लेमोनेड आणि चहा

मध , लिंबू , साखर
पुढे करून प्रत्येक भांडणांनंतर
क्लासिक लेमोनेड
तुझा आवडता
तू बोलली बघूया गाडी लेमोनेड च्या पुढे जाते का
when life give you lemons ,
make lemonade
when life gives you lemons,
squeeze them in people's eyes
or may be just throw them
I look at the menu
Cappuccino
Latte
Hazelnut
Espresso
Irish
Machitto
Green apple soda
Pink lemonade Slush
Old monk with water
your sleeping eyes
Cocktail
mocktail
life is cranberries
कॅफे भर पसरलेल्या मेनू मध्ये एकटी क्रॅनबेरी
तुझ्या हजार न विचारलेल्या प्रश्नाची लाख उत्तर
कॉफी वरचा फेस
मी पाहिलेल्या हजार फिल्म्स
वाचलेली हजार पुस्तक
बघितलेल्या मोहक जागा
आणि तुझे हलकेसे झोपेने मिटणारे डोळे
एकाच उपाय
घाटामधल्या धुक्यामध्ये
किंवा
नारंगी सिंग्नल असलेल्या रस्त्यावरती
मध्यरात्री
एक कडक ग्लासमधला चहा
झोप उडवणारा
वाफाळता
तीच लेमोनेड मधली गोड़ साखर
थोडी समजुतीने , चवीच्या अंदाजाने मिसळलेली
चहापत्ती
कुठेही कधीही थर्मास मध्ये पिऊ शकते तू
एकटी फिरताना
माझी आठवण आली तर
किंवा मला तुझी
आठवण आली तर
नात्याच्या गुंतागुंतीपेक्षा
चहा मध्ये साखर योग्य प्रमाणात घालून
सुखी राहावं
म्हणजेच एव्हरेज दुखी
रिलेटिवली सुखी
एकत्र

field_vote: 
0
No votes yet