आप‌ली प्र‌त्येकाची टोळी

कसे कळते की एखादी व्यक्ती आपल्या ट्राइबची आहे? एखादं शिंग फुंकून चेहऱ्यावरती, अंगावरती रंगाचे पट्टे माखूनआपल्या ट्राइबची व्यक्ती "हुला हो....हुला हु" क‌र‌त नाचत येते की पाहिल्यांदा सबकॉन्शस लेव्हलवर एका stirring (soul stirring ) जाणवते कि भूकंप होतो की फासे पडत जातात, karma unfolds in some mysterious ways?

.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतं? आपलं वय वाढत असतं म्हणजे अमूर्त पातळीवरती काय पडसाद उमटतात? Getting comfortable in your own skin याचेच दुसरे नाव वय वाढणे असते का? हां मूर्त पातळीवरती आपल्या शरीरावरती ऋतुबदल दिसून येतात. दुधाचे दात पडून, नवे येतात, कुमारावस्थेतून, पौगंडावस्थेतून आपण तारुण्यात प्रवेशतो, हळूहळू वय वाढते तसेडोळ्यापाशी क्रो फीट दिसू लागतात, शरीर लवकर थकू लागते वगैरे वगैरे. काळ त्याची जकात घेतच असतो. आयुष्यात प्रायॉरिटीज देखील बदलत असतात. पहिला नंबर मिळवायचा असतो त्याची जागा नोकरी मिळवायची , जोडीदार मिळवायचायं, घर घ्यायचे, बेंक बॅलन्स फुगवायचा, नाना प्रायॉरिटीज. पण हे सारे बदल, बदलावं बाह्य जगतात होत असतात, मित्र-मैत्रिणी येत जात असतात. एखादे नाते गहिरे होता असते तर एखादे नाते आयुष्यातून निघून जात असते. पण हे बदल पहाणारा हा जो "मी" आहे त्याच्यात काय बदल घडत असतात? लहानपणी सुद्धा ज्या उत्कटतेने मला सवंगड्यानी मला स्वीकारावे मला सामावून घ्यावे असे वाटतं असते तितक्याच उत्कटतेने आजही तेच वाटते. मी एकटा पडू नये, मला खेळात घ्या, मला सामावून घ्या. लहानपणी ज्या तीव्रतेने मला प्रेमाची आस जाणवे त्याच असोशीने आजही प्रेमाची ओढ जाणवत असते. कदाचित लहानपणी मी आत्मकेंद्री असेन‌ आज नसते? - खरंच असे होते का? का मी त्या स्वभावाविशेषावरती अलगद पांघरूण घालून ते दडवायला शिकते ? असे होते का की प्रत्येक वर्षासरशी आपण आपली खरी ओढ , आस लपवण्यात तरबेज होत जातो? हे अगदी १०० % खरे आहे कि आपण विविध क्षेत्रात श्रीमंत होता असतो. लहानपणी फक्त आई-बाबा, आज्जी -आजोबा हे जग असलेले आपण आता कितीतरी नव्या संबोधनांनी , नात्यांनी समृद्ध होत असतो - आपण आई-बाबा, काका,काकू, मामा, मामी अगदी आज्जी, आजोबा हि नाती भूषवू लागतो पण ..... कुठेतरी आपण तेच १८-२५ च्या मधले असतो. आरशात आपण पहातो टक्कल पडलेले असते, पोट सुटलेले असते, क्वचित (ऑर नॉट सो क्वचित) बेढबहि झालेलो असतो पण आपल्या मनात आपण तेच १८-२५ मधील असतो. नात्यात करकचून बांधलेलो आपण मुखवटे लावून वावरण्यात तरबेज तर होता नाही ना? पत्नी, सून, आई, वडील, नवरा, बॉस, सहकारी असे कितीतरी मुखवटे. सासूबाईपुढे अदबीने वागतो, नवर्याला क्रश सांगू धजत नाही, मुलींपुढे तर अगदी जपून आब राखून वागत असतो. अशा वेळी किती प्रकर्षाने वाटते, असे कोणीतरी हवे ज्या व्यक्तीपुढे काय वाट्टेल ते बोलता यावे, मनातले सांगता यावे, अगदी अग्ली, कुरूप होता यावे, आपली सारी ऑब्सेशन्स, कम्पल्शन्स, पूवर्वजन्माच्या संस्कारांचे रेसिड्यूज उघड करता यावे. असा मित्र अशी मैत्रीण जी आपल्या ट्राइबची असावी. आपल्यासारख्या idiosyncrasies असलेली, आपल्या कुरुपतेला ना हसणारी असावी. बरं अशी इन्व्हेस्टड्सही नको जसा नवरा व अन्य नाती असतात. कारण इन्व्हेस्टेड असल्याने आपल्या दोषाकडे हे लोक सहानुभूतीने पाहू शकत नाहीत. एका कम्फर्टेबल त्रयस्थ दृष्टीचा अभाव त्यांच्यात असतो. ते आपल्या ट्राईबचे नसतात ते आपल्या आयुष्याचा पाया असतात, फाउंडेशन असतात पण आपल्या ट्राईबचे नसतात. ते इंडिफरंट, अगदी त्रयस्थ मित्र मैत्रीण होउ शकत नाहीत. त्यात दोष कोणाचाच नसतो. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. जरा त्या मर्यादा सांभाळून घेतल्या नाहीत तर ते नातंही आपल्याला सांभाळून घेत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा कि असे मनाचे पापुद्रे अन पापुद्रे उतरवून व्यक्त सर्वांपूढे होता येत नाही. असे नाते प्रत्येकाला सापडतेच असे नाही. इन फॅक्ट प्रत्येकाला कदाचित तशा नात्याची गरजही वाटतं नसेल. पण काहींना तशा मैत्राची, काउन्सिलरची,एका श्रोत्यांची , सर्वाहारी, सर्वसमावेशक perennial मैत्रीची आस असते.
परत परत त्याचा प्रश्नापाशी मी अडखळत असे, मला कसे कळेल कि अमुक एक व्यक्ती माझया ट्राइबची आहे? पण जसजसे वाया वाढत गेले मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळत गेले.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होते?- या प्रश्नाचे एक उत्तर हे आहे कि आपली टोळी (ट्राइब) आपल्याला सापडत जाते.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

