स्साला... रोच्ची कटकट

स्पष्टीकरण --
" रोजची कटकट" ह्या लिखित शब्दांचा प्रत्यक्ष उच्चार "स्साला... रोच्ची कटकट" असा केलाय.
स्पष्टीकरण समाप्त--
माझं त्या "तारे जमीनपर" पिच्चरमध्ये तो लहान मुलगा आहे ना "इशान अवस्थी"... त्याच्यासारखं होतं.
बुटाची लेस बांधता येत नाही झटकन. फार प्रयत्न करावे लागतात. पिशवीची बांधलेली गाठ सोडवता येत नाही.
रस्त्यानं जाताना फक्त समोरच लक्ष असतं. आजूबाजूला फारसं नाही. (पेरिफेरल व्हिजन नसणे बहुतेक ह्यालाच म्हणत असावेत.)
रस्ते लक्षात रहात नाहित. अगदि रडकुंडिला आलो. खुप प्रयत्न केले. पण नाहिच लक्षात रहात.
तिखट खाणं सहन होत नाही. पंख्याखाली झोपता येत नै. खूपदा प्रयत्न केले. पण झेपतच नै.
ग्रुपमध्ये लोक बोलत असतील तर ग्रुपच्या र्‍हिदममध्ये येता येत नै. ग्रुप डायनामिक्सशी जुळवून घेणं जड जातं.
लोकं काहीतरी इनसायडर जोक्स मारतात. चटकन् क्लिक होत नै.
टॉपलेस् स्ट्रिप क्लब मध्ये चार वर्षाचं बालक जावं ; तितपत गोंधळल्यासारखा चेहरा करुन असतो.
आणि गब्बर पुन्हा पुन्हा स्पर्धा, संघर्ष वगैरे बोलतो. दबाव येतो. अर्थात मी गोंधळलो आहे की नै म्याटर करत नै;
विशेषतः १९९२ नंतरच्या उदारीकरणानंतर गाडीनं अपरिहार्य वळण कुठं घेतलय; हेही समजत असतं.कळत असतं. पण वळत नसतं.
"इशान अवस्थी " पाहिला आणि एकदम " अर्रे! हाच तरे मी" म्हणत चकित झालो. हाच तर होता लहानपणीचा मनोबा.
"विल पावर , संघर्ष, प्रयत्न ,इन्स्पिरेशन" वगैरे थोरांची कामं आहेत.
आम्ही संघर्ष करतोय, स्वतःची खूप आपटतोय. पण अजूनही झटझट बुटाची लेस बांधता येत नै .
नोटांचं बंडल असेल; तर पटापट मोजता येत नै. एकसारखी स्वाक्षरी/सही पुन्हा पुन्हा करता येत नै.
लोकांना सही करुन चेक देणं टेन्शनचं काम वाटतं. पब्लिक चक्क इतरांच्या सहीची नक्कल करते! आम्हाला स्वतःचीच सही करता येत नै. Sad
गाडी चालवत असतानाच शिंक कशी येते ते समजत नै. सहज काम-बिम करत असताना शिंक आली तरी नेमक्या वेळी रुमाल सापडत नै.
तोंडावर हात ठेवून शिंक द्यावी लागते. आणि मग उगाच 'एक्स्युज् मी' म्हणत नम्रतेचा सूर आणावा लागतो.
कधी ग्रुपसोबत लंच/डिनरला गेलो तर सगळं लक्ष लहान मुलासारखं खाण्याकडच असतं.
अगदि सहजतेने मन लावून खात बसतो. लोकांच्या गप्पा काय चालल्यात; काय टॉपिक आहे; कशाचच भान नै.
पिच्चरात त्या इशान अवस्थीच्या लहानपणाचा काळ दाखवलाय. बहुतेक तो पुढं मोठा चित्रकार तरी झाला असेल.
आम्हाला चित्रं, संगीत, खेळ/स्पोर्ट, क्यारम-चेस कै येतच नै.त्याच्यासाठी त्या "लहानपणीच्या आठवणी" आहेत.
"तारे जमीनपर " मधला तो माठ मनोबा मोठा झाल्यावर एखादा "स्टार" तरी झाला असेल.
त्याला एखाद्या तरी क्षेत्रात गती आहे. खर्‍या मनोबाला तोही स्कोप नै. आमची तर साला आख्खी लाइफच अशी आहे.
आमच्या जिंदगीची स्क्रिप्ट नेमकी कोणी लिहिलिये हेच समजत नै.
.
मला भूक लागते. कधी कधी खुप भूक लागते. मग मी दोन तीन वाट्या घट्ट वरण नैतर भाज्या घेउन बसतो ; कधी खायला न मिळाल्यासारखं.
भिजवलेले बदाम खायला घेतले तर एक दोन पुरत नैत. दहा पंधरा खातो. मग नंतर शेप्रेट, फुल्ल, पोटभर नाश्ता करतो.
मी असं पोटभर जेवत असताना म्हणे लोक माझ्याचकडे बघत असतात. बघेनात का. खात असताना माझं लक्ष खाण्याकडे असतं;
माझ्यावर लक्ष ठेवून असणार्‍यांकडे माझं लक्ष नसतं.
.
गब्बरच्या 'मार्केट'ला असेही काही लोक असतात हे समजत नाही. त्याला फक्त विजेते समजतात. तुम्ही 'विजेते' नाहित.
तुम्ही तर अस्तित्वात नसायला हवात.असं 'मार्केट मेक्यानिझम' म्हणतं. मग आपल्याला लै कळतं; हे मी दाखवू जातो.
गब्बरला सहज +१ ठोकून देतो.दुनियेनी मला ठेचून्,वेचून,चेचून,मारुन टाकलं पाहिजे; ह्याला मी +१ दिलेलं असतं.
.
हे सगळे कै मोठ्ठे प्रॉब्लेम्स, क्यालामिटी नाहियेत. लहान सहान कटकटीच आहेत. पण तेवढ्यापुरतं दिमाग का दही करुन जातातच ना.
ह्यातल्या काही गोष्टी जाता-येता इतरांनाही त्रास देत असल्या पाहिजेत. म्हणजे ...
ऐन मोक्याला हापिसाची बस सुटणे, नि मग पुढच्या बसची वाट बघत बसणे ; महत्वाच्या कामाच्या वेळी बाइक पंक्चर होणे ; कधी लोड शेडिंगमुळें, लाइट जाण्यामुळं घात होणे; अंघोळ करताना साबण हातचा निसटून कुठं गेलाय तोच धड न सापडणे; एखाद्या पेमेण्टच्या शेवटच्या दिवशी एकदम भरवशाचं घरचं नेट बंद पडणे ; कधी आपल्या नुकत्याच केलेल्या खरेदीबद्दलचा फ्याशन सेन्स, रंग वगैरे बघून एखादी नम्र, प्रेमळ, साजूक,सात्विक,सज्जन पत्नीची प्रतिक्रिया असेल तश्शीच आपल्या पत्नीची प्रतिक्रिया असणे. नि मग तिनं अगदि प्रेमानं मग तुमच्या भाजीत हंडाभर मिरच्या , मसाला नि तिखट ओतत अहिंसक ,असहकार आंदोलन पुकारणे; इत्यादी इत्यादी.
किंवा कधी निवांत वेळी टॉप फ्लोअरच्या टेरेसवर आरामात कॉफी पीत तुम्ही बसलेले असताना कधी भस्सकन् दचकवून गेलेलं कबूतर कॉफी सांडणार, कधी "गुड नाइट" म्याट्स संपल्याचं फार उशीरा ...दुकान बंद झाल्यावर लक्षात येणार; मग डास मंडळी तुमच्यावर मेजवानी झोडणार; हापिसाला उशीर होत असताना ऐन वेळी गाडीला किक मारणार इतक्यात सटासट शिंका येउन नाक वहायला लागणार, पुन्हा आठ दहा मजले वर जायला लागणार; किंवा तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असाला तर मस्त वेळेत तुमचा कोड / डेव्हलपमेण्ट पूर्ण होणार इतक्यात...तुम्हाला तुमचा कोड सेव्ह करण्याची संधीही न देता धाडकन् आख्खा सर्व्हर रिबूट होणार, तुम्ही तोवर कदाचित ब्याक अप घ्यायचाही राहून गेलेला असणार, सगळी मेहनत मातीत जाणार....
छोटी छोटी माणसं. छोटी छोटी जिंदगी. त्यांचे मोठ्ठे मोठ्ठे प्रॉब्लेम्स. ही लोकच इतकी छोटिशी असतात की त्यांचे मोठ्ठे प्रॉब्लेम्सही अदरवाइज छोटेच असतात!
साधी, छोटी , निरागस, इवली, व्रात्य,भाबडी,बेरकी,खोडकर जिंदगी.
त्या.... "मालगुडी डेज्" सिरियलमध्ये दाखवल्यासारखी.
.
.
.
" मी ए ना चाराण्याची खरेदी क्रेडिट कार्डानं केली. आता मला लाखभर रुपये क्याश बेक नि ऑफर म्हणून मिळ्णारेत!"
"मी बाराणे खर्च केले म्हणून अमिताभ बच्चन माझी सही घ्यायला माझ्या घरी येणारे!!"
अशा सगळ्या सुरस कथा सतत पब्लिक आसपास सांगत असते . याला यंव ऑफर मिळाली नि त्याला त्यंव ऑफर मिळाली वगैरे लोकं सांगत असतात. ते कायतरी वॉलेट अन् paytm,freecharge अन् न जाणो काय काय वापरतात. ब्यांकांची क्रेडिट कार्डं वापरतात. पण आम्हिच वापरायला गेलो की भांचुत ऑफर कशी काय नसते ?
म्हंजे सिस्टिम नेहमी मला लुटायलाच का बसलेली असते ? माझ्याकडे लुटण्याइतपत बक्कळ सरप्लस आहे; किंवा माझ्याकडेच्च लुटण्याइतपत बक्कळ सरप्लस आहे
असं सिस्टिमला का वाटत असावं ? की मग सिस्टिमला समजलं असावं की मी किती गाढव आहे ते?
म्हंजे "ह्याला हवं तेवढं लुटलं तरी काही होणार नै. तुच्छ क्षुद्र आम आदमी.लुटा ह्याला. " असच वाटत असेल ना ?
ह्या व्यवस्थेचा...ह्या सिस्टिमचा मुख्य उद्योग हा मला लुटणे असाच का असावा ?
माझ्याच घराची लाइटची बिलं दहा दहा हजार रुपये का येत असावीत ? तीही फक्त दोन पंखे नि चार सी एफ एल असताना ?
.
.
असो.
.
झालं. एकदाचं कडाक्याचं भांडण झालच. जिग्गी दोस्तासोबत....
त्याला लै हौस. इकडे चाराण्याचा डिस्काउण्ट आहे, तिकडे पाव पैशाचा डिस्काउण्ट आहे; वगैरे वगैरे बक्कर करत असतो.
म्हटलं ह्यापेक्षा कामावर फोकस केलास तर चार-आठाण्यातून बाहेर तरी येशील.
तर साहेब म्हणाले की " छे रे. आपल्या इंडस्ट्रीत ठराविक वर्षांनी ठराविक प्याकेज मिळतच की. उगा त्यासाठी धडपड करुन काही फायदा होत नै."
मी म्हटलं ऑल्मोस्ट तुझ्याच प्रोफाइलची काही मंडळी ठाउक आहेत. (तुझ्यासारखेच क्वालिफिकेशन्स, ऑल्मोस्ट त्याच रँकिंगची कॉलेजे आणि तसलाच सुरुवातीच्या काळातला workex.) आता त्यांचं इनकम ब्रॅकेट तुझ्या निदान दुप्पट आहे.आणि तू काही त्याही गटातला नाहिस की ज्यांना इनकम शिवाय "काहीतरी करण्याची" इच्छा वगैरे असते. कारण " काहीतरी करण्याची इच्छा" असेल तर 'इन्कम' ह्या पॅरामीटरचं महत्व तितकं रहात नाही. (उदा-- माझे काही मित्र काही नवीन प्रॉडक्ट बनवू पाहतात, कला शिकू पाहतात, परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून नाव कमावू पाह्तात जॉब व्यतिरिक्त. तर इतर कुणी जमेल तसं संगीत, इतिहास वगैरे क्षेत्रात जमेल ते योगदान देत असतो. माझ्या एका मित्रानं संगीतात ट्यून्ससुद्धा तयार केल्यात. एका एफ एम रेडियोनं स्वतःच ऑफर देउन त्या विकत घेतल्या होत्या वर्ल्ड कपच्या काळात थीम म्हणून. म्हटलं तुझं तेही नै. दिवसभर दिवास्वप्न बघत बसायची हा मुख्य उद्योग. पैशांचा पाउस पडावा असं बटबटीत स्वप्न. पण त्यासाठी काही करण्याची, धडपडायची इच्छा आहे का ? प्रयत्न आहेत का ? तर कैच नैत! असणार कसे ? चोवीस तास चार आठ आण्यांच्या डिस्काउण्टमध्ये डोस्के अडकलेले.)
.
मग तोही भडकला. त्यानेही माझी लायकी काढली.
.
"शतरंज के खिलाडी " पिच्चरमध्ये क्लायमॅक्सला क्षुद्र, तुच्छ , आळशी दोघे दोस्त(संजीव कुमार आणि सईद जाफरी) जसे भांडतात; व नंतर पुन्हा गळ्यात पडतात; तोच सीन जशाला तसा रिपीट झाला. दोन दोस्त पुन्हा गळ्यात पडले. तिकडे कर्तबगार , खमक्या इंग्रजांचं राज्य अधिकाधिक दृढ होतय नि हे सुस्ताड आपल्यातच मग्न आहेत.
भुक्कडपणाचा लाइव्ह , जिवंत (नि कदाचित ते दाहक वगैरे म्हणतात तसाही!) अनुभव. पिच्चर वगैरेची भांचुत कै गरजच नै.
.
.
माझ्या एका खास दोस्ताच्या मते हे प्रॉब्लेम्स मुळात प्रॉब्लेम्सच नाहित. किंवा first world problems आहेत. खाउन पिउन व्यवस्थित असणार्‍या लोकांना "वाटत" असणारे प्रॉब्लेम्स. काय की. असेलही तसं.डोक्यात आलं लिहून काढलं.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

