ही बातमी समजली का? - १३२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---

डॉयन्स ऑफ इंडियन आँत्रप्रिनरशिप

http://economictimes.indiatimes.com/small-biz/startups/flipkarts-sachin-...

field_vote: 
0
No votes yet

त्याज्यायचं रडकं...

बादवे - अ‍ॅमेझॉन इंडियामध्ये नारायण मूर्ती प्रणीत व्हीसी फंडाची ५१% गुंतवणूक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रडकेपणा तर आहेच पण त्याही पुढे फ्लिपकार्ट ही सिंगापोरी रजिष्टर झालेली कंपनी आहे. ओलामधले मालक कॅनेडिअन-रशिअयन फंड आहेत ही अजूनच हाईट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मिपाच्या खफवरूनः

फ्लिपकार्ट लॉसमध्ये आहे म्हणून त्यांची अंडीपिल्ली बाहेर येत नाहीयेत. एकदा प्रॉफिट करायला लागले की सिंगापूरच्या कंपनीला रॉयल्टी देणे वगैरे लीळा करायला लागतील. तेव्हा देशभक्ती आडवी येणार नाही.

लॉस असतानाच कंपनी विकली, तर डायरेक सिंगापुरी कंपनी विकतील (व्होडाफोनसारखी.) म्हणजे भारतात कॅपिटल गेन टॅक्स पण नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

क्लिंटनची पोस्ट मस्तय. एकदम बेष्ट.

म्हणजे भारतात कॅपिटल गेन टॅक्स पण नको.

याचेच नियम पूर्वलक्ष्यी प्रभावाने बदलले होते राइट? सो सिंगापोरी विकली तरी ट्याक्स पडेल राईट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो - ते टाळण्यासाठी होल्डिंग कंपन्यांचे दोन लेयर्स करतात. जरा किचकट रेशिपी आहे.

दुसरा उपाय म्हणजे बायबॅक. म्हणजे अ‍ॅक्वायररच्या कंपनीला थोडे शेअर द्यायचे, आणि मग टार्गेटच्या भारतीय कंपनीने सिंगापोरी कंपनीकडून आपलेच शेअर बायबॅक करायचे. म्हणजे आपोआप त्या अ‍ॅक्वायररच्या स्टेकची रिलेटिव्ह किंमत वाढते.

पहिला उपाय पिस्तुलाची गोळी असेल तर दुसरा उपाय विषप्रयोग आहे. टैम लागतो, पण एकदम जालीम काम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बादवे - अ‍ॅमेझॉन इंडियामध्ये नारायण मूर्ती प्रणीत व्हीसी फंडाची ५१% गुंतवणूक आहे.

ह्याचे कुठे प्रूफ मिळेल काय? न कावता सांगा आबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लाऊडटेल.

ही पब्लिक डोमेनमधली माहिती आहे अनुताई. कावेन कशाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमची सिग्नेचरच आहे ना की तुम्ही कावता म्हणुन Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल! असंय काय!

बादवे - प्रतिसाद एडिट करतानाच गेला. एडिट करायचं होतं हे हे:

अ‍ॅमेझॉन इंडिया आणि क्लाऊडटेलमध्ये** नेमकं काय साटंलोटं आहे हे बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. बट फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस - अ‍ॅमेझॉन इंडिया = क्लाऊडटेल

**किंवा फ्लिपकार्ट - डब्लूएस रीटेलमध्ये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

केस ठोकायला पाहिजे दोघांवर ( अ‍ॅमेझॉन आणि च्लाउडटेल वर ).

Cloudtail is an independent seller on the platform that sells products across various categories and gets the same privileges as any of the other sellers on our platform

हा क्लेम निव्वळ खोटा असण्याची शक्यता आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे आणि त्याला कोणी रेग्युलेटर पण नाही.

हाम्रीकेत असे चालते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचे नियम बदलले अलिकडेच ऐकलं. प्लॅटफॉर्मवाल्यांना एकाच विक्रेत्याचा टोटल विक्रीमधला शेअर ४०%पेक्षा जास्तं नाही ठेवता येणार असा काहीसा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

१% सुद्धा चालायला नको जर प्रॉपर रेग्युलेटर नसेल तर.

बाकीच्या सेलर्स ची माहीती अ‍ॅमॅझोन क्लाऊडटेल ला देणार. क्लाउडटेल च्या प्रॉडक्ट ना चांगली शेल्फ्स्पेस देणार. बाकीच्या सेलर्स च्या डीलीव्हरी मुद्दाम डीले करणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Case For Abolishing Income Tax For Individuals
बोकीलांच सजेशन नाही हे पण लेख छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Known for her anathema to the Left, West Bengal chief minister Mamata Banerjee used a surprising word today to slam the Centre for the currency ban - 'capitalist'.

लब्जोअल्फाज ही काफी नही किसी गझल के लिये
खून-ए-जिगर भी तो चाहिये सही असर के लिये

--

गझल मे बंदीश्-ओ-अल्फाज ही नही काफी
जिगर का खून भी चाहीये कुछ असर के लिये.

----

चुडीदार परिधान केलेल्या महिलांना पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश नाही

----

भारतात lingerie व इतर प्रौढांसाठीची उत्पादने विकणार्‍या कंपनीला भेडसावणार्‍या समस्यांबद्दल

----

India, US finalise Major Defence Partner agreement - मला हे काही समजलं नाही. बरंचसं व्हेग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चुडीदार परिधान केलेल्या महिलांना पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश नाही: हे नगण्य इशू घेऊन त्यासाठी लढणे हे स्त्री-मुक्ती-लढ्यातील शक्ती वाया घालविणे आहे . कोणत्याही मंदिरात, दर्ग्यात प्रवेश न मिळाल्याने महिलांचे नक्की काय बिघडते? जी धर्मसंस्था हा आपल्या मुक्तीतील मोठा अडसर आहे, तिला कशासाठी कवटाळायचे ? महिलांवरील अत्याचार , लैंगिक त्रास, हुंडाबळी, शिक्षण इत्यादी खरे प्रश्न नाहीत का? त्यावर लढण्याचे काय झाले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

खरे इश्श्यू हाती घेतले तर क्विक बक्स मिळणार कसे? टोकनिझम केला की बरे असते. स्वस्त आणि मस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Agreed! +1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

जी धर्मसंस्था हा आपल्या मुक्तीतील मोठा अडसर आहे, तिला कशासाठी कवटाळायचे ?

इश्क ... दुसरं काय ?

(पण धर्माचं व व्यक्तीचं (स्त्री असो वा पुरुष) नातं असं कॉम्प्लेक्स बनलं आहे की बस्स.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है! मस्तच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

महिलांवरील अत्याचार , लैंगिक त्रास, हुंडाबळी, शिक्षण इत्यादी खरे प्रश्न नाहीत का? त्यावर लढण्याचे काय झाले?

