आत्महत्या , नक्षलवाद, लोकशाही मार्गाने आंदोलन; लोक पर्याय कसा निवडतात

आज ही बातमी मी वाचली.

http://www.loksatta.com/mumbai-news/farmers-collective-suicide-warning-t...

सामूहिक आत्महत्येचा इशारा
नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी शिवारात गळफास लटकवले

दुसरीकडे देशात काही ठिकाणी लोक सशस्त्र उठाव करत आहेत.
आणि तिसरीकडे बरेच लोक लोकशाही मार्गाने त्यांच्या समस्या सोडवू पहात आहेत.

या सगळ्या गोष्टी "समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे" एकाच स्पेक्ट्रमवर पण वेगवेगळ्या टोकाला येतात.

मला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोणत्या विशिष्ट परिस्थिती आल्या की लोक एका विशिष्ट मार्गाचा अवलम्ब करतात?

म्हणजे भारतात भ्रष्टाचार सुरु आहे याची बोंबाबोंब वर्षानुवर्षे आहे- तरीपण सामान्य जनतेने त्या विरोधात एखाद्या नेत्याचा खून केल्याचे मला माहित नाही. (कोणाला माहित असल्यास उदाहरणे द्यावीत). याचा असा अर्थ लावता येईल का, की जनता अजूनही सत्ताधाऱ्यांवर "प्रेम करते"?

field_vote: 
0
No votes yet

नेत्याचा भष्टाचार केलाय म्हणून खून केल्याचं ऐकलं नाहीये. एक कारण असंही असू शकेल की बोंबाबोंब कितीही केली तरी आपण ( म्हणजे भारतीय ) भ्रष्टाचाराला खून करण्याईतपत वाईट मानत नसावोत . प्रांतिक , जातीय , धार्मिक संवेदना आणि अस्मिता आपल्याला जास्त महत्वाच्या वाटत असाव्यात . उदाहरणार्थ : जातीबाहेर लग्न ऑनर किलिंग , घरात बीफ ठेवलंय या संशयावरून खून वगैरे , किंवा पाकिस्तानात ब्लास्फेमी च्या संशयावरून खून वगैरे .( यात जबरी चोरी/ दरोडे/ अंडरवर्ल्ड सुपार्या यातील खून मी गृहीत धरत नाहीये )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समस्या कशाला म्हणायचे आणि आंदोलन कुठल्या प्रकारे चालवायचं यावर पूर्वी तरी लोकल प्रामाणिक नेतृत्वावर अवलंबुन असे . सध्या मात्र आंदोलने ही एक इव्हेंट म्हणून चालवली जात असावीत . पब्लिसिटी , इन्फ्रास्ट्रक्चर , रिसोर्सेस , ऑपरेटिंग manpower , या सगळ्याचा चोख विचार होत असावा . ( अण्णा , रामदेवबाबा , मराठा मोर्चा ही आंदोलने अत्यंत प्रोफेशनली चालवल्या सारखी वाटली .हे मी आंदोलनाच्या उद्देशावर लिहीत नसून पद्धधती बद्दल लिहीत आहे . )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम‌चा प्र‌श्न थोडा भिन्न‌ आहे हे माहितिये म‌ला....

प‌ण्

The myth of the rational voter - why democracies choose bad policies - लेख‌क Bryan Caplan

पीडीएफ ह‌वी अस‌ल्यास तुम‌चा इमेल व्य‌ नि क‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This book develops an alternative story of how democracy fails. The
central idea is that voters are worse than ignorant; they are, in a word,
irrational—and vote accordingly. Economists and cognitive psychologists
usually presume that everyone “processes information” to the
best of his ability.6 Yet common sense tells us that emotion and ideology—not
just the facts ortheir “processing”—powerfully sway human
judgment.

म‌स्त वाट‌त‌य्. कॉग्निटिव्ह साय‌कॉलॉजी आली की म‌ला आव‌ड‌त‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

दुसरीकडे देशात काही ठिकाणी लोक सशस्त्र उठाव करत आहेत.

उगाच काहीत‌री खोटेनाटे प‌स‌र‌वु न‌का. हे जे कोण‌ लोक‌ गोळ्या घालुन लोकांना मार‌त आहेत ते उठाव व‌गैरे क‌र‌त न‌सुन स्व‌ताची दुकाने चाल‌व‌त आहेत्. उगाच डाकुंना मोठे क‌राय‌च्या मागे लागु न‌का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ह‌म‌त‌ आहे. न‌क्ष‌ल‌वादी, त्यांचे श‌ह‌रांतील स‌म‌र्थ‌क‌, आणि लोक‌शाहीवादी अस‌ल्याचे ढोंग क‌रून डाव्या द‌ह‌श‌त‌वादाला पाठीशी घाल‌णारे जे क‌र‌तात त्याला उटाव‌, क्रांती-बिंती म्ह‌णू न‌ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

क्रांती म्हणण्या सारखे सखोल तत्वज्ञान नक्षल वादा मागे आहे असे मला ही वाटत नाही. प्रणव ने ही तसे म्हटलेले नाही. पण जर का संघटीत पणे काही हजार माणसे (भारताच्या मानाने हा आकडा मोठा नसला तरीही) जीवावर उदार होण्या एव्हडी पेटत असतील तर त्यांचे Grievances गभीर आहेत आणि ते सोडवण्याचा अहिंसक मार्ग अयशस्वी झालाय असेच दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोणत्या विशिष्ट परिस्थिती आल्या की लोक एका विशिष्ट मार्गाचा अवलम्ब करतात?<<

स‌ध्या त‌री भार‌तात‌ असं चित्र‌ आहे की न‌क्ष‌ल‌वाद‌ / हिंस‌क‌ आंदोल‌न‌ं स‌र‌कारांना झेप‌त नाही आहेत‌. त्याउल‌ट‌ लोक‌शाही मार्गांनी केलेली आंदोल‌न‌ं द‌ड‌प‌शाही क‌रून स‌र‌कार‌ चिर‌डून टाक‌त‌ं आहे. त्यामुळे लोक‌शाही मूल्यं न‌ पाळ‌णारी आंदोल‌नं स‌ध्या जोमात आहेत असं वाट‌त‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"सामान्य जनतेने त्या विरोधात एखाद्या नेत्याचा खून"
खून करणारयाला सामान्य समजतच नाहीत ना....., नाहीतर नक्षलवाद्यांनी छत्तीसगड मधील कॉंग्रेस चे संपूर्ण नेतृत्व ठार केल्याचे विसरला नसता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे! हे माहितीच नव्हते मला ..