लेख अतिशय आवडला. मनोबा, हा आणि तुझे इतर या स्वरूपाचे लेख गोळा करून कुठल्यातरी वर्तमानपत्रात वगैरे पाठव. खरोखर सांगतो, अशा सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या सामान्य अडचणींचं चित्रण वाचायला अनेकांना आवडेल, कारण ते निश्चितच त्यांना भिडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्च्च. ROFLROFL

अशा सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या सामान्य अडचणींचं चित्रण

चकलात तुम्ही. त्याने लेखाच्या सुरुवातीला लिहीलय की त्याला तो इशान अवस्थी सारखा आहे असं वाटतं. इशानसारखी मुलं स्पेशल असतात हे लोकांनी त्या सिनेमानंतर एवढं मनावर घेतलं की अनेक सेलिब्रिटींची अहमहीका (बरोबर लिहीला असावा हा शब्द, केव्हापासून वापरायचा होता;) लागली होती आम्ही तसे होतो हे सांगायला. तसं आहे की नाही हे,मनोबा? Wink

नशीबवान आहात की सुरस कथा सांगणारे पब्लीक तरी आजूबाजूला असतात . आमच्या भोवती तर असं पब्लीक असायचं की आम्हाला रडायची संधीच मिळायची नाही. प्रत्येकजण :आमचं नशीब बघ कसं भंगार" म्हणून आळवून आळ्वून सांगायचं. माझ्या एका कलीगची सासू खाष्ट होती म्हणे. ती आम्ही दोघंच आहोत हे किती चांगलं आहे आणि मला त्यामुळे मला किती वेळ वाचवता येतो हे ती मला सारखं सारखं सांगायची.

अवांतर
तीनएक वर्षांपूर्वी स्वाक्षरी जुळत नाही मह्णून माझे सलग दोन तीन क्रॉस्ड चेक रिजेक्ट झाले. मला भितीच वाटायची सही करताना. परत तो सॅलरी अकाउंट. मग एकदा एक पीपीएफ अकाउंटला आणि एक एलआयसी पॉलीसी साठी दिलेला चेक रिजेक्ट झाल्यावर मग सरळ मॅनेजरशी जाऊन भांडले, सहीतलं साम्य दाखवलं आणि म्हटलं "मी काय यंत्र आहे का की तंतोतंत तशीच सही प्रत्येकवेळेस आलीच पाहिजे. कधी अक्षरं छोटी येणार कधी मोठी म्हणून काय तुम्ही माझ्याच पीपीफ अकाउंटला दिलेला आणि तोही क्रॉस्ड चेक रिजेक्ट कराल?" तो म्हणायला लागला हे काम मेन ब्रॅचचं असतं. मग ऑनलाईन कम्प्लेंटही केली. नंतर तो प्रकार बंद झाला. आताही क्वचित कधी थोडा फरक असेलही पण चेक रिजेक्ट नाही झाला नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> मग ऑनलाईन कम्प्लेंटही केली. नंतर तो प्रकार बंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

