प्लॅस्टिक प्रलय

माणसांच्या जंगलात ईव्ह आणि ऍडम
ऍडमने प्लॅस्टिकचा सफरचंद खाऊन
इव्ह सिलिकोनि स्तन कुस्करले
सर्व जग नव्याने निर्माण झालं
आणि त्यानंतर प्रलय झालाच नाही
प्लॅस्टिकचा क्रॉस वरती लटकावलेला येशू
प्लॅस्टिकचा धर्म
निरंतर कुजणारे
मासांचे लगदे
थडग्यामध्ये पुरलेले
स्मशानात जळालेले
पंचतत्त्व वैगेरे
मरणाच्या अनुकिरणोत्सर्जनी खुणा
खोलवर गर्भात
जेनेटिकली मॉडिफाइड बाळं
तापलेला सूर्य
सोडबोटलच्या गोटीचा फस्कन आवाज
शाश्वत चुतियागिरी
कृत्रिम श्वास
ऑक्सिजन मास्क
संभोगानंतरचे बरबटलेले कॉन्डोम
ऍडमच्या औलादी कंडोममधून
कचऱ्यात त्यांचे अंश
कोटी कोटी डीएनए
कुत्री शोधतात अन्न
त्याच कचऱ्यात
पोटात प्लास्टिकचे गोळे
बोट मोबाईलवर घासून
त्यांचा झालेला लवडा
हिमनग वितळून भसकन
पृथ्वीचा फ्लॅश दाबावा
बुडावं
सूर्याने
माणसाने
देवाने
तेव्हा रक्ताळलेले तोंड घेऊन ताज ताज
हरीण मारलेला सिंह त्याचे लचके तोंडत असेल
सूर्य आणि चांदण्या पुन्हा एकत्र उगवत असतील
आय होप त्या चांदण्या प्लास्टिकच्या नसाव्यात

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)