार असेल तरीही माझं काह्ही जात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीशी सहमत. लिरिक मिळाल्यावर पुन्हा गाणं ऐकलं. पण ' डली' हा शब्द काही ऐकू आला नाही. काही का असेना, थोडक्यात, हेलन म्हणजे गुळ आणि बाकी पब्लिक म्हणजे 'मुंगळा' असंच कवी(?)ला म्हणायचं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

लेखाबद्दल घासकडवी यांना...._/\__/\__/\__/\__/\_

@पण इतकं प्रभावी कथानक असतानाही केवळ हेलनचा नाच लोकांना का लक्षात रहातो अशी खंत लेखकाने व्यक्त केलेली होती. >>> या निमित्तानी आमचा गुगळेंना एक प्रश्न.. हेलनचा नाच विसरुन कथानक लक्षात राहाण्यासाठी काय करावे..?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

>

त्या करिता चित्रपटाचे कथानक विशद करून सांगणार्‍या आमच्या लांबलचक लेखाची (वर घासकडवींनी लिंक दिलेली आहेच) पारायणे करावीत. काही शंका असल्यास तिथेच विचाराव्यात.

अवांतर :- भटजीबुवा, आमच्या लेखाऐवजी घासकडवींच्या लेखाची किंवा त्यांच्या स्टाईलमध्ये मुंगळा गाण्याची पारायणे करीत बसाल तर यजमानांच्या घरी गेल्यावर मुखातून श्लोक / मंत्रां ऐवजी मुंगळाच बाहेर पडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com