सुखद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा. मुद्देसुद , म्हणजे चक्क एक , दोन असे आकडे घातलेले मुद्दे लिहून काढलेले. त्यांच्याकडून मिळालेल्या बाउन्स्ड चेकचा फोटो काढला. तो फोटो , माझ्या कंपनीच्या आयकार्डावरली सही असे कुठले कुठले माझ्या सहीचे नमुने स्कॅन करून त्यासकट लेखी तक्रार. ती कॉपी बँकेकडे + ऑनलाईन. त्यातून पे टू एलआयसी ऑफ इंडीया किंवा पी पी एफ अकाउंट नं क्षक्ष्क्ष् लिहीलेला चेक सहीतली अक्षरे मोठी दिसता आहेत म्हणून रिजेक्ट करणे म्हणजे मुर्खपणाच होता. कदाचित बॅन्केच्या बर्‍याच कस्टमरांची त्यावेळेस अश्या तक्रारी असतील म्हणून ते काम करणारा माणूस बदलला असेल वा त्याला नंतर व्यवस्थित ट्रेनिंग दिले असेल.
पण तक्रार करण्याआधी झालेल्या दोनतीन चेक रिजेक्शनमुळे मी सही करायला एवढी घाबरायचे की त्या चेकवर सही करण्याआधी पानभर सही करून बघायचे तरी त्या चेकवर सही करताना हात थरथरायचा. नंतर बॅंकमॅनेजरशी बोलताना ती सगळी भीती कालीमातेसारखी पायाखाली ठेवून त्याच आवेशात भांडले होते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहमहमिका असा शब्द आहे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मनोबा
तुमच येथील पुर्ण लेखन मी वाचलेल आहे.
व त्यावरुन माझा असा माझ्यापुरता स्पष्ट निष्कर्ष आहे की तुम्ही जिनीयस आहात.
यात एक अंशाचाही उपहास नाही मी अत्यंत गंभीरतेने हा प्रतिसाद लिहीत आहे.
तर तुम्ही इतके अपवादात्मक स्वरुपाच लेखन करता.
त्यातला प्रांजळपणा तर थेट भिडतो. मात्र एका बाबतीत मी कधी कधी जबर कनफ्युज्ड होतो.
अनेक दिवसांपासुन तुम्हाला हे विचारायच होत. पण धाडस होत नव्हत आज विचारुनच घेतो.
तुम्ही हा जो पवित्रा घेता "कॉमन मॅन" चा "ऑर्डीनरीनेस" चा हा सहज निखळ गंमत म्हणून असतो की खरोखर तुम्हाला स्वतःविषयी असे वाटत असते ?
मला कधी कधी हा "बुरखा" मुद्द्दामहुन ओढलेला वाटतो. आता वाटतो याला अर्थातच काही इलाज नाही. वाटण्याला काहीही वाटु शकते हे मान्य आहे पण वाटते हे अगदी खरे.
मला कधी कधी असा संशय येतो तुम्ही दांभिक आहात.
माझ वाटणं विचार करणं चुकीच्या दिशेने जात आहे का ?
हा माझा पुर्णपणे चुकलेला निष्कर्ष असेल तर मला दोन खडे बोल तात्काळ सुनवावेत मी लगेच पळुन जातो.
मनोबांचा फॅन व मनोबा विषयी डाउट दोन्ही एकाच वेळी असणारा.
मारवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

तुम्हाला अंदाज आलाच आहे मारवा.

व्यवस्थापीडीत ( सौजन्य - बॅटोबा ) असल्याचा बुरखा घेण्याची दांभिकता मनोबा नेहमी करतो.
तो अजिबात गरीब बिच्चारा आणि सामान्य नाही. असले काही सेंटी टाइप लिहुन तो फक्त मजा बघतो.

त्याला जवळुन ओळखणार्‍या काही लोकांच्या मते तो "हुकुमशहा" आहे. Smile

---------------
मनोबा - तुझा बुरखा आता हळुहळु पारदर्शक होत चालला आहे.
स्वताला गरीब-बिचारा दाखवुन सहानुभुतीचे ब्राऊनी पॉइंट मिळवयाचे (ऑपोझीट सेक्स कडुन), हे सुद्धा १९९० नंतर चालत नाही. त्यामुळे तू तुझी स्ट्रॅटेजी बदल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेल असेल. मलाही हिच शंका आहे.
(पण फोटोवरुन वाटत नाही. का फोटोत तसे न वाटू द्यायचीही कला त्याने आत्मसात केलीय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक उपाय आहे. गब्बरसिंगशी संवाद न करणे !!!!! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक उपाय आहे. गब्बरसिंगशी संवाद न करणे

किंवा, गब्बरलाच बुटाची लेस बांधायला सांगणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

ठाकुरच्या बुटाची लेस एक तर रामलाल ने किंवा राधेने किंवा बेष्ट म्हंजे गब्बर ने च बांधायला हवी. नैका ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आय विश मला असे लिहायला जमले असते Sad
___

आय विश असे प्रॉब्लेम्स मला असते Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचि - तू कीती आयडी करुन ठेवले होतेस तयार वर्षापूर्वी?

चायनिज आयडीचे काय झाले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाव बदलते ग मी फक्त. आय डी नंबर तोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर....

मनोबा, खलप्रवृत्तीच्या लोकांशी संबंध असले/ठेवले की असंच होतं. सुक्याबरोबर ओलं पण ....

गब्बरला अनफ्रेंड करून टाक.

( बाकी अनु राव यांच्याशी असहमत. मुलींना बहुतांश पुरुष लबाड वाटतच असतात. मनोबा निरागस, सत्प्रवृत्त, सालस आहे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा निरागस, सत्प्रवृत्त, सालस आहे.

एवढ्या शिव्या मी नसत्या ऐकल्या ब्वॉ मनोबा Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झोपडपट्टीत राहण्याइतकेही पैसे नसल्याने महाल बांधणार्‍यांची, बसमध्ये द्यायलाही सुट्टे नसल्याने कार खरेदी करणार्‍यांची आठवण झाली. खरेच आहे, खूपच करुण भीषण परिस्थिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा बॅट्या ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मग डास मंडळी तुमच्यावर मेजवानी झोडणार;

अलिकडेच कायतरी ओ ग्रुपच्या लोकांना डास जास्त चावतात असं वाचंलं, तुम्ही अर्ज करून ब्लडग्रुप बदलून घ्या ना !!!

>>कधी "गुड नाइट" म्याट्स संपल्याचं फार उशीरा ...दुकान बंद झाल्यावर लक्षात येणार;

अशावेळी सुरेश प्रभूंच्या (किंवा सुषमा स्वराज यांच्या) ट्विटर अकाउंटवर ट्वीट करावं. ते म्याट घरी पोचवायची व्यवस्था करतात असं ऐकलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अवांतर मजकूर चुकून छापला गेला असल्याने प्रतिसादकाच्या विनंतीनुसार काढून टाकला आहे. - संपादक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गल्ली चुकलं काय वो हे, पीएल?
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा - काय आहे रे हे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख उघडल्यावर कर्सर इवलुसा होऊन उजवीकडच्या कोपचित जाऊन बसलेला पाहून लगेच ओळखलं की काहीतरी बराच माल पडलेला आहे. मनोबा = down and out in Pune ,george orwell - down and out in London. अनंत _ ढवळे - एकदम अमिरखान इन थ्री इडिअटस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रुपमध्ये लोक बोलत असतील तर ग्रुपच्या र्‍हिदममध्ये येता येत नै. ग्रुप डायनामिक्सशी जुळवून घेणं जड जातं.
लोकं काहीतरी इनसायडर जोक्स मारतात. चटकन् क्लिक होत नै.

हा सगळ्याच introvert लोकांचा प्रॉब्लेम आहे. चालायचंच.

आम्हाला स्वतःचीच सही करता येत नै

हा तर बर्‍याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. माझी पण सही दर वेळेला निराळी येते. त्यात वाईट नाही वाटून घ्यायचं. अगदी पुलंनी सुद्धा लिहीलंय की सही जमत नाही, असं कुठेसं वाचल्याचं आठवतंय.

आम्हाला चित्रं, संगीत, खेळ/स्पोर्ट, क्यारम-चेस कै येतच नै

येत नसलं तरी प्रयत्न तर करून बघा. मला खूप काही करावसं वाटतं पण येत काहीच नाही. नविन छंदावर पैसे खर्च केले की आणि ३-४ महिने त्या धुंदीत राहिलं की फार बरं वाटतं. मागे बासरी शिकायला घेतली. त्यात नविन बासरी घेणे, दोन तीन महीने क्लासला जाणे यात बरेच पैसे खर्च केले. पण २ महीने सराव करूनही 'प' काही वाजेना, मग बसरीचा नाद सोडुन दिला. त्या क्लासमधे खुप चांगले मित्र मिळाले आणि शास्त्रिय संगीताची आवड लागली ही जमेची बाजु. त्या नंतर स्केचिंगचं वेड लागलं. स्केच पॅड, चर्कोल पेन्सिल, कलर पेन्सिल, स्केचिंग पेन्स यावर बराच खर्च केला. नंतर स्केचिंगची पुस्तकं घेतली तिही दोनेक हजराच्यावर. ३-४ महीने प्रयत्न करून तेही सोडुन दिलं. आता ती पुस्तकं म्हणजे आयुष्यभराचा ठेवा आहेत. मग नंतर वॉटर कलरचं वेड. त्यातही काही जमलं नाही. आता नविन रंग जसेच्या तसे पडून आहेत. सध्या मी अ‍ॅक्रेलिक रंगांशी कुस्ती खेळत असते. dried flowers craft, ओरिगामी, सायकलींग असे अनेक छंद एकाच वेळेला सुरू असतात.

