बूट

पृथ्वी तुडवत जाणारे
उन्मत्त अत्याचारी बूट
काळेशार चमकदार चामडे, गुडघ्यापर्यंत
त्यातून उगविणारी सोलीव गोरी
प्रमाथी कांती, पुष्ट पोटऱ्या, हळूहळू
मांड्यांचा आकार घेणाऱ्या,
काळ्या तोकड्या स्कर्टखाली श्वास घेणारे
घाटदार, दुभंग नितम्ब .
संबंध वर्ग घायाळ, मुली एकमेकींकडे
बघतायत , 'शिक्षिका हे घालू शकते?
तेही शिकवताना
?'
पुरुष (स्त्रिया?) आवंढा गिळतात,
प्रयासाने नजर हटवितात,
प्लॅटफॉर्मवर चढताना ती अचानक
मागे वळून माझ्याकडे पहाते: रोखून
आणि मान हलविते
नकारार्थी !
---

field_vote: 
0
No votes yet