२०१३ च्या हल्ल्यावर गुगलून पाहिले ..

http://timesofindia.indiatimes.com/india/Maoists-kill-Salwa-Judum-founde...?

ही बातमी वाचून असे वाटते की त्यांनी तो हल्ला केला कारण "सलवा जुडुम" संघटना तयार करून नक्षलवाद्यावर हल्ले होत होते. म्हणजे कारण भ्रष्टाचार असे नसून केवळ हल्ल्याला प्रत्युत्तर असे होते.

पण मग नंतर मला त्या हल्लेखोरांचे मीडिया स्टेटमेंट मिळाले

http://www.bannedthought.net/India/CPI-Maoist-Docs/Statements-2013/13052...

त्यात त्यांनी त्या महेंद्र कर्मावर फार डिटेलमध्ये अभ्यास केला आहे असे दिसते. आणि त्या अजूनही बरीच करणे दिली आहेत. आता खरे कारण काय आहे ते माहित नाही.

एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे - या हल्लेखोरांचे हिंदी/इंग्लिश एवढे चांगले कसे काय - आणि त्यांचे विचार ते इतक्या "नॉर्मल" भाषेत कसे काय लिहू शकतात ..

उदा. दाभोलकार हत्येवरचे त्यांचे स्टेटमेंट कोणत्याही नॉर्मल विरोधी पक्षासारखे वाटते
http://www.bannedthought.net/India/CPI-Maoist-Docs/Statements-2013/13090...

आणि http://www.bannedthought.net/India/CPI-Maoist-Docs/Statements-2013/13101...

"छत्तीसगढ़ विधानसभा चुनावों का बहिष्कार करो!"

"जनता की वास्तविक समस्याएं संसद और विधानसभाओं में कभी भी चर्चा का विषय नहीं बन सकती हैं। संसद-विधानसभाओं पर साम्राज्यवादियों, दलाल बड़े व्यापारिक घरानों, बड़े जमींदारों, ठेकेदारों और माफियाओं का नियंत्रण है। चुनाव की व्यवस्था एक बड़ा झूठ है और जनता को इस खर्चीले उत्सव की कोई जरूरत नहीं है। ऐसी व्यवस्था को लोकतंत्र कतई नहीं कहा जा सकता जहां वोटों को शराब और पैसे से, धर्म और जातिगत भावनाओं के नाम पर खरीदा जाता है। जब अपराधी, डकैत और कुख्यात भ्रष्ट राजनेता चुनाव जीत सकते हैं और जब वोट बंदूक की ताकत एवं बूथ कब्जाने के आधार पर पाये जाते हैं तब इसे लोकतंत्र कहना बेहद हास्यास्पद होगा। इसीलिए हमारी पार्टी संसदीय व्यवस्था के बहिष्कार का आह्वान करती है। क्योंकि संसदीय संस्थाएं भ्रम पैदा करने के अलावा और कुछ नहीं कर सकतीं। दरअसल वोट देना और नहीं देना दोनों भी जनता के जनवादी अधिकार हैं। इसलिए चुनाव बहिष्कार हमारा जायज अधिकार भी है।"

हे वाचून त्यांचे मत कोणत्याही मतदान न करणाऱ्या निराशावादी सामान्य माणसारखेच आहे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे भारतात भ्रष्टाचार सुरु आहे याची बोंबाबोंब वर्षानुवर्षे आहे- तरीपण सामान्य जनतेने त्या विरोधात एखाद्या नेत्याचा खून केल्याचे मला माहित नाही. (कोणाला माहित असल्यास उदाहरणे द्यावीत). याचा असा अर्थ लावता येईल का, की जनता अजूनही सत्ताधाऱ्यांवर "प्रेम करते"?

Can politicians be trusted to look carefully after the long-run interest of the general public ?.

हे इथे ड‌क‌व‌ण्याचे कार‌ण काय ?
उत्त‌र - लोक क‌सा निर्ण‌य घेतात, प‌र्याय क‌से निव‌ड‌तात् त्याचे अत्य‌ंत म‌स्त विवेच‌न यात आहे. अर्थात‌च नेह‌मीचा घिसापिटा आक्षेप असेल‌च की हे सिम्प्लिस्टिक आहे. प‌ण मुद्द्याचा म‌तितार्थ स‌म‌ज‌णे ग‌र‌जेचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is of great concern to the politician is today, the present, the here and now. The more the politician improves today's state of affairs for his constituents, the greater are his chances of surviving politically past the next election. But improving today too often involves ignoring the future. This reality is why, for example, politicians love to spend borrowed money.

सेम लॉजिक ने असे पण म्हणता येईल का की सामान्य लोकांसाठी लोकशाही मार्ग हा जास्त वेळखाऊ मार्ग आहे - त्यापेक्षा मागण्या मान्य करून घेण्यासाठी खून करणे पर्याय आजचे प्रश्न आजच सोडवतो (?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0