निबंध : माझा नवरा

मी एका पाच हजार मित्र असणार्‍या फेसबुकवरच्या प्रसिद्ध लेखकाची बायको आहेय. त्याला पाच हजार फ्रेंड असले तरी लाईक्स मात्र सहाशे सातशेच्या वरती जात नाहीत. तरीही तो काहीही लिहो पाचशे जण त्याचे म्हणणे मान्य करतात म्हणजे माझ्या नवर्‍यामध्ये नक्कीच नेता होण्याचे काहीतरी गुण असतील. पुर्वीच्या काळी नेत्यांचे लाखो समर्थक असायचे, आताशा हे पाच हजार पेक्षा नेहमीच कमी असतात त्यामुळे त्यांना #मायक्रोनेता असे म्हणता येईल. एखादा माणुस किती मोठा तर ज्याला जेवढेच लाईक आणि तेवढेच फ्रेंड्स आहेत त्याला खरा नेता म्हणता येईल. माझा नवरा नेता बणण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यासाठी तो पुस्तकातले निरनिराळे उतारे त्याच्या वॉलवर टाकीत असतो. प्रसंगी तो त्यासाठी पुस्तके पण फाडतो. हे त्याचे पुस्तके फाडणे मला आवडत नाही कारण त्याने स्वतःनेपण एक पुस्तक लिहलेले आहे आणि त्याच्या फाडलेल्या पानांचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवरुन इकडुन तिकडे फिरत असतात. आपले पुस्तक कुणी पुर्ण न वाचता त्यातले फक्त तुकड्यांचेच फोटो टाकुन पाठवले तर त्यातुन कुणी नेता होउ शकतो का? तर खुप काही लिहणारे पण ज्यांचे पुर्ण कोणी कधी वाचीत नाही असे अनेक लेखक महाराष्ट्रात होउन गेले. त्यांची फक्त अवतरणेच सांगायची पद्धत हा देशाचा खोडलेला इतिहासच आहे आणि आता माझा नवराही खोडलेला इतिहास बनतो आहे.

मी सुंदर दिसते. किती सुंदर? तर माझा नवरा मानवी दु:खाबद्दल उथळ लोकांचा जीव पिळवणार्‍या कथा लिहतो तेंव्हा त्याच्या कथेला जितके लाईक्स येतात तितके माझ्या जीन्स घातलेल्या फोटोला येतात. माझ्या नवर्‍याचे कर्तुत्व आणि माझे सौंदर्य मोजण्याचे हे एक गणीत माझ्याकडे आहे. ह्यापेक्षा आणखी दुसरी काही गणिते पण आहेत. माझ्या नवर्‍याला सेक्स पुर्ण करायला बरोबर साडेतीन मिनीटेच भेटतात. इतका तो कामात बिजी असतो. तो घरी आला की मी त्याला म्हणते 'आज सेक्स करायचा का?' आणि तो म्हणतो 'आज नको आज खुप इमेल्स आणि इतर कामे आहेत. जेवण झाल्यावर फक्त तीन चार मिनीटे आहेत'. तर तेवढे तीन चार मिनीटच काय माझ्या वाट्याला चांगले येतात. इतर वेळेस तो पुर्णतः फोनमध्ये पहात बसलेला असतो, क्वचीत लिहतांना दिसतो. लिहतांना म्हणजे टाईप करतांना. तो फोनमध्ये पहात असतांना त्याच्या चेहर्‍यावरचे भाव साधारण प्रत्येक दोन मिनीटाला बदलत असतात. हे उतारचढाव पहायला मजा येते. माझा नवरा एका दुसर्‍या लेखकाच्या वॉलवर फेक अकाउंटने जातो. ते अकाउंट मुलीच्या नावाने असुन त्यावर कतरीना कैफ चा फोटॉ लावलेला आहेय आणि तु खिच मेरी फोटो ह्या गाण्यावर नाच करणार्‍या मुलींचा एक व्हिडीओ वॉलवर आहेय. त्या मुली सातारच्या असाव्यात कारण त्यातल्या एकीने रिबीन्स लावलेल्या आहेत. त्या दुसर्‍या लेखाला पन्नास साठ लायका येतात कधीकधी लायका येतही नाहीत. कधीकधी तो लेखक आपल्या हस्तलिखीतातले काहीतरी वॉलवर टाकीत असतो जे कुणाला समजत नाही. म्हणजे म्हणने समजते पण अक्षर समजत नाही. त्याला कुणीतरी हस्ताक्षर वाईट आहे असे कमेटमध्ये म्हणाले तर त्याने त्या लोकांना खुप दिर्घ उत्तर देउन त्यांचा अपमान केला. त्याने माझ्या नवर्‍याचाही असाच अपमान केला होता. माझा नवरा तेंव्हा पुर्ण आठवडा अस्वस्थ होता. शेवटी त्याचा त्रास वाढु लागला आणि आमच्या फॅमिली फ्रेंड्सने त्याला त्या लेखकाला ब्लॉक करायचा सल्ला दिला. आमचे फॅमिली फ्रेंड्स हे त्या कमी लाइक्सवाल्या लेखकाचेही फ्रेंड्स आहेत. मी त्यांना म्हणाले तुम्ही आमच्यसारख्या मोठ्या माणसांमध्ये न वावरता त्या कमी लाईक्सवाल्यांशी कशाला बोलत असतात? तर ते म्हणे तुम्ही जसे आमचे मित्र तसेच तेही आमचेच मित्र. एक दुसरे फॅमिली फ्रेंडस आहेत ते मात्र त्या दुसर्‍या कमी लाईक्स येणार्‍या लेखाकाला माझ्या नवर्‍याइतक्याच शिव्या देतात. ह्या वाक्याचे दोन तीन अर्थ होउ शकतात आणि त्यामुळे अनर्थही होउ शकतो म्हणुन आता मी माझ्या नवर्‍यासंबधी फार काही बोलु शकत नाही. तुम्ही दहापैकी निदान चार मार्क तरी द्या.

