Skip to main content

आदिप्र‌श्न‌

धगधगे कोटी सूर्यांचे
स्थंडिल अह‌र्निश‌ जेथे
ल‌वथ‌व‌त्या चैत‌न्याचे
का बीज‌ जन्मते तेथे ?

अणुगर्भ उक‌लुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?

का अंत असे ज्ञेयाला ?
का ज्ञान तोकडे ठरते?
का सीमा अज्ञेयाची,
अज्ञात प्रदेशी वसते ?