टोळी शोधत त्या दुसय्रा टोळीत घुसायचा प्रयत्न करतो,ते आपल्याला हुसकतात अथवा लक्षच देत नाहीत. हरणाच्या पिंजय्रातल्या सशा/कासवांसारखे आपण तिथे राहतो. मग अस्वल बनून एकटेच धुंदित राहतो. नात्यांची फिकिर न करता ढोलीत झोपा काढतो. अचानक जागे होऊन पुन्हा टोळीच्या शोधात. कधीकधी माकडा/वानरांसारखी टोळी तयार होते थोडे दिवस.
(रूपक)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेख शुचीतै..
फक्त

इन फॅक्ट प्रत्येकाला कदाचित तशा नात्याची गरजही वाटतं नसेल.

हे पटलं नाही.
'माझिया जातिचा मज भेटो कोणि' ही आस प्रत्येकालाच असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ध‌न्य‌वाद पुंबा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुची, कल्पना/ विचार मस्त मांडलेयस पण शेवटापाशी मी थोडी अडखळले. काही गाळलं आहेस का लिहीताना? निष्कर्ष म्हणून काय म्हणायच आहे ते नक्की कळलं नाही. अशी टोळी आपल्याला मिळते की नाही? का कायमच या शोधात असतो आपण? का अजून वेगळं काही?
कधी कधी एखाद्या टोळीत आपल्याला सामावून घेतले जावे असं वाटतही असतं पण वयानुसार वाढत गेलेली आपल्याच सवयी,विचार,बंधनं आड येतात. अशीही मजा होते की अशी टोळी मनात अस्तित्वात असते पण त्या टोळीतल्या सदस्याची परस्परांशी ओळखही नसते.

असे कोणीतरी हवे ज्या व्यक्तीपुढे काय वाट्टेल ते बोलता यावे, मनातले सांगता यावे, अगदी अग्ली, कुरूप होता यावे, आपली सारी ऑब्सेशन्स, कम्पल्शन्स, पूवर्वजन्माच्या संस्कारांचे रेसिड्यूज उघड करता यावे. असा मित्र अशी मैत्रीण जी आपल्या ट्राइबची असावी. आपल्यासारख्या idiosyncrasies असलेली, आपल्या कुरुपतेला ना हसणारी असावी.

