ही बातमी समजली का? - १३९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

Tucson cosmetology student under investigation for giving free haircuts

मज्जा. - सरकार हे किती मुजोर होऊ शकते त्याचे उदाहरण.

the words written in the state statute says in part “A person shall not perform or attempt to perform cosmetology without a license or practice in any place other than in a licensed salon.”

सरकारच्या प्रायोरिटीज गंडलेल्या आहेत, असे म्हणा हवे तर. पण हा मुजोरपणा नाही.

न्हावी किंवा न्हावीण केस किंवा नखे कापते, गिऱ्हाईक तिला पैसे देते. यात सरकारचा संबंध का यावा? न्हावीण फार चुका करू लागली तर तिचा धंदा लवकरच बंद पडेल. फार फार तर मान्यताप्राप्त सौंदर्य-प्रसाधने वापरावीत असा कायदा असू शकतो, कारण त्यांनी त्वचेचे नुकसान होऊ शकते . (पण मी प्रत्यक्षात पाहिलेली सौंदर्य प्रसाधने अज्ञात कंपन्यांची असतात !)

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

सरकारचा संबंध आहे कारण कॉस्मेटॉलॉजी हा रेग्युलेटेड उद्योग आहे आणि त्याच्यासाठी लायसेन्स लागते. पुढच्या वेळी सलूनमध्ये न्हावी/न्हाविणीचे लायसन्स बघा. ते ग्राहकाला सहज दिसले पाहिजे असा नियम आहे.

सरकारचा संबंध आहे कारण कॉस्मेटॉलॉजी हा रेग्युलेटेड उद्योग आहे आणि त्याच्यासाठी लायसेन्स लागते. पुढच्या वेळी सलूनमध्ये न्हावी/न्हाविणीचे लायसन्स बघा. ते ग्राहकाला सहज दिसले पाहिजे असा नियम आहे.

कॉस्मेटॉलॉजी हा रेग्युलेटेड उद्योग नसायला हवा हा प्रतिवाद योग्य आहे. पण हे अतिबेसिक लिबर्टेरियन आर्ग्युमेंट झाले.

माझा मुद्दा हा आहे की --

(खालील प्रश्न wonkish वाटू शकतील पण मुद्दा समजून घेण्यासाठी उपयुक्त. मनोबा, ऐकतोयस ना ?? )

(१) गरीब व बेघर लोकांना केशकर्तनाच्या सेवा लागत असतील तर त्या कोण पुरवणार ?
(२) सरकारने पुरवल्या तर त्या पुरवताना सरकार स्वस्त दरात पुरवणार की मार्केट रेट ने ?
(३) सरकारने जर स्वस्त दरात पुरवल्या तर त्यामुळे - जे लोक मार्केट दराने पुरवतात त्यांच्या आमदनीवर अनिष्ट परिणाम होईल का ?
(४) जर सरकारने मार्केट दराने पुरवल्या तर बेघर व निर्धन लोकांची नेमकी कोणती सेवा सरकार करत आहे (जी इतर कॉस्मेटॉलॉजिस्ट्स पुरवत नाहीयेत)?
(५) सरकार जर स्वस्त दरात पुरवत असेल तर त्या cosmetology student ने मोफत त्याच सेवा पुरवण्यावर आक्षेप का ? अन्यथा सरकार असं म्हणणार का की त्या cosmetology student ने मोफत पुरवू नयेत पण काही नाममात्र शुल्क आकारलेच पाहिजे ??
(६) सरकारने जर मोफत पुरवल्या तर त्या cosmetology student च्या तेच करण्यावर आक्षेप का ?
(७) सरकारकडून सेवा दिल्या जाण्या आधी सेवा मिळवणारी व्यक्ती ही लबाड नसून खरोखर निर्धन व बेघर आहे हे फक्त पडताळून पाहण्यासाठी सरकार जो खर्च करते तो जस्टिफाएबल आहे का ?

आज वाचलेला आणखी एक विनोद - पाळीचं रक्त शू करतेवेळीच बाहेर येईल, असं लिपस्टिक एका पुरुषानं शोधून काढलं.
यातलं तत्त्व म्हणे असं - कधी झोपेतून उठल्यावर किंवा बराच वेळ तोंडाची हालचाल केली नाही की आपले ओठ एकमेकांना चिकटतात. ओठांना जीभ लावून जरा ओलसर केलं की वेदनेशिवायच ओठ सुटतात. हेच तत्त्व वापरून लिपस्टिक बनवली. पण पाळीच्या स्रावात रक्त असतं आणि त्यातही चिकार पाणी, म्हणजे आर्द्रता असते हे या पाळीसम्राटांना समजलेलं नाही.

त्यावरून मला जुनी गंमत आठवली. (चांगली) शूघरं नसतील अशा ठिकाणी स्त्रियांनी वापरण्यासाठी खालच्या चित्रात आहेत अशी फनेल मिळतात. तर एक पुरुष मला मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होता, की हे फनेल वापरताना याचा कमी व्यासाचा, नळीसारखा भाग आपल्या शरीराच्या दिशेला ठेवायचा. मी मोठ्या प्रयत्नानं हसू रोखत सांगत होते, "नाही हो, हे असं चालणार नाही. तुमच्या हौसेखातर मी माझ्या सोयीनुसार प्रयोग करून काय होतं हे सांगू शकते, पण माझ्यावर विश्वास ठेवा." जगातल्या अर्ध्या माणसांच्या शरीररचनेबद्दल, अर्ध्या माणसांना येणाऱ्या व्यावहारिक अडचणींबद्दल मला तुमच्यापेक्षा बरंच जास्त माहित्ये; हे सांगण्याचा मोह मी तेव्हा टाळला. त्या नळीच्या टोकाचा व्यास व्यावहारिक पातळीवर पुरेसा आहे का नाही, याची त्या गृहस्थांना कल्पना नसणार. 'गोल्डन शॉवर' प्रकारात त्यांना व्यक्तिशः रस नसण्याची शक्यताच अधिक.

फनेल

पुरुषांवर प्रेम केलंच पाहिजे! ते किती करमणूक करतात, सगळ्यांचीच!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

any innovation in the menstruation department should be left to people who, you know, actually menstruate.

......अर्ध्या माणसांना येणाऱ्या व्यावहारिक अडचणींबद्दल मला तुमच्यापेक्षा बरंच जास्त माहित्ये....... याची त्या गृहस्थांना कल्पना नसणार >> अच्छा, म्हणजे पाळीच्या क्षेत्रात पुरुषांनी ढवळाढवळ करू नये असे म्हणायचे आहे तर. बायकांनी या क्षेत्रात कायकाय शोध आणि एकूण टक्केवारीच्या किती टक्के शोध लावले आहेत? हे जाणून घ्यायला आवडेल. बादवे, tampon चा शोध पुरुषाने (Earle Haas) लावला आहे. ज्या कपबद्दल तुम्ही बोलताय तो एका स्त्रीनेच (Leona Chalmer) शोधलाय, म्हणजे तो परफेक्टच असणार, नाही का?

अनुभवाचे बोल : cup whoops ass of tampon. हे मी ऐसीवरच आधी जाहीर लिहिलंय. तरीही ...

बायका शू करताना ती बाहेर पडते तेव्हा त्या धारेचा व्यास किती असतो ह्याचा अंदाज तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे, असं जाहीर करणार असलात तर माझी ना नाही. पण तसं स्पष्ट बोला, बै!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रश्न हा कप कसा/कुठल्या डायरेक्शनमध्ये वापरावा, याबद्दल न्हवताच. मूळ मुद्दा होता आम्हालाच या विषयातले सगळे काही कळते आणि पुरुषांना या विषयात काही अक्कल नाही म्हणून त्यांनी यात लक्ष घालू नये या condescending tone बद्दल होता. त्या संदर्भात माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल काय?

प्रश्न नक्की काय आहे?

तुच्छता दर्शवणं ही माझी प्रतिक्रिया आहे; मुळात पात्रतेशिवाय आगाऊपणा केल्याबद्दल. त्याशिवाय टिंगल करता आली नसती, म्हणून.

मागे एका तमिळ संशोधकाचं टेड टाॅक ऐकलं होतं. त्यानं स्वस्त (आणि मस्त) नॅपकिन बनवले, त्या गोष्टीबद्दल. त्याचं तोंडभर कौतुकही केलं होतं. तेव्हा असेल तर तुमच्या डोक्यात सेक्सिझम आहे; माझे विचार स्वच्छ आहेत.

आणि हो, कपाची दिशा नाही, फनेलची. चित्र लावलंय ते फनेल आहे. कप निराळा; त्याचा उपयोग निराळा. मुळात नीट वाचा काय लिहिलंय, आणि काय सुचवलंय तेही; असा एक अगोचर सल्ला. त्याशिवाय माझ्याकडून प्रतिसादांना उत्तर मिळणार नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रमाणित करण्यात येते की उदय हे ही एम सी पी आहेत.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत. एफ सी एस कडून प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तर अगदी ट्रू ब्लू एम सी पी आहेत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या जीवनातला फेमिनाझिझमचा बोळा मात्र निघालेला दिसत नाही अजून.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याचा इथे संबंध असेल अशी शंका येऊन ते वाचायला घेतलं; पण पूर्ण वाचलेलं नाही. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच हे वाक्य सापडलं. (तिथेच थांबले.)

Catharine MacKinnon and Andrea Dworkin (precursors to today’s fainting-couchers) sought to protect women from the ravages of an implacable, all-encompassing patriarchy.

आता मागे जा, पॉर्न ओके प्लीज विशेषांकातले माझे दोन लेख वाचा : पॉर्नोग्राफीचा विरोध : अमेरिकन इतिहासाची एक झलक : भाग १ आणि भाग २. त्यातले शब्द आणि ध्वनित अर्थ दोन्ही समजून घ्या. तुम्हाला काय समजलं त्याची मांडणी करा; हा अगोचर सल्ला. त्याशिवाय स्त्रीवादाबद्दल तुम्ही जे काही लिहाल त्याला मी उत्तर देणार नाही.

मुळात ज्या कारणासाठी मूर्ख पुरुषांची टिंगलटवाळी केली आहे, त्यांच्याबद्दल तुच्छतादर्शक भाषा वापरलेली आहे, त्याची पुनरावृत्ती करून काय मिळवताय?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरुषांवर प्रेम केलंच पाहिजे! ते किती करमणूक करतात, सगळ्यांचीच!

हे आवडलं. शेवटी हे महत्त्वाचं. मूर्ख मानून वा जोकर मानून वा अजून काय मानून; प्रेम असण्याशी मतलब!!!

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुरुषांवर प्रेम केलंच पाहिजे! ते किती करमणूक करतात, सगळ्यांचीच!

हे आवडलं. शेवटी हे महत्त्वाचं. मूर्ख मानून वा जोकर मानून वा अजून काय मानून; प्रेम असण्याशी मतलब!!!