कालच व्यंकटेश माडगुळकरांचं वाटा हे पुस्तक वाचत होते. त्यातला हा एक उतारा-

या जिवनात कंटाळा अटळ आहे आणि तोही अपुर्‍या पांघरुणासारखा असतो. अपुरं पांघरुण तोंडावर घ्यावं म्हटलं तर पाय उघडे राहतात, पायाखाली घ्यावं म्हटलं तर तोंड उघडे. यातून थोडी सुटका होते ती आपल्या छंदामुळे. जमतील तसे छंद लावून घ्यावेत. एका छंदाचा कंटाळा आला की तो टाकावा, दुसरा लावून घ्यावा, किंवा एकाच वेळी अनेक छंद चालू ठेवावेत.
मानवी आयुष्य तसं निरर्थकच. कला, राष्ट्रभक्ती, देवधर्म, असे काही काही निर्मून आपणच त्याला अर्थ प्राप्त करून देत नाही का?

आपण व्यवस्थापीडीत (हा शब्द फारच आवडलाय) आहोत हे मोअर ऑर लेस सगळ्यांनाच वाटतं. रिक्षेवाले सगळ्यांनाच फसवतात. मला तर पेट्रोल पंपावरती पण काहिनाकाही हातचालाखी करून फसवतात. आपण बिचारे आहोत हे बर्‍याच लोकांना वाटतं, पण जंगल रूल्स सगळ्यांनाच लागू होतात, आणि लढणं भाग आहे. आणि हो, Murphy's law देखील सगळ्यांनाच लागू होतो. 'Anything that can possibly go wrong, does' त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जास्त टेंशन घ्यायचं नाही.
कधीकधी फारच सगळ्या गोष्टींचा उबग आला तर मी पुलंचं हे पत्र वाचते, वाचुन बघा, कदाचित तुम्हालाही आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद खूप आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

>>पण २ महीने सराव करूनही 'प' काही वाजेना, मग बसरीचा नाद सोडुन दिला.

बहुतांश लोकांना प (किंवा कोणताच सूर) बरोबर वाजत नाही हे कानाला कळत नाही. त्यामानाने तुम्ही फारच लकी !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बहुतांश लोकांना प (किंवा कोणताच सूर) बरोबर वाजत नाही हे कानाला कळत नाही. त्यामानाने तुम्ही फारच लकी !!!

नैतर काय!

"उगिच का कांता" मधला "उ" सारेगमपधनीसामध्ये कुठे आहे असे विचारणारे आम्ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद खासच!
.

मानवी आयुष्य तसं निरर्थकच. कला, राष्ट्रभक्ती, देवधर्म, असे काही काही निर्मून आपणच त्याला अर्थ प्राप्त करून देत नाही का?

अगदी हेच्च हेच्च मला नानावटींच्या धाग्यावरती मांडायचे होते पण शब्द सुचले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद अतिशय आवडला आहे. माडगुळकरांच्या पुस्तकातील उतार्‍याबद्दल बहूत धन्यवाद. शिवाय ह्या खालील वाक्यासाठी टाळ्या :

आपण बिचारे आहोत हे बर्‍याच लोकांना वाटतं, पण जंगल रूल्स सगळ्यांनाच लागू होतात, आणि लढणं भाग आहे.

एवढ्यातच कोणाचं तरी व्हाट्स-अ‍ॅप स्टेटस वाचलेलं 'पेन मे बी इनएवीटेबल बट सफरींग इज ऑप्शनल'...

बाकी मारवा, अभ्या, अनुराव (_/\_ गुरुमैय्या) ह्यांच्याशी सहमत. मलाही प्रत्यक्षात तरी तू कधी असा वाटला नाहीस जसा लेखात भासवण्याचा (माफी ह्या शब्दासाठी) प्रयत्न केला आहेस. पण तुला सतत (मागेही तुझ्या काही लेखांमधे तू स्वतःचं असचं चित्र उभं केलं होतंस म्हणुन 'सतत' हा शब्दवापर) स्वतःबद्दल तसं वाटत असेल तर काय बोलणार- काळजी घे, ह्या कोशातून (बुरख्यातून) बाहेर ये इतकंच म्हणेन आणि हो जरा काहितरी नविन वेगळं लिही पाहू Wink कॉमन मॅन बद्दल आपल्या पुराणात बरंच लिहिलंय, अता एक पार्टी पण आहे ऑफिशिअली त्याचं प्रतिनिधित्व करणारी, सो पुरे आता Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबाला एक लक्षात येत नाहीये की मराठी जालावरचा कॅप्टीव्ह ऑडीयन्स नी त्याला गेले ४-५ वर्ष वाचले आहे. त्याच त्याच लोकांना तो कीतीकाळ गंडवु शकणार? SmileDirol

मनोबानी आता त्याचे ( खोटे ) रडगाणे कन्नड किंवा तामिळ जालावर घेउन जावे. बॅटोबा त्याला कन्नड भाषांतर करुन देइल. तिथे २-३ वर्ष गायल्यावर, मग ओडीशी वगैरे मधे प्रयत्न करता येइल. पंजाबी, किंवा अरबी वगैरे जालफोरम वर असले काही लिहु नकोस. लोक वैतागतील.

-------
आय सिन्सिअर्ली होप मनोबा हलके घेत असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी सहमत. विविधतेने नटलेल्या इ. देशात तर या रडगाण्याला बरेच गिर्‍हाईक मिळेल. त्याने फक्त भाषांतर करून घ्यावे की बास्सच. चेतन भगतनंतर मनोबाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुतै आणि बॅट्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुलंचं हे पत्र लिंकबद्दल धन्यवाद.आता ते अर्धवट सोडलेल्या छंदसाहित्याचा कोणी भाचा भाची पुतण्या उपयोग करेल.प नसलेली बासरी विकणे हा गुन्हा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा, सुरेख लिहिलंयस. आवडलं.

बाकी पब्लिकची पण कमाल आहे. मागे फार पूर्वी एकदा (म्हणजे बघा, लॉर्ड डलहौसी गव्हर्नर होता तेंव्हा!) आम्ही आमच्या नास्तिकतेबद्दल एक प्रकट चिंतन लिहिलं होतं. तेंव्हा देखील पब्लिक आमचं सायको-अ‍ॅनालिसिस करायला निघालं होतं, त्याची आठवण झाली...
Smile
पोरगं आपल्या मनातलं लिहितंय, लिहू द्या त्याला!
तो जे लिहितोय ते वाचनीय आहे हे महत्वाचं!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिडां तुमचा नास्तिक धागा (http://misalpav.com/node/2522) माझ्या मिपावरच्या वाचनखूणांमध्ये आहे. मला प्रचंड आवडतो तो.
- शुचि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबाचे लिखाण प्रचंड वाचनीय असते. त्याला मी कीती दिवस सल्ला देते आहे की असे फुटकळ ( म्हणजे छोटे, व्हॉअ फॉर्वड करण्यासारखे ) लिहीण्यापेक्षा जरा जालापासुन वगैरे दुर जा आणि १२-२४ महीने शांत बसुन मग जरा काहीतरी मोठे लिही. ( पण त्याला दर आठवड्याला पुल स्टाइल मधे एकदा रडगाणे गायल्याशिवाय रहावतच नाही )

पोरगं आपल्या मनातलं लिहितंय, लिहू द्या त्याला!

इथेच तर फसलात तुम्ही पिडाकाका, हे पोरग मनातले लिहीत नाही (कारण तो तसा अजिबात नाहीये ).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा म्हणजे ऐसीवरील दवणे की ज्युनिअर ब्रह्मे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या लेखनाचा अर्कशब्द श्रेणी म्हणून काढायचा असेल तर "पिचलेला" ह्या शब्दाचा संपादकांनी विचार करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

