मदत: एलिअन
कधी सुरूवात समजली होता शेवट म्हणजे असं बघा कशाला करेल कुणी उगाच अळंटळं सांगतो मला म्हणायचंय ते गुमान.
तरी अर्धवट असलेली म्हणून काय झालं कुणी असू नये का तसा अपूर्ण गोष्ट सरळ तरी बघा जमतं का एवढंच.
------------------------------------
"तुला नक्की काय म्हणायचंय?" बशीतला काजू तोंडात टाकण्यापूर्वी प्रोफेसर केंकर्यांनी प्रश्न केला.
काजू तोंडात टाकून ते समोर बसलेल्या अशोककडे बघत राहिले. इतका बुद्धिमान विद्यार्थी- पण त्याचं हे असं व्हावं? का?
"सर, माझी अशी थेरी आहे की-"
"थिअरी. तुझी थिअरी आहे-"
"हो. सॉरी. माझी अशी थिअरी आहे की-" अशोकने आपली जीभ कोरड्या ओठांवरून फिरवली. ते ओठ ओले करण्याची संधी तो पुढे काय बोलतो त्यावर अवलंबून होती. आणि कशाने ओले होतील हे त्याच्या पुढल्या विधानावर अवलंबून होतं.
"माझ्या मते मी एका महत्त्वाच्या गोष्टीचा पर्दाफाश केलाय."
"पर्दाफाश?" केंकर्यांनी आपल्या उजव्या नाकपुडीतून एक दीर्घ उच्छ्वास टाकला. काय ही मराठीची अधोगती? छॅ! किते म्हणू सांगू तुमका.. अर्ध्या तासापूर्वीची टकिला अजूनही मेंदूच्या आतून फिरत होती.
"सर, मराठीची शुद्धाशुद्धता जाऊ दे. मुद्दा असा आहे की -"
"शुद्धाशुद्धता. वाह! चांगला शब्द वापरला ह्याने." डाव्या नाकपुडीतून जोरदार उच्छ्वास टाकताना प्रो. केंकरे अकस्मात हुळहुळले. त्यांच्या नाकातून बाहेर डोकावणारा केस बहुधा डोलला असावा.
"मी एका मोठ्या शोधाच्या उंबरठ्यावर आहे. आणि मला यापुढे तुमची मदत लागेल सर." अशोकने तोलूनमापून चांगल्या मराठी शब्दांची निवड करत आपलं वाक्य पूर्ण केलं. निदान वाईन तरी मिळायला हरकत नाही आता.
"ह्म्म.. कसली मदत हवीये तुला? आणि कसला शोध?" केंकर्यांनी दोन्ही नाकपुड्यांतून जोरदार उच्छ्वास टाकात पृच्छा केली. आता टकीलाचा सहवास संपत आला होता. नवी सोबतीण...
"सांगतो सर. म्हणजे कसं आहे की मला पंधरा मिनिटं लागतील सांगायला, तुम्हाला वेळ तर आहे ना?" अशोकने चाहूल घेतली. अजूनही ऑफर येत नाही.
"बोल तू. मी आहे मोकळाच." खुर्चीचा आधार घेऊन उठता उठता प्रो. केंकर्यांनी अशोककडे नजर टाकली. काय द्यावं ह्याला? एक चांगला शब्द वापरला खरा पण पर्दाफाश? हे काय मराठी झालं? अॅ!, किते रे तू?
"सर माझ्याकडे एलिअन्सबद्दल पुराव्याने सिद्ध करता येईल अशी माहिती आहे." एका श्वासात अशोकने आपला हुकूमी पत्ता प्रोफेसरांकडे फेकला.
त्यांचा वाईनकडे चाललेला हाता आता व्हिस्कीच्या बाटलीकडे गेल्याचं त्याच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं.
"सविस्तर सांग." टेबलावर बाटली ठेवून प्रोफेसर खुर्चीवर रेलले. "हेल्प युअरसेल्फ. नो फॉर्मॅलिटीज्."
अशोक आता सैलावला. केंकर्यांनी व्हिस्कीयोग्य समजावी अशी बातमी आपण आणू शकलो ह्याचा आत्मविश्वास त्याच्या मिशीतून अस्फुट हसला. ते दृश्य पाहून भिंतीवरची पाल स्वर्गवासी केंकरे सिनिअर ह्यांच्या फोटोमागे लपली.
-*-
घड्याळाच्या नि:शब्द टकटकीत पाच-सहा मिनिटं अशीच गेली आणि बोलणार्या दोन्ही पात्रांची गात्रं दारूच्या धुंदीत आणखीच सैलावली.
अशोकने आपल्या मोज्यांच्या वासाचं टेन्शन घ्यायचं सोडून दिलं आणि तो ऐसपैस बसला.
"सर, आपल्या लॅबमधे काम करणारा धोत्रे आहे ना- तो एलिअन आहे."
"रमेश?" केंकर्यांनी आपला चष्मा नाकावर तसाच घसरू दिला.
"असेल."