माझा नवरा एक चांगला मायक्रोनेता आहेय. आणीक त्याचा काळा गॉगल घालुन लावलेला प्रोफाईल पिक मला प्रचंड आवडतो. माझे माझ्या नवर्‍यावर आणि त्याच्या फेसबुकवॉलवर प्रेम आहेय.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

इतका सेक्सी अनिर्बंध निबंध आंजा वर कधीच वाचला नाही बरोबर चार मिनिटात एका स्ट्रोक मध्ये वाचून काढला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
निबंध जोमात‌, मायक्रोनवरा कोमात‌.

@मारवा - आणि आपली सही सही आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा ... सविस्तर प्रक्रिया देणार होते, पण सध्या ३-४ मिनीटंच आहेत; त्यापैकी बहुतेकसा वेळ वाचनातच गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे निबंध माध्यम निवडल्याबद्दल अभिनंदन. शब्दसंख्या,विचार आणि निबंधाचा विषय लक्षात ठेवून मार्कांची माफक अपेक्षा ठेवता! माइक्रोलेवलचा काळ योग्य प्रकारे व्यक्त केलात. चिपळूणकर,आगरककरांचे समाजसुधारक निबंध इतिहासजमा आहेत. आताचा जमाना आली लहर केला कहर चार मिनिटांत हे ठसवण्यात यशस्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@राहुल बनसोडे . निबंध आवडला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>माझे माझ्या नवर्‍यावर आणि त्याच्या फेसबुकवॉलवर प्रेम आहेय.<<

आणि माझे बनसोडेंवर!

एक आक्षेप मात्र नोंदवतो -

>>माझ्या नवर्‍याला सेक्स पुर्ण करायला बरोबर साडेतीन मिनीटेच भेटतात. इतका तो कामात बिजी असतो.<<

म्हणजे, जास्त वेळ भेटला, तर नवरा जास्त वेळ सेक्स करू शकेल अशी शक्यता ह्यातून निर्माण होते. अशी शक्यता शिल्लक सोडण्याबद्दल बनसोडेंचा निषेध! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>> आणि माझे बनसोडेंवर!<<<
माझे पण !!!
>>>सेक्स पुर्ण करायला बरोबर साडेतीन मिनीटेच भेटतात. इतका तो कामात बिजी असतो.<<<
हे वाक्य लोडेड च आहे . यात किमान १, २ ,३ शक्यता निर्माण होतात . तरी 'कामात 'या शब्दावर फालतू सांस्कृतिक कोटी केलेली नाही हेही उत्तम ( सांस्कृतिक यातही दोन शक्यता . तर असो .)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायक्रो माझा नवरा आहे।
सारे मायक्रोज माझे बांधव आहेत।
माझ्या मायक्रोवर माझे प्रेम आहे।
माझ्या मायक्रोच्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या फेसबुकचा मला अभिमान आहे।
त्या फेसबुकची बटीक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या फेसबुक लावणार्‍या, लाळ गाळणार्‍या
आणि इन्बॉक्सात येणार्‍या फेसबुकफॅन्स्चा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी फ्लर्टयुक्त वागेन।
माझा मायक्रोनवरा आणि माझे मायक्रोफॅन्स
यांच्याशी गेम्स खेळत राहाण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे लाईक्स आणि
त्यांचं हपापलेपण ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

निबंधाचा हा प्र‌कार‌ प्र‌च‌लित केल्याब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0