कुठचीही चळवळ ही एका वेळी अनेक वेगवेगळ्या विषयांबाबत लढा देत असते. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वेगवेगळे विषय महत्त्वाचे वाटतात. तसंच प्रत्येक कार्यकर्त्याची विशिष्ट विषयावर चळवळ करण्याची क्षमता वेगवेगळी असते. स्त्री-चळवळीच्या बाबतीत हे वेगवेगळे मुद्दे म्हणजे बांधून ठेवणाऱ्या वेगवेगळ्या दोऱ्या. त्या प्रत्येकच दोरीवर कार्यकर्ते आपापल्या परीने हल्ला करतात. फक्त 'महत्त्वाच्या' विषयांवरच लढा द्यायचा म्हटला तर चळवळ यशस्वी होऊ शकणार नाही.

आणि तुम्ही मांडलेल्या विषयांबाबत अनेक वर्षं अनेक लढे चालू आहेत. शिक्षणाच्या बाबतीत तर नेत्रदीपक प्रगती झालेली आहे. हुंडाबळी कमी व्हावेत म्हणून स्त्रीमुक्ती संघटनांनी खूप मोठा संघर्ष केला होता. हुंडाविरोधी कायदे त्यामुळे पास झाले. आता अजून चळवळ करून नक्की काय साध्य करायचं? सरकारने कायद्याची अंमलबजावणी करणं आणि सर्वसाधारण सुबत्ता वाढवणं हे चालू राहायला हवं. जुने विश्वासार्ह आकडे नाहीत, पण १९९८ साली ७१४६ बळींचा आकडा सांगितला जातो. २००८ साली हा ८१७२ झाला, आणि त्यानंतर सुमारे ८२५० वर स्थिरावलेला दिसतो. म्हणजेच लोकसंख्या ३० टक्के वाढली पण बळींची संख्या १५ टक्क्यांनी वाढली. लैंगिक त्रास, अत्याचार यांबाबतही आंदोलनं चालू आहेत.

मला बऱ्याच वेळा असं दिसतं की त्या विशिष्ट क्षेत्रात काम न करणारे लोकं, हे काम करणाऱ्या लोकांवर 'हे करणं चुकीचं आहे. त्याऐवजी हे करायला हवं.' असे बिनधास्त ताशेरे ओढून घेतात. या प्रवृत्तीला फेसबुक जबाबदार आहे की नाही माहीत नाही, पण फेसबुकाच्या वाढीबरोबर असे ताशेरे वाढलेले दिसतात. मला त्यांना नेहेमी विचारावंसं वाटतं, 'की या विषयाबाबत तुम्ही जे करत आहात (ताशेरे ओढणं) यापेक्षा अधिक तुम्हाला काही करता येईल का?' तसं मला इथे विचारावंसं वाटतं, की तुम्ही या इतर फ्रंट्सवर काय चालू आहे याबाबतीत काही जाणून घेण्याचा तरी प्रयत्न केला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. परदेशी राहून भारतीय माध्यमांद्वारे जितकी माहिती करून घेत राहता येतं तितकी मला नक्कीच आहे . चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांशी माझी इमेलवर चर्चा चालू असते .
२. अखेर समाजपरिवर्तनाचा खरा मार्ग म्हणजे वैचारिक बदल हे जर मान्य असेल तर त्यासाठी काम करणे हे "कृती" पेक्षा वेगळे कसे ठरते?
३. ८२५० वर "स्थिरावलेला" बळींचा आकडा हे ऐकून मी थक्कच झालो ! हा आकडा "स्वीकारार्ह" मानायचा का ? आणि हुंडाबळी टाळणे हे पोलिसी काम नसून मतपरिवर्तनाचे काम आहे हे तुम्हाला मान्य असावे . इतक्या भयानक गोष्टीला सुप्तपणे कारणीभूत असणाऱ्या "धर्म" नावाच्या आज्ञावलीला थोडासुद्धा स्टेटस आपण कसा देऊ शकतो ? तिला घराबाहेरच काढणे महत्वाचे नाही का?
४. सनातन धर्मातच काय, अगदी संत-साहित्यातही फुटाफुटाला स्त्रीला दुय्यम स्थान देणारी भाषा असते.
लक्ष्मी सरसवती या दोघी सवती
गणरायाच्या पुढती जोडीनं लवती
!

(मी संतांना दोष देत नाही आहे, कारण ते त्या त्या काळातल्या भाषाविश्वाने मर्यादित झालेले असतात) . पण म्हणून ते मान्य करायचे का? आणि किती जागी भाषा बदलणार आहात ?
धर्म ही संकल्पना, पॅराडाइम म्हणून मान्य केली तरी "प्रस्थापित धर्म" मान्य करायची काय गरज आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

धर्मसंस्थेला नमवण्यासाठी तिचा त्याग करणं आवश्यक आहे हे पन्नास वर्षांनी जास्त लागू ठरेल कदाचित. पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे. सविस्तर प्रतिसाद नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नास्तिक व्यक्ती म्हणून मला या आंदोलनांचं महत्त्व नाही. शहरी, सुशिक्षित, उच्चवर्णीय आणि जखडून ठेवणाऱ्या धार्मिक वातावरणात मी कधीही राहिले नाही. स्त्रीवादी म्हणून मला या आंदोलनांबद्दल कितीही ममत्व वाटलं तरीही मी त्यासाठी बाहेरची ठरते. हे आंदोलन ज्या स्त्रियांसाठी महत्त्वाचं आहे त्यांनीच ते केलं पाहिजे.

कोणत्याही मंदिरात, दर्ग्यात प्रवेश न मिळाल्याने महिलांचे नक्की काय बिघडते? जी धर्मसंस्था हा आपल्या मुक्तीतील मोठा अडसर आहे, तिला कशासाठी कवटाळायचे ? महिलांवरील अत्याचार, लैंगिक त्रास, हुंडाबळी, शिक्षण इत्यादी खरे प्रश्न नाहीत का? त्यावर लढण्याचे काय झाले?

या सगळ्या प्रकारात धर्मस्थान - मंदिरं, दर्गे, पीर - या गोष्टी प्लेसहोल्डर समजता येतात. इथे धर्मस्थानांची तुलना शिक्षणसंस्थांशी करण्याचा मोह आवरला पाहिजे. पण त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की, आम्हाला धर्माचं आहे ते स्वरूप आवडत नाही पण आम्हाला धर्मही सोडायचा नाही, असं म्हणणाऱ्या स्त्रियांनी धर्म बदलायचं ठरवलं तर त्यावर आक्षेप काय आणि कसा घेणार? तो-तो धर्म मानणाऱ्या लोकांसाठी आपापली धर्मस्थानं पवित्र आहेत; त्यावर पुरुषांनी सत्ता गाजवणं आणि सद्यस्थितीचा, व्यवहाराचा अजिबातच विचार न करता एकतर्फी काही पुरुषी निर्णय घेणं हे तो-तो धर्म मानणाऱ्या स्त्रियांवर अन्यायकारक आहे.