सर्व वाचक प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. सल्ले दिलेत, पु लं च्या लिंका दिल्यात, माझा उत्साह वाढवायचा प्रय्त्न केलात, हे सगळं कसं नॉर्मलच आहेत हे ही सांगितलत, म्हणजे माझी काळजी करता. माझे हितचिंतक आहात.माझे हितचिंतक असण्याबद्दल आभार.
पि.डां. काकांचे खरोखर,मनापासून, विशेष आभार. शिवाय ह्या निमित्तानं त्यांचा तो धागाही पुन्हा वाचण्यात आला. मस्तय. माझ्याच मनातलं लिहिल्यासारखं वाटलं.अनंत ढवळे ह्यांनी नेमकं काय लिहिलय ते अजून समजून घेतो आहे. पूर्ण/नेमकं समजलं नाही.
व्यक्तिशः स्वतःबद्दल अधिक काही सांगत - बोलत बसणं आत्ता , इथे , ह्या धाग्यावर उचित वाटत नाही.
.
.
अवांतर -- एक विशुद्ध भंकस... अनु रावांविषयी
बाकी, "मनोबा अमुक आहे, तमुक नाहिये. " वगैरे म्हण्णार्‍या अनु राव ज्यांना अपव्होट्स देताहेत त्यांनी ; किंवा जे अनुरावांना अपव्होट्स देताहेत, +१ म्हणताहेत त्यांनीही दोन मिनिटं 'मनोबा' ह्या विषयावरची टिप्पणी थांबवावी आणि अनु राव ह्यांच्याबद्दल विचार करावा. इतरांबद्दल बिंधास्त कमेंटा टाकत सुटणार्‍या अनु राव स्वतः मात्र गुप्त गुप्त राहतात. स्नोडेनपेक्षा अधिक प्रायव्हसी मिरवतात. त्या प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत की कुणाचा डु आय डी आहेत की एखादा रोबोट प्रोग्राम A.I. वापरुन अनु राव हा आय डी चालवतोय; काहिच पत्ता लागत नाही.
त्यांचं अस्तित्व आहे; असं म्हणता येत नाही. नाहिये, असंही नाही.
अनु राव ही जणू परमेश्वराप्रमाणे , परब्रम्हाप्रमाणे आहे. ती कोणालाच दिसत नाही. ती ऐकूही येत नाही.
तिचं फक्त जालिय अस्तित्व जाणवतं. तेवढ्या जालिय भागापुरतं ते परब्रम्ह ज्ञेय असलं; जाणून घेता येत असलं तरी त्याचं समग्र आकलन इतर मर्त्य जालिय आयडींना शक्य नाही. अनु राव माणूस आहेही आणी नाहीही. ती त्या पलिकडे आहे. सध्यातरी आपल्यासाठी तो फक्त एक रोबोट प्रोग्राम आहे... प्रतिसाद जनरेट करत राहणारा. जसजशी प्रगती होत राहिल तसं तसं अनुरावला अधिकाधिक जाणून घेणं इतरांना शक्य होइल. पण कितीही झालं तरी ते पूर्णांशानं असणार नाही. (Lim X tends to Y/infinity ; but can never exactly reach Y/infinity) कारण अनुराव ह्या व्हर्चुअल आय डी बद्दलच काय ती माहिती मिळत राहिल.
अनुरावचं अस्तित्व क्षणिक, क्षणभंगूर, काही काळात हवेत विरुन जाणारं आहे आणि चिरंतन शाश्वत,कालातीतही आहे. कितीही आय डीं वर "हाच अनुराव असू शकतो" असा डाउट घेतला तरी शेवटी "हा नाही, हा नाही" , "नेति नेति" असच उत्तर येणार आहे.
शेवटी अनुराव आहे तरी काय ? स्थल काल देश आकाश ह्यात , चराचरांत व्यापून उरलेलं एक तत्व. आणी त्यापलिकडचंही बरच काही.
.
.

अनु रावांना कट्ट्यांच्या तपशीलांची , वृत्तांताची लै उत्सुकता. पण स्वतः यायला लै भाव खातात. येतच नैत. त्यांनीही खरं तर मागच्या कट्ट्याला यायला हवं होतं. पण असं काही म्हटलं की त्या हुशारीनं मौनात जातात. ह्याच संदर्भात एक विडंबन लिहिलय. जालावर वावरताना "तुझिया सामर्थ्याने ढळतिल दिशाही दाही" ही आमच्या शाळेतली कविता समोर दिसली अन् आर्त भाव असा एकदम उसळून,उफाळून आला.

@ अनु राव ,
अनु, अनुडे, अनुटले गं. का गं अशा कमेंटा करतेस ?

तुझिया मौनाने ह्या ; पिघळतील ऐसीकर काही |
मी हट्ट भेटीचा ह्या ; सोडणार तरिही नाही ||
खुदकन् हसुनि समयी; विसरतील मुद्दे सारे |
पण सांग कसे सोडावे ; शंकेचे हे चुकचुकणे ||
भेटेल मला आ.बा. ; भेटेलही बापट अण्णा |
अन् स्वतःस विसरुन येतिल ; जिवलग इतरही काही ||
शोधित मजला येतिल नवनवे ऐसीकर भारें |
करित विचार तुझाचि ; चित्त माझे पुकारे ||
विसरुन तुला मी; कसे काढिन ते तास तिथले |
अन् फटकार्‍यांच्या तुझिया ; गाइन मी तराणे ||
मेलो. हुश्श.
मी सात जन्मात कधी कविता केल्या नैत. वाचल्याही नैत. विडंबनेही पाडली नैत. पण जन्मात पहिलाच प्रयत्न केलाय. मीटर बिटर अजून नेमकं समजत नै. सराव नैय्ये.
भावना समजून घ्या. शिवाय हे सर्व उत्स्फूर्त आहे. त्यामुळे अजून एक हात फिरवण्याची गरज आहे कवितेवर.
सध्या तरी मनोबाबद्दल टिप्पणी सोडा. अनु राव ह्या रोबोट प्रोग्रामचं काय करायचं ते बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुने सॉलिड करिश्मॅटिक मिस्टीक ऑरा निर्माण केला आहेच. नो डाऊट. मला तर फक्त तिची जन्मवेळ व स्थान हवे आहे मग ती माझ्यापुढे पुस्तकासारखी उलगडेल Wink (म्हणजे जेवढं काही शिकले आहे तेव्हढ्याच मर्यादेत)
पण ती रोबो नाही. मी तिच्या भावना टिपलेल्या आहेत.
___
मनोबा तिच्या लिखाणातून ही ती उलगडतेच की रे. मानवी स्वभाव ओळखण्याची तुझी शस्त्रे परज हाकानाका Wink तुझी कविता आवडली. अनु स्त्री नसती तर मी तिच्या प्रेमात पडले असते, डांबरटपणासाठी Wink पण स्त्री आहे म्हणुन फक्त मत्सरावर निभावते आहे झालं ROFL
__
मिस्टिरिअस वुमन वरचा मस्त कोट पण ज्याला प्रेम/आकर्षणाची झालर नसेल. असा शोधायच्या प्रयत्नात बरोब्बर अपोझिट व माझ्याबद्दलचा कोट सापडला -

“If there was one thing I had never been, it was mysterious, and if there was one thing I had never done, it was not talk.”
― Lauren Bacall, By Myself

___
मनोबा, मिस्टरी (गूढत्व) बद्दलचा हा कोट ऐक-

“Anything mysterious is worth to be followed!”
― Mehmet Murat ildan

.
हे सर्व लिहीण्याचे प्रयोजन अनुला टार्गेट करुन कानकोंडे करण्याचे नाही पण तसे तिला वाटणार आहे हे मला माहीत आहे Sad पण she better overcome it & bask in attention Smile
.
बाय द वे, अनुला हे गाण डेडिकेट करते आहे just as my compliment for sustaining the mystery. यातील सेक्श्युअल कंटेंटकडे दुर्लक्ष करावे. -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां असा मनोबा आवडतो ब्वा आपल्याला, असाच रहा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय मनोबा, इतके रोचक आणि हुशार प्रतिसाद लिहीण्याइतके सॉफ्टवेअर डेव्हलप करणे कोणाला बापजन्मात शक्य आहे का?

तू रडगाणे सोडुन असे काही लिहीलेस हे माझ्या फटकार्‍यांचे यशच नाही का? Smile

अनंत ढवळे ह्यांनी नेमकं काय लिहिलय ते अजून समजून घेतो आहे. पूर्ण/नेमकं समजलं नाही.

काय लिहीले आहे ही फार पुढची गोष्ट आहे. पण ह्या धाग्यावर ते तसे का लिहीले आहे इतके जरी तू समजवुन घेतलेस आणि आम्हाला सांगितलेस तर बरे होइल.

मला भेटण्याच्या उत्सुकते पेक्षा ढवळे आजोबांनी काय आणि का लिहीले आहे हे जाणुन घेण्याची उत्सुकता जास्तीची नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुझिया मौनाने ह्या ; पिघळतील ऐसीकर काही |

मटा जास्त वाचल्याचा परिणाम. बाकी अनुराव नामक डुआयडी कुणाचा आहे ते बघणे रोचक ठरावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुराव एक आत्य्ंत संवेदन्शिल पुरुष आहे हे नक्कि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

मनोबा, अनुरावांबद्दलचं हे लिखाण प्रचंड आवडलं. आणि त्यांचं कशाला काय करायचं? "विरोधासाठी विरोध" या वाक्याचं उत्तम उदाहरण आहेत त्या/ते. आपल्या 'अहं'ला जमिनीशी जोडून ठेवणारा आय-डी.

शुची,

हे सर्व लिहीण्याचे प्रयोजन अनुला टार्गेट करुन कानकोंडे करण्याचे नाही पण तसे तिला वाटणार आहे हे मला माहीत आहे

नाही वाट्णार कदाचित त्या/ते हे एन्जॉय करत असतील. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा तिची "नो कमेंट" Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतरांबद्दल बिंधास्त कमेंटा टाकत सुटणार्‍या अनु राव स्वतः मात्र गुप्त गुप्त राहतात. स्नोडेनपेक्षा अधिक प्रायव्हसी मिरवतात.