"अशे? रमेश सीताराम धोत्रे. गेली १४ वर्षं लॅबमधे काम करणार्या माणसाचं नावही तुला ठाऊक नाही? आणि त्याशिवायच त्याला तू एलिअन म्हणतोस? "
"सर, तेंडुलकरने प्रत्येक इनिंगमधे किती रन्स केलेत ते ठाऊक असलं तर त्याचं नाव माहिती नसलं तरी चालतं हो". दारू पिऊन वायवाला गेलो तर नक्कीच १० मार्कं जास्त मिळतील असा सूक्ष्म तरीही मौलिक विचार अशोकच्या डोक्यात दूरवर कुठेतरी उमटून गेला. त्याने मोठ्या दिलदारपणे त्या विचाराला जाऊ दिलं.
"......" केंकर्यांना नक्की विषय काय आहे ते न आठवल्याने ते तसेच अशोककडे बघत बसून राहिले.
"नाही, ते जाऊ दे. धोत्रे एलिअन आहे यात काही वादच नाही सर."
"असं कशावरून म्हणतोस तू??" केंकर्यांना आता क्षणिक विलंबही सहन होत नव्हता. ते रहस्यस्फोटाकडे वळले.
अर्हर्हर्हर्हर्ह.. एक सपशेल ढेकर देऊन अशोक म्हणाला -
----------------------------------
लोकानला काय वाटतं ते विचारू शकतो कदाचित माहिती असेल तर सांगा म्हणजे मग धोत्रे एलिअन का आहे ते सगळ्यांना कळू शकेल.
हा लेख इतका फॉरवर्ड करा की शेवटी सगळ्यानला समजेल की धोत्रे एलिअन का आहे.
please do the needful.
thanking you in anticipation,
अस्वल.
प्रतिक्रिया
फॉर्वर्ड करणेत आलेला आहे. आता
फॉर्वर्ड करणेत आलेला आहे. आता सांगा धो ए का आ?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
कारण...
...हे लिहीत असताना अस्वलाला व्हिस्की जास्त झालेली होती, म्हणून. (त्याअगोदर टकीलाचाही संग होऊन गेलेला होता, परंतु ती बात अलाहिदा. तात्कालिक कारण व्हि.जा.झा.हो. हेच होते. असो.)
१. तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला एवढी शिंपल गोष्ट इ.इ. - पु.ल.
२. धो.ए.का.आ.चे रहस्य ते काय, आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा प्रकार फॉर्वर्ड केलात? केवढे ते डेस्परेशन! शोभते काय हे तुम्हाला, आबा? अाँ?
डेस्परेसनचं कारण असं की धो ए
डेस्परेसनचं कारण असं की धो ए का आ असा प्रश्न आहे. धो ए आ का असा नाहीये. ए लोकांमध्येही धो वगैरेसारखी आडनावं असू शकतात म्हणजे मला पोलादी आशा आहेत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ए लोकांमध्येही धो वगैरेसारखी
एलियास असू शकेल. (एवढी शिंपल गोष्ट...)
तो कुलभूषण जाधव जिकडेतिकडे भारतीय पासपोर्ट घेऊन हिंडतो म्हणून काय प्रत्येकच एलियन आपल्या एलियनत्वाच्या उघड खुणा बाळगत सगळीकडे फिरेल असे वाटले काय?
अस्वलराव
पाहिजे तर हवा तेवढा मध देतो पण जरा उलगडून सांगा.
काही कळलच नाही.
काही कळलच नाही.
मला सुद्धा.
मला सुद्धा.
यामागची बूडभूमी न कळाल्याने
यामागची बूडभूमी न कळाल्याने काही रिमार्क देववत नाहीये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धोत्रे एच वन बी वर आहे म्हणुन
धोत्रे एच वन बी वर आहे म्हणुन तो non resident alien अर्थात एलिअन आहे.
त्रुटी
१. धोत्रे एच१बीवर असल्यास, तो रेसिडेंट एलियन आहे की नॉन रेसिडेंट एलियन, हे कोणाच्या दृष्टिकोनातून पाहता, त्यावर अवलंबून आहे. इमिग्रेशनवाल्यांच्या दृष्टिकोनातून तो नि:संशय नॉ.रे.ए. आहे. उलटपक्षी, आयआरएसच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास तो नॉ.रे. आहे की रे., हे सबस्टॅनशियल प्रेझेन्स टेस्टच्या निर्णयनावरून ठरावे. (बहुतांश केसिसमध्ये तो रे.च ठरावा.)
२. तसेही तो रे. आहे की नॉ.रे. (की अनडॉक्युमेंटेड) ही बाब गौण आहे. तो एलियन असण्याकरिता तो एच१बी, एच४, बी१/बी२, जे१, एफ१, ग्रीनकार्डहोल्डर, रेफ्युजी किंवा अनडॉक्युमेंटेड यांपैकी काहीही (किंवा अन्यही काही) असू शकतो. फक्त यूएस सिटिझन नसल्याशी आणि यूएसमध्ये असल्याशी मतलब.