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही कार्यशाळा आहे...लिहू इच्छिणाऱ्यांसाठी, लिहित असलेल्यांसाठी, भाषा अभ्यासकांसाठी, पत्रकार, विद्यार्थी, मराठी भाषेची आवड असणारे आणि वाचकांसाठी सुद्धा..!

मराठी साहित्यात अत्यंत दर्जेदार अशी पुस्तकं प्रसिद्ध करणारं, प्रकाशन विश्वात आपल्या दर्जाने आणि गुणवत्तेने स्वत:ची वेगळी नाममुद्रा उमटवणारं ’राजहंस प्रकाशन’...! आणि कौशल्यावर आधारीत दर्जेदार कार्यशाळा आयोजित करणारी i Transform! यांच्या संयुक्त विदयमाने ही लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे.

३० वर्षांहून अधिक काळ संपादन, लेखन आणि अनुवादाचा अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आपल्याला मार्गदर्शन करतील.

कार्यशाळेतील विषय –

लेखन प्रेरणा
लेखन प्रकार
लेखन तंत्र
ललित – कादंबरी-कथा-कविता-ललित लेख
पुस्तक निर्मिती
अललित – वैचारिक/राजकारण/समाजकारण/इतिहास/चरित्र/आत्मचरित्र/विज्ञान/कला
लेखनासाठीचे वाचन आणि संदर्भ
अनुवाद
मराठी- मंग्लिश

मार्गदर्शक –
आनंद हर्डीकर
विनया खडपेकर
करूणा गोखले
डॉ.सदानंद बोरसे

कालावधी- दि. ४ मार्च आणि ५ मार्च २०१७
वेळ- सकाळी ९ ते संध्याकाळी ६ (प्रत्येकी दोन तासांची ४ सत्रे)
स्थळ- ए.आर.भट हॉल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड, पुणे
कार्यशाळेचे शुल्क – रू.२५०० प्रत्येकी. (यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि दुपारचा चहा यांचा समावेश आहे)

संपर्कासाठी क्रमांक- 9881901821
ई-मेल- vasu.rubaai@gmail.com
आयोजक-
दिलीप माजगावकर| आनंद हर्डीकर
वसुंधरा काशीकर-भागवत

फेसबुकचा दुवा

--
माहितगार

हेच तर चूक आहे! केवळ पैशे खाण्याचे धन्दे!
सरकार यात नक्की काय "रेग्युलेट" करते?

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

स्त्री डॉक्टर्स हे पुरुष डॉक्टर्स पेक्षा जास्त कार्यक्षम असतात का ?

--

Laid off: Swedish workers could be given paid 'sex breaks' to improve well-being

जय हो !!! खरं विकसित राष्ट्र.

--

In a post-Trump world, India can be an example of plural values.

बकवास बकवास बकवास.

फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम इथे प्लुरलिझम होता ना ? काय दिवे लावलेत ?

Bareilly-based Muslim organisation offers Rs 10 lakh for beheading Islamic scholar Tarek Fatah

सेक्युलरिझम चा विजय असो.

हिंसेला उत्तेजन देणारी भाषणे "अभिव्यक्ती स्वातंत्र्या" खाली डिफेन्ड करता येत नाहीत. या संघटनेवर खटला झाला पाहिजे .

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

प्रे . ट्रम्प यांचा गोरा वंशद्वेष्टा प्रमुख सल्लागार स्टीव्ह बॅनन याला अमेरिकन काँझरव्हेटिव्ह युनियन ने वक्ता म्हणून केवळ आमंत्रणच दिले नाही, तर त्याच्या जागतिकीकरण-मुक्त-व्यापार विरोधी, वंशवादी विचारांना तिथे मोठी दादही मिळाली . यावरून या दोन्ही गटांमध्ये विचारांचे मोठे साधर्म्य आहे, आणि (निदान अमेरिकन ) भांडवलशाही ही एक कलर-ब्लाईंड मेरिटोक्रसी आहे हा दावा फोल आहे हे सिद्ध होते.
https://www.nytimes.com/2017/02/24/us/politics/stephen-bannon-cpac-speec...

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

प्रे . ट्रम्प यांचा गोरा वंशद्वेष्टा प्रमुख सल्लागार स्टीव्ह बॅनन याला अमेरिकन काँझरव्हेटिव्ह युनियन ने वक्ता म्हणून केवळ आमंत्रणच दिले नाही, तर त्याच्या जागतिकीकरण-मुक्त-व्यापार विरोधी, वंशवादी विचारांना तिथे मोठी दादही मिळाली . यावरून या दोन्ही गटांमध्ये विचारांचे मोठे साधर्म्य आहे, आणि (निदान अमेरिकन ) भांडवलशाही ही एक कलर-ब्लाईंड मेरिटोक्रसी आहे हा दावा फोल आहे हे सिद्ध होते.

(१) अमेरिकन भांडवलशाही राज्यव्यवस्था म्हंजेच कॉन्झर्व्हेटिव्ह.
(२) गोरा माणूस जरा काही तुम्हास न आवडणारं बोलला की लगेच असा निष्कर्ष काढावा की तो वंशद्वेष्टा आहे. पुरावा वगैरे सगळं बकवास आहे.
(३) केवळ विचार व्यक्त केले की व्यक्ती/देश हे विशिष्ठ नामाभिधानास/ विशेषणास पात्र होतात. कृती ची आवश्यकता नसते.
(४) राज्यव्यवस्था (उदा. प्रजातंत्र) व अर्थनीती (उदा. भांडवलशाही) ह्या दोन्ही मधे फरक असूच शकत नाही. दोन्ही बाबी इंटरचेंजेबल असतात.

--

शंका - (खालील प्रश्न हा माझ्या अतिकच्च्या गणितापोटी आलेला आहे. खरोखर.)

Probability of A is m
Probability of B is n

So probability of A AND Probability B should be less than either m and n. बरोबर ??

(१) अमेरिकन भांडवलशाही राज्यव्यवस्था म्हंजेच कॉन्झर्व्हेटिव्ह.
(४) राज्यव्यवस्था (उदा. प्रजातंत्र) व अर्थनीती (उदा. भांडवलशाही) ह्या दोन्ही मधे फरक असूच शकत नाही. दोन्ही बाबी इंटरचेंजेबल असतात
: सत्ता-व्यवस्था ही अर्थ-व्यवस्थेहून वेगळी कशी आणि का असेल?
(२) गोरा माणूस जरा काही तुम्हास न आवडणारं बोलला की लगेच असा निष्कर्ष काढावा की तो वंशद्वेष्टा आहे. पुरावा वगैरे सगळं बकवास आहे.: "एक कल्चर आणि एक नेशन " (म्हणजे ज्यात काळे किंवा हिस्पॅनिक काय, पण ज्यूज किंवा कॅथोलिक्सही बसत नाहीत ती वंशवादी नाही? तुमचा काहीतरी व्याख्येचा घोळ होतोय!)
(३) केवळ विचार व्यक्त केले की व्यक्ती/देश हे विशिष्ठ नामाभिधानास/ विशेषणास पात्र होतात. कृती ची आवश्यकता नसते. : तुमचं म्हणणं ते होत नाहीत ? सिरियसली?
.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

सत्ता-व्यवस्था ही अर्थ-व्यवस्थेहून वेगळी कशी आणि का असेल?

तुम्ही राज्यव्यवस्थेतल्या समस्या दाखवून त्या अर्थव्यवस्थेस लागू आहेत अशा अर्थाचं विधान केलेलं आहे. व ते मी दाखवून देत होतो.

--

व्याख्येचा घोळ नाही.

बॅनन यांनी रेसिस्ट वक्तव्ये केलेली आहेत ह्याचा पुरावा द्या.

--

तुमचं म्हणणं ते होत नाहीत ? सिरियसली?

नाही.

The Hill reported that “the Ku Klux Klan, neo-Nazis and other white nationalist groups” praised Trump’s selection of Bannon. Former KKK leader David Duke said the choice was “excellent,” according to The Hill.

Senator Minority Leader Harry Reid said in a statement that “President-elect Trump’s choice of Steve Bannon as his top aide signals that white supremacists will be represented at the highest levels in Trump’s White House.”

One study found that 31% of people using the hashtag #whitegenocide follow Breitbart.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हफिन्ग्टन पोस्ट चे आर्टिकल वाचले. त्यात पुरावा सापडला नाही.

-

स्टीव्ह बॅनन हा तितकाच रेसिस्ट आहे जितका राहुल गांधी सेक्युलरिस्ट, दलितोद्धार समर्थक आहे. किंवा जितका मुलायमसिंग समाजवादी आहे.

The person seems to be associated with such words or themes. Does not seem to have anything concrete.

मुंबईच्या माजी जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी त्यांचं घर कर्करोगाच्या संशोधनासाठी सोडलं. बातमीचा दुवा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संशोधना साठी घर मागे ठेउन गेल्या , असे भाषांतर हवे.

शंका - (खालील प्रश्न हा माझ्या अतिकच्च्या गणितापोटी आलेला आहे. खरोखर.)
Probability of A is m
Probability of B is n
So probability of A AND Probability B should be less than either m and n. बरोबर ??

जवळजवळ हो. असा विचार करा की एका कोऱ्या कागदावर A आणि B अशी दोन वर्तुळं आहेत. A ने कागदाचा १९% भाग व्यापला आहे तर B ने ३५% व्यापला आहे. आता दोन्ही वर्तुळांना सामायिक भाग हा १९% पेक्षा जास्त असणं शक्य नाही. जर A हे वर्तुळ पूर्णपणे B च्या पोटात असेल तर मात्र सामायिक भाग (म्हणजे अख्खं A वर्तुळ) १९% असेल.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

तुम्हाला नक्की काय झालं?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वडाची साल पिंपळाला लावताय तुम्ही.

Cow Urine Can Sell for More Than Milk in India

या प्राईसेस काय सांगतात ?

-

“The most difficult task is to collect cow urine because how do you know when an animal will actually do it?” said Vikash Chandra Gupta, who partnered with the cow shelter in Bulandshahar last year for starting his cow-urine business. “The attendants take clues from the animals’ movements and try to identify patterns in urination.”

Traces of gold are found in the urine of cows from the local Gir breed, scientists at Junagadh Agricultural University, in Modi’s home state of Gujarat, concluded in June after analyzing 400 specimens.

गुजरातमध्ये कुणाचे तरी अच्छे दिन आले म्हणायचे?

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

धंधो मे फायदो छे.

गुरमेहर कौरसंदर्भात शोएब दानियल लिहितात - The abuse of soldier's daughter Gurmehar Kaur shows that Savarkarite nationalism is on the rise

मला फेसबुकवरून ज्यांच्याकडून हा दुवा मिळाला त्यांनी लिहिलंय - Scroll blames Savarkar for Gurmegar Kaur incident. How helpless when you want to blame someone. Bizarre logic.