खरंच ही ओढ जाणवत आलीय आणि जाणवते. मी बरेचदा खर्‍या मैत्रीबद्द्ल वाचते,ऐकते तेव्हा तेव्हा मला जाणवत जातं की अश्या मैत्रीचा अनुभव मी कधीच घेतलेला नाही. विद्यार्थीवयात तरूणवयात (तेव्हा मोबाईल नसतानाही) हे मैत्रीचे धागे असेच अतूट रहाणार असं वाटायचं पण आतातर प्रत्येक मैत्रीचे धागे जोडताना जुने मैत्र जागवतानाही दोन्ही बाजूंनी काहीतरी राखून ठेवलं जातय हे जाणवतं.
कधी कधी असं वाटतं, आपल्या कुरुपतेला समोरचा हसणार, असं वाटणंच तुम्हाला मैत्री पासून दूर ठेवतं. ती भावना काढून ठेवता आली तर कोणाशीही निखळ मैत्री होऊ शकेल. मग आपण कोणाच्या टोळीत नाही सगळेच आपल्या टोळीत.;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय‌ अंत‌रा मी काही भाग‌ गाळ‌ला आहे.
मात्र स‌र्वांना टोळि मिळ‌तेच असे नाही हेच स‌त्य‌ आहे.
काटे टोचुन टोचुन, पायाचे त‌ळ‌वे क‌से बघ‌ निब‌र‌स‌र‌ होतात त‌स‌ं म‌न‌ही निब‌र‌ होत‌ं. निब‌र‌चा अर्थ‌ निग‌र‌ग‌ट्ट नाही. निब‌र‌ म्ह‌ण‌जे डिफेन्सिव्ह्. स्व‌त:ला स‌त‌त ज‌प‌णार‌ं. आणि म‌ग कोणाही पुढे म‌नाने निर्व‌स्त्र होता येत‌ नाही, आप‌ले अचिल्स हील‌ दाख‌विता येत‌ नाही.
ज‌र‌ स‌ब‌कॉन्श‌स‌म‌धुन , कॉन्श‌स‌ म‌नात येणारे कुरुप रेसिड्युज चा निच‌रा क‌राय‌चा असेल त‌र क‌सा क‌राय‌चा? काऊन्सिल‌र‌? की मैत्र्?
असे एखादे मैत्र अस‌णे आरोग्याक‌र‌ता ग‌र‌जेचे अस‌ते. प‌ण व्याप‌ अस‌तात त्या मैत्रालाही आप‌ल्यालाही. क्व‌चित किंब‌हुना अनेक‌दाच कुरुप‌प‌णा लोक‌ घेऊ श‌क‌त‌ नाहीत्.
प‌ण रिस्क घेण‌ं सोडाय‌च‌ं न‌स‌त‌ं. टेक‌ अ रिस्क लेट अद‌र‌ प‌र्स‌न रिकॉइल्.
१००० ज‌ण‌ रिकॉइल‌ होतात प‌ण एक‌ व्य‌क्ती ब्रेव्ह साप‌ड‌ते आणी ती व्य‌क्ति ज‌न्माला पुर‌ते.
___
प‌ण‌ असा मित्र‍मैत्रिणिचा थेर‌प्युटीक उप‌योग केला जावा का? म‌ला वाट‌त‌ं ज‌रुर केला जावा. आणि वेळ‌प्र‌स‌ंगी त्या व्य‌क्तीचा कुरुप‌प‌णा, ह‌ळ‌वेप‌णा, विचित्र‌प‌णा आप‌ण‌ही सांभाळून घ्यावा अग‌दी मायेने, प्रेमाने.

देणाऱ्याने देत‌ जावे, घेणाऱ्याने घेत‌ जावे,
घेणाऱ्याने एके दिव‌शी देणाऱ्याचे हात घ्यावे

.
स‌ग‌ळ‌ं सार आहे "विश्वास्" या श‌ब्दात्. "विश्वास्" ही अतिश‌य सुंद‌र‌ भाव‌ना आहे. होय‌ ते ज‌से मूल्य‌ आहे त‌शीच भाव‌नाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला आहे हो लेख ..
.... प‌ण‌ असा मित्र‍मैत्रिणिचा थेर‌प्युटीक उप‌योग केला जावा का? म‌ला वाट‌त‌ं ज‌रुर केला जावा. .... एकदम बरोब्बर . मी तर म्हणतो खरा आपल्या टोळीवाला असेल तर उपयोग केला जावा का असा प्रश्नच पडत नाही .. तो होऊनच जातो . ( भरपूर टोळयांवाला बापट )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile ध‌न्य‌वाद अण्णा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना विस्तार हा शब्द सुचला नव्हता तो वर प्रतिसादात आला. हे सर्वांनाच जमत नाही. इतके भावविवश होऊन टोळी शोधण्याचा स्वभाव असावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile ख‌रे आहे श‌र‌द‌जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0