रातकिडा

रातकिडा कोणी कोणी पाहिलंय रातकिड्याला किंचाळताना? मी तर अजून पर्यंत रातकिड्याला पाहिलंय सुद्धा नाही.
लहान असताना दिवाळी-मे च्या सुट्टीत आम्ही गावाला म्हणजे अलिबाग ला जात असू तेथे आमचं कौलारु मातीचे जुने घर होते, आमची आज्जी तेथे एकटीच राहत असे, घराच्या माळावर ती लोणचे, आंबोशी, सुकट-बोंबील यांची साठेबाजी करायची जी परत जाताना आम्ही घेऊन जात असू. आम्ही आंबोशी खाण्यासाठी दिवसा हि माळावर जायला घाबरत असू कारण तेथे कौलांच्या फटीतून येणाऱ्या सुर्यप्रकाश हा एकच उजेडाच स्रोत होता त्यात भर म्हणून रातकीडे जे दिवसाही किर्र करायचे.

थोडे मोठे झाल्यावर तो ओरडणारा प्राणी पकडायचा या साठी तासन तास वाया घालवले पण तो काही भेटला नाही.मग मी आणि माझा भाऊ संभावित रातीड्याच्या घराजवळ जाऊन जोरात किंचाळत असू परिणामी रातकिडा काही क्षणा करिता शांत होत असे. व आम्ही जिंकलेल्या मुद्रेत जिना उतरून खाली येत असू. पण आमचा शत्रू पुन्हा ओरडायला लागत असे.

आणखी पुढे जरा जास्त अक्कल आली आणि समजलं कि तो रडत नसून आपल्या प्रेयसीला मिलनासाठी हाक देत आहे व प्रेयसी ते सुमधुर संगीत ऐकून त्यापाशी येत आहे. तेव्हा मी रातकिड्याचा शोध थांबवला. (कशाला डिस्टर्ब करायच!) त्याच्या आवाजाचे भरपूर टोन असून प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ असतात.(ते अर्थ फक्त त्या मादीलाच कळतात तुम्हाला नाही).

तुम्ही पाहिलंय का कधी रातकिडा? आम्हाला सुद्धा सांगा कसा दिसतो तो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

येथे प‌हा रात‌किडा आणि ऐका त्याची किर‌किर‌!

गूग‌ल‌नाथ‌ स‌हाय‌ क‌रे ज‌ब‌ कौन‌ बिगाड‌ क‌रे न‌र‌ तेरो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाक‌तोडा अस‌तो, पायाव‌र‌ पाय‌ घासुन आवाज‌ क‌र‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0