सावरकरी विचारपद्धती आणि प्रत्यक्ष सावरकर ही व्यक्ती यांतला फरक न समजणं ही गोष्ट आता विनोदी वाटत नाही. असा गच्चागोळ घालणारे एवढ्या प्रमाणात दिसतात आणि हे लोक एवढ्या उच्चरवात बोलत असतात की भीती वाटते. 'क्या आप पांचवी पास से तेज है' नावाचा एक कार्यक्रम टीव्हीवर लागत असे (अजूनही असेल); अशा कार्यक्रमांनी आता (लिबियाची राजधानी कोणती, असा) ट्रिव्हिया विचारणं सोडून, साध्यासाध्या वाक्यांचे अर्थ, ध्वन्यर्थ लोकांना विचारायला सुरुवात करावी, असं वाटायला लागलं आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखाच्या सुरुवातीला त्या मुलीचे चित्र आहे. ते चित्र सत्याधारित असेल (म्हंजे इतर कुणी फोटोशॉप वापरून मॅनिप्युलेट केलेले नसेल तर) ती मुलगी चक्रम आहे.

चला! अर्धसत्य वाचून लोकांना जोखायला सुरुवात झाली. आजचा उरलेला दिवस छान जाणार.

इच्छा असल्यास, हे पूर्णसत्य -

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घरी गेल्यावर पहाते. पण काय माहीत ती मुलगी पाकीस्तानी आहे की भारतिय की अन्य देशाची. त्यावरही अवलंबून आहे की ती चक्रम आहे की कोण. जर भारतिय असेल तर चक्रम आहे. जर पाकीस्तानी असेल तर देशभक्त आहे कारण ती पाकीस्तानवर ठपका देत नाहीये.

गुंतागुंतीची मांडणी पूर्ण न पाहता, तिचा अभ्यास न करता, सगळं सरधोपट करून लोकांना नावं ठेवणं, सोपं आणि पॉप्युलर आहे.

गुरमेहर चक्रम आहेच; कारण तशी नसती तर माचोगिरीचं-हिडीस-प्रदर्शन-मांडणारं-युद्ध सोडून लोक शांततेकडे वळतील, असल्या स्वप्नवत कल्पना तिनं बाळगल्या नसत्या.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुंतागुंतीची मांडणी पूर्ण न पाहता, तिचा अभ्यास न करता, सगळं सरधोपट करून लोकांना नावं ठेवणं, सोपं आणि पॉप्युलर आहे.

अगदी. तिची मांडणी पूर्ण समजून घेणं म्हंजे ती मांडणी संपूर्ण असते असं मानणं हे सुद्धा सोप्पं व प्रख्यात आहे.

हिंट देतो - Strategy of Conflict.

इच्छा असल्यास, हे पूर्णसत्य

हॅहॅहॅ.

तिच्या चक्रमपणाचा तुमच्यावर इतका लगेच परिणाम होईल असं वाटलं नव्हतं.

मी असं का म्हणतोय ते सांगतो.

ती म्हणते की "Pakistan did not kill her father, War did." हे वाक्य चक्रमच आहे.

(१) जर तिच्या वडिलांच्या मृत्यू साठी कोणाला उत्तरदायी ठरवायचं असेल तर ते युद्धाला कसं ठरवता येईल ?
(२) तिला धमक्या दिल्या गेल्या त्यांचं उत्तरदायित्व ठरवायचं असेल तर ते फेसबुक ला ठरवता येईल का ? किंवा सोशल मिडियाला ठरवता येईल का ? की ज्या व्यक्तीने धमक्या दिल्या त्या व्यक्तीला शोधून उत्तरदायी मानावे ?

---

गुरमेहर चक्रम आहेच; कारण तशी नसती तर माचोगिरीचं-हिडीस-प्रदर्शन-मांडणारं-युद्ध सोडून लोक शांततेकडे वळतील, असल्या स्वप्नवत कल्पना तिनं बाळगल्या नसत्या.

वैचारिक दिवाळखोरीतून misandry पोटी आलेला प्रतिसाद.

ज्या युद्धाच्या परिणामाबाबत ती व तुम्ही बोलत आहात त्या कारगिल युद्धात संधी व क्षमता असूनही भारत सरकारने सीमापार हल्ले केले नाहीत. फक्त पाकिस्तानचे हल्ले परतावून लावले. ह्याला म्हणतात Commitment to peace. पण तुम्ही हे दुर्लक्ष करणारच ... कारण सरकार नावडत्या पक्षाचे (त्यावेळीही होते व) आहे.

गुरमेहरला जे सुचवाचयं आहे ते असं आहे -
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सरकारांनी दोन्ही देशांत, आपसांत शांतता नांदावी यासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. तसे प्रयत्न केले असते तर तिच्या वडलांचा आणि त्यांच्यासारख्या अनेकांचा जीव घेणारी युद्धं (एक कारगिलचं नव्हे, अनेक) झाली नसती. तिनं युद्धाला नव्हे, युद्धखोरी तेवती ठेवणाऱ्यांना दोषी ठरवायला पाहिजे होतं, पण तिनं जे माध्यम आणि जो फॉर्म निवडला त्यात कदाचित हे शक्य झालं नसेल. किंवा तिला माणसांवर थेट दोषारोपण करायचं नसेल.

बाकी misandry, नावडत्या पक्षाचं (तेव्हाचं आणि सध्याचं) सरकार वगैरे सगळ्या तुमच्या विचारांच्या मर्यादा आणि कल्पनांचे खेळ आहेत; त्यात मला काही रस नाही.

असे असेल तर हा तिचा चक्रमपणा आहे. आणि तुमची गांधारीगिरी आहे. तुम्हाला दिसतच नाही की अण्वस्त्रे बनवणे ही शांति प्रति प्रचंड मोठी कमिटमेंट असते. युद्धात सुद्धा मर्यादा पाळणे ही सुद्धा.

कुणीही उठतं आणि काहीही लेक्चरं द्यायला सुरु करतं आणि तुम्ही हुरळून जाता.

--

बाकी misandry, नावडत्या पक्षाचं (तेव्हाचं आणि सध्याचं) सरकार वगैरे सगळ्या तुमच्या विचारांच्या मर्यादा आणि कल्पनांचे खेळ आहेत; त्यात मला काही रस नाही.

ही पराभूत झाल्यानंतर पराभव मान्य करण्याची तिरकस पद्धत आहे.

--

बाकी misandry, नावडत्या पक्षाचं (तेव्हाचं आणि सध्याचं) सरकार वगैरे सगळ्या तुमच्या विचारांच्या मर्यादा आणि कल्पनांचे खेळ आहेत; त्यात मला काही रस नाही.

अगदी. "बालकांना एक खुला ढोस" वगैरे डायलॉगबाजी ही त्याचीच द्योतक आहे.

तुमचं सगळं बरोबर आहे. धन्यवाद.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा व्हिडीओ पाहिल्याक्षणी, हा ऐसी वर येणार, आणि त्यावर कोण कोण, कुठल्या बाजूने, कसं बोलणार हे भाकित मी वर्तवलं होतं असं मी म्हटलं तर त्यावर तुमचा कितपत विश्वास बसेल?

युद्ध कोणाला हवं असतं? तिने जो मुद्दा मांडलाय तो चुकीचा नाहीए, पण बरोबरही नाहीए. युद्धाने तिच्या वडिलांना मारलेलं आहे हे खरंय. पण ते युद्ध पाकिस्ताननेच चालू केलेलं आहे, म्हणून 'पाकिस्तानने मारलं नाही' हे विधान निखालस भंपक आणि दिखाऊ आहे. जर, युद्धामुळे नाश होतो, काहीही साध्य होत नाही वगैरे शांततासंदेश द्यायचे होते तर ते तसे द्यायचे. ते पुढचं स्टेटमेंट शुद्ध पब्लिसिटी स्टंट आहे, हे आर्ग्युमेंट म्हणूनच पटतं.

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

युद्ध कोणाला हवं असतं? तिने जो मुद्दा मांडलाय तो चुकीचा नाहीए, पण बरोबरही नाहीए. युद्धाने तिच्या वडिलांना मारलेलं आहे हे खरंय. पण ते युद्ध पाकिस्ताननेच चालू केलेलं आहे, म्हणून 'पाकिस्तानने मारलं नाही' हे विधान निखालस भंपक आणि दिखाऊ आहे.

राष्ट्र ही संकल्पनाच रद्द समजणार्‍या (परंतु त्याचे फायदे उपटणार्‍या) बांडगुळांना या सत्याचे काय होय! कसली एकेक भोकाडं पसरतात या मुद्यावर.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> युद्धाने तिच्या वडिलांना मारलेलं आहे हे खरंय. पण ते युद्ध पाकिस्ताननेच चालू केलेलं आहे, म्हणून 'पाकिस्तानने मारलं नाही' हे विधान निखालस भंपक आणि दिखाऊ आहे. <<

पाकिस्तान म्हणजे नक्की कोण ह्याची व्याख्या काय आहे त्यावर ते अवलंबून असावं. तिच्या तर्कशास्त्राचं विश्लेषण केलं तर ती राजकीय नेते आणि आम जनता ह्यांच्यात फरक करत असावी असं दिसतं. समजा, भारतीय माणसाला विचारलं की काय रे सीमेवर आपले सैनिक मरू नयेत आणि पाकिस्तानचेही मरू नयेत अशी परिस्थिती आली तर ती चांगली, का दोन्हीकडचे मरताहेत ती (म्हणजे आताची) परिस्थिती चांगली? तर तो काय म्हणेल?

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समजा, भारतीय माणसाला विचारलं की काय रे सीमेवर आपले सैनिक मरू नयेत आणि पाकिस्तानचेही मरू नयेत अशी परिस्थिती आली तर ती चांगली, का दोन्हीकडचे मरताहेत ती (म्हणजे आताची) परिस्थिती चांगली? तर तो काय म्हणेल?

तिसरा ऑप्शन का नसावा असा एक साधा प्रश्न तरी नक्कीच विचारेल, उदा. आपले सैनिक न मरता किंवा अल्प प्रमाणात मरून जर त्यांचे बहुसंख्य सैनिक मेले तर ही परिस्थिती चांगली असेल की नसेल?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अल्प प्रमाणात मरून जर त्यांचे बहुसंख्य सैनिक मेले

अल्प????? अल्प म्हणजे कमी डॅमेज? प्रत्येक मनुष्याची किंमत त्याच्या नात्यातल्यांना केवढी असते. समोरचे १०० लोक मारण्याकरता आपला १ बळी द्यायचा? का स्वस्त आहे त्याच्या जीवाची किंमत?

मग War didn't kill my father, Politics did असं तिने म्हटलं असतं तर उजवे-डावे-वर्च्याआळीतले-खाल्च्याआळीतले सगळ्यांच्या हव्या तितक्या टाळ्या मिळाल्या असत्या की.
तुम्ही जो अर्थ लावला आहे, तो त्याचा तिच्या विधानांशी चांगला नव्वद अंशाचा कोन आहे.