धर्मातल्या जाचक रूढी, उदाहरणार्थ, संमतीवयाचा कायदा नसणं, सती, अन्यायकारक वारसाकायदे, इ. गोष्टी बदलल्या; ते बदल पुरुषांनी मान्य केले म्हणून त्या मान्य आणि आता स्त्रियांना धर्माचं स्वरूप आणखी बदलावंसं वाटतं तर ते मात्र शक्ती फुकट घालवणं, हा दृष्टीकोनही तद्दन पुरुषी आहे. ह्या लढ्यात आपल्या, नास्तिक व्यक्तींच्या मताला काहीही किंमत असायचं कारण नाही. काही लोकांना धर्म, धर्मस्थानं, धर्मपंडित (मुल्ला, भटजी, बडवे, इत्यादी) यांची गरज सध्याच्या काळात आहे; जसं स्त्रियांना सलवार-कुडता हा वेश गरजेचा वाटतो, तसंच. सलवार-कुडता घालणं चालेल, मात्र धर्म आणि संबंधित गोष्टींची (मानसिक) गरज अवास्तव, हे ठरवण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला?

दुसरा मुद्दा, स्त्रीमुक्ती हा विषय एकरेषीय, एकसंध नाही. एकरेषीय बनवायचाच तर त्याची व्याप्ती फार मोठी होते - स्त्रिया आणि पुरुषांना समाजात सर्वत्र समान स्थान पाहिजे. जर पुरुषांच्या सध्याच्या कपड्यांवर, शर्ट-ट्राउजर्स, मंदिर काही आक्षेप घेत नाही तर स्त्रियांच्या कपड्यांवर का घेतं? त्यापुढे जाऊन, माणसाचं मन पाहा, भक्ती पाहा, बाह्य रूप बघू नका, अशा प्रकारचा संदेश देणाऱ्या धर्माच्या मंदिरात लोकांच्या बाह्यरूपांवर बंधनं आणणं धर्माच्या विचारांशी सुसंगत आहे का?

तिसरा मुद्दा थोडा व्यापक स्वरूपाचा आहे. धर्मस्थानांसंदर्भातल्या हक्कांना प्लेसहोल्डर समजता येतं. स्त्रिया आणि पुरुषांना समाजात समान अधिकार असावेत, अशा अपेक्षेने स्त्रिया जर काही आंदोलन करत असतील तर ती प्रगतीच आहे. माझ्यासारख्या शिकलेल्या, स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांना अशा प्रकारच्या आंदोलनांची, चळवळींची आवश्यकता नाही. मला माझे अधिकार मिळवता येतात आणि धर्मासारख्या गोष्टींना (आणि एमसीप्यांना) सरळ लाथ घालता येते. (मला काही कृती करण्याची हौस असती तर मी 'सरन रॅप' साडीसारखा गुंडाळून मंदिरात गेले असते.) पण हे आंदोलन ज्या स्त्रियांसाठी करण्याची गरज आहे त्या स्त्रियांची स्थिती फडतूस धर्म (आणि एमसीप्यांना) लाथा घालता येईल अशी, आहे का? अशा प्रकारच्या आंदोलनात सहभाग घेऊन आणि/किंवा कोणीतरी आंदोलन केल्यामुळे जर ह्या स्त्रियांना थोडा आत्मविश्वास आणि त्यांच्या परिसरातल्या पुरुषांना उलुशी अक्कल येणार असेल तर हे आंदोलन करून शक्ती वाया जाते, असा आरोप करता येईल का?

१. सरन रॅप म्हणजे काय आणि ब्रँडनेम वापरून मुद्दाम लिहिण्यामागचं (धार्मिक) कारण इथे पाहा.

---

अवांतर - एरवी स्त्रीवादाबद्दल शष्प काही आकलन नसणाऱ्या सदस्यांनी स्त्रीवादाबद्दल मतवाटप करणं हास्यास्पद आहे, याची त्यांना जाणीव आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओहायो रद्दड राज्य दिसतय Sad
.
https://www.yahoo.com/beauty/ohio-lawmakers-pass-strict-heartbeat-aborti...
.

banning abortion from the time a heartbeat can first be detected in a pregnancy (approximately six weeks gestational age), often before many women even learn they are pregnant. The bill does not contain any exemptions for victims of rape or incest.

_________

https://www.theguardian.com/world/2016/dec/08/marine-le-pen-says-no-free...

Marine Le Pen: no free education for children of 'illegal immigrants'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.thehindu.com/news/national/Former-Air-Force-chief-Tyagi-arres...

माजी हवाईदल प्रमुखांना अटक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला याचं टायमिंग सस्पेक्ट वाटतंय. पंजाब व युपी मधल्या निवडणूका आलेल्या आहेत त्यामुळे.... काँग्रेसला घेरण्याचा इरादा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Venezuela seizes 4 million toys to distribute to the poor - फडतूसांचा विजय असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.misalpav.com/comment/907609#comment-907609

हा आयडी गब्बर किंवा अनु राव चालवतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किंवा अ‍ॅमी/अस्मी..... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नोप्स Smile

तो आयडी मला लक्षवेधक वाटलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा आयडी माझा नाही, गब्बु चा असल्यास माहीती नाही. मी फक्त ऐसीवर असते. त्या प्रतिसादात लिंका नाहीत , म्हणजे तो गब्बु पण नसावा.

पण प्रतिसाद मस्तच होता हे मान्य केलेच पाहिजे.
त्यांचे बाकीचे लेखन कसे असते ते बघायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा आयडी गब्बर किंवा अनु राव चालवतात का?

मी चालवत नाही. मी फक्त ऐसीवर लिहितो. मिपा वर माझा अकाऊंट आहे पण मी लॉग-इन करत नाही.

साहना ह्या प्रामाणिक लिबर्टेरियन आहेत असे माझे त्यांचे काही (म्हंजे दोनचारच) प्रतिसाद/धागे वाचल्यानंतरचे निरिक्षण आहे.

गब्बर प्रामाणिक लिबर्टेरियन नाही. गब्बर हा सोयिस्कररित्या लिबर्टेरियन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु हा सोयिस्कररित्या गब्बर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रविचंद्रन अश्वीनच्या नव्या तुफानी पर्फॉर्मन्सबद्दल आणि एकूणच अश्विन या माणसाबद्दल सांगणारा लेख/मुलाखत
http://www.thecricketmonthly.com/story/1068145/chennai-super-king

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

10-Year U.S. Bond Yield Closes at 17-Month High

The yield on the benchmark 10-year Treasury note settled at a 17-month high on Monday as a crude oil price rally lifted inflation expectation and dimmed the allure of government bonds. The yield on the 10-year note rose above 2.5% earlier Monday and settled at 2.478%, compared with 2.462% Friday. It marks the yield’s highest close since June 26, 2015. Yields rise as bond prices fall. Government bond yields in the developed world have been rising after falling to record lows during the summer, reflecting a big sentiment swing from soft growth and low inflation earlier this year toward stronger growth and higher inflation.

७ नोव्हेंबर ला 10-Year U.S. Bond Yield १.८३% होतं आज २.४९% झालेलं आहे. आता ट्रंप सायबांच्या वायद्यांचं काय होणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज दुपारी सहजच रशिया टुडे चॅनल पाहत असता त्यावर एक संपत आलेली चर्चा निसटती ऐकायला मिळाली. विषय होता- पॉलिगामी

त्यातल्या एका सहभागी उद्योजक महाशयांच्या मते, ब्रिटन हा एक उदारमतवादी देश असून इस्लामधील बहुपत्नीत्व हाही उदारमतवादच आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारने उदारमतवादाला,पुरोगामित्वाला जागून इस्लाममधील बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता दिली पाहिजे.इ.इ.