३. ट्रंपोत्तर जमान्यात तर एलियनत्वाच्या अटी अधिकच शिथिल झालेल्या आहेत. आता तर सिटिझन नसण्याचीसुद्धा अट नाही. फक्त गौरेतर (त्यातही शक्य तोवर ब्राउन) वर्ण असणे पुरेसे आहे. ('गो बॅक टू व्हेअर यू केम फ्रॉम, यू @*&$#%! ढिशक्यांव!') मुसलमान असल्यास - किंवा 'मुसलमानासारखे दिसत असल्यास' (बोले तो सरदारजी वगैरे) सोन्याहूनही पिवळे.१
४. तसेही ही ष्टोरी अमेरिकेत घडत असल्याचा उल्लेख कोठेही नाही. त्यामुळे हे सर्व डिस्कशन फोल असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
..........
१ तसेही ट्रंप येऊन फार दिवस झालेले नाहीत, तेव्हा अशा क्वचित कोठेतरी तुरळक घडणाऱ्या प्रसंगांना डावी ट्रंपविरोधीअजेंडाप्रेरित दुष्ट मीडिया आपल्या नित्याच्या सवयीने अवाच्यासवा प्रसिद्धी देऊन उगाच मोठे करीत असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. शिवाय, पिडांकाका बहुधा सुखरूप असावेत१अ, १ब. सबब, ही लेफ्टविंग मीडियाने ट्रंप, रिपब्लिकन, व्हाइट सुप्रेमशिष्ट आणि अन्य संकीर्ण मंडळींना नाहक बदनाम करण्याच्या एकमेव उद्दिष्टार्थ पसरविलेली निखालस लोणकढी खोटी अफवा असण्याचीच शक्यता जास्त; नव्हे, खात्रीच!
१अ पिडांकाका दिसले नाहीत बऱ्याच दिवसांत. पण 'नो न्यूज़ ईज़ गूड न्यूज़' तत्त्वास अनुसरून सुखरूपच असावेत बहुतेक.
१ब यामागे पिडांचे -किंवा अन्य कोणाचेही - कोणत्याही प्रकारे वाईट चिंतण्याचा कोणताही उद्देश नाही, हे आधीच स्पष्ट करतो.
आहेत, पिडांकाका आहेत! :)
सुखरूप आहेत. सध्या मरणाचे काम असल्याने इथे यायला फुरसत मिळत नाहिये, इतकंच.
ऑफ कोर्स! नो हार्म टेकन!!
आमची आठवण आहे हे काय थोडं आहे?
अनेक धन्यवाद.
हा हा हा ...
हा हा हा ...
अस्वलाच्या डोक्यातून काय निघेल सांगता येत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फारवड केल्याने पुण्य वगैरे
फारवड केल्याने पुण्य वगैरे लागत असेल तर { करणाय्राला} तर त्यात गम्य नाही.
हाहा! मस्त आहे.
हाहा! मस्त आहे.
ह्म्म्म्म
धण्यवाद.
आबा आणि नबा- (आप्पा आणि बाप्पा सारखं वाटतंय. डॉक्टरच्या तपासणीचा फार्स)
धोत्रे एलिअन का आहे हे मला खरंच माहिती नाही. मी विचार करण्याचा प्रयत्न केला पण मला तो एलिअन आहे एवढंच माहिती आहे, का ते कळलं नाही.. आणि बाकी काय सुचलं नाही म्हणून असंच इकडे लिवून टाकलं. anticlimax. [सॅड स्मायली]
------------------------------
तिरशिंगराव - उलगडण्यासारखं काही नाहीये.. ठिगळेंच्या भाषेत सांगायचं तर मी सॉरी आहे साहेब. एस डबल ओ आर ई.
--------------
शुचिमामी आणि अनुराव- +१. मलाही ह्याचा अर्थ नक्की कळला नाही. पण म्हणून मी लिहायचं थांबवणार नाहीये. सत्य जगापुढे आलंच पाहिजे.
-------------
असो.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
सुरुवातीला एलियन वगैरे वाचून
सुरुवातीला एलियन वगैरे वाचून सायफाय टाईप काहितरी असेल असं वाटलेलं. हे अमेरिकेशी निगडीत वायलच काहितरी दिसतय.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नाय हो
एलिअन बोले तो परग्रहवासी वाला एलिअनच डोक्यात होता. पण काय झेपलं नाय पुढे आपल्याला म्हणून रसिक वाचकांच्या इ. इ.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
=))
अश्लील अश्लील! म्हणे धोत्रात एलियन आहे!
धोत्रेच एलियन आहे असं लिवलंय वाटतं का? तसं नैय्ये, पहिली वाक्य वाचा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बिघडला लका ऋष्या तू
बिघडला लका ऋष्या तू
णिषेध! आधी सुधारीत आवृत्ती
णिषेध! आधी सुधारीत आवृत्ती अस्तित्त्वात असल्याचे आरोप बंद करा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
निषेध निषेध. मी पण निषेध
निषेध निषेध. मी पण निषेध करतो.
सुधारणा वगैरे कै नसते अॅक्चुअली.
निरागस पणा कडून डॅम्बिसपणाकडे वाटचाल असते फक्त.