मागचं म्युझिक, ते प्लॅकार्ड्स, फिकट ग्रे रंगसंगती, आय अ‍ॅम अ सोल्जर, फाईटिंग फॉर पीस, इनफ इझ इनफ वगैरे टाळ्याखेचू वाक्यं काय दर्शवतात, ह्यावर माझं मत आधारित आहे. फक्त त्या दोन वाक्यांवर नाही.

हेही पहा.
१.
२.
आणि हे.

तर्क जरा ओढूनताणून वाटतायत, पण इंटरेस्टिंग आहेत.

मागे 'ब्राह्मणी' शब्दावरून जे घमासान झालेलं तेच इथे आहे. आपण तिच्या मताचे अर्थ का लावत बसावे? बोलावं स्पष्ट माणसाने. शब्द आपण काय वापरतो, त्याचा एक सरळसोट अर्थ काय निघतो, आणि त्यात काहीए तथ्य आहे का वगैरे समजत नसेल तर ह्यात पडावंच कशाला? आणि एकदा पडलं, आणि लोकांची प्रतिक्रिया आली की 'माझ्या २० वर्षांच्या मनाला हे झेपत नाहीय' वगैरे अजून सहानुभूती खेचणारी विधानं का करावित?

Because, peace is da new SWAG, bruh.

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

पाकिस्तान म्हणजे नक्की कोण ह्याची व्याख्या काय आहे त्यावर ते अवलंबून असावं. तिच्या तर्कशास्त्राचं विश्लेषण केलं तर ती राजकीय नेते आणि आम जनता ह्यांच्यात फरक करत असावी असं दिसतं.

गुरमेहेरसाठी एक नवा फलकः
Pakistan did not kill my father. India did.
पाकिस्तान म्हणजे नक्की कोण, भारत म्हणजे नक्की कोण याचे खालील प्रमाणे अर्थ घेऊ.
१. पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानचे लोक.
२. भारत म्हणजे भारत सरकार, राजकीय नेते.

समजा, भारतीय माणसाला विचारलं की काय रे सीमेवर आपले सैनिक मरू नयेत आणि पाकिस्तानचेही मरू नयेत अशी परिस्थिती आली तर ती चांगली, का दोन्हीकडचे मरताहेत ती (म्हणजे आताची) परिस्थिती चांगली? तर तो काय म्हणेल?

माझी मावशी गेल्या दिवाळीला देवाघरी गेली. तिला वापस कसं आनायचं? (असं मनेल).
================================================================
गुरमेहरीय सिद्धांत १ - दोन पक्षांतील भांडणांस दोन्ही(च)* पक्ष कारणीभूत असतात.
गुरमेहरीय सिद्धांत २ - एका पक्षाने केलेल्या दुसर्‍या पक्षाच्या नुकसानासाठी पहिला पक्ष जबाबदार नसून (वा दुसराही पक्ष नसून) तत्स्थितीसूचक सामान्य नाम जबाबदार असते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गुरमेहरीय सिद्धांताच्या अजवीय विवेचनाला बॅटीय पाठिंबा.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समजा, भारतीय माणसाला विचारलं की काय रे सीमेवर आपले सैनिक मरू नयेत आणि पाकिस्तानचेही मरू नयेत अशी परिस्थिती आली तर ती चांगली, का दोन्हीकडचे मरताहेत ती (म्हणजे आताची) परिस्थिती चांगली? तर तो काय म्हणेल?

का बुवा?

भारतीय सैनिकाला भारतीय टॅक्सपेयरच्या खर्चातून जो पगार मिळतो, तो कशासाठी असतो? भारतीय टॅक्सपेयरचा पैसा अंशतः, थोड्याफार प्रमाणात जर वसूल झाला, तर कोठे बिघडले?

(पाकिस्तानी टॅक्सपेयरने आपला विचार करावा. त्यांच्या वतीने विचार करण्यास मी - लिबरल असलो तरी - समर्थ नाही.)

बाकी, इतरत्र म्हटल्याप्रमाणे, भारतात बहुधा कॉन्स्क्रिप्शन नसावे. (चूभूद्याघ्या.) सबब, भारतीय सैनिकास सीमेवर जर मरायचे नसेल, तर त्यास सैन्यात भरती न होण्याचा पर्याय उपलब्ध आहेच. आणि त्याचात्याचा विचार करण्यास तो समर्थ असावाच, याची मला खात्री वाटते. सबब, त्याच्या वतीने विचार करण्याचे मला प्रयोजन नसावे. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

व्हाटेव्हर मे बी द कंटेक्स्ट ऑफ द सेंटेन्स, पण ते विधान म्हणजे अगदीच लाँग हॉप किंवा फुलटॉस आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरोबर. तिच्या त्या विधानात वडिलांच्या मृत्युचा दोष भारत पाकिस्तान यांच्यात बरोबर वाटला जातो. हे बोगस संतुलन आहे. कारगील युद्ध हे युद्ध नसून केवळ बचाव होता. अग्रेशन पूर्णतः पाकिस्तानी होतं. म्हणुनच एकंदर व्हिडो पकाऊ, उपदेशी आणि टाळ्याखेचू वाटला.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नुआन्स समजायची अपेक्षा कुणाकडून करताहात ढेरेशास्त्री, सोडून सोडाच म्हणतो मी.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सरकारांनी दोन्ही देशांत, आपसांत शांतता नांदावी यासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. तसे प्रयत्न केले असते तर तिच्या वडलांचा आणि त्यांच्यासारख्या अनेकांचा जीव घेणारी युद्धं (एक कारगिलचं नव्हे, अनेक) झाली नसती. तिनं युद्धाला नव्हे, युद्धखोरी तेवती ठेवणाऱ्यांना दोषी ठरवायला पाहिजे होतं, पण तिनं जे माध्यम आणि जो फॉर्म निवडला त्यात कदाचित हे शक्य झालं नसेल. किंवा तिला माणसांवर थेट दोषारोपण करायचं नसेल.

Sorry to point this out, but... दस्तुरखुद्द तिचे दिवंगत तीर्थरूप आर्मीत नव्हते काय? भारतीय लष्कराची (पर्यायाने त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या भारत सरकारची) स्यालरी (शब्दशः 'नमकचा पैसा') घेत नव्हते काय (पर्यायाने नमक खात नव्हते काय)?

बोले तो, हा जो अधोरेखित आरोप आहे, त्यात अभिप्रेत असलेल्या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे त्यांचाही सहभाग नव्हता काय?

स्वतः सामील व्हायचे, नि मग जीव गेला की (दोन्ही बाजूच्या) सरकारांच्या नावे बोंबलायचे, याला काय अर्थ आहे? (सिव्हिलियन बोंबलला, तर एक वेळ समजण्यासारखे आहे. आर्मीवाल्यांकरिता it is a professional hazard - they are paid - at the taxpayer's expense - to die in war. जगलेवाचले तर तो बोनस. शिवाय, भारतासारख्या देशात - करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग, पण - बहुधा कॉन्स्क्रिप्शन नसावे. बोले तो, त्यांच्यावर सैन्यात भरती होण्याची कोणीही सक्ती केलेली नाही. It is out of their own choice - their own free will - that they volunteered to join the armed forces, so they accepted the privileges and perks as well as the risks that go with the job. त्यांनी बोंबलण्याचे खरे तर काम नाही. पण काय असते, की आम जनतेत 'फौजी भाईं'बद्दल उगाच एक सॉफ्ट कॉर्नर असतो. त्यातून असे बोंबलण्याची सोय होते, इतकेच.)

आर्म्या आहेत, युद्धे ही व्हायचीच. नि त्यात सैनिक हे मरायचेच. नि म्हणून आर्मीच काढून टाकलीत, नि प्रतिपक्षानेसुद्धा जर ते केले नाही नि वर उलट संधीचा फायदा घेऊन हल्ला केला, की मग बसा बोंबलत तिच्यायला!

Armed Forces are a necessary evil. They do a necessary job. फक्त, म्हणून त्यांना डोक्यावर चढवायचे नसते. नाहीतर मग ते (पाकिस्तानसारखे) डोक्यावर बसतात. (भारत त्या बाबतीत सुदैवी आहे. रादर, आजतागायत सरकार कोणाचेही असो, परंतु लष्करी दले ही कायम नागरी सरकारच्या ताब्यात आहेत. परंतु हे अवांतर झाले.)

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सरकारांनी दोन्ही देशांत, आपसांत शांतता नांदावी यासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत.

असे कसे म्हणता येईल? उलट (पाकिस्तानच्या वतीने बोलण्यास मी समर्थ नाही - लिबरल असलो, तरीही! - परंतु) (पाकिस्तानसारखा अ‍ॅड्व्हर्सरी शेजारी असताना) निदान भारत सरकारने तरी सक्षम आर्मी बाळगून शांततेस हातभारच लावलेला नाही काय?

Deterrence, deterrence म्हणतात, तो हाच! Si vis pacem, para bellum! (उलटपक्षी, Si vis bellum, para pacem असेही ऐकिवात आहे. असो.)

क्या बात है. मस्त!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद आवडला. पाकिस्तानने मारले नाही असे म्हणण्याचा वगैरे प्रकार विनोदी वाटला.

दस्तुरखुद्द तिचे दिवंगत तीर्थरूप आर्मीत नव्हते काय? भारतीय लष्कराची (पर्यायाने त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या भारत सरकारची) स्यालरी (शब्दशः 'नमकचा पैसा') घेत नव्हते काय (पर्यायाने नमक खात नव्हते काय)?

बरोबर. युद्धखोरीला विरोध करताना सैन्य, सैनिकांनाही विरोध केलाच पाहिजे. हाना आरण्ड्ट म्हणते तसं, सैन्य, सैनिक हे दूधखुळी बालवर्गातली मुलं नव्हेत की शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींचं तंतोतंत पालन केलं. गुरमेहर स्वतःला शांततेसाठी लढणारी सैनिक म्हणवते; युद्धखोरीविरोधात लढणारी. वडलांची कृती आणि निर्णय यांच्यापासून ती स्वतःला वेगळं काढते.

तिचा भर डिप्लोमसीवर आहे; म्हणून ती जपान-अमेरिका, फ्रान्स-जर्मनी यांची उदाहरणं देते.

प्रत्यक्ष युद्धं होऊन जीव जाऊ नयेत म्हणून सैन्य बाळगणं (त्या सैन्यानं कठीण प्रदेशात पूल, रस्ते बांधणं; नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांना मदत करणं) निराळं आणि प्रत्यक्ष युद्ध होऊन लोकांचा जीव जाणं निराळं. कोणी मनुष्य जवळजवळ जिवंत नसतो; माणसाचा जीव असतो किंवा नसतो. हा फरक ती करत्ये.

---

आपले सैनिक न मरता किंवा अल्प प्रमाणात मरून जर त्यांचे बहुसंख्य सैनिक मेले तर ही परिस्थिती चांगली असेल की नसेल?