भटाला ओसरी दिल्यावर भट कसे हातपाय पसरत जातो याचे हे एक मासलेवाईक उदाहरण. आमच्यासाठी वेगळा कायदा करा यापुढची पायरी अर्थातच वेगळे मतदारसंघ, स्वतंत्र प्रतिनिधित्व मग स्वतंत्र राज्य. हे फिअरमॉन्गरिंगच आहे.

थोडा शोध घेतल्यावर आझाद चायवाला हेच ते महाशय असावेत असा अंदाज आहे. यांच्या दुसरी बायको शोधायच्या मॅट्रिमोनिअल/डेटिंग वेबसाईटस फार प्रसिद्ध आहेत म्हणे!

बाकी ते काही असो, आमचं दु:ख वेगळंच आहे-सालं इथे एवढी घासून एक मिळत नाही आणि लोक चार-चारच्या बाता करतात!

अवांतर: रशिया टुडेवर बरेचदा मुख्य प्रवाहातल्या पुरोगामी माध्यमांनी दुर्लक्ष केलेल्या, आपल्याकडे कधीच न येऊ शकणार्‍या बातम्या व चर्चा असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

बाकी ते काही असो, आमचं दु:ख वेगळंच आहे-सालं इथे एवढी घासून एक मिळत नाही...

सुखी आहात!

...आणि लोक चार-चारच्या बाता करतात!

आमचे उलट म्हणणे आहे, की एकदा एकीबरोबर लग्न केल्यावर लोक पुन्हा दुसरीबरोबर लग्नाचा विचारच कसा करू शकतात?

(तुम्हीं काहीं म्हणां, ए.ए.शेट, सर्व बायका सारख्याच. आमलेट!)

पॉलिगमीच्या गुन्ह्यास पॉलिगमी हीच शिक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भटाला ओसरी दिल्यावर भट कसे हातपाय पसरत जातो याचे हे एक मासलेवाईक उदाहरण. आमच्यासाठी वेगळा कायदा करा यापुढची पायरी अर्थातच वेगळे मतदारसंघ, स्वतंत्र प्रतिनिधित्व मग स्वतंत्र राज्य.

बहुपतित्व व बहुपत्नित्व या मुद्द्याबद्दल मी दुविधे मधे आहे.

खरंतर एकपतित्व वा एकपत्नित्व हे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कायद्याद्वारे झालेले आक्रमण आहे. तेव्हा खरंतर बहुपतित्व व बहुपत्नित्व वर असलेली बंदी उठवायला हवी. व्यक्तीला बहुपतित्व व बहुपत्नित्व चे स्वातंत्र्य असायला हवे.

दुसर्‍या बाजूला - स्लिपरी स्लोप ची फॉलसी असते असा प्रतिवाद असला तरी स्लिपरी स्लोप हा अ‍ॅक्च्युअली घडत नाही असे सिद्ध होत नाही. आमच्यासाठी वेगळा कायदा असावा ह्या मागणीचे रुपांतर -- आमच्यासाठी वेगळा कायदा असल्यामुळे आम्ही राष्ट्रीय मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेलेलो आहोत व म्हणून आम्हाला मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी प्याकेज मिळावे -- अशी मागणी होते. २०१३ च्या मे महिन्यात हे असे प्याकेज (काही हजार कोटी) दिले गेले होते. त्या बातमीचा दुवा शोधायचा प्रयत्न करूनही मिळाला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंतर एकपतित्व वा एकपत्नित्व हे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कायद्याद्वारे झालेले आक्रमण आहे. + १

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

>>खरंतर एकपतित्व वा एकपत्नित्व हे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कायद्याद्वारे झालेले आक्रमण आहे.

पती किंवा पत्नी होणं (पक्षी- कुणाशी कमिटेड असणं) हेच स्वातंत्र्यावरचे आक्रमण आहे असे खरे तर गब्बरने म्हणायला हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जगभर वेगवेगळी भटं ओसरी मागतात, हातपाय पसरतात आणि डोईजड होतात. गोसरंक्षणाच्या नावाखाली गोवंशहत्याबंदीचा कायदा आला, आणि नंतर गोरक्षकांच्या फौजा खुनाखुनी करत मोकाट सुटल्या. हे त्याचंच उदाहरण आहे.

आणि हे जुन्या काळपासून, वेगवेगळ्या देशांत, संस्कृतीत चालू आहे. ख्रिश्चनांनी धर्मरक्षणासाठी चर्चला इन्क्विझिशनचे अधिकार दिले. मग इन्क्विझिटर्सनी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' म्हटल्यामुळे ज्योर्दानो ब्रूनोची जीभ खिळ्याने खांबाला ठोकून त्याला जाळून मारलं. इतर हजारो लोकांचे अत्यंत घृणास्पद रीत्या हालहाल करून त्यांना मारलं.

हे सगळे प्रतिगामी साले माजले आहेत. त्यांना थोडी ओसरी दिली तर हातपाय पसरून तुमच्या नरड्याच आवळतात.

बाकी मुळातली मागणी मान्य करून एकंदरीतच लग्नसंस्था मोडून गेली तर बरंच. ती पण माजली आहे साली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकंदरीतच लग्नसंस्था मोडून गेली तर बरंच. ती पण माजली आहे साली. + १

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हे सगळे प्रतिगामी साले माजले आहेत. त्यांना थोडी ओसरी दिली तर हातपाय पसरून तुमच्या नरड्याच आवळतात.

पण यात मुद्दा हा की (जो तुम्ही टाळला आहे?) ही ओसरी प्रतिगामी पुरोगाम्यांना त्यांच्याच पुरोगामित्वाचा हवाला देवून मागतात. आणि पुरोगामी विचारकही आपलं पुरोगामित्व (ज्याला पुरोगाम्यांचं वर्तुळ वगळता 'सामान्य' जनता, at the end of the day फारशी किंमत देत नाही) सिद्ध करायला मागचापुढचा विचार न करता एका वैचारिक गंडाच्या अंमलाखाली त्याला 'हो' म्हणतात. आता इथेच पाहा, बहुपत्नीत्व हे पुरोगामी आहे असं मुस्लिम विचारकांनी म्हणताच पुरोगामी मंडळी लगेच ,हो-हो खरंच आहे- बहुपत्नीत्व मान्य करायला हवं-अल्पसंख्य मुस्लिमांना शरीयाप्रमाणे वागू द्यायला हवं- आपण नाही तर कुणी- असं म्हणत गळे काढतील परंतु मुस्लिमांना असं म्हणणार नाहीत की- तुम्हाला जर बहुपत्नीत्व पुरोगामी म्हणून पाहिजे असेल तर बहुपतित्वही तितकंच पुरोगामी आहे. तेही मान्य करा. आम्ही आमचा कायदा बहुपती-बहुपत्नीत्व दोन्हीसाठी बदलतो तेव्हा तुम्हीही तुमचे पुरातन तरी आधीच पुरोगामी असलेले शरीया कायदेही बहुपतित्वासाठी बदला. आधीच पुरोगामी असलेल्या मुस्लिमांनी अजून पुरोगामी असायला काहीच हरकत नसावी, नाही का? यालाच सम्यक विचार, विचारांची देवाणघेवाण इत्यादी म्हणत असावेत.

