जगाचा इतिहास (गेली दोन तीन हजार वर्षे …)

त्याच्या कुशीत विसावताना ती जेव्हा म्हणते
"मी तुला लवकरच डायव्होर्स देणार आहे "
आणि तो म्हणतो "लवकर!" , दोघांच्याही मनात
नक्की काय आहे हे कोणालाच कळत नसतं.
पण आकाशात तारे लुकलुकत असतात आणि
विरूद्ध-लिंगी शरीराच्या उबेत दोघेही मग्न , हताश असतात.

हर हर में हर बसे
और हर को हर की आस
हर को हर हर ढून्ढ फिरी और
हर है मेरे पास!

ख्रिस्ताच्या जन्माच्या काहीच शतके आधीच्या
रोमन शिल्पातील व्यक्तिरेखा चेहर्यावर
एक विचित्र दैन्य दाखवितात.
जगाचे दैन्य संपविण्यासाठी लवकरच
देवाचा जन्म होणार आहे पण बहुधा
हे आपल्या आयुष्यात घडणार नाही
असे त्यांना वाटत असावे.

अब्दुल्ला के घरसे जहां पे
नूर बिखरनेवाला हैं
दाई हालिमा गोद में तेरी
चांद उतरने वाला हैं.

प्रेषित मोहम्मद येतो ( सल्ललाहू अलेवसल्लम !)
एका विलक्षण प्रत्ययकारी एकेश्वर वादाचा लखलखीत रूपेरी खिळा
प्रत्येकाच्या कपाळात ठोकला जातो. हिंसा.
हिंसा. घोडे व रोखलेल्या तलवारी .
म्हातार्या स्त्रियांची हत्या व
सर्वत्र रक्तपात.

स्वच्छ पांढरे कपडे आणि दाढी असणारा मुसलमान म्हातारा
आपल्या मुलांच्या कबरीवर नमाज पढतच रहातो
पढतच रहातो.

दोघांच्याही मनात
नक्की काय आहे हे कोणालाच कळत नसतं.
पण आकाशात तारे लुकलुकत असतात आणि
विरूद्ध-लिंगी शरीराच्या उबेत दोघेही मग्न , हताश असतात.

===

field_vote: 
0
No votes yet