त्यांचे बहुसंख्य सैनिक मेले तर तिथे बऱ्याच गुरमेहर बनतील, ज्यांच्या घरी वडील नसतील. (फक्त सध्याचे सत्ताधारी नव्हे) राजकारणी आणि नागरिक अशी विभागणी करणारी गुरमेहर भारतीय नागरिक आणि पाकिस्तानी नागरिक अशी विभागणी करत नाही. युद्ध न करणारे, रोजचं आयुष्य शांतपणे जगून नैसर्गिक मरणाने मरण्याची इच्छा बाळगणारे लोक भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये बहुसंख्य प्रमाणात आहेत; गुरमेहर त्यांचं ध्रुवीकरण करत नाही, उलट आहे ती दरी कमी करू पाहते.

सैद्धांतिक पातळीवर, पाकिस्तानचे बरेच सैनिक मारले गेले यात आनंद मानावा असं वाटणारे बरेच लोक असतीलही यात मला संशय नाही. गुरमेहरचे (मला पटणारे) विचार या लोकांना फार पटणार नाहीत, याचीही जाणीव आहे. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर भारत-पाकिस्तानात कोणत्याही युद्धात भारताचं मामूली नुकसान झालंय आणि पाकिस्ताननं सपाटून मार खाल्लाय असं झालेलं नाही; भारताचं नुकसान एक एकक आणि पाकिस्तानचं १०० एककं, अशा छापाचा फरक कधीच नव्हता. म्हणजे प्रत्यक्षात जे होणं फार कठीण आहे, ते होईल अशी शक्यता मानून काहीही होणार नाही. दुसरं उदाहरण बघायचं तर चीन आणि तैवानचं पाहा. तैवान केवढासा देश आहे, पण चीनला तो गिळंकृत करता येतोय का?

मग आपल्या शेजारी पाकिस्तान असणार, काश्मीरवर दोघांचाही दावा असणार आणि कदाचित आपल्या मृत्युपर्यंतही या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नसेल असं गृहित धरून, आपली हानी कमी करण्याचे प्रयत्न का करू नयेत? आपली हानी म्हणजे राजकारण्यांची हानी नव्हे, आपला फायदा म्हणजे राजकारण्यांचा फायदा नाही. राजकारणी कोणत्याही पक्षाचे असले तरीही ते सामान्य जनतेच्या पक्षाचे कधीही नसतात. (त्यांनी दाखवलेल्या) पाकिस्तानद्वेष्ट्या देशभक्तीमधून सडक-बिजली-पानी येणार नाहीत; आपली प्रगती सडक-बिजली-पानीमध्ये आहे. त्यामुळे (गरज असल्यास, देशभक्तीचा फ्लेवर बदलून) सडक-बिजली-पानी, भरभक्कम अर्थव्यवस्था, गुन्हेगारीचं प्रमाण कमी करणं, वगैरेंना देशभक्ती म्हणावं.

१. वडलांचे विचार त्यांच्या ठिकाणी; आज वडील जिवंत नाहीत आणि मला त्यांचे विचार पटत नाहीत; याचा स्वानुभव आहे. म्हणून मला ते तसं दिसतंय का तिला खरंच तसं म्हणायचं आहे?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांचे बहुसंख्य सैनिक मेले तर तिथे बऱ्याच गुरमेहर बनतील, ज्यांच्या घरी वडील नसतील. (फक्त सध्याचे सत्ताधारी नव्हे) राजकारणी आणि नागरिक अशी विभागणी करणारी गुरमेहर भारतीय नागरिक आणि पाकिस्तानी नागरिक अशी विभागणी करत नाही. युद्ध न करणारे, रोजचं आयुष्य शांतपणे जगून नैसर्गिक मरणाने मरण्याची इच्छा बाळगणारे लोक भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये बहुसंख्य प्रमाणात आहेत; गुरमेहर त्यांचं ध्रुवीकरण करत नाही, उलट आहे ती दरी कमी करू पाहते.

शांतता व अहिंसा ही ऑटोमॅटिकली अस्तित्वात येते किंवा अस्तित्वात असतेच असं मानणं ही समस्या आहे असा माझा मुद्दा आहे.

एक अत्यंत विचित्र उदाहरण देतो. निसर्गात सुद्धा सशाचे, किंवा हरणाचे उदाहरण घ्या. त्यांना शांतपणे जगायचं असतंच की. पण ते लोक एकत्र येत नाहीत, व देश बनवत नाहीत आणि scale चा फायदा उठवत नाहीत. पण सिंह कधीही येऊन त्यांना मारू शकतो. They probably have a latent demand which remains unfulfilled. They do not have a way to translate the risk(which indeed exists) into specific risk mitigation and reduction strategies. पण हरणांचं व सशांचं इव्होल्युशन इतपत झालेलं नाही व त्यामुळे ते असं सगळं विचारपूर्वक करू शकत नाहीत.

चिंजं नी विचारलेला --- पाकिस्तान म्हंजे नेमकं कोण ? हा प्रश्न उचित आहे. चपखल आहे. पाकिस्तान म्हंजे कदाचित त्यांची आर्मी, त्यांचं सरकार, किंवा (त्यांच्याच भाषेत सांगायचं तर) "नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स". So Indian Govt does not know who to negotiate with, deal with, enter into agreement with. And who to hold accountable.

पण मजेशीर बाब ही आहे की - We(In India) are unwilling to accept that they may be deliberately doing this. They may be deliberately preventing themselves from providing us the certainty (clarity). जसं ट्रंप नं जाहीर केलं - की - "त्याचं सरकार आयसिस ला कसं, कुठे ठोकणार आहे ते ट्रंप सांगणार नाही". Let them keep guessing.

मुद्द्याचा क्रक्स सांगतो - In democracy - Is it really possible to have a rational policy declaration on "when you will go to war" ?

( खूप उड्या मारलेल्या आहेत. हे विस्कळीत आहे पण.....)

--

सैद्धांतिक पातळीवर, पाकिस्तानचे बरेच सैनिक मारले गेले यात आनंद मानावा असं वाटणारे बरेच लोक असतीलही यात मला संशय नाही. गुरमेहरचे (मला पटणारे) विचार या लोकांना फार पटणार नाहीत, याचीही जाणीव आहे. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर भारत-पाकिस्तानात कोणत्याही युद्धात भारताचं मामूली नुकसान झालंय आणि पाकिस्ताननं सपाटून मार खाल्लाय असं झालेलं नाही; भारताचं नुकसान एक एकक आणि पाकिस्तानचं १०० एककं, अशा छापाचा फरक कधीच नव्हता. म्हणजे प्रत्यक्षात जे होणं फार कठीण आहे, ते होईल अशी शक्यता मानून काहीही होणार नाही. दुसरं उदाहरण बघायचं तर चीन आणि तैवानचं पाहा. तैवान केवढासा देश आहे, पण चीनला तो गिळंकृत करता येतोय का?

माझा मुद्दा विस्कळीतपणे मांडतोय.

(१) प्रत्यक्षात होणं कठिण आहे ह्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अण्वस्त्रांमुळे युद्धाची शक्यता अतिशय कमी झालेली आहे. अण्वस्त्रांच्या उपस्थितीत आक्रमकता असली तरी कृती करणं कठिण होऊन बसतं. कारण अण्वस्त्रांचा परिणाम महाभयानक असतो. इतका आक्रमक कृति करण्याचा निर्णय घेणार्‍याची सुद्धा तंतरते. शांति प्रति कमिटमेंट चे दुसरे उदाहरण म्हंजे "नो फर्स्ट युज पॉलिसी" जी भारताने स्वतःहून जाहिर केलेली आहे. पण पाकिस्तानने नाही. ह्या उदाहरणातून हे दिसते की पाकिस्तान हा शांततेप्रति वचनबद्ध नाही पण भारत आहे. शांतता ही अस्तित्वात आणावी लागते. It needs to be created, ensured, supplied. And someone has to work towards it. व भारत तेच करत आलेला आहे. उदा. अकाऊंटॅबिलिटी ही काटेकोरपणे पॉलिटिकल नेतृत्वाकडे ठेवणे, Steadfast adherence to the doctrine of Civilian control of the military. उलटपक्षी पाकिस्तानने अकाउंटॅबिलिटी ही संदिग्ध ठेवून भारता समोर रिस्क निर्माण केलेली आहे. (मला हे म्हणायचंय की शांतता नांदावी व्हावी म्हणून भारताने पाकिस्तानपेक्षा फार जास्त प्रयत्न केलेले आहेत - आणि हा मुद्दा अतिबेसिक आहे.).

(२) चीन ला तैवान गिळंकृत करणं कठिण आहे कारण हे. आणि हे. अमेरिकेने तैवान ला तशी वचनं दिलेली आहेत. Somebody is working towards it or underwrites that risk. अर्थात तैवान कडून अमेरिकेला बदल्यात काहीतरी मिळत असणारच.

मला जे काही समजलंय त्यावरून माझं मत आणि माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. याला अर्थातच वर्तुळपूर्वबाण म्हणण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य सगळ्यांना आहे. पण ... असो.

शांतता व अहिंसा ही ऑटोमॅटिकली अस्तित्वात येते किंवा अस्तित्वात असतेच असं मानणं ही समस्या आहे असा माझा मुद्दा आहे.

मान्यच. तसं असतं तर युद्धं झाली नसती आणि डिप्लोमसीची गरजही पडली नसती. एवढं लांब कशाला जा, 'असहमतीवर सहमती' ही गोष्टसुद्धा सहजसाध्य झाली असती; पण तसं दिसत नाही. थोडक्यात, शांतता आणि अहिंसा या गोष्टी आपसूक अस्तित्वात येतात, हे मिथक वाटतं.

तुमचं सिंह-सशाचं उदाहरण मला नीटसं समजलं नाही. दुसरी दोन उदाहरणं देते. एक गांधींचं. स्वतंत्र्यलढ्यात गांधींचं यश कशात होतं, तर सर्वसामान्य भारतीय नागरिकांनाही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. सगळ्यांना किंवा बहुसंख्य लोकांना बंदुका आणि बाँब घेऊन मारामारी करणं शक्य नव्हतं; कारण - बहुसंख्यांना शांततेचं आयुष्य हवं असतं. ते मिळतं असं नाही, हवं असतं.
दुसरं उदाहरण अलीकडचं, मोदींचं. राष्ट्रभक्ती दाखवण्यासाठी सगळ्या किंवा बहुसंख्य नागरिकांना सीमेवर जाऊन किंवा देशांतर्गत दहशतवादी, माओवाद्यांशी लढणं शक्य नसतं. मग लोकांनी राष्टभक्ती कशी दाखवायची? तर रांगेत उभं राहणं, वगैरे प्रकारचे नोटाबंदीचे त्रास सहन केले. का? देशाचं, देशाच्या अर्थव्यवस्थेचं यातून भलं होईल असं लोकांना वाटलं म्हणून. (महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये तसे आकडेही दिसले.) पुन्हा एकदा, हिंसा करणं आणि हिंसेला तोंड देणं सगळ्यांना शक्य नसतं; म्हणून शांततापूर्ण मार्ग काढावा लागतो. मोदींनी तो काढला.