यात चूक काय? असे बरेच आयडी आहेत जे गुप्त राहतात. उदा: 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न बा कोण आहेत (त्यांचे प्रोफेशन) याबद्दल मला उत्सुकता आहेच की मग. मला वाटतं ते मॅथेमॅटिशिअन आहेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी - चुकून पोस्ट झाला माझा प्रतिसाद - मी इतरत्र पोस्ट करण्यासाठी लिहिलेल्या रँडम नोटस आहेत ह्या..बाकी तुमचे ललित अतिशय आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनाला तरतरीतपणा नसणे फार वैतागवाणे असते यात दुमत नाही. आणि फक्त तेवडाच प्रोब्लेम आहे... तर फ्लावर् रेमेडीज आर देर टु हेल्प. आल द बेस्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

***********पुढील मजकूर हा कटकट्/वैताग्/तक्रार म्हणून लिहिलेला नाही. अक्त तो मी- माझ्याबद्दल आहे, म्हणून ह्या धाग्यात लिहित आहे. ********
सध्या मी exuberant अवस्थेत आहे. हायपर उल्हासित.
जेव्हा केव्हा किराणा, स्टेशनरी दुकानांत जाणं होइ तेव्हा माझ्या आवडत्या निळ्या reynolds 040 bold बद्दल चौकशी करत असे. पण सर्वत्र प्रचलित reynolds 045 हाच पेन असल्याचं दिसलं. सगळे लोक तोच दाखवत. reynolds 040 bold कुठं मिळेल हेही कुणी सांगत नसे. आज रस्त्यात व्हिनस स्टेशनर्स लागलं. मोठ्ठं , स्टेशनरी स्पेश्शल दुकान आहे. त्याच्याकडे तो पेन होता. तो म्हटला की सुट्टा एक पेन मिळणार नै. पाच पेनचा एक पॅक घ्यावा लागेल. एक पॅक चोवीस रुपयांचा. म्हटलं हरकत नाही. दे लगेच. घरी आल्यापासून त्या पेननं उगीचच लिहित सुटलोय. मज्जा येतिये. दहावी बारावी वगैरेचे पेपर मी त्याच पेननं दिले होते. स्वतःकडे भारी भारी हिरो, चायना वगैरे कंपन्यांचे पेन होते. त्यात घालायला, कॅमलिन, केलपार्क वगैरे कंपन्यांची दौतही होती. पण का कुणास ठाउक, माझं प्रेम जडलं ते ह्याच्यावरच. बहुतेक शाईचे पेन वापरायची टेक्निक/तंत्र जमले नसेल. पण Parker चे सुद्धा काही पेन्स माझ्याकडे होते. काही गिफ्ट मिळाले होते; काही बक्षिस मिळाले होते.(हो . मलाही बक्षिसं मिळालित शालेय जीवनात! मला "उत्तेजनार्थ स्पेशालिस्ट" किंवा "व्हेटेरन उत्तेजनार्थ" अशी पदवी मिळायचीच काय ती बाकी होती. कथाकथन, वक्तृत्व, क्विझ ,एक्स्टेम्पोर ,बुद्धीबळ वगैरे प्रकारांत "उत्तेजनार्थ" घेउन परतत असे. नवखी पोट्टीसुद्धा पहिल्या-दुसर्‍या प्रयत्नातच पहिला-दुसरा नम्बर पटकावून जात. आम्ही आपले "व्हेटेरन उत्तेजनार्थ"च राहिलेलो असू. अर्थात नाही म्हणायला एक्स्टेम्पोर/उत्स्फूर्त मध्ये माझा वट होता. अगदि वैचारिक, ललित, विनोदी, कल्पना विस्तार .... असा कोणत्याही टाइपचा विषय असला, तरी तिथे मात्र मी बाजी मारुन जात असे. पण.... नॉर्मल वक्तृत्व , वादविवाद स्पर्धांत व्हायचं काय की माझी "भाषण पाठ" करण्याची स्टाइल नव्हती. मी मुद्द्याचे पाच सात शब्द लिहून घ्यायचो लोकांशी , सरांशी बोलून. आणि त्या पाच सात मुद्द्यांवरुन काय ते बोलायचो. ह्यात व्हायचं असं की खुबीनं पेरलेली दिलखेचक वाक्यं,विचारपूर्वक घेतलेले पॉझ, हुक्मी लोडेड/र्‍हेटोरिक प्रश्न ,सूचक संवाद ,हावभाव आणि नजरेचा वापर, भावनिक आवाहनं, जाहिर च्यालेंज/आव्हानं असं त्यात काहिच नसे. संथ, एका लयीत बोलणं चाललेलं असे. भाषणातले मुद्दे बरे असले तरी त्यात जोर/आवेश असा काहिच नाही. प्लस चेहरा गोंधळलेला. (मियां रोते क्युं हो ? सूरत ऐसी!)असो. निव्वळ सादरीकरण शैलीचा विचार केल्यास माझं बोलणं साधारणतः शिवाजीराव भोसले, कुरुंदकर ह्यांच्या स्टायलिचं असे. विजेत्या लोकांचं बाबासाहेब पुरंदरे,बानगुडे पाटिल, भिडे गुरुजी,बाळ ठाकरे,अत्रे ह्यांच्यासारखं असे. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, वाद विवाद वगैरे जिंकणारे बहुसंख्य लोक "लॉ"चे विद्यार्थी असत. पहिलं -दुसरं बक्षिस ते घेउन जात. तो मुद्दा नाही. अवांतर झालं. सॉरी.
मुद्दा हा की विविध शाई पेन, पार्कर वगैरेचे बॉलपेन सदृश प्रकार , जेलपेन , रेनॉल्ड्सचाच "जेटर" असे सगळे प्रकार ट्रय केल्यानंतर reynolds 040 bold ह्यातच मी स्थिरावलो. अगदि कम्फर्टेबल वाटत असे. अक्षर कधी चांगलं आलच, तर ह्याच पेननं येत असे.(माझं अक्षर एकसारखं येत नसे/नाही. दर तासागणिक्,मूडअनुसार बदलतं.) शिवाय झरझर लिहून होइ. असा हा माझा प्रिय पेन लै लै दिवस सापडतच नव्हता. ह्याला हल्ली फारशी मागणी राहिली नसल्यानं हा दुकानदारांकडे नसतो म्हणे. तो मिळाला म्हटल्यावर मला अगदि भारिच वाटतय.
वर्ष दोन वर्षापूर्वी "बोरकुट" नावाचा भुकटी सदृश पदार्थ शाळेच्या दिवसानंतर प्रथमच खायला मिळाल्यावर असाच आनंद झाला होता. बोकाणे भरुन खाल्लेला. आजही तसच होतय.
.
.
लोकांना लोणावळा वगैरेची चिक्की आवडते म्हणे., मला कुणी स्वतःहून दिली, आग्रह केला, तर ती मी खातो. पण चिक्की हा प्रकार मला फारसा आवडत नाही. त्याचच एक भावंड आहे fudge नावाचं. जेली, किंवा च्यवनप्राश सारखा पदार्थ असतो. तो मला अतिप्रचंड आवडतो. पण अजूनतरी आख्ख्या पुण्यात, आख्ख्या औरंगाबादेत तो प्रकार कुठेही मिळत नाही. लोणावळ्यालाच मिळतो. लोणावळ्याला चिक्की विकणारे जे फेमस "मगनलाल" दुकान आहेत; त्यांचच हे दुसरं प्रॉडक्ट आहे. पण गंमत म्हणजे लोणावळ्याच्या इतक्या जवळ राहूनही कित्येक पुणेकरांनाही हा प्रकार ठाउक नाहीये असं दिसतं. "मगनलाल"चे पुण्यात जितके फ्रँचायझी आहेत; त्या सगळ्यांकडे फक्त चिक्कीच मिळते, fudge नाही मिळत.

जास्त लोकप्रिय असलेला हा तो पेन --
http://www.freesia.co.in/media/catalog/product/cache/1/image/1200x1200/9...
.
.
त्याच पेनचं एक भावंड; मला आवडणारा पेन :-
http://www.penandpaper.co.in/content/images/thumbs/0008104_reynolds_040_...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले मनोबा. छानच लिहीलयस.लघुकथा लिहायचे मनावर घे गड्या. कारण त्यांच्यात कथाबीज लहान अस्ते पण विस्तार बराच. ते एक अचाट कौशल्याचे काम आहे. गी दी मोपासा च्या कथा वाचून पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त सार्त्र समोर आला. मस्त.

चॉकलेट फज पुण्यात बहुतेक मिळत नाही हे कंफर्म झाले आता... नाही म्हणायला बंड गार्डन पुने सेंट्रल समोर ला-पिजेरियामधे वेनिला आइस क्रिम विथ चॉकलेट फज मिळते पण त्याच्या क्मतीत बहुदा तु चारचाकीने लोणावळ्याला जाउन फज घेउन येशील... कँप एरियात इतर कुठे हा प्रकार मिळत असेल तर बघ ट्राय मारुन.. अपडेट पण कर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

शेवटी जीवनात, , पेन हीच रेमेडी रे सॅम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ऐसीचा प्रॉम्प्ट मराठी टायपण्यासाठी वापरतो. हा मजकूर इतरत्र पोस्ट करण्यासाठी टाईप केलेला - चुकून पोस्ट झाला !