गोसरंक्षणाच्या नावाखाली गोवंशहत्याबंदीचा कायदा आला, आणि नंतर गोरक्षकांच्या फौजा खुनाखुनी करत मोकाट सुटल्या. हे त्याचंच उदाहरण आहे.

ही तुलना अंमळ चुकली आहे असं म्हणेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ही ओसरी प्रतिगामी पुरोगाम्यांना त्यांच्याच पुरोगामित्वाचा हवाला देवून मागतात.

अहो, वेगवेगळी भटं असतात, वेगवेगळ्या ट्रिका वापरून ओसऱ्या मागतात. तुम्ही जे उदाहरण दिलं आहे त्यात नुसतीच मागणी आहे, ओसरी मिळालेली नाही. तेव्हा हातपाय पसरणं दूरच. बाजारात ओसरी आणि ऐसीवर प्रतिगामी पुरोगाम्यांना मारी.

शहाण्या समाजाने मुळातच सर्व प्रतिगामी विचारांना हाड म्हटलं पाहिजे. कुराणात म्हटलंय म्हणून बरोबर नाही, तर लैंगिक स्वातंत्र्य - सर्व पुरुष आणि स्त्रियांना मिळावं या तत्त्वानुसार बहपतित्व आणि बहुपत्नीत्व मान्य केलं पाहिजे. मुस्लिमांच्या मागण्या गेल्या खड्ड्यात.

आता इथेच पाहा, बहुपत्नीत्व हे पुरोगामी आहे असं मुस्लिम विचारकांनी म्हणताच पुरोगामी मंडळी लगेच ,हो-हो खरंच आहे- बहुपत्नीत्व मान्य करायला हवं-अल्पसंख्य मुस्लिमांना शरीयाप्रमाणे वागू द्यायला हवं- आपण नाही तर कुणी- असं म्हणत गळे काढतील

कोण असं म्हणालं? उगीच गळे काढतील, गळे काढतील अशा कल्पनेनेच का गळे काढायचे?

ही तुलना अंमळ चुकली आहे असं म्हणेन.

इथे तर भटाने हातपाय पसरलेले स्पष्ट दिसताहेत. मी तर आपला तो बाब्या असं तुम्ही म्हणताय असं म्हणेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही ओसरी प्रतिगामी पुरोगाम्यांना त्यांच्याच पुरोगामित्वाचा हवाला देवून मागतात

हा रिव्हर्स आपला तो बाब्या न्याय.

एवढंच माझं म्हणणं!

आता इथेच पाहा

इथे म्हणजे ऐसीवर नव्हे हो मालक!

जाउ द्या, आपण कशाला आपसांत मारामारी करा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

इथे म्हणजे ऐसीवर नाही हे स्पष्टच होतं, कारण तुम्ही गळे काढले असं न म्हणता गळे काढतील बहुतेक असं लिहिलं होतंत. अशी खात्री बाळगण्यासाठी तुमच्यापुढे कोणाची उदाहरणं आहेत हे विचारत होतो. असो. जिथे विचार बदलणं शक्य नाही तिथे बोलून काय फायदा असा प्रश्न मला पडायला लागलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुपत्नीत्व हे पुरोगामी आहे

वाघमारे साहेब, तुमच्या प्यार्‍यातून हा एकच वाक्याचा तुकडा उचलतोय. हमका माफी दैदो.

बहुपत्नीत्व हे लिबरल आहे. कसे ते सांगतो. लिबरल म्हंजे लिबर्टीच्या संबंधातले. लिबर्टी हे बलप्रयोगाच्या विरोधी आहे. बलप्रयोग केव्हा उचित आहे व केव्हा नाही हे ठरवताना जे तत्व विचारात घ्यावे ते तत्व खाली उधृत करत आहे. जॉन स्टुअर्ट मिल्ल ने "ऑन लिबर्टी" या पुस्तकात हे तत्व विशद केलेले होते. हे तत्व पर्फेक्ट/परिपूर्ण आहे असं नाही. पण यू गेट द प्वाईंट. विवाह हे मुख्यत्वे निवडीवर आधारलेले नाते आहे. स्वयंवराची प्रथा होतीच की. निवड करताना बलप्रयोग नसायला हवा कारण मग निवड हा शब्द निरर्थक ठरतो. व विवाहासारख्या प्रेम व निवड यावर आधारलेल्या नात्याच्या बाबतीत तर अजिबात बलप्रयोग नसावा. कारण प्रेमात तर बलप्रयोग हा विचार सुद्धा मनाला शिवता कामा नये. सरकारने द्विभार्या प्रतिबंधक कायदा केलेला आहे व त्याद्वारे बलप्रयोगाची (६ महिने कारावास) धमकी दिलेली आहे व त्यामुळे बहुपतित्व्/बहुपत्नित्व हे बलपूर्वक बंद करण्यात आलेले आहे. बलप्रयोग किंवा त्याची धमकी बंद केली (म्हंजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा रद्द केला) तर बहुपतित्व्/बहुपत्नित्व झकास पैकी बहरेल.

The only purpose for which power can be rightfully exercised over any member of a civilized community, against his will, is to prevent harm to others.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>विवाह हे मुख्यत्वे निवडीवर आधारलेले नाते आहे. स्वयंवराची प्रथा होतीच की. निवड करताना बलप्रयोग नसायला हवा कारण मग निवड हा शब्द निरर्थक ठरतो.

ROFL
सीतेच्या "स्वयंवरा"तील शिवधनुष्य उचलण्याचा पण* सीतेने लावलेला नसून जनकाने लावलेला होता हा तपशील सांगून माझे दोन शब्द संपवतो.

द्रौपदीच्या स्वयंवराच्या बाबतीत थोडा फरक होता. इट सीम्स पणात भाग कोणी घ्यायचा हे ठरवण्याचा चॉईस द्रौपदीला होता (बहुधा).

*टेक्निकली जनकाने सीतेला पणाला लावली आणि युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावली. फार फरक नैये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बलप्रयोग किंवा त्याची धमकी बंद केली (म्हंजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा रद्द केला) तर बहुपतित्व्/बहुपत्नित्व झकास पैकी बहरेल.

गब्बु - असहमत.

बहुपत्नित्व अस्तीत्वात आहेच कायदा असुन सुद्धा. कायदा रद्द केल्यामुळे बहुपत्नित्व बहरेल हे तुझे स्वप्नरंजन आहे.

बहुपतित्व मात्र कायदा रद्द केला तरी अजिबात बहरणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१.

कारण उत्क्रांतीच्या रेट्यात पुरुष बहुपत्निक आहे. (मानवाला जवळच्या सस्तन प्राण्यांचे निरीक्षण करता)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उत्क्रांतीच्या रेट्यात पुरुष monogynous नाहीत आणि स्त्रिया monoandrous नाहीत. पुरुषांना सरासरी १५-१८ स्त्रियांबरोबर झोपायचं असतं, स्त्रियांना ५-७ पुरुषांबरोबर. (आकड्यांचा संदर्भ : Evolutionary Psychology by David Buss) उत्क्रांतीला लग्न, पती, पत्नी ह्या गोष्टी समजत नाहीत. उत्क्रांतीच्या रेट्यामुळे स्त्रिया आणि पुरुष बहुगामी असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कायदा रद्द केल्यामुळे बहुपत्नित्व बहरेल हे तुझे स्वप्नरंजन आहे.