चीनला तैवान गिळता येत नाही, यासाठी चीनवर जसा दबाव आहे तसा दबाव भारतावर नसेलच का? मुळात भारताची पाकिस्तानची पुरती खोड मोडण्याएवढी पत आहे का? अमेरिकेचं व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक, सिरीयामध्ये काय झालं? तरी हे देश अमेरिकेचे शेजारी देश नाहीत. शेजारी देश अस्थिर असण्याचा फायदा अधिक होतो का स्थिर असण्याचा? अमेरिकेला शेजारी म्हणून कॅनडा आवडतो का मेक्सिको? आणि हा सगळाच माझ्या दृष्टीनं उपमुद्दा आहे. कारण पाकिस्तानशी लढाई करून, त्यांची पुरती खोड मोडून, भारताची प्रगती आहे त्याच वेगात करत राहणं शक्य आहे असं मला अजिबातच वाटत नाही. आणि त्यापेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचं, युद्धात होणारी जीवितहानी मला अजिबात मान्य नाही. (अर्थात, माझ्या मताला विचारतं कोण, याची जाणीव आहे.) एकंदरच, युद्ध हा पर्याय असण्याबद्दल चर्चा करण्यात मला फार रस नाही; कारण या पर्यायाची निवड करणं किंवा न करणं यावर आपल्यापैकी कोणाचाही ताबा नाही.

माझ्या दृष्टीनं दुसरा महत्त्वाचा मुद्दा भारत-पाकिस्तान युद्धाचा. कारगिल युद्धाबद्दल मला जितपत माहिती आहे, पाकिस्तानने आधी खोडी काढली. पण आणखी थोडं मागे जाऊ; तिथे घुसखोरी होऊ शकली याचं कारण अनेक स्थानिकांनी त्या घुसखोर-सैनिकांना सहकार्य दिलं असणार. त्यांना सहकार्य द्यावंसं का वाटलं? किंवा ज्या-ज्या मुद्द्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याइतपत तंटा आहे, त्या मुद्द्यांची तीव्रता कमी करण्यासाठी भारत सरकारनं पुरेशी पावलं उचलली का युद्धखोरी तेवती ठेवणारी पावलं उचलली?

कदाचित भारत सरकारवर पाकिस्तान सरकार, काश्मिरी नागरिकांपेक्षा अधिक जबाबदारी टाकली तर लोकांना आवडणार नाही. म्हणून जवळचं उदाहरण बघू. ऐसीवर समजा मी काही तांत्रिक बदल केले आणि म्हटलं की मला नावं ठेवणाऱ्या, भारंभार आणि निरर्थक लिहिणाऱ्या लोकांना दिवसातून तीनच प्रतिसाद लिहिता येतील, तर मी फार बरी वागत्ये असं म्हणाल का? हाच न्याय भारत सरकारलाही लावला जातो. मी भारतीय आहे म्हणून मी भारत सरकारकडून अपेक्षा ठेवते; शांतताप्रेमी पाकिस्तानी नागरिक त्यांच्या सरकारकडून अपेक्षा धरतात. मी भारतातलं सरकार निवडून देण्यासाठी मतदान करू शकते, म्हणून मी भारतीय राजकारण्यांना माझ्या अपेक्षाही सांगते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्हा सर्वांचे मुद्दे घरी जाऊन वाचायचे आहेत. आय अ‍ॅम मिसिंग ऐसी वावर.

चीनला तैवान गिळता येत नाही, यासाठी चीनवर जसा दबाव आहे तसा दबाव भारतावर नसेलच का? मुळात भारताची पाकिस्तानची पुरती खोड मोडण्याएवढी पत आहे का? अमेरिकेचं व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक, सिरीयामध्ये काय झालं? तरी हे देश अमेरिकेचे शेजारी देश नाहीत. शेजारी देश अस्थिर असण्याचा फायदा अधिक होतो का स्थिर असण्याचा? अमेरिकेला शेजारी म्हणून कॅनडा आवडतो का मेक्सिको? आणि हा सगळाच माझ्या दृष्टीनं उपमुद्दा आहे. कारण पाकिस्तानशी लढाई करून, त्यांची पुरती खोड मोडून, भारताची प्रगती आहे त्याच वेगात करत राहणं शक्य आहे असं मला अजिबातच वाटत नाही. आणि त्यापेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचं, युद्धात होणारी जीवितहानी मला अजिबात मान्य नाही. (अर्थात, माझ्या मताला विचारतं कोण, याची जाणीव आहे.)

शेजारची राष्ट्रं डब्यात गेलेली असली तरी तुमचं राष्ट्र दणकट, सुदृढ असू शकतं. मेक्सिको ची दयनीय अवस्था असली तरी व क्युबा विव्हळत असला तरी अमेरिका त्यांच्या २५ पटीने सुदृढ आहे.

दुसर्‍या॑ महायुद्धात (दोस्त राष्ट्रांबरोबर हात मिळवणी करून) जर्मनीची पुरती खोड मोडून झाल्यावर (आणि जर्मनीचं विघटन झालं तरी) सुद्धा फ्रान्स सुदृढ होता. प्रगतिपथावर होता. आजही विकसित व बलशाली राष्ट्र आहे.

भारतावर दबाव असेलही. पण तो झुगारण्यासाठी आवश्यक असलेली बार्गेनिंग पॉवर मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत.

---

एकंदरच, युद्ध हा पर्याय असण्याबद्दल चर्चा करण्यात मला फार रस नाही; कारण या पर्यायाची निवड करणं किंवा न करणं यावर आपल्यापैकी कोणाचाही ताबा नाही.

हे तुमचं मत झालं.

युद्ध या पर्यायाची निवड करणं किंवा न करणं यावर आपल्यापैकी कोणाचाही ताबा नाही - असं जर असेल तर तिचं बोलणं बकवास आहे असं म्हणालं तर त्यावर कोणालाही आक्षेप घ्यायचं कारण नाही. नैका ?

--

तुमचं सिंह-सशाचं उदाहरण मला नीटसं समजलं नाही.

खालील वाक्य हाच मुद्दा आहे माझा - ससा-सिंह या उदाहरणात.

शांतता आणि अहिंसा या गोष्टी आपसूक अस्तित्वात येतात, हे मिथक वाटतं.

Peace is a valuable service that is demanded by some people because it is in their interest. Violence benefits some other people = so they want to create a service that satisfies their desires.

सदर प्रतिसादाचा मूळ लेख, गुरमेहरचा व्हिडिओ आणि चालू चर्चा यांच्याशी काहीही संबंध नसल्यामुळे प्रतिसाद देणं टाळत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@घाटावरचे भटः

वर्तुळपूर्वबाणन्याय म्हणजे हा प्रतिसाद. गुरमेहेरला सपोर्ट करायचं आहे असं ठरवून आर्ग्युमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुरमेहरचे विचार पूर्ण पटले आहेत; नव्हे, तिला पाठिंबा देणाऱ्यांचे विचार तसेच होते ही शक्यता लक्षात घेतली आहे का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुरमेहेरला सपोर्ट करायचं आहे असं ठरवून आर्ग्युमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे.

मी सुद्धा थेट सांगतो की मला हे पहायचं आहे की "भारताने पाकिस्तानला दोन तिन वेळा करकचून ठोकले व भारतीयांच्या आत्मसन्मानावर पाकिस्तान ने जे आघात केले त्याला पुरेपूर प्रत्युत्तर दिले गेले" व म्हणून मी गुरमेहेर च्या "अतिरेकी व बेभान शांतताखोरीला" विरोध करायचाच असं ठरवून प्रतिवाद करत आहे.

अर्थातच मला प्रत्युत्तर म्हणून = प्रतिवाद असा होऊ शकतो की गब्बर सारख्या काही लोकांच्या मागणी पोटी भारतीय सैनिकांच्या जिवाशी खेळ का व्हावा ? (त्याला उत्तरही देऊ शकतो.).

वरचा, 'बूच मारू नका' म्हणून अर्धवट सोडलेला प्रतिसाद कधी पूर्ण करणार?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टाईप करत आहे.

क्या बात है! साधु साधु !
(पण म्हणजे लश्करी खर्च वाढवीत नेणे म्हण्जेच शान्तता-रक्शण असा अर्थ होतो . हे कुठे थाम्बणार ? मा श्री ट्रम्प यांनीही काल लष्करी खर्च ५४ बिलियन डॉलर्स ने वाढविण्याचा प्रस्ताव मांडला आहे . अमेरिकेचा लष्करी खर्च हा सध्या रशियाच्या दहापट आणि नंबर दोन ते एकवीस राष्ट्राच्या खर्चाच्या बेरजेहूनही अधिक आहे असे असताना हे कशासाठी? दुसरीकडे अनेक असाध्य रोगांच्या संशोधनासाठी पुरेसा पैसे नाही)

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

(पण म्हणजे लश्करी खर्च वाढवीत नेणे म्हण्जेच शान्तता-रक्शण असा अर्थ होतो . हे कुठे थाम्बणार ? मा श्री ट्रम्प यांनीही काल लष्करी खर्च ५४ बिलियन डॉलर्स ने वाढविण्याचा प्रस्ताव मांडला आहे . अमेरिकेचा लष्करी खर्च हा सध्या रशियाच्या दहापट आणि नंबर दोन ते एकवीस राष्ट्राच्या खर्चाच्या बेरजेहूनही अधिक आहे असे असताना हे कशासाठी? दुसरीकडे अनेक असाध्य रोगांच्या संशोधनासाठी पुरेसा पैसे नाही)

हे कुठे थांबणार? वर प्रत्युत्तर हे की कलेक्टिव्ह डिफेन्स. नेटो सारखी संघटना बांधणे. Attack on one is attack on all - चे क्लॉज घालणे.

खर्चाचंच म्हणाल तर युरोपवर ट्रंप दबाव आणत आहेच की ... की खर्च शेअर करा म्हणून.

चला! अर्धसत्य वाचून लोकांना जोखायला सुरुवात झाली. आजचा उरलेला दिवस छान जाणार.

इच्छा असल्यास...

सगळे इथे तिरकस का बोलत असतात सतत? बाकीचे पण करत असतील पण ह्या चर्चेत घुसताना हा पहिला असला पोस्ट दिसला म्हणून लिहिलं.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

काही लोकांशी सरळ बोलण्याचा प्रयत्न करूनही फायदा होत नाही; मग पराभूत मनोवृत्तीमधून असा तिरकसपणा येतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१६ मे २०१४ नंतर पराभूत कोण आहे आणि त्यांचा तिरकसपणा कसा दिसामासांनी वाढतच चाल्लाय त्याचे प्रत्यंतर तुमच्याकडूनच आलेले आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सगळे इथे तिरकस का बोलत असतात सतत? बाकीचे पण करत असतील पण ह्या चर्चेत घुसताना हा पहिला असला पोस्ट दिसला म्हणून लिहिलं.

नाय ओ.

असंच काय नाय.