क्षमस्व !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

***********पुढील मजकूर हा कटकट्/वैताग्/तक्रार म्हणून लिहिलेला नाही. फक्त तो मी- माझ्याबद्दल आहे, म्हणून ह्या धाग्यात लिहित आहे. ********

माझे दुभंग व्यक्तिमत्व झाल्यासारखे झालेय. मला ह्यांच्यातले अन् त्यांच्यातले; दोन्ही बाजूकडचे कित्येक मुद्दे पटतात; त्यात मेरिट वाटते. हे विरोधाभासी आहे, हेही दिसते. म्हणूनच मी एका विदेशातल्या बहुश्रुत विद्वान ज्ञानी मित्राला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री आय एस डी कॉल केला होता.
.
.
सध्या जे गरिब आहेत त्यांचे भले व्हावे, त्यांनी उन्नत , प्रॉडक्टिव्ह व्हावे असे मला मनापसून वाटते.
आणि ते तसे होत नाहित म्हणून त्यांचा राग येतो.
इतके असूनही ते नवनवीन गरिबांना जन्माला घाल्तच असतात; लोड वाढवतत ह्याबद्दल अजूनच राग येतो.
.
.
स्त्रियांचा त्यांच्या देहावर हक्क आहे हे मान्य आहे. पण त्यांनी गर्भपात करु नये , असंही मला वाटतं.
.
.
रस्त्यावर ठेला लावणार्‍याचं कौतुक वाटतं त्याची अर्थप्राप्ती करण्याची धडपड बघून. तो जिद्दीचा रोल मॉडेल वाटतो.
पण त्यानं अतिक्रमण केलेलं आहे, जागा हडपली आहे, संभाव्य अपघाताला कारणीभूत होतोय म्हणून त्याचा रागही येतो.
त्याला फोडून काढावेसे वाटते.
.
.

मी जिचा द्वेष करतो करतो आणि जिचा आदर करतो; ती व्यक्ती एकच असू शकते.
.
.
दोस्ती-यारी-नाती ह्या सगळ्यात मी विचित्र परिस्थितीत असतो. मला एकाचवेळी एकाचव्यक्तीबद्दल दोन टोकाच्या गोष्टीही वाटत असू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणतेच कंस्ट्रेंट्स नाहीत समजून तुमच्या सर्व अपेक्षा - देवाकडून, निसर्गाकडून, लोकांकडून, स्वतःकडून, अन्य कुणाकडून काय काय आहेत ते सांगता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण त्यांनी गर्भपात करु नये , असंही मला वाटतं. >> असली केवळ आयजीच्या जीवावर बायजी उदार फुकाची बडबड करण्यापेक्षा त्या गर्भपात करायला गेलेल्या स्त्रियांना स्वतःच्या घरी घेऊन जा. त्यांच्या अन्न वस्त्र निवारा मेडीकल खर्चाची सोय कर. त्यांना सरोगसीचे पैसे दे. आणि नंतर त्या मुलांनादेखील तुच सांभाळ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असली केवळ आयजीच्या जीवावर बायजी उदार फुकाची बडबड करण्यापेक्षा त्या गर्भपात करायला गेलेल्या स्त्रियांना स्वतःच्या घरी घेऊन जा. त्यांच्या अन्न वस्त्र निवारा मेडीकल खर्चाची सोय कर. त्यांना सरोगसीचे पैसे दे. आणि नंतर त्या मुलांनादेखील तुच सांभाळ.

अतिसहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझाही प्रतिसाद मोठाच आहे, पण माहित नाही तुम्हाला कितपत आवडेल.
ब्रश, आंघोळ, चहा इ. पंधरा मिन्टांत आणि फक्त बुटांची लेसही पंधरा मिन्टांत बांधणारा. कोई मिल गया जेव्हा पाहिला, तेव्हा ह्या लोकांना रिटार्डेड म्हणतात असं कळलं. सलग एक-दोन आठवडे नाड्या/सुतळी/दोर्‍या घेऊन बसलो. मग एकाच पाकळीची गाठ, मग दोन जमू लागली. त्यानंतर फुकट क्रिएटीव्हिटी म्हणून ते जास्त करायला लागलो. आत्ताही माझं दोर्‍यांशी खेळायचं वेड गेलेलं नाहीये. आई म्हणते मी मामावर गेलोय. असेल ब्वॉ. कागद वेगवेगळ्या स्टाईलने मोजायचा इतकाच प्रयत्न करून शेवटी नोटा मोजणं जमू लागलं. अजूनही स्वतःची सही व्यवस्थित करता येत नाही, हे मात्र सेम.
ह्यापुढे जे लिहीलंय ती व्यक्तीगत निरीक्षणं आहेत.
इन्सायडर जोक कधीच क्लिक होत नाहीत. खेळायला न जाता, दिवसभर झोंबीसारखी पुस्तकं वाचणार्‍या माणसांचं हेच होतं. चित्रं, आणि बुद्धिबळ मात्र बर्‍यापैकी जमतं. पण हे नेमके आजूबाजूच्या कोणाचे (मुंबईत राहणार्‍या लोकांचे जनरली) इंटरेस्ट नसतात. मग अशा लोकांचे फार मित्र होत नाहीत. मग इनसायडर जोक कळायचं तर राहूचद्या.
मग एक 'लेफ्ट आऊट' झाल्याची भावना वाढीस लागते. मग, आपणही चारचौघांसारखं वागायला हवं म्हणून वर दिलेले सगळे प्रयत्न मी केले. त्यामुळे ती भावना कमी होत नाही, परंतु चारचौघांसमोर हसं होण्याची भिती थोडीशी नाहिशी होते. ती भावना मात्र अजून गेलेली नाही. त्या भावनेचा आणि जलशृंखलायोगाचा काय संबंध वगैरे विचाराल तर तो आमचा प्रांत नाही बॉ.
पुढे तुम्ही जे बाकी लोकांबाबत दिलंय, त्याला काही उपाय नाही.
आता-
इंटरनेटवर आपली स्यूडोनेम्स का असतात? तर आपलं मत बिन्धास्त समोरच्यावर ठोकता यावं म्हणून. त्यांचाही कन्स्ट्रक्टिव्ह वापर करा की! कोणाचं तुम्हाला नाही पटलं, तर दोन उपाय आहेत. एक म्हणजे, त्यांचं म्हणणं मान्य करा, तिथल्या तिथे सोडून द्या. एकतर, आपल्याला व्यवस्थित प्रतिवाद करता नाही आला, की समोरच्याचं म्हणणं मान्य करता आलं पाहिजे. अर्थात हे सगळं स्यूडोनेमबाबत चाललं असल्याने, तुम्ही बिंधास्त माझंच बरोबर आहे आणि बरंच काही काही (;)) लिहू शकता. दुसरं, त्या रिप्लाय्जमुळे तुम्हाला लेफ्ट आऊट झाल्यासारखं वाटलं, की पुढील श्लोक म्हणा.
नको रे मना गुंतू आंतरजाली |
जालावरी (स्वघोषित) पंडितांची मांदियाळी ||
असोत बापडे _____चे पंखे अनेक |
त्या पंख्यांची सध्या गरज काय हिवाळी ||

(रिकामी जागा हव्वी तश्शी भरा. हा श्लोक मनापासून म्हणालात, की हिवाळा संपल्यानंतर तुम्ही हे सगळं आपसूक विसरून जाल की नाई बघा. इच्छुकांनी दुसर्‍या ऋतूंसाठी स्वतः श्लोक बनवावेत.)
तेही नाहीच, तर एक तिसरा उपाय आहे. त्यामुळे मात्र ऐसीचं सदस्यत्व धोक्यात येऊ शकतं, पण मग तो 'नवीन खाते बनवा'चा दुवा आहे कशाला? Wink

१. हसवणूक ह्या पुलंच्या पुस्तकात 'त्यांनी आमची स्वाक्षरी कधी एकसारखी होत नाही, बँकांतली कामं खिडकीवरच्या रामभाऊ-गजाभाऊंच्या ओळखीने होतात' असं लिहीलंय.

२. ह्याच पुस्तकात ते हा योग विशद करतात. त्यात ते तुम्ही लिहीलेलं

कधी निवांत वेळी टॉप फ्लोअरच्या टेरेसवर आरामात कॉफी पीत तुम्ही बसलेले असताना कधी भस्सकन् दचकवून गेलेलं कबूतर कॉफी सांडणार, कधी "गुड नाइट" म्याट्स संपल्याचं फार उशीरा ...दुकान बंद झाल्यावर लक्षात येणार; मग डास मंडळी तुमच्यावर मेजवानी झोडणार; हापिसाला उशीर होत असताना ऐन वेळी गाडीला किक मारणार इतक्यात सटासट शिंका येउन नाक वहायला लागणार, पुन्हा आठ दहा मजले वर जायला लागणार; किंवा तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असाला तर मस्त वेळेत तुमचा कोड / डेव्हलपमेण्ट पूर्ण होणार इतक्यात...तुम्हाला तुमचा कोड सेव्ह करण्याची संधीही न देता धाडकन् आख्खा सर्व्हर रिबूट होणार, तुम्ही तोवर कदाचित ब्याक अप घ्यायचाही राहून गेलेला असणार, सगळी मेहनत मातीत जाणार....

हे सगळं हा योग कुंडलीत असणार्‍या माणसांच्या नशीबात लिहीलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

पु लंच्या पुस्तकात लिहिलंय तसं .. आम्ही मनातच म्हणत मरायचे ... सद्याच वाचलेलं .. आपलं मन सतत धावतं समालोचन करत असता हो... आधी मला वाटलेलं बडबडण्याचा स्थायीभाव असल्याने आमचच असं होतं ..
माणसं आवडतात मला अवतीभोवती .. पण बरेचदा असं होतं कि मी झोन आऊट होते . . आपल्या डोक्यात चालेल असत भलतंच आणि समोरचा काय बोलतो याच्याकडचं लक्ष उडत ... संतांच्या लंपन सारख सतत डोक्यात चक्र चालत असतंच की ...

