" धूर्त , चतुर वगैरे ..."

पुण्याच्या छप्पन्न वर्षे पाहिलेल्या धूर्त, चतुर वगैरे मित्रांची
वयस्क केसाळ कांती कलत्या उन्हात
चमकत असते.
मुलांनाही आता मुलं होऊ घातलीत आणि बायको
विरागिणी.
शेजारच्या सिगारेटच्या धुराचा
त्रास होत नाही: (पुण्यात आता चांगले
कॅन्सर हॉस्पिटल आहेच.)
पोटही तसे हात फिरवायला...
जॉगिंग वगैरे नसते धंदे नकोच या वयात.
अमेरिकेतून आलेल्या त्रस्त युद्ध्ग्रस्तांना ते विचारतात: भलत्या
जड तलवारी उरापोटी उचलायला तुला
कोणी सांगितलं रे माठ्या ? दूरच्या खिंडींवर
विकतची लढाई!
आमच्या टेकडीवरच्या खिंडीतून आम्ही जातो
सहज पलीकडे,
स्कूटरवरून !

---

field_vote: 
0
No votes yet