(१) एक म्हंजे तिरकसपणा हा भाषिक सौंदर्याचा भाग आहे असा (किमान माझा तरी) समज आहे.
(२) नारळासारखे असतात काही लोक. अंदर से नरम और बाहर से सख्त. अदितीचं तसंच आहे.
(३) काही लोक दाखवताना एकमेकांशी खूप भांडल्याचं दाखवतात आणि आतून त्यांची घनिष्ठ मैत्री असू शकते. जसं मी दाखवताना मनोबा माझा खूप मित्र आहे असं दाखवतो पण तो माझा एक नंबर चा शत्रू आहे. काल सिफर ला भेटलो तेव्हा लई शिव्या घातल्या मनोबाला आम्ही. (पळा पळा).
(४) स्पेसिफिकली अदिती च्या बाबतीतच बोलायचं म्हंजे जालावरच्या चर्चेमुळं डोकं फिरवून न घेणारी आहे ती.

अरे ते सगळं ठीक आहे, पण हेच - तिरकसपणा हा भाषिक सौंदर्याचा "भाग" आहे पण इथे मूळ मुद्दा हा तिरकसपणाचा भाग आढळतो.

मूळ विषयातले मुद्दे बाजूलाच राहतात आणि समोरच्याची मापं काढणंच सुरु असतं. तुझाच वरचा पोस्ट पहा ज्याच्यावर विदिताईनी रिप्लाय केलाय. पण असू दे, मी एन्जॉय करतो. मला काही इश्यू वैगेरे नाही. माझ्या तरी "प्रत्येक" पोस्ट मध्ये sarcasm नसतं.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

सगळे इथे तिरकस का बोलत असतात सतत? बाकीचे पण करत असतील पण ह्या चर्चेत घुसताना हा पहिला असला पोस्ट दिसला म्हणून लिहिलं.

होय. इथं लै लै तिरकस बोलतात. इन फ्याक्ट काही काही आय डी तर फक्त तिरकसच बोलतात. ह्याचा मला वैताग्,उबग येतो. अर्थात त्यांनाही हेच अपेक्षित असावं. राजकिय आणि सामाजिक बाबतीत त्यामुळे फार काही धड बोलता यायची सोय राहिलेली नाही. कित्येकांना तर मुद्दे मांडायचेच नसतात; फक्त टोमणे मारायचे असतात, शेरेबाजी करायची असते.

बुच (हीहाहाहाहाहाह - पाताळविजयम् मधील राक्षस)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबाच्या प्रत्येक प्रतिसादाला बूच मारुन ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. नाहीतर मनोबा २ वर्षानंतर इतिहास बदलेल.

नाहीतर मनोबा २ वर्षानंतर इतिहास बदलेल.

मनोबा युगप्रवर्तक आहे.

होय. इथं लै लै तिरकस बोलतात. इन फ्याक्ट काही काही आय डी तर फक्त तिरकसच बोलतात. ह्याचा मला वैताग्,उबग येतो. अर्थात त्यांनाही हेच अपेक्षित असावं. राजकिय आणि सामाजिक बाबतीत त्यामुळे फार काही धड बोलता यायची सोय राहिलेली नाही. कित्येकांना तर मुद्दे मांडायचेच नसतात; फक्त टोमणे मारायचे असतात, शेरेबाजी करायची असते.

तिरकस बोलण्यावर आक्षेप का आहे ? असं नेमकं काय आहे की जे तिरकस बोलण्यामुळे होत नाही परंतु सरळसोट बोलण्यामुळे होतं ? किंवा असं नेमकं काय आहे की जे तिरकस बोलण्यामुळे साध्य केलं जातं परंतु सरळसोट बोलण्यामुळे होत नाही ?

तू कायदेशीर/सैद्धांतिक आक्षेप घेत नाहीयेस हे मला माहीती आहे रे. (हे मान्य केलं नसतं तर तू "गब्बर पुस्तकी बोलतो" असा प्रतिवाद केला असतास.).

आता पुस्तकी मुद्दा - तिरकस पणाचे फायदे.

तिरकसपणा म्हंजे Sarcasm = असा माझा समज आहे.

तिरकस बोलण्यावर आक्षेप का आहे ?

ह्याबद्द्ल

ह्याचा मला वैताग्,उबग येतो.

एवढच पुरेसं असावं.

होय. इथं लै लै तिरकस बोलतात. इन फ्याक्ट काही काही आय डी तर फक्त तिरकसच बोलतात.

बोलणे तर ठीक आहे मनोबा, पण तिरकस वागणार्‍यांचे काय?

बोलणे तर ठीक आहे मनोबा, पण तिरकस वागणार्‍यांचे काय?

वागणे तर ठिक आहे अनुराव, तिरकसच असणार्‍यांचे काय?

. राजकिय आणि सामाजिक बाबतीत त्यामुळे फार काही धड बोलता यायची सोय राहिलेली नाही. कित्येकांना तर मुद्दे मांडायचेच नसतात; फक्त टोमणे मारायचे असतात, शेरेबाजी करायची असते.

नीट नामोल्लेख केल्याने हेच वाक्य तिरकस टोमणा कसे नाही हे संदर्भासहित स्पष्ट करा (४ गुण)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टोमणे हे मुद्दे नसतात असे कोणी सांगितले?

कित्येक वेळेला एक टोमणा जे सांगेल ते विस्तारुन सांगितलेला मुद्दा सांगणार नाही.

ते मला कशाला विचारते ते कोणा मनोबाला विचार ने!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबा उत्तर देत नाही ना. Sad ( नुस्ती टिंब फेकुन मारतो )

गेल्या काही वर्षात एकूण भारतात (आता जगात हे ही म्हणता येईल) जी एक राईटिस्ट आणि लिबरल्स अशी एक जंग चाल्लीय्य त्याचाच भाग दिसतो. मला ही १५ मिनिट्स ऑफ फेम category तली वाटते (विडीयो पाहिल्यानंतर).

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

जी एक राईटिस्ट आणि लिबरल्स अशी एक जंग चाल्लीय्य

त्याच युद्धाचा एक मुद्दा (एकमेव नव्हे) हा आहे की --

एखादा समाजघटक गट बेनिफिट्स मागताना गट म्हणून मागतो.
पण कॉस्ट्स शेअर करायच्या असतील तर मात्र आमच्या गटा चं स्टिरिओटायपिंग + टार्गेटिंग होतय अशी बोंब ठोकतो.

+१००

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

स्क्रोलचे लेख विशेष पढतमूर्खांकडून लिहून घेतले जातात.

While often dismissed by the Congress’ critics as empty rhetoric, this somewhat idealistic stance helped India after 1947 avoid the religious bigotry that convulsed Pakistan, given its reliance on Muslim nationalism as a foundational principle.

पाकिस्तान आपने आप नहीं टूटा. (भारत ने चालाकी से तोडा.) ना ही इस टूटने में पाकिस्तानी इस्लामी राष्ट्रवाद का कोई रोल था. (अगर कुछ था ही तो राष्ट्रवादी इस्लाम कि हार थी.). और यदि भारत हिंदू राष्ट्र होता तो वो टूटता ही या उसका पाकिस्तान होता ही ऐसा हाल होता ये कहना गधागिरी है. वैसे भारत ने पाकिस्तान न बनके ऐसे क्या झंडे गाड दिए है? दोनों कि राजनिति और सामजिक स्थिति में कोई अंतर नहीं है.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सिरियसली ? भारताची शास्त्रीय आणि तान्त्रिक प्रगती तुम्हाला पाकिस्तान इतकीच दिसते? मन्गळावर यान पाठविणे , एकाच वेळी १३८ उपग्रह कक्षेत पाठविणे, औषधनिर्मितीत सर्व जगाची 'फार्मसी " बनणे , किंवा इम्पोर्ट-सब्स्टिट्यूटची एक प्रचंड अर्थव्यवस्था उभारणे हे तुम्हाला दिसत नाही ? भारत पाकिस्तानसारखा होणे म्हणजे रस्त्यारस्त्यात सरकारी यद्न्य किंवा तत्सम विनोदी प्रकार होणे!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मन्गळावर यान पाठविणे , एकाच वेळी १३८ उपग्रह कक्षेत पाठविणे

कोण बरं ते म्हणत होतं- पृथ्वी ते चंद्र/सूर्य इतक्या लांबीची काठी द्या फक्त, आत्ताच्या आत्ता उपग्रह सोडतो आकाशात, गणितबिणित सर्व गोष्टी यूसलेस आहेत.

त्यामुळे उपग्रह वगैरे कै खास नै इ.इ.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो ना . म्हणून तर जगातली दोनशेहून अधिक राष्ट्रे ते सहज करतात ! अगदी पाकिस्तान सकट .

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Trump's statement- We condemn Kansas shooting.

He has long way to go compared to our PM. He gave a statement within 3-4 days of incident. The unit of time should be "month".

And his supporters have not even claimed that the dead person was indeed a Muslim.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लिबरलांची भूतावळ मात्र नेहमीप्रमाणे नॅनोसेकंदांत कावकाव करत सुटतात - भारत असो नैतर अमेरिका.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

The unit of time should be "month".

भिकार्‍यांना टाळणे हे एक कौशल्य आहे. भिकारी अ‍ॅक्टिवली भीक मागत असताना शांतपणे दोन मित्रांनी आपल्या गप्पा चालू ठेवल्यात असं होत नाही. लिबरल मंजे "आमच्या मुद्द्याकडे लक्ष द्या, अगोदर द्या, लवकर द्या, जास्त द्या, इतरांचं सोडून आमचं बघा" असं केकाटणारे भिकारी आहेत. त्यांना इग्नोर करायची सवय हे अवघड कौशल्य आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत

तुम्ही हे मनापासून बोलताय अजो? लिबरल म्हणजे नक्की कोण डोळ्यापुढे आहे तुमच्या?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिबरल हा शब्द (राजकारण सारखा) निगेटिव आणि हायजॅक झालेला आहे. चांगल्या अर्थाने लिबरल लोकांचा कसा विरोध करता येईल?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा मंग चालु दे! Smile

सहज एक सजेशनः सध्या 'तशा लोकांना' फुरोगामी हा शब्द वापरतात.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुद्द्याशी सहमती-असहमती बाजूला ठेवली तर अजोंचं भाषिक स्किल वाखाणण्याजोगं आहे. वरील उपमा काय डेडली आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अ‍ॅज़ डेडली अ‍ॅज़ दॅट गाय हेडली.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"केकाटणारे भिकारी' या प्रकारच्या अविवेकी आणि बाष्कळ शिव्या देणे हे भाषाकौशल्य ? मला वाटते हे भाषाकौशल्याच्या पूर्ण विरुद्ध आहे . भाषिक इनकॉम्पिटन्स चे लक्षण आहे .

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"केकाटणारे भिकारी' या प्रकारच्या अविवेकी आणि बाष्कळ शिव्या देणे हे भाषाकौशल्य ? मला वाटते हे भाषाकौशल्याच्या पूर्ण विरुद्ध आहे . भाषिक इनकॉम्पिटन्स चे लक्षण आहे .