ठीकाय.

पण मग बायगेमी विरोधी कायदा का करण्यात आला ? बहुपत्नित्व हे प्रिव्हेलंट होते व त्यातून समस्या उद्भवत होत्या म्हणूनच तो कायदा (१९४६ मधे) केला गेला किंवा कसे ? आता १९४६ हा ब्रिटिशांचा काल होता. नंतर १९५५ मधे हिंदु विवाह कायदा केला गेला त्यानुसार पॉलिगेमी बेकायदेशीर ठरवली गेली असं विकीपेडिया म्हणतोय. व प्राचीन कालात पण पॉलीगेमी सर्रास नव्हती असं विकी म्हणतोय. असं जर आहे/होतं तर जे घडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्याच्या विरोधी कायदा करून ते बेकायदेशीर करण्यात काय हशील आहे ? माणसांना प्रचंड स्वातंत्र्य असतं की कोणाला व किती लोकांना भाऊ किंवा बहीण मानायचं याचं. पण त्याचा अर्थ प्रत्येक जण उठ्सूट इतरांना भाऊ बहीण मानत नाही. व मानले तरी वडिलार्जित मालमत्तेतला हिस्सा हा मानलेल्या बहिणीला वा भावाला देत नाहीत. मदिरापानाचं स्वातंत्र्य असतं आणि त्यात मजा पण असते व सूख पण मिळते पण म्हणून प्रत्येक जण रोज, दोन्ही वेळा जेवताना दारू पित नाही. म्हंजे मला असं म्हणायचंय की स्वातंत्र्य असलंच तरी त्याचा वापर किंवा गैरवापर हा सर्रास होईलच असं नाही. अनेकदा सोशल नॉर्म्स हे महत्वाची भूमिका अदा करतात (When it comes to governance).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परंतु मुस्लिमांना असं म्हणणार नाहीत की- तुम्हाला जर बहुपत्नीत्व पुरोगामी म्हणून पाहिजे असेल तर बहुपतित्वही तितकंच पुरोगामी आहे. तेही मान्य करा. आम्ही आमचा कायदा बहुपती-बहुपत्नीत्व दोन्हीसाठी बदलतो तेव्हा तुम्हीही तुमचे पुरातन तरी आधीच पुरोगामी असलेले शरीया कायदेही बहुपतित्वासाठी बदला. आधीच पुरोगामी असलेल्या मुस्लिमांनी अजून पुरोगामी असायला काहीच हरकत नसावी, नाही का?

शॉल्लेट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही आमचा कायदा बहुपती-बहुपत्नीत्व दोन्हीसाठी बदलतो तेव्हा तुम्हीही तुमचे पुरातन तरी आधीच पुरोगामी असलेले शरीया कायदेही बहुपतित्वासाठी बदला.

ठीक आहे. आधी तुम्ही तुमचे कायदे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बदला तर खरे. मग "ते" बदलतात की नाही - किंवा कसे बदलत नाहीत - ते पाहून घेऊ.

डील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज की ताजा खबर : व्हेनेझुएला सरकारने डिमॉनेटायझेशन केले. - १०० बॉलिव्हा च्या नोटा रद्द. व्हेनेझुएला चे अतिरेकी समाजवादी राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो यांनी १० दिवसांची मुदत दिलेली आहे. १० दिवसांत त्या जुन्या १०० बॉलिव्हा च्या नोटा बदलून घ्यायच्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी सरकार आल्यापासुन अल्पसंख्यांकांच्या दाढीस्वातंत्र्यावर पण आता गदा आलीय ( बाकी स्वातंत्र्य तर पूर्वीच काढुन घेतलीयत ). मोदींनी सर्वोच्च न्यायालयावर पण काळी जादु केलीय. आता काय करायचे? कुठे जायचे?

http://www.loksatta.com/desh-videsh-news/air-force-personnel-cant-sport-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता काय करायचे? कुठे जायचे?

याचे उत्तर तुम्हांला आणि इतर सर्वांनाही अगोदरच माहिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्लडी साडेतीन टक्केवाले मनुवादी फारच माजलेत नाही का?

http://www.aksharnama.com/client/trending_detail/293

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला. सर्व आरक्षणांमध्ये एनर्जी घालवत, रक्ताचं पाणी करण्यापेक्षा बाहेरदेशी जाण्यात कमी श्रम वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरक्षण हे ब्राह्मणांसाठी Leveraged Buyout आहे किंवा कसे यावर विचार व्हावा.

( शुचे, चिकणे, Control Function of Debt बद्दल तुला मी मागे सांगितलेले होतेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या परिच्छेदापासूनच स्टँडप कॉमेडीचं पोटेन्शियल बाळगणारा लेख असं मत होत होतं. (माझे बहुतांश मैत्र ब्राह्मण आहेत. अगदी परदेशी मैत्र मोजूनही बहुतांश संगत ब्राह्मणी. यांतले बहुतेकसे ब्राह्मण पहिल्या परिच्छेदातल्या वर्णनात फिट्ट बसतात. माझ्यासकट! बहुतेकांची आई ब्राह्मणेतर उच्चवर्णीयच असेल असं नाही.)

मात्र हे वाक्य वाचल्यावर लेख उपहासाने खचाखच भरलेला आहे खात्रीच पटली -

इतिहासदृष्ट्या पहिल तर ब्राह्मण स्त्री इतकी शोषित, वंचित स्त्री इतर कुठल्याही समाजात नसेल... ब्राह्मण स्त्री म्हणजे शोषणाची परमावधी म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला, बॅट्या..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हेच म्हणतो!
(अवांतरः हे लेखक मिपावरपण लिहितात. छान असतात त्यांचे लेख!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

थँक्स आबा. ते परदेशी जाण्यामागची कारणमीमांसा सोडून दिली तरी बाकीचं खरंच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखक 'जन्माने ब्राह्मण आहे एवढ्यावर माझं बाह्मण्य संपतं' असं म्हणतो ते पटत नाही. कारण स्वतः इतरांचा उल्लेख करताना ब्राह्मण कुटुंबातले/ ब्राह्मण तरुण इत्यादी असाच करताना दिसतोय. एका परिच्छेदात म्हणतो "जन्मजात ब्राह्मण्याशी संबंध जोडल्याने या लोकात इतकी वर्ष काढलेला मी मी न रहाता बाहेरचा कुणी होतो' पण स्वतः इतरांची ओळख ब्राह्मण मात्र ब्राह्मण कुटुंबातले लोक परदेशी इ इ प्रकारे जातीनेच होते. जातीयवादापासून दूर जाण्याची इच्छा असली तरी स्वतःच्या मनातून जात काढून टाकणे जमत नाहिये असेच दिसतेय..
जातीयवाद म्हणजे केवळ काही जातींना कमी लेखणे एवढेच नसून .. कालबाह्य निकषांवरून जन्माच्या आधारावर लोकांचे वर्गीकरण.. आता निकष कालबाह्य आहेत हे पटतं पण ते जन्माने वर्गीकरण मात्र मनातून जाता जात नाही..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्राह्मण म्हणजे नक्की कोण, असा लेखकाचा समज आहे, असा विचार करताना मला पक्षांतरबंदी कायद्याचं किंचित अधिक आकलन झालं. घाऊक प्रमाणात population inversion (=मोठ्या प्रमाणावर समाजघटकांनी विचार आणि/किंवा कृती बदलणं) झालं की आमदारकी/खासदारकी जात नाही आणि तरीही इतर काही फायदे मिळतात.