आज काल फालतू ग्लोबलाईझशन च्या नावाखाली आपण किती शाईन मारलीये दाखवायची गरज फार वाढलीये ... बरं आणि तिच्या आयला तू जे केलं ते ज्याम भिकारचोट आहे हे हि बोलायची चोरी असते ... ग्रुप मधून बाहेर काढण्याची भीती ... लोक ज्याम राजकारणी असतात हो ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मनोबाच्या दृष्टीने काही लोक फायनल अप्रूव्हर्स आहेत. मनोबाचे त्यांच्याशी फारसं पटत नाही. पण ते अप्रूव्हर्स आहेत असं त्याला मनापासून वाटतं. कोणतेही मत मनोबा आधी मनातल्या मनात त्या अप्रूव्हर्स कडे सबमिट करतो - अप्रूव्हल साठी. त्या अप्रूव्हर्सकडून ते मत अप्रूव्ह झाले नाही तर मनोबा अस्वस्थ होतो. आणि मग मनोबा ते मत स्वतःचं मत म्हणून स्वीकारत नाही. भले ते कितीही सुयोग्य असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय पर्फेक्ट अ‍ॅनॅलिसिस आहे गब्बु तुझा.

मनोबाच्या मनातल्या अ‍ॅप्रुव्हरांनो - असे दुर लोटु नका त्याला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे दुर लोटु नका त्याला.

दूर हटो ऐ दुनियावालो हिंदोस्तां हमारा है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरारा, लैच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुन्हा वाचला धागा मौनोबा.

ताजंतवानं लेखन असतं हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सांगण्यासारखी चांगली गोष्ट म्हंजे मागच्या काही दिवसात मला लै डिस्काउण्ट मिळाले. (मला कधीच मिळत नाहित, असे मला वाटे.)
त्या गोष्टी साम्गण्यापूर्वी एक विनंती. उपप्रतिसाद देउ नका प्लीझ. वेगळा स्वतंत्र प्रतिसाद लिहा. ह्या प्रतिसादात मी आठवेल तसं लिहित जाणार आहे अजून.
पहिला मुद्दा --
शुक्रवारी एका नाटकाला जायचे आहे; त्याचे तिकिट दोघांचे मिळून ऑल्मोस्ट पावणे सातशे रुपये झाले bookmyshow वरती.
ते मी payback पॉइण्ट्सने भरले. (मागची काही वर्षे payback पॉइण्ट्स जमत होते नुसते; मी वापरलेच नव्हते. सुदैवाने फारसे lapse झालेले नाहित.)
आणि अजूनही इतके पॉइण्ट्स शिल्लक आहेत की मी दोन -तीन वेळेस bookmyshow वरुन तिकिटे काढू शकतो.
सो, माझे पैसे वाचले; असं म्हणता यावं.
दुसरा मुद्दा--
झालच तर आख्ख्या भारताला रिलायन्स जिओने पाच सात महिने फुकट वापरु दिल्या ना टेलिकॉम सुविधा; त्यात मीही लाभ घेतला.
इतकच नव्हे तर आता ह्या महिन्यापासून एअरटेलसुद्धा एक झकास प्लान देत आहे. साडेपाचशे रुपयात अनलिमिटेड बोलायला मिळणार लोकल आणि एस टी डी.
आणि तीनेक जीबी डेटा मिळणार.म्हंजे खर्च झालाच तर फक्त आय एस डी कॉलचाच काय तो होइल.
तिसरा मुद्दा --
बिग बास्केटवर डिस्काउण्ट मिळाला. साडे सोळाशे रुपयांची खरेदी करुन साडे बाराशे रुपये द्यावे लागले. चारशे रुपयांचा; म्हंजे सुमारे पंचवीस टक्क्यांचा डिस्काउण्ट.
मार्केटमध्ये जाता-येता त्या किमती तपासल्या. बिग बास्केटने आधी फुगवून मग डिस्काउण्ट लावून दर कमी करण्याचा ड्याम्बिसपणा केलेला नाही.
खरोखर डिस्काउण्ट मिळाला, बाजरभावानुसार जे दर आहेत, त्यावर.
.
.
चौथा मुद्दा --
ऑफिसमध्ये एक मोहिम सुरु आहे नव्यानव्या बाबी शिकायची. त्यात उत्साहानं स्वतःची नोंदणी मी केलिये. त्यात 150 डॉलर फीस असलेला udemy.com वरचा कोर्सही फुकट करायला मिळतो आहे. तो वेळेत पूर्ण केल्यास अजून भारीवाले कोर्स करायला मिळणारेत.
.
पाचवा मुद्दा
माझे कर्ज एका ब्यांकेकडून काढून दुसरी८कडे हलवायचा माझा विचार होता६. पूर्वतयारी म्हणून सहज स्वतःचा CIBIL स्कोर ५तपासला.
आणि हे तपासणेही खरे तर फुकटात झाले असते. (रघुराम राजन गव्हर्नर असताना त्यांनी ज्याचा त्याचा CIBIL स्कोर त्या त्या व्यक्तीला त्यानं मागितल्यास वर्षातून एकदा फुकट मिळावा अशी तरतूद केलिये.) पण त्या प्रकारात फार वेळ जात होता. अर्ज वगैरे भरुन पोस्टाने पाठवत बसणे अशी सगळी प्रोसिजर असल्याचे वेबसाइटवर लिहिले होते. मला झटपट स्कोर बघायचा होता ऑनलाइन, त्यासाठी साडे पाचशे रुपये भरावे लागले. तर सांगायचं म्हणजे जे हे की, फुकटात होणार्‍या कामासाठी साडे पाचशे रुपये घालवून बसलो. पण तत्त्वतः इथून पुढे हवं तेव्हा वर्षातून एकदा मला तो स्कोर फुकट मिळणार आहे.
.
सहावा मुद्दा
Ola cabs ने ola select ही प्रिमिअर/विशेष ग्राहकांसाठी असलेली सेवा मला दोनेक महिन्यांसाठी फुकट दिली आहे नियमितचा व चांगला वापर पाहून. (Ola cabs मध्ये प्रवास संपल्यावर ग्राहक मंडळी ड्रायव्हरला रेटिंग देतातच, पण ड्रायव्हरसुद्धा ग्राहकास रेटिंग देतात. ) ही सेवा एका महिन्यासाठी तीनेकशे रुपयांत मिलते. थोडक्यात ३०० गुणिले २, म्हणजे ६०० रुपयांची सेवा विनाखर्च मिळाली.
.
सातवा मुद्दा
पुण्याहून माझ्या मूळ गावी जाताना लै झिकझिक होइ. कारण माझ्या हापिसातून शिवाजीनगरला जायचे, आणि तिथून एस्टी पकडायची गावाकडे जाणारी; ह्या प्रकारात तशी दगदग व खर्च, दोन्ही फार होइ. मागील दोनेक महिन्यात माझ्या ऑफिसच्या दारातून एसटीने शिवनेरी बसेस सुरु केलेल्या आहेत थेट माझ्या गावापर्यंत. माझी दगदग व खर्च दोन्ही वाचले.

हे सगळं मी का सांगतोय ?
वरती लिहिल्याप्रमाणं सध्या परिस्थिती नाहिये; मला डिस्काउण्ट द्यायचा नाही असले काही मार्केटने ठरवलेले नाहिये, हे सांगावंसं वाटलं म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Software क्षेत्रात काम करणारी मंडळी खोर्याने.. वगैरे ऐकलेलं. त्यांनाही असे छोटे आनंद मिळतात हे वाचून छान वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे नेहमीचंच आहे आमचं. एखाद्या नवीन ठिकाणी नवीन मंडळींना आपण भेटणार असं कळलं की आपल सगळं कसब पणाला लावून यांच्यावर काहीही करून फर्स्ट इम्प्रेशन पाडायचं असं ठरवणं. हे कसं करता येईल याचे इमले बांधणं. मग ही मोहिम फत्ते केल्यावर लोक कसे आपल्याच चर्चा करतील याच स्वप्नरंजन.
आणि प्रत्यक्ष वेळी तिथे आधीपासून चॅम्पियन बसलेत हे कळून आपण हो,नाही,मलाही तसच वाटतंय ,सहमत आहे असे जुजबी शब्द टाकून वेळ मारून नेणं. बर ते झाल्यावर "जाऊदे ना तिकडं" म्हणून विसरण्याची तरी कला अवगत असावी? ते नाही. "आपण असंच बोललो असतो तर?" ,"अरेरे असं करायला हवं होतं", "पोपट झाला का सगळ्यांसमोर आपला?" असले प्रश्न पुढचा एक आठवडा सतत आणि पुढे आयुष्यभर जेव्हा डोक्याला काम नसेल तेव्हा छळत राहणार.

अज्ञानात सुख मानायला पण येत नाही राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0