अमान्य.

भाषाकौशल्यच आहे. एखाद्या phenomenon चे दुर्लक्षित अंग ओळखणे आणि ती नेमक्या शब्दात मांडणे हे कौशल्य.

याला जर तुम्ही भाषाकौशल्य म्हणत असाल तर तुमने अभीतक कुछ भी देखा नही असे खेदाने म्हणावेसे वाटते !

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आज ठाणे स्टेशनवर "कम्युनिस्टांच्या हिंसाचाराविरोधात" सभा वगैरे होती. ठाण्यात/ठाणे जिल्ह्यात/महाराष्ट्र राज्यात अलिकडे कुठे कम्युनिस्टांचा हिंसाचार झाला हे कळू शकले नाही.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्व काही वाचून झालं. गुरमेहेर म्हणते - तिला शांती हवी आहे. आणि त्याकरता भारत व पाकिस्तानच्या नेत्यांनी योग्य नेतृत्व केले पाहीजे.युद्धाने प्रश्न सुटणार नाहीत.
.
ज्या देशाने वेगळी चूल मांडली आहे, धर्माच्या आधारावरती एका देशाचा लचका तोडूनच स्वतःचे अस्तित्व जोपासलेले आहे. त्या देशाला शांतीची भाषा खरच कळेल का? त्या देशाची व आपली प्रकृतीच भिन्न आहे.
.
मला गुरमेहेर चक्रमच वाटते. चांगल्या अर्थाने म्हणजे जिनीअस चक्रम नव्हे तर अव्यवहारी चक्रम.

अव्यवहारी चक्रम.

षुचि, तू तिला उगाचच बेनिफीट ऑफ डाउट देतीयेस. ती अतिशय व्यवहारी आहे. पुढे कुठल्या निवडणुकीत उमेदवार म्हणुन दिसेल.

हाहाहा दूरदर्शी असेलही.

संपूर्णतः सहमत

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

वरातिक्मागून आमचं हे थोडं
===

गुरमेहेरला जे काही बोलली आहे त्यामागे ठोस राजकीय भुमिका आहे हे स्वयंस्पष्ट आहे. तिचे बोलणं हे केवळ वैयक्तिक मत आहे वगैरे सत्य असेलही पण त्याला देण्यात आलेली प्रसिद्धी आणि त्याचा होत असलेला वापर बघुन हे प्रकर ण वैयक्तिक अभिव्यक्तीच्या पुढे गेलं आहे हे मान्य करायलाच हवे.

त्याला विरोध हा होणारच. अनेक लोकांच्या मते ती जे बोलली/लिहिलं (तिझ्या वडलांना पाकिस्तानने नव्हे युद्धाने मारले) हे हास्यास्पद ते संतापजनक ते देशद्रोही आहे. ते तसे आहे किंवा नाही हे ठरवायला मी पात्र मानी मात्र अगदी तसं असलं तरी तिला विरोध करायला विनोदापासून ते कोर्टात तक्रार करण्यापर्यंत अनेक मार्ग उपलब्ध आहेत (व देशभरातून ते वापरले जात आहेत) त्याला अजिबात हरकत नाही. मात्र तिला विरोध करताना तिला बलात्काराच्या धमक्या देण्याचा मात्र करकचून निषेध केला पाहिजे.

दुसरे, तिच्या बाजुने बोलणार्‍यां प्रसिद्ध व्यक्तीं पैकी काहिंही (जसे श्री.अख्तर) ग्राहम्च्या पिरॅमिडवर अत्यंत खालच्या स्तरावरून वाद पुढे नेला आहे. तोही दुर्दैवी आहे.

==

माझे मतः
गुरमेहेरचे बोलणे बर्‍यापैकी भावनाचिंब असले तरी तर्काला व वस्तुस्थितीला फारसे धरून नाही - भाबडे आहे. मात्र त्याच्या बाजुने हिरीरीने बोलण्यासारखे किंवा सरसावून ठो ठो निषेध करण्याइतके घनघोर मला त्यात काहीच दिसत नाही. पॉलो कोएलो पासून आमच्या मोदी-दवण्यांपर्यंत अनेकजण अशी महिरपी, भारदस्त दिसणारी पण तर्काच्या कसोटीवर फोपशी ठरणारे वाक्य वापरत असतात. लहान आहेत म्हणून सोडून द्यायचं झालं Tongue

मात्र अशा बोलण्यालाही कोणी बलात्काराच्या धमक्या देऊ लागलं तर मात्र त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मूळ वाद गुरमेहर बरोबर की चूक हा नाहीच. तिच्यामुळे मूळ वाद मागे पडलाय. विद्यापिठात मुक्त वातावरणात चर्चा व्हायला हव्यात की नकोत हा आहे (जो जूनाच, गेल्या वर्षीचा आहे).

तीन वृत्तपत्रांच्या अग्रलेखाने मांडलेली ही मतं.
देशभक्तीचे ठेकेदार (मटा)

"विरोधकांची विचारसरणी पटत नसली, तरी त्यांना विचार मांडण्याचा अधिकार आहे हे मान्य केले पाहिजे. अभाविपची ती तयारी नसल्याने सध्याचा वाद चिघळत आहे."

Standing Up (इंडियन एक्सप्रेस)

"The idea of the university as a place for discussion and debate must be protected by all those who have a stake in its growth."

Whither free speech?
Govt’s silence on campus violence is baffling (बिझनेस स्टॅ)

"The point about reason, or rather the absence of it, is underlined by the fact that Umar Khalid, the student of Jawaharlal Nehru University whose presence in Ramjas College was the trigger for the violence perpetrated by the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP), was not going to speak on anything that would have compromised India’s integrity. He was slated to speak on the tribals of Bastar. There is nothing “anti-national’’ in speaking about them. This makes it obvious that the violence was a premeditated attack. What is appalling is that instead of showing regret, ABVP members are proud of what they did and have threatened to continue to use violence against those they perceive to be “anti-national’’. It is manifest that they have no respect for the freedom of speech and the rule of law. They believe that muscle power and bullying lay down the writ in democratic India....."

"It is not for the first time that the Prime Minister and the entire leadership of the Bharatiya Janata Party have been eloquently silent on the violence in Ramjas College and its sordid aftermath, including the shameful hounding of Gurmehar Kaur.... As the ruling party, the Bharatiya Janata Party has to make sure that the shadow of violence does not loom large over Indian democracy."

युद्ध नको शांतता हवी वगैरे सगळं मान्यच आहे.
पण पाकिस्तानने नाही युद्धाने मारले वगैरे शाब्दिक खेळ करुन नक्की साध्य होणार आहे.
दोन्ही देशांच्या सरकारांनी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले नाहीत हे फार जनरल विधान आहे.
नक्की काय केलं पाहिजे.. म्हणजे काश्मीर पाकिस्तानात असाव/ काश्मीर भारतात असावं/ कश्मीरचं विभाजन करावं ????????
ठोस काही उपाययोजना सुचवल्या नसतील तर शांततेचे गुणगानसुद्धा धुरळा उडवण्यापलिकडे काहीच करु शकणार नाही..

तुम्ही ज्याला शाब्दिक खेळ म्हणता, त्यामागे काही तर्क असू शकतो; तो मांडून झाल्यावरही त्याला शाब्दिक खेळ ते देशद्रोह इथपर्यंत लेबलं लावणं यासारखी दुःखद गोष्ट नाही. तिच्या तर्कातल्या, विचार-मतांमधल्या चुका खोडून काढण्याजागी लेबलं लावणं, ही पळवाट आहे. वीरेंद्र सेहवागनं जे केलं तेच चर्चेच्या नावाखाली करणं ...!

जावेद अख्तरांनीही चर्चा न-मुद्द्यांवर राहील याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो मांडून झाल्यावरही त्याला शाब्दिक खेळ ते देशद्रोह इथपर्यंत लेबलं लावणं यासारखी दुःखद गोष्ट नाही.

तिने तिच्या पिताश्रींच्या मृत्युसाठी अंशतः अंशतः अंशतः भारतास जबाबदार धरलेले आहे. युद्धास जबाबदार धरणे म्हंजे युद्धातील पार्टीज ना जबाबदार धरणे आहे. व युद्धात ३ पार्टीज होत्या. पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी/घुसबैठिये, भारत. म्हंजे भारत किमान ३३% जबाबदार ठरतो. भारतीय थलसेना ही मर्सेनरी सेना नाही. भारतीय नागरिक स्वेच्छेने भारतीय थलसेतेत भर्ती होतो. भर्ती झाल्यावर सुद्धा बहुतेक निर्णयांमागे नियमावली असते. कारगिल युद्धात भारताने जे केलं ते बहुतांश नियमबाह्य नव्हतं. आणि म्हणून तिचे ते विशिष्ठ वक्तव्य - ज्यात तिने आपल्या पित्याच्या हत्येसाठी युद्धास जबाबदार धरलेले आहे ते - वक्तव्य देशद्रोही आहे.

@३_१४ विक्षिप्त अदिती, माझा तुम्हास थेट प्रश्न -

(१) तुम्ही याच्याशी सहमत आहात
(२) तुम्ही याच्याशी सहमत नाही आहात

--

वरील २ पैकी कोणतेही एक उत्तर तुमचे नसेल तर उत्तर न देता माझ्या या प्रतिसादाची उपेक्षा करावी अशी शिफारस करतो.

फक्त तिसरेच काही उत्तर दिले नाहीत तर बरं होईल. अर्थातच तुम्हास हवं असेल तर तिसरेच काय तर चौथे पण उत्तर देऊ शकता ... अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य तुम्हास आहेच.

तुम्ही ज्याला शाब्दिक खेळ म्हणता, त्यामागे काही तर्क असू शकतो; तो मांडून झाल्यावरही त्याला शाब्दिक खेळ ते देशद्रोह इथपर्यंत लेबलं लावणं यासारखी दुःखद गोष्ट नाही. तिच्या तर्कातल्या, विचार-मतांमधल्या चुका खोडून काढण्याजागी लेबलं लावणं, ही पळवाट आहे.

+१.
त्या मुलीच्या लॉजिक मधे फॉल्ट आहे, पण तिच्यात एक देवभोळी सद्भावना आहे असं म्हणून प्रतिवाद करावा.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होय ती मुलगी (गुरमेहेर) आदर्शवादी आहे पण तिचा आदर्शवाद मला प्रॉपगाआंडा/कॅल्क्युलेटेड मुव्ह्/चक्रमपणा वाटतो. याउलट तिच्यावर विश्वास ठेऊन पोटतिडीकेने तिला डिफेन्ड करणारा अदितीचा आदर्शवाद मला हवेच्या प्रसन्न झुळुकीसारखा वाटतो.
.
जेव्हा गब्बर म्हणतात ती वरुन काटेरी पण आतून मेलो (इंग्रजी) आहे तेव्हा त्यांनाही मला जे म्हणायचे आहे तेच वाटत असावे.