अशांत...

अशांत अशा या कातरवेळी
खट्टू झालो माझ्याचवर,
बसलो आहे पारावरती
मन जातय डोंगरावर...

डोंगराच्याच गावातला
एक भकास बोडखा डोंगर
ज्यावर न जाणे नसायची
कधीच कसली हिरवळ...

माझ्या सारखाच भासे तो मला
जणू त्याला आवडायची नाही
कुणाचीही वर्दळ...

हटकून मग मी त्यावर जायचो
माझ्या मनातल्या सग्गळ्या बाता
अगदी अगदी सगळ्या कथा
बळेचच त्याच्याशी शेअर करायचो...

तोही सगळ ऐकूण घ्यायचा
माझीच दुसरी बाजू जणू
माझ्या सिगरेटच्या कश बरोबर
माझ्यासारखाच बेधुंद व्हायचा...

ऐके दिवशी न रहावून
मी त्याला विचारल
माझ्या फालतू senty बाता
कसा रे रोज करतोस सहन?

विट आलाय मिञांना पण ह्याचा,
म्हणतात आज कोणता विचार आहे?
म्हणूनच मग नाईलाजाने
तुझ्यापर्यंत आलो आहे...

क्षणभर थांबून बोलला तो
मीही तुझ्यासारखाच आहे
मी सगळ ऐकतो
कारण तु तेच बोलतोस
जे कुणाला सांगण्यासाठी
मी आपर्यंत कुढत आलोय...

म्हणूनच माझ्यावरती हिरवळ नाही
ना कुणाची वर्दळ नाही
कितीदा तरी प्रयत्न केला पण
सगळ्यांना वाटल मला मनच नाही...

सारच उमजल एका क्षणात...

ऊदास असतानाच मी येतो
हे का त्याला कळत नव्हत!
तरीही तो जवळ घेतो
का ते? मला माञ वळत नव्हत...

पुढे कित्येक दिवस मी
दररोज त्याला भेटायचो
काही विषय नसला तरी
hi, bye करुन यायचो...

त्या दिवशी डोंगराच गाव सोडताना
आवरत नव्हता मला आवेग,
कोरुन घेतली त्याची आठवण
मी माझ्या हातावर एक

ती खुण अजून ठसठसते
जेंव्हा मी एकटा असतो...
जेंव्हा मी उदास बसतो...
जेंव्हा मी अशांत असतो...

field_vote: 
0
No votes yet