या लेखात तार्किकदृष्ट्याही एवढी स्लॉपी विधानं केली आहेत की जालीय लेखनाचा गांभीर्याने विचार का होत नाही, अशा परिसंवादात मी(सुद्धा) या लेखाचं उदाहरण देईन; तरी बरं, मला समाजशास्त्र, इतिहास वगैरेंचं फार ज्ञान नाही. फक्त तर्क वापरून मोठाल्ली भोकं दिसताहेत -

अ. ऐतिहासिकदृष्ट्या ब्राह्मण स्त्रिया सर्वाधिक शोषित, वंचित - नक्की कोणता काळ? नक्की काय पुरावे वापरले?
आ. ज्या हिशोबात इतर जाती अन्यायग्रस्त (किंवा काही) असण्याचं पातक त्याच जातीतल्या लोकांवर तसं ब्राह्मण स्त्रिया पिचलेल्या असण्याचं पातक ब्राह्मण स्त्रियांवर का समस्त ब्राह्मणांवर का कसं?
इ. याच हिशोबात, ब्राह्मणांची मुळं भारतात रुजली नाहीत असं लेखक म्हणतात, तो दोषही ब्राह्मणांचा का नाही? तो दोष ब्राह्मणेतरांवर का ढकलला?
ई. परदेशात राहणारे ब्राह्मण (पुरुष आणि स्त्रिया) हळदीकुंकवं, मंगळागौऱ्या, गणपती, गौरी, होळीचे डँस करत नाहीत का काय?
(माझ्या ओळखीतले, अमेरिकेत थंड प्रदेशात राहणारे लोक दिवाळी, होळी, वगैरे सणांसाठी नाटकं, डँस वगैरे करतात. म्हणजे बाहेर छान, सुंदर हवा असताना घरात बसून नाटकं, डँसांच्या तालमी आणि बाहेर बर्फाळ हवा असताना घरात राहून करण्याचे काही उद्योग नाहीत. का, तर भारतीय कॅलेंडर - संस्कृती - जपायचं असतं. ही मुळं नाहीत तर काय आहे?)
उ. बहुसंख्य असे आहेत पण ते प्रातिनिधिक नाहीत म्हणजे नक्की काय? लेखातल्या या वाक्यांचा नक्की सांख्यिकी अर्थ काय :

(हे विचार) प्रातिनिधिकही नाहीत, पण अगदीच अपवादात्मकही नाहीत. मला भेटलेले बहुसंख्य ब्राह्मण तरुण असेच काहीसे विचार करणारे आहेत.

----

१. भौतिकशास्त्र आकलनाची जाहिरात.

२. इतर जातीतल्या स्त्रियांची (ज्या कोणत्या) ऐतिहासिक काळात काय अवस्था होती याबद्दल लेखकाला कितपत माहिती आहे? उदाहरणार्थ, महात्मा फुलेंची विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिने लिहिलेला निबंध वाचल्यावर "ब्राह्मण स्त्रिया सर्वाधिक शोषित" हे वाक्य म्हणजे इतर जातीतल्या स्त्रियांची दुःखं सरळ दुर्लक्षित करून, त्यांच्यावर केलेला क्रूर विनोद वाटतो.

३. विडंबनासाठी नोट - काल मी "काकस्पर्श" सिनेमा पाह्यला. काय पीडायचे रे च्यायला, त्या काळातल्या बायकांना. टक्कल काय, अनकूल कपडे काय! खूप खूप प्रॉब्लेम्स!
काय, तेव्हा इतर जातीतल्या स्त्रियांना गरीबी, शिक्षणाचा अभाव, यांच्या जोडीला जातीय भेदभावसुद्धा सहन करायला लागायचा? त्याबद्दल कोणती मूव्ही आहे? मूव्ही नाही म्हणजे काही होत नसणार, यार! चिलॅक्स!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा प्रतिसाद वाचून मराठा मोर्चा धाग्यावरील 'विचारवंतांची त्रयस्थ निरीक्षणं' आठवली...

इथे सप्रेंना मार्मिक मिळतायत; तिकडे आम्ही निरर्थक होतो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.yahoo.com/news/m/608d9c0b-f0ab-36b4-96b2-75113dc8714e/ss_som...
Some poor Venezuelan parents give away children amid deep crisis
वाईट वाटते. कोणीच देश कसा मदतीचा हात पुढे करत नाहीये? अमेरीका का नाही करत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Struggling to feed herself and her seven children,

लोलियत. पहिले वाक्य वाचूनच पुढे वाचायची इच्छा झाली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Indian Defence Forces To Be Under 'US Scrutiny', Alleges CPM's Sitaram Yechury - LEMOA को लेकर बहोत राडा हो रहेला है भाई. तो जाहीर करावा अशी मागणी का आहे ?? चीन ला खुश करण्यासाठी की काय ?? कराराचा मसूदा सरकारने जाहीर केलेला नैय्ये असं म्हणायचं आणि वर करारातल्या मजकूराबद्दल (ओपिनियन) भाष्य करायचं हे आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.buzzfeed.com/sahilrizwan/funniest-indian-tweets-2016?utm_ter...
क्र. २६, आणि ४४ विशेष आवडली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हाहाहा टु गुड!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The IAF regulations clearly state that while in uniform, the personal appearance of an individual should not give any religious bias.

IAF regulations not only restrict sporting beard but also tilak on forehead, thread on wrist

नभः स्पृशं दीप्तम-अनेकवर्णं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...शिखांना तेवढी (सब्जेक्ट टू रेग्युलेशन्स का होईना, परंतु तरीही) दाढी राखण्याची मुभा आहे, ती कोणत्या तत्त्वाच्या आधारावर?

(नाही, शिखांना आर्म्ड फोर्सेसमध्ये नोकरी करताना दाढी ठेवायला बंदी असावी, असा माझा मुळीच दावा नाही. क्वाइट द काँट्ररी. पण मग, तेव्हा कोठे जातो, सन्स ऑफ राधांनो, तुमचा निधर्म?)

(शीख भारतीय हे मुसलमान भारतीयांपेक्षा अधिक भारतीय आहेत - किंवा मुसलमान भारतीय हे शीख भारतीयांपेक्षा कमी भारतीय आहेत - (हिंदू भारतीयांची तर बातच करत नाहीये) - असा काही दावा वा तत्त्व आहे काय?)

----------

अस्सल मराठीत: राधेच्यांनो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यही तो मै कह रहा हूं.

सेक्युलरिझम राबवताना (आरक्षणासारखं) आर्म्ड फोर्सेस ना त्यातून वगळायचे किंवा नाही त्याबद्दल .... आणि प्रत्येकाला एक्झॅक्टली समान नियम लावणे किती समस्याजनक असू शकते त्याबद्दल...आणि दाढीचा मुद्दा नेमका कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच कमी (कमी म्हंजे शून्य नव्हे) संबंध असणारा आहे/असतो त्याबद्दल. मग चर्चा तिकडेच जाते - की सेक्युलरिझम म्हंजे प्रत्येकाला एक्झॅक्टली सेम नियम लावायचा की प्रत्येक धर्माला समान आदर देऊन त्यातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माप्रमाणे वागायची मुभा द्यायची (आणि मग त्यांना ती मुभा दिली मग आम्हाला ही का नाही ?? वगैरे सुरु होणार) !!!

कदाचित "जो निर्णय सरकारने घ्यायला हवा तो न्यायालयाकडे सरकवून" वाद टाळणे किंवा भविष्यात वाद निर्माण करणे हा प्लॅन असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शीख धर्मात दाढी सक्तीची आहे. इस्लाममध्ये नाही या आधारावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोण म्हणतो?? कितीतरी शीख सोयीनुसार दाढी न राखणारेदेखिल आहेत..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय, शीख धर्मात इंडियन आर्म्ड फोर्सेस जॉइन करणे सक्तीचे थोडीच आहे?

(पुन्हा, शिखांना (१) इंडियन आर्म्ड फोर्सेसमध्ये राहून दाढी राखण्याची मुभा नसावी, किंवा (२) दाढी राखायची झाल्यास इंडियन आर्म्ड फोर्सेसमध्ये भरती होण्यास मनाई असावी, यांपैकी कोणताही माझा दावा नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोर्ट म्हणतं!

http://timesofindia.indiatimes.com/india/muslims-cant-grow-beard-after-j...

The court did consider the case of a community like Sikhs whose members wear turbans and have beards and noted, "No material has been produced before this court to indicate that the appellant professes a religious belief that would bring him within the ambit of Regulation 425(b), which applies to personnel whose religion prohibits the cutting off of hair or shaving the face of its members.

सोपं आहे. ईस्लाममध्ये दाढीची सक्ती असल्याचा पुरावा आणता आला नाही. शिख धर्मात दाढी सक्तीची असल्याचा पुरावा आणता आला असेल. शिंपल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कमाल आहे.. त्या वकिलाला पण एक बिनदाढीचा शीख हजर करावा असं सुचल नाही वाटत Smile

पण माझ्या मते शीखांना पण धार्मिक कारणांनी सूट देणं साफ चूक आहे.. खास करून सैन्य दलात जिथे असे नियम खूप स्ट्रिक्टली पाळले जातात..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा समजलाच नाही तुम्हाला.

प्रश्न हे होते.
इस्लाममध्ये दाढी सक्तीची आहे का -- नाही. (कुराणात लिहिलं नसेल तसं)
शीख धर्मात आहे का? -- हो. (लिहिलं असेल कुठल्या तरी त्यांच्या पुस्तकात)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कुठल्यातरी पुस्तकात आहे म्हणून कोर्टात "शीख धर्मात दाढी मँडेटरी आहे" हे जसं सिद्ध केलं तसं एखाद्या वकीलाला "बिन दाढीचा शीख" ह युक्तिवाद (किंवा आणखी दुसरा युक्तीवाद)वापरून दाढी मँडेटरी नाही हे देखिल सिद्ध करता येउ शकतं..

कोर्ट 'पुस्तकात लिहिलय तो धर्म' या बरोबर धर्म म्हणजे 'जगण्याची पद्धत' असा कुठलाही विचार करु शकतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सफाइवाला पदासाठी अर्ज मागवले उप्र मध्ये त्यात पाचशेच्यावर बिएस्सी ,बिटेक आहेत.काल त्यांची नालेसफाइ परीक्षा घेण्यात आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता शिकलेले लोक हे काम करणार म्हणजे सफाई होणारच नाही, हे फुकाच्या चर्चा करत बसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सफाइ कामगारांना घरं मिळतात हे त्यामागचं खरं कारण असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>डेव्हिड फ्रिडमन हे कठोर व कट्टर इस्रायलवादी आहेत.

येस प्राइम मिनिस्टर या मालिकेतील एक प्रसंग आठवला.
एका नोकरशहाची नेमणूक इस्रायलचा राजदूत म्हणून केल्यावर तो नोकरशहा पंतप्रधानांना भेटून "Israelis know I am on Arab side" असे म्हणतो. तेव्हा ते पंतप्रधान म्हणतात, "I thought you are on our side".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कसय ना, की स्वतःचा देशवादी असलं की झिनोफोबिक, भक्तं, निओ-नाझ्झी अशी विशेषणं लागतात. त्यापेक्षा दुसरा देशवादी होणं सोयिस्कर. मस्तं विचारवंत म्हणवून घेता येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यापेक्षा दुसरा देशवादी होणं सोयिस्कर. मस्तं विचारवंत म्हणवून घेता येतं.

आणि काही विशिष्ट शांतताप्रिय देशांबद्दल असे होण्याची चैन त्या देशांत राहून केलेली परवडत नाही. त्याकरिता दुष्ट वैट्ट गोर्‍यांच्या देशात रहावे लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुर्कस्थानमधल्या रशियन राजदूताचा गोळीबारात मृत्यू झाला आहे . "अलेप्पोचा सूड " अशा प्रकारच्या घोषणा हल्लेखोर करीत होते. सीरियातल्या युद्धावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात .
http://www.jpost.com/International/Report-Russian-ambassador-shot-in-Tur...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

गब्बु - क्रिस्तीना वर लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निग्लिजन्स मुळे झालंय. जाऊ दे ना. इतक्या पुरुषांनी इतके राडे केलेत (अगदी कत्तली सुद्धा केल्यात. ते बरं चालतं ?) ... एखादी बाई तिथे असली तर ती टोचत्ये का ?? ... व ते सुद्धा निग्लिजन्स मुळे...झालेय तिच्याकडून ... हेतुपुरस्सरपणे नाही. सगळे तिच्या मागे हात धुवुन लागू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाकिस्तानात डिमॉनेटायझेशन

तू चाहे ले चल कहीं
तुझपे है मुझको यकीं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करीना ला "तैमुर" नावाचे पुत्ररत्न जाहले.

http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/kareena-delivered-a-bab...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय ते नाव, अहाहाहाहा....अतिशयच शांतताप्रिय माणसाचे नाव ठेवले म्हणायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बातमी वाचली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लंगडा आला रे

जन्म होउन ४८ तास पण झाले नाहीत तर लगेच ऐसीवर हजर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तराखंडमधील मुस्लिम कर्मचा-यांना कामाच्या तासात २ तासांचा 'नमाज ब्रेक' दिला जाणार आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/what-if-hindus-also-ask-for-puj...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bjp-sad-alliance-sweeps-ch...

चंदिगड महानगरपालिकेत भाजपनी २६ पैकी २१ जागा जिंकल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.bbc.com/news/world-europe-38375555. बर्लिनमधे ट